वास्तव (सत्य की आभास)©®
Ir al canal en Telegram
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही..... Contact to Admin👉 @Vastav_bot (For Promotion and others)
Mostrar más3 191
Suscriptores
+124 horas
-27 días
-1230 días
Archivo de publicaciones
"आतुरता भेटीची.."
दिवसामागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा, कधी रे येशील तू?
धरेस भिजवून गेल्या धारा
फुलुन जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीसी जोडून गेले सप्तरंग सेतू
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली
मेघावली नभी पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
--ग दि माडगूळकर
पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो.
ज्यांनी कठीण काळात हात सोडला त्यांचा राग कसला त्यांच्यामुळेच तर कळलं की आपण एकटेही पुरेसे आहोत.
Repost from मराठी सुविचार ✨
काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो.⚘️
HAPPY TEACHERS DAY
@suvichar_marathi
Repost from मराठी सुविचार ✨
आयुष्यातील ज्या वळणावर आपण चुकीच्या मार्गाने जात असतो त्यावेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे असतात ते आपले शिक्षक.
Happy Teacher's Day
@suvichar_marathi
Repost from मराठी सुविचार ✨
शिकवता शिकवता आपणांस आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे, आदराचे स्थान म्हणजे आपले "शिक्षक"
Happy Teacher's Day 👨🏻🏫
@suvichar_marathi
सृष्टीतील मोहक व्यक्तिमत्त्वाचे सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, अतिउच्च उदाहरण म्हणजे ' माधव ' ❤️🦚🥰 आईला तो लाला म्हणून प्रिय आहे , बहिणीला तो कन्हैया म्हणून प्रिय आहे , राधेला तो श्याम म्हणून प्रिय आहे , गोपिकांना तो सखा म्हणून प्रिय आहे, पत्नीला तो आदर्श पती म्हणून प्रिय आहे , योध्याला तो गुरू म्हणून प्रिय आहे , गुरू ला तो शिष्य म्हणून प्रिय आहे अन या भूतलावर परमेश्वराने स्थापन केलेल्या मानवी जीवाला आजही शेकडो वर्षांनंतर कृष्ण देव म्हणून प्रिय आहे ❤️💯 निव्वळ प्रेम निव्वळ प्रेम म्हणजे कृष्ण कृष्ण कृष्ण 🥰
रेशमाच्या धाग्यात गुंफलेत प्रेमाचे अतूट बंध,
बहीण-भावाच्या नात्याचा दरवळतोय गोड सुगंध...
कितीही भांडलो तरी कधीच न आटणारी माया,
या पवित्र नात्यावर राहो कायम सुखाची छाया...
🎀 रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎀
देशावर प्रेम करणं म्हणजे
फक्त तिरंगा लावून फिरणं नाही,
तर आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी
प्रामाणिकपणे निभावणं.!
कारण देश बदलण्यासाठी,
प्रत्येकाने सीमेवर जाण्याची गरज नाही
आपण जिथे आहोत तिथे
थोडं अधिक प्रामाणिक,
थोडं अधिक जबाबदार,
थोडं अधिक माणूस होणं
गरजेचं आहे.!!
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा💐
अशा मन:स्थितीत त्यांनी पंढरी सोडली असेल, आणि आता ते परतीच्या वाटेने देहूला माघारी येत असतील.
पंढरीला असताना जो भजन किर्तनाचा सुखसोहळा वारकऱ्यांनी अनुभवला असेल,त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व परतीच्या वाटेने चालत असताना त्याच विषयी गप्पागोष्टी आता करत असतील.
वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न झाले असेल.
पंढरीला जात असताना वारकऱ्यांच्या हातामध्ये गरुड टके, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यांच्यापासून त्यांना जे सुख झाले आहे, ते सुख ते एकमेकांना सांगत असतील.
तुकाराम महाराज म्हणतात,
“आता ते वारकरी लवकरच येथे येतील, मग मी त्यांना माझे दोन्ही बाहू पसरुन त्यांना क्षेम आलिंगन देईन.”
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳
१९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️
'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩
त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻♂️
भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठूमाऊली च्या दर्शनाचा.. आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…🙏🏻
जय जय रामकृष्ण हरी' 🙏🏻🌸
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻💐💐
जीवनात मोठं होणं अवघड नाही,पण मोठं मन ठेवणं खूप अवघड असतं.पैसा,पद,प्रसिद्धी आणि यश यामुळे माणूस मोठा दिसू शकतो; पण त्याच्या वागण्यात जर नम्रता,करुणा आणि माणुसकी नसेल,तर त्या मोठेपणाला फारसा अर्थ उरत नाही.खरा माणूस तोच,जो दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळसपणे पाहतो.मदत नेहमी पैशानेच होत नाही;कधी एखादा दिलासा देणारा शब्द,कधी आधार देणारा हात,तर कधी फक्त शांतपणे ऐकून घेणंही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतं.आपण जग बदलू शकत नाही,पण आपल्या वागण्याने कोणाचं तरी जग थोडं सुंदर नक्कीच करू शकतो.प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची नवी संधी असते.रागापेक्षा संयम,द्वेषापेक्षा प्रेम आणि अहंकारापेक्षा नम्रता निवडली,तर जीवन अधिक अर्थपूर्ण होतं.शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात;पण तो किती चांगला माणूस होता,हे मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात.म्हणून संपत्तीपेक्षा माणुसकीची श्रीमंती कमवा.तीच आयुष्यभर साथ देणारी खरी संपत्ती आहे.
"मित्रांनो;काळजी घ्या. ..."
