We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más757
Suscriptores
-124 horas
+17 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
शिष्यवृत्तीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं की त्याचा लाभ मिळत नाही म्हणून मी सांगतो,
23-24 मध्ये जेवढ्या लोकांनी अर्ज केला त्यापैकी 95.58 टक्के लोकांना आपण रक्कम वितरित केली.
24-25 मध्ये 91.89% लोकांना आपण वितरित केली.
पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
23-24 मध्ये 98 टक्के विद्यार्थी आणि 24-25 मध्ये 96 टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
"उमेद मॉलच्या संदर्भात विषय उपस्थित केला, या संदर्भातला निर्णय
पहिल्या टप्प्यामध्ये
पुणे विभागात सातारा पुणे सोलापूर
कोकण विभागात रत्नागिरी आणि ठाणे
नाशिक विभागात जळगाव
छत्रपती संभाजीनगर विभागात बीड छत्रपती संभाजीनगर धाराशीव
अमरावती विभागात यवतमाळ आणि अकोला
नागपूर विभागात वर्धा आणि नागपूर या जिल्ह्याचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात इथे आपण यावर्षी सुरू करतो आहोत. पुढच्या टप्प्यात सगळे जिल्हे जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत."
एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा केला होता.
24-25 मध्ये 767 रोजगार मेळावे आयोजित केले या मेळाव्यात 38 हजार 512 उमेदवारांची नोकरी करता निवड झाली
25-26 मध्ये 372 रोजगार मेळावे आयोजित केले त्यामध्ये 24 हजार 101 उमेदवारांची नोकरी करता निवड करण्यात आली
त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं तर हे अतिशय यशस्वी होता आहेत.
ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही हिंदवी स्वराज्याची भूमी आहे… इथे हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूचे समर्थन खपवून घेतले जाणार नाही
हिंदू मिलच्या स्मारकाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता,
आता याच्यामध्ये स्ट्रक्चरल काम 100 टक्के पूर्ण आहेत, प्रवेशदार इमारत 96 टक्के पूर्ण आहे, व्याख्यान वर्ग 98 टक्के पूर्ण आहे, ग्रंथालय 99 टक्के पूर्ण आहे, प्रेक्षागृह 92 टक्के पूर्ण आहे,
आणि आता 230 फुटाचा पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण झालेला आहे. यावर्षी 400 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे
मागेल त्याला कृषी पंपाची घोषणा केली होती, मला सांगताना आनंद वाटतो की,
आत्तापर्यंत 85% लोकांना पंप ऑलरेडी आपण देऊन टाकले...
आपण जर विचार केला तर 2004 ते 2019 या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 14 लाख 74 हजार पंप बसवले.
2022 ते 2025 वर्षांमध्ये आपण 10 लाख 63 हजार पंप बसवले.
आपल्याला माहिती आहे, आता एका महिन्यामध्ये 50 हजार पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंदणी झालेली आहे.
आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी, 15 हजार 472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये आपण दिलेले आहेत
आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेल आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत
शाळांचा जर आपण एक विचार केला तर, त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही....
आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत.
आणि या शाळांमध्ये एकूण 69 % विद्यार्थी हे आमचे शिकतायत
जयंतरावनी तर थ्री इडियट्स मधला डायलॉग देखील आम्हाला सांगितला,
पण त्यातला दुसरा डायलॉग आहे डोन्ट वरी, ऑल इज वेल...ऑल इज वेल..
देशामध्ये एकूण 119 युनिकॉर्न आहे या 119 युनिकॉर्न पैकी 28 युनिकॉर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत देशाच्या 25 टक्के जवळपास यूनिकॉर्न किंवा त्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून स्टार्टअप कॅपिटल म्हणून आज महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो
स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नावीन्यता धोरणाला मान्यता दिली.
जवळपास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकरता 500 कोटी रुपयांच्या फंडची आपण व्यवस्था केली आहे.
आणि मला सांगताना आनंद वाटतो की, आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये देशाच स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाच स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाच स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे.
देशातल्या रजिस्टर्ड स्टार्टअप मध्ये सर्वाधिक स्टार्टअप 20% ऑफ द कंट्री हे महाराष्ट्रामध्ये आहेत.
जगभरात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा गौरव, भारताच्या सामर्थ्याची हीच आहे ठळक छाप.
आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत
त्यानुसार 2 लाख 61 हजार 839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे
आणि त्यातन 70 हजार 895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे
आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात किती नियुक्त्या केल्या मला सांगताना आनंद वाटतो की,
महायुतीच सरकार आल्यापासून 1 लाख 20 हजार 449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत
अजून जे शिल्लक आहेत त्यांना पुढच्या दोन महिन्यात नियुक्त्यां देऊ, हा आकडा दीड लाखापर्यंत जाईल...
मी सांगतो की सातत्याने बेरोजगारीचा दर आपण खाली आणतोत, आपण जर बघितलं तर...
बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये हा 4% होता,
23-24 मध्ये 3.3% पर्यंत तो खाली आणला आणि
2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे,
म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे.
थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे, आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते.
दावोस करार -
2022 ला जे करार केले होते त्यातल्या 98 टक्के करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो म्हणजे सिरियसली इन्वेस्टिंग,
2023 मध्ये आपण जे 1 लाख 37 हजार 393 कोटीचे केले होते 19 करार होते त्यापैकी 80 टक्के करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत,
2024 मध्ये आपण 24 करार केले होते 3 लाख 16 हजार 739 कोटीचे त्यातले 70 टक्के करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत आणि
2025 मध्ये आपण 48 करार केले होते जवळपास 12 लाख 23 हजार 81 कोटी रुपयाचे त्यातले 88 टक्के करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत..
एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025 च्या डावोस मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये जेएसडब्ल्यू च्या इलेक्ट्रिक वेहीकलचा करार केला
आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं या जून मध्ये त्यांची पहिली EV ही तयार होते
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे. मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की, साधारणपणे 12- 13 साली आपली अर्थव्यवस्था 13 लाख कोटीची होती.
आता गेल्या 11 वर्षांमध्ये 13 लाख कोटीहून ती किती आली, 51 लाख कोटी हे जवळपास 3 पट आपली अर्थव्यवस्था दहा वर्षांमध्ये आपण नेली.
महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने 500 बिलियन पार करून आता 660 बिलियनवर आपण पोहोचलो आहोत.
राज्याच्या तिजोरीची नाडी देवेंद्रजींना अचूक माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आपल्या मित्राचे तोंडभरून कौतुक
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
