𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Ir al canal en Telegram
6 967
Suscriptores
+324 horas
+87 días
+1630 días
Archivo de publicaciones
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
https://m.youtube.com/watch?v=D7Y-nJ8uiEA&pp=ygUMZGhydXYgcmF0aGVl
✔️How to Find Your Inner Talent- Various Career Options by Dhruv Rathi
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 1Join @mpscguidnce
#MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती स्पर्धा परीक्षा #MAT न्यायाधिकरणाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. आता परीक्षार्थींना सरळ उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.
♦️महिला आरक्षण विधेयक - फेटाळले
> मतदानासाठी उपस्थित - 528 सदस्य
> मंजुरी साठी - 352 मतांची आवश्यकता
● विधेयकाच्या बाजूने -298 मते पडली
● विरोधात - 230 मते पडली..
TAX Assistant की Clerk? निवड तुमची, पण वास्तव जाणून घ्या!
जर तुमची Tax Assistant पदावर निवड निश्चित असेल आणि तरीही Clerk पदाला 'No Preference' द्यायला मन तयार होत नसेल, तर खालील मुद्द्यांवर नक्की विचार करा. Tax Assistant हे पद क्लर्कपेक्षा सरस का आहे?
✅ आर्थिक संपन्नता/ पगार: क्लर्कच्या तुलनेत पगारात दरमहा तब्बल १५ ते २० हजारांचा फरक आहे.
✅ मुंबई पुण्यात घर घेण्याचे स्वप्न: ५ वर्षांच्या सेवेनंतर Basic च्या १२५% HBA (House Building Advance) मिळते. क्लर्कच्या तुलनेत TA ला BASIC जास्त असल्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात स्वतःचा ६०-७० लाखांचा फ्लॅट घेणं सहज शक्य होतं.
✅ Promotion - केवळ ४ ते ५ वर्षांच्या कालखंडात तुम्ही STI (State Tax Inspector) पदी बढती मिळवू शकता. ही संधी क्लर्क पदात इतक्या लवकर मिळत नाही.
✅ कामाचा नो ताण: फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने सोडले, तर कामाचा कोणताही मोठा ताण नसतो.
✅ पुढील अभ्यासासाठी वेळ: तुमच्या अनुपस्थितीत कामे अडकून राहत नाहीत, त्यामुळे COMBINE किंवा इतर परीक्षांच्या तयारीसाठी तुम्ही हव्या तितक्या सुट्ट्या घेऊ शकता... कोणी त्रास देत नाही..
✅ सुट्ट्यांची मज्जाच मज्जा: शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्या आल्यास, मधल्या दिवशी CL टाकून सलग ४-५ दिवस गावी जाऊन 'हवागिरी' करण्याची पूर्ण मुभा मिळते..
✅ राहणीमान आणि सोयीसुविधा
मुंबईतील वास्तव्य: अटल सेतूमुळे आता प्रवासाचा ताण उरलेला नाही. करंजाडे, उल्वे यांसारख्या विकसित भागात राहून तुम्ही कुटुंबियांना दर्जेदार आयुष्य देऊ शकता.( तीन..चार वर्षानंतर.. पुणे..संभाजी नगर.. कोल्हापूर.. इत्यादी जिल्ह्याच्या ठीकाणी बदल्यांचे Chances..)
✅ क्रीडा आणि छंद: क्रिकेटप्रेमींसाठी करंजाडे क्रिकेट लीग, GST फ्रेंडशिप लीग आणि 'इंद्रधनुष्य' यांसारख्या विविध स्पोर्ट्स टूर्नामेंट्सची पर्वणी असते... शनिवार रविवार Badminton.. ट्रेकींग.. वगैरे छंद जोपासू शकता..
✅ थोडक्यात सांगायचे तर...
चांगल्या शहरात राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल.. तर क्लर्कपेक्षा Tax Assistant कधीही भारीच!
➡️ जर Tax Assistant पद Confirm झालय तर... क्लर्कला " No Preference" देऊन पुण्य कमवा.. ते पुण्य GST मधील चांगल्या पोस्टींगसाठी नक्की कामी येईल...😊😊🔥🔥
टीम मराठीमय 🙏
@Marathimay
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील(Opting Out/Preference) वेबलिंक उपलब्ध झाली आहे
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT
अंतिम तारीख - 20 एप्रिल 2026
नमस्कार सर,
मी भूषण.
मी सध्या Tax Assistant पदासाठी waiting list मध्ये आहे आणि Clerk या पदासाठी प्रयत्न करत आहे. सर, माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे.
मी सध्या सदाशिव पेठेतील Domino's मध्ये pizza delivery चे काम करत अभ्यास करत आहे. अनेक वेळा मी कमी मार्क्समुळे थोडक्यात मागे राहिलो आहे.
माझे वडील हयात नाहीत. घरी आई एकटीच आहे आणि ती मजुरी करून घर चालवते. गेल्या पाच-सव्वा पाच वर्षांपासून मी pre आणि mains च्या प्रक्रियेत अडकलो आहे.
म्हणूनच मला तुमची मदत खूप गरजेची आहे. तुम्ही जर वैयक्तिक आवाहन केलं, तर Tax Assistant पदासाठी निवड झालेली उमेदवार “no preference” हा पर्याय निवडतील. त्यामुळे काही जागा रिक्त होतील आणि मला संधी मिळू शकेल.
माझी आई गावाला माझ्या निकालाची वाट पाहत आहे सर.
Please मला मदत करा.🙏🏻
आपला विश्वासू,
भूषण
( नम्र विनंती - कर सहायक पद Confirm असेल तर.. Clerk ला No Preference द्यावा )
@Marathimay
🔥🔥🔥
राज्यातील शासकीय भरती प्रक्रियेत मोठे बदल.☑️☑️
MPSC मधे 102 संवर्ग 🔥
PSI & अराजपत्रित पदांच्या मुलाखत पद्धत बंद 👍
सरळसेवेसाठी अनुभव अट रद्द
Join👉@aaspirant_club
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा ‼️💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
♦️MPSC च्या जाहीरातीनंतर नऊ महिन्यांत निकाल !
भरती प्रक्रियेला वेग देण्यावर आयोगाचा भर....
आयोगाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेला गती देण्यावर भर आहे. रखडलेल्या काही परीक्षा, निकाल आणि मुलाखती वेळेत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-महेंद्र हरपाळकर, सचिव, MPSC
🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत
नमस्कार मित्रांनो 🙏
MPSC लिपिक-टंकलेखक पदाचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्या एका जबाबदार आणि सामाजिक भान राखलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेषतः Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या आणि आधीपासून कार्यरत असलेल्या मित्रांना हे कळकळीचे आवाहन आहे.
📅 वेबलिंक १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.
1️⃣ Tax Assistant (2024) पदी निवड झालेल्या मित्रांसाठी:
ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि जे ‘Tax’ पदावर जॉईन करणार आहेत, त्यांनी क्लर्कच्या वेबलिंकवर जाऊन ‘No Preference’ निवडणे आवश्यक आहे.
⚠️ जर तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही, तर मुख्य परीक्षेतील जुने पसंतीक्रम Default म्हणून गृहीत धरले जातील. त्यामुळे तुमचे नाव विनाकारण लिपिकच्या यादीत येऊ शकते. 👉 यामुळे कट-ऑफ वाढतो आणि तुम्ही जॉईन न केल्यास ती जागा कायमची रिक्त राहू शकते.
2️⃣ आधीपासून कार्यरत / 2023 मधील क्लर्क उमेदवारांसाठी:
👤 जे उमेदवार आधीपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांना क्लर्क पदावर यायची इच्छा नाही: ➡️ त्यांनी कृपया पसंतीक्रम भरू नयेत किंवा ‘No Preference’ निवडावे.
📌 2023 मध्ये आधीच क्लर्क म्हणून रुजू झालेले उमेदवार: ➡️ जर तुम्हाला तुमचे इच्छित ठिकाण मिळाले असेल, तर कृपया पुन्हा या प्रक्रियेत जागा अडवू नका. 💡 तुमच्या एका ‘No Preference’ मुळे नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते.
3️⃣ तांत्रिक मुद्द्यांचे गांभीर्य:
🚫 या भरतीत वेटिंग लिस्ट नसल्यामुळे, जर जागा सोडली तर ती पुढील भरतीपर्यंत रिक्त राहते. ➡️ यामुळे एका पात्र उमेदवाराची संधी कायमची नष्ट होते.
♿ समांतर आरक्षणामुळे काही प्रवर्गातील जागा कमी होत आहेत, त्यामुळे उपलब्ध जागांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
🎯 ➡️ फक्त आवश्यक आणि इच्छित प्राधिकरणच निवडा. ➡️ उर्वरित ठिकाणी ‘No Preference’ द्या. ➡️ निवड झाल्यानंतर जायचे नसेल, तर वेळेत Opt-out करा.
🙏 आमची नम्र विनंती:
लिपिक पदाचा संभाव्य कट-ऑफ तुम्ही तुमच्या GML रँकवरून सहज ओळखू शकता. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास अनुभवला आहे. ❌ “बघू काय होतंय” ❌ “जागा अडवून ठेवू” ही मानसिकता टाळा. ✔️ केवळ आवश्यक असेल तेव्हाच पसंतीक्रम भरा.
✨ लक्षात ठेवा: 👉 तुमचा एक ‘No Preference’ पर्याय, एका मित्राला नोकरी मिळवून देऊ शकतो!
+1
व्ही. राधा मॅडम -सामान्य प्रशासन विभाग अप्पर मुख्य सचिव 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
#uddeshblogs
OPTOUT का ?🌿
एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.
पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.
एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…
ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..
आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂
©उद्देश
