विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन
- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार
▶️राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
- राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.
▶️सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती
- लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच
- नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
- नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
- वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण
- स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
- नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्यांच्या उद्योगाला चालना
- मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार
- 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
- मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
- 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
- 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
- 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार.
▶️पर्यटनाला चालना...
- प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
- 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
- राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश.
▶️सशक्त युवा.... खेळांना प्रोत्साहन
- खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
- बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
- पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान
- नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये.
▶️झाडे झुडे जीव सोईरे पाषाण...
पर्यावरणपूरक विकास
- राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
- 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
- भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
- 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
- एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
- डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
- पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
- ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
- गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
- शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी.
▶️नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी,
अपराधसिद्धतेत वाढीसाठी....
- न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण
- न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार
- 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट
- मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार
- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प
- राज्यात दोन नवीन कारागृह
- देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह
- 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये.