ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

😊 विचार-सुविचार 😊

😊 विचार-सुविचार 😊

الذهاب إلى القناة على Telegram

कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्याला नकारात्मक विचारांनी ग्रासले जाऊ नये. आपण आपल्या अभ्यासात आणि कार्यात तितक्याच उत्साहाने,सकारात्मकतेने, आरोग्याची काळजी घेत राहावे यासाठी हा छोटासा प्रयत्न. @Vichar_Suvichar 🌿

إظهار المزيد
2 545
المشتركون
-324 ساعات
-87 أيام
+1330 أيام
أرشيف المشاركات
#DSPTalk✨ कृतीचा आनंद खूप महत्वाचा असतो... तो आनंद तुम्हाला मिळू लागला की त्या अभ्यासपूर्ण कृती तुमच्याकडून अजून होत जातात. त्यासाठी कोणतीतरी ध्येयपूरक कृती करणेच आवश्यक... ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

✌️
✌️

Repost from N/a
नाना पाटेकर... Great माणूस... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 https://www.instagram.com/reel/DeOWwz8OYM8/?stkn=MWx5cHJ1bWs4cGNjeQ==

#DSPTalk ✨ काळ निघून जातो... ज्या वेळेसाठी प्रयत्न करतोय ती वेळ तर वेळेवर यासाठी सगळा अट्टाहास असतो आपला पण काळ आपल्या हातात नसतो. हातात असतं ते प्रयत्न करणेच... अन् ते प्रयत्न थांबवू नका... खूप महत्वाचे आहेत... बाकी बोलत राहू.. © दिनेश @Vichar_Suvichar 🌿

#DSPTalk ✨ काळ निघून जातो... ज्या वेळेसाठी प्रयत्न करतोय ती वेळ तर वेळेवर यासाठी सगळा अट्टाहास असतो आपला पण काळ आपल्या हातात नसतो

#DSPTalk 🌿 एखादं ध्येय किंवा गोष्ट मनात घेऊन सुरू होतो माणसाचा प्रवास... पण प्रवास थांबायचा कुठे ते काळ आपल्यावर ती वेळ आणतो. त्या प्रवासात ते ध्येय आणि गोष्ट जे मागते ते आपण देत असू तर ते मिळते पण आपल्याकडून ते दिले गेले नाही तर मग तो प्रवासच नकोसा होतो... पण ही वेळ तुमच्यावर आणण्यासाठी काळ तयार असतो.. आजही काळ तशी परिस्थिती बनवून बसलाय तुमची ती वेळ आली का.... ज्याचे त्याने ठरवा.. बाकी बोलत राहू. ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

#DSPTalk ✨ स्वप्न असले पाहिजे, काहीतरी गाठण्याचे ध्येय निश्चितच पाहिजे. ते नसेल तर बिना इंधनाच्या गाडीसारखी अवस्था आपली होईल. ती टाळण्यासाठी आपल्याला पहिला स्वप्न बघायला शिकलं पाहिजे आणि नंतर त्यासाठी अविरत कृती करत राहील पाहिजे. थांबून चालणार नाही. सततच्या पाण्याच्या पडणाऱ्या थेंबाने मोठे कठीण दगड देखील दुभंगले जातात तर मग आपण रोज थेबथेंबाने का आपल्या कृती सातत्यपूर्वक ठेवू शकत नाहीये... बघा विचार करून त्यावर आज तर कृती करा... ©दिनेश @Vichar_Suvichar 🌿

#DSPTalk ✨ खूप बोलता येईल मनाच्या कोपऱ्यात जाऊन स्वतःशी... स्वतःच्या नसलेल्या चुकादेखील मन दाखवेल मोठ्या ठळक करून... पण त्यातही महत्त्वाच्या असतील त्या म्हणजे आपल्या आजच्या कृती... झाले ते गेले. पश्चात्ताप करायचा की एकेक इंच पुढे सरकण्यासाठी, एकेक मार्क घेण्यासाठी पुढे चालत राहायचं... तेच ठरवायची वेळ ही आहे असेच स्वतःला सांगायचं. जेव्हा मन आपल्याला कोपऱ्यात सरकवू पाहत असते तेव्हा... मग काय झालंय का स्पष्ट तुम्हाला की कोणत्या कृती अपेक्षित आहेत स्वतःकडून... तिकडे जास्त प्रयत्न होउदेत. बाकी बोलत राहू... ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

Control the Controllable @Vichar_Suvichar🌿
Control the Controllable @Vichar_Suvichar🌿

#DSPTalk ✨ Postponed अन् यथावकाश... हे दोन शब्द नसून... अश्या कातळवेळा आहेत की ज्यांची पहाट कधी होईल ते माहिती नाही. कोरोना मध्ये असे गोंधळ होतो तेव्हा हे चॅनेल सुरू केले होते संवादासाठी. आजही त्याच अवस्थेत विद्यार्थी अभ्यास करताना आणि नियोजनाला धक्के बसताना पाहत आहेत. तुमच्या ज्या भावना त्याच आमच्या.. बाकी बोलत राहू... ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

1000 subscriber's होण्यासाठी help करू शकता. Thank You🙏🎯

#DSPTalk 🌿 आयुष्याचा प्रवासात काही गोष्टी करायच्या राहून जातात भूतकाळात.. पण वर्तमानात त्या शक्य असतील तर नक्की करू शकतो. ते करणे महत्त्वाचे. जेव्हा आपण कधीतरी मनाने ठरवलेल्या गोष्टी करायला लागतो ना... तेव्हा खरं आयुष्य पुढे जाऊ लागतं असं वाटतं.. बघा... © दिनेश @Vichar_Suvichar🌿