es
Feedback
😊 विचार-सुविचार 😊

😊 विचार-सुविचार 😊

Ir al canal en Telegram

कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्याला नकारात्मक विचारांनी ग्रासले जाऊ नये. आपण आपल्या अभ्यासात आणि कार्यात तितक्याच उत्साहाने,सकारात्मकतेने, आरोग्याची काळजी घेत राहावे यासाठी हा छोटासा प्रयत्न. @Vichar_Suvichar 🌿

Mostrar más
2 384
Suscriptores
Sin datos24 horas
-117 días
-3330 días
Archivo de publicaciones
#DSPTalk ✨ ज्या गोष्टीचा कंटाळा आपल्याला अभ्यास करताना येतो त्याच गोष्टीचा अभावाचा आपल्याला exam मध्ये फटका बसतो... #Think on it... @Vichar_Suvichar🌿

चुकीच माहिती असूनही स्वतःला योग्य दिशेवर नेणे, अवघड असले तरी जमवावे लागेल. जे चांगलं करण्याचा आपण कंटाळा करतो यश कदाचित त्यातच असते. तो पुढाकार आपला स्वतःला त्या चांगल्या कामाकडे ढकलण्याचा असुदे. ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

बरोबर 6 वर्षे आपले हे चॅनेल सुरू होऊन... आजही तोच प्रयत्न... तोच उद्देश समोर आहे.. तुमची मनाची शांतता आणि अभ्यासात सातत्य... याच साठी लेखन प्रपंच ... बोलत राहूयात 😊 @Vichar_Suvichar 🌿

संयम तर राखला पाहिजे... गोष्टी घडतील. आपण कृतीत पाहिजे.. @Vichar_Suvichar 🌿
संयम तर राखला पाहिजे... गोष्टी घडतील. आपण कृतीत पाहिजे.. @Vichar_Suvichar 🌿

एक निरीक्षण... बघा तुम्हाला पटतंय का ते... पेपर कुठलाही झाला की तो अवघड असतो. अवघड म्हणजे भयानक अवघड.... सर्वत्र बाहेर हीच चर्चा असते.. Answer key आल्यावर असं वाटतं आपलं हे चुकलं..ते चुकलं... तेव्हाही पेपर अवघड असतो. Cut off लागला की प्रतिक्रिया बदलतात.... Sad Reality... त्यात मध्ये जागा वाढ calculation सांगणारे ते विषय मी बोललो नाही अजून यात.. ते ही आलेच... जर अंदाजच सगळ्यांचे चुकत असतील तर आता त्यांच्या मतांना विचारात घेऊन तुम्ही पश्यातापाच्यां भूमिकेत का स्वतःला नेताय.. पुढे काही आहे तिथे बदल करण्यावर भर द्या... काल cut off लागला गट ब पूर्व 2025 चा... कोण कोण आपला पूर्व चा पेपर बघितले आहेत.. (हा प्रश्न न पास झालेल्यांसाठी...) त्यात आता आज क च्या जागा वाढल्या.. मूळ गोष्ट काय करायला पाहिजे आपण... ती म्हणजे अभ्यास आहे.. स्पर्धा परीक्षा म्हणजे परीक्षेबद्दल चर्चा न्हवे... सर्वांच हेच होत असतं. पण तुम्हाला थोडं वेगळं वागता आणि तसे जगता आले. तर पूर्व चा पेपर पुन्हा द्यायची वेळ येत नाही... बघा.. तुमच्या मनाशी बोला. आज नियोजन करून कामाला लागा. बाकी आहेच. आपण बोलत राहू.. ©दिनेश #DSPTalk @Vichar_Suvichar🌿

दर रविवारी ठरवतो की काहीतरी voice chat करू असं... पण होत नाही.. अस वाटतं मस्त अभ्यास करत आहेत तर करू देत ना. काही वर्षापूर्वी कोविड होता तेव्हा कसे गावाकडे लोक जात होते आता तसं काहीसं झालंय. युद्धाचे लोण घरापर्यंत आलेत. होईल सुधार लवकरच हे थांबले तर. आशा ठेवा. विश्वास ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आणि अभ्यास करा. अभ्यासच तुमचं खरं ' इंधन ' आहे. तुमच्या प्रगतीसाठी. त्यास पेटते ठेवण्याचा आमचा थोडा ' चिंगारी ' एवढा प्रयत्न. 😊🎯 ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

दृष्टिकोन सर्वकाही... @Vichar_Suvichar🌿
दृष्टिकोन सर्वकाही... @Vichar_Suvichar🌿

#DSPTalk✨ मनातल्या गोष्टी मित्रांनो कोणाशी तरी बोलत जावा. मनाने रिकामे असा. ताण घेऊ नका. काही प्रश्नांचं उत्तर ' वेळ ' हेच असतं. तोपर्यंत संयम ठेवा. काळजी घ्या. ©दिनेश @Vichar_Suvichar 🌿

#DSPTalk ✨ कधी कधी motivation down होते. आपल्याकडून ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत. पण तेव्हा जर आपल्याकडून ठरवून एखादी गोष्ट खाणे होत असेल तर मग तेव्हा विषय हा शिस्तीचा असतो. तुमचा कुठे तर खंड पडला की मग पुन्हा मूळ मार्गावर गाडी लवकर येत नाही. आणि गाडी मार्गावरून खाली येताना सगळ्यात आधी motivation कमी होऊन जाते.. हे करणेच महत्वाचे वाटत नाही... बघा तुम्हाला पटतंय का.. कोणा कोणासोबत होतय असे... ©दिनेश पाटील @Vichar_Suvichar 🌿

खूप बोलता येईल या विषयावर... हे लक्षात घ्या... Exam समोर नसतानाच खरी परीक्षा असते असं मला वाटतं.. तुमचे दिवस कसे अभ्यासमय होता आहेत का ते बघा... अंतर्मुख व्हा.. आणि उद्या नवीन मराठी वर्ष... नव्याने सुरुवात करा. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. ©दिनेश पाटील @Vichar_Suvichar🌿

#DSPTalk ✨ आपलं सगळं बरं चाललेलं असतं... आणि मग एकदिवस कोणतरी कायतर वेगळी गोष्ट सांगते. 😅 आपलं पुढं असलेले सगळंच बदलून जाते. मागे 10 दिवस तुम्ही मस्त अभ्यास केलेला असता तिथून पुढे काही विषयच लागत नाही आपला आपल्याला.... असं तुमचं होतंय का... अस होत असेल तर मग ज्या गोष्टी करून तुम्हाला result येतात तेच बदल तुम्ही करा. Results येत असतील तर बदल स्वीकारून पुढे जा.. प्रत्येकाची पद्धत इथे वेगळी आहे... हे लक्षात ठेवा. आज इतकच ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

#DSPTalk गेलेली वेळ परत येत नाही. जे काही करायचं ते आज,आता, ताबडतोब हवे. "मला हे करायचं ते करायचंय..." असं मनात स्वतःला सांगून काही होणार नाही.. काहीतरी केलच पाहिजे. "चल, एक पान वाचू..." अस म्हणून तरी ती सुरुवात तुमची झालीच पाहिजे. वेळ ' आज ' आहे. उद्या ' नाहीच '... बघा पटतंय का...!! तुमच्या सोबत ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

स्पर्धा परीक्षा संदर्भात ही गोष्ट नक्की जोडून बघा... परीक्षा नसलेल्या महिन्यातच खरी परीक्षा असते.. . . . . . . . . #marathi #competitive #viralreels #mpsc #exams https://www.instagram.com/reel/DV3b2EBATVu/?igsh=MWRjMGp2ZjVsbmw0cg==

#DSPTalk✨ स्पर्धा परीक्षेच्या ह्या प्रोसेस मधून जाताना अशा एका टप्प्यात तुम्ही येता की जिथे तुमच्या इथून पास होऊन बाहेर पडण्याच्या शक्यता जास्त असतात.. नेमकं तिथेच तुमच्याकडून जास्त मेहनतीची अपेक्षा असते. जिथे जे फुगतात. माझं ह्यात झालंय त्यात पण होउन जाईल... हे असे मनात येऊ लागले की समजायचं काम कमी विचार जास्त चालू आहेत.. घ्यावच लागतं हातात मग तेव्हा कुठे तुम्ही ते बोलू शकता...😂 त्या टप्प्याला तुम्हाला बाहेर प्रसिद्धी मिळते पण result नंतरची प्रसिद्धीच खूप महत्वाची आणि शाश्वत असते... बऱ्याच जणांना कळलं असेल तो टप्पा काय आहे...😌 कळलं का..? पटतंय ना...! ©दिनेश @Vichar_Suvichar 🌿