Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 209
Suscriptores
-424 horas
-117 días
-9230 días
Archivo de publicaciones
4 209
कैलास मानसरोवर यात्रेतील ३७ भाविकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा पुढाकार; सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. त्यांचे काठमांडू येथून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत आवश्यक होते.
या समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी सागा येथे अडकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने पत्रव्यवहार व समन्वय साधण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही तत्परतेने आवश्यक मदत व सहकार्य केले.
या सर्व प्रयत्नांना यश आले असून सर्व ३७ भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आहेत
4 209
मराठी- प्रत्येकासाठी आपलेपणाची भाषा!
अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रात व्यावहारिक मराठी अवगत असलीच पाहिजे, या भूमिकेला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे रिक्षा व टॅक्सी चालकांनी स्वागत केले आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेले सातारा जिल्ह्यातील प्राचीन श्री क्षेत्र महाबळेश्वर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #महाबळेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#रक्षाबंधन #RakshaBandhan #Maharashtra
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
On this Sanskrit Diwas, let's celebrate the timeless language of the Vedas and the Upanishads that carries India’s profound heritage, knowledge, and cultural wisdom across generations.
भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती ।
तस्यां हि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम् ।।
संस्कृतदिनस्य नैकाः शुभाशयाः।
#संस्कृत_दिवस #संस्कृत #SanskritDay #Sanskrit #Maharashtra
4 209
CMO Maharashtra Tweets:
Ensuring the Safe Return of Maharashtra’s Citizens
Ensuring the highest priority to the safety of Maharashtra’s citizens stranded in Nepal, CM Devendra Fadnavis took immediate steps to facilitate their safe return to India and arranged buses for their journey. The tourists from Maharashtra expressed their heartfelt gratitude to CM Fadnavis for extending timely assistance and ensuring arrangements for their safe return during this difficult situation.
At the request of CM Fadnavis, Nepalese MP Sandeep Rana also personally reached the spot and extended assistance in facilitating the safe departure of the citizens from Maharashtra to India.
पर्यटकांची सुरक्षितता हीच सरकारची प्राथमिकता!
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रयत्न करून बसेसची व्यवस्था केली. या कठीण प्रसंगी तातडीने मदतीचा हात देत सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल महाराष्ट्रातील पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीनुसार, नेपाळचे खासदार संदिप राणा यांनीही स्वतः घटनास्थळी पोहोचून महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारताकडे रवाना करण्यासाठी मदत केली.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात ‘वाहतूक शिष्टमंडळा’समवेत बैठकीतील संबोधन...
(मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai #AutoTaxiDrivers
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Strengthening Pune’s Energy Infrastructure for Future Growth
Chaired a meeting with a delegation regarding the proposed GIS substation at Bhongavali in Bhor taluka.
Directed MSETCL officials to address the concerns of local residents while developing the transmission line passing through Bhor taluka and the proposed GIS substation at Bhongavali under the Green Energy Corridor. A concrete and positive solution should be ensured to minimise the impact on local citizens while keeping the renewable energy projects on track.
Pune, as a major industrial district, is witnessing a significant rise in electricity demand. Ensuring the timely development of necessary substations is therefore crucial to prevent power shortages in the future. Substation works are accordingly underway in several other talukas across Pune district as well, strengthening the district’s power infrastructure to meet its growing needs. At the same time, the concerns of citizens in Bhor have been acknowledged, and a balanced solution will be worked out in coordination with the Central Government.
Senior officials were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2093031541534572860?s=20
4 209
CMO Maharashtra Tweets:
भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी स्थानिकांच्या हिताचा व्यवहार्य पर्याय काढला जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशनसंदर्भात शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली.
केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नवीकरणीय ऊर्जेच्या ग्रीन कॉरिडॉरमधील भोर तालुक्यातून जाणाऱ्या ट्रान्समिशन लाइन व भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन उभारताना स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन स्थानिक नागरिकांचे कमीतकमी नुकसान होईल, असा सकारात्मक मार्ग काढला जाईल. सबस्टेशनची जागा, विद्युत वाहिन्यांचे संरेखन आणि भविष्यातील वाढीव विद्युत भार यांचा विचार करून व्यवहार्य पर्याय तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोरमधील शेतकऱ्यांची विविध प्रकल्पांसाठी यापूर्वीच जमीन गेलेली असताना पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन मागितली जात असल्याचे स्थानिक समितीचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे जवळपास 40 % काम पूर्ण झाले आहे. पुण्यासारख्या औद्योगिक जिल्ह्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आवश्यक सबस्टेशन्स उभारली नाहीत, तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वीजटंचाई निर्माण होऊ शकते. पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही सबस्टेशन्सची कामे सुरू आहेत. मात्र, भोरमधील नागरिकांच्या अडचणी शासनाने समजून घेतल्या असून, त्या सोडविण्यासाठी योग्य मार्ग काढण्यात येईल. या समस्येवर महापारेषण तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार असून हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. सबस्टेशनच्या कामामुळे स्थानिकांचे कमीतकमी नुकसान कसे होईल, उपलब्ध जागेचा योग्य वापर कसा करता येईल आणि भविष्यातील विद्युत वाहिन्यांबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन कसे करता येईल, याचा विचार केला जाईल. ग्रीन कॉरिडॉरला विरोध केल्यास त्याचा परिणाम पुण्याच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांनीही सहकार्य करावे आणि सर्वांच्या हिताचा मध्यममार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Long-Term Vision for Pandharpur’s Development, Heritage and Local Economy
Chaired a meeting with a delegation regarding the Pandharpur TirthKshetra Development Plan at Sahayadri Guest House in Mumbai today.
Directed that the Pandharpur development plan be finalised after considering the suggestions and demands of Warkaris, devotees, local residents, traders, religious heads and public representatives, with all feasible suggestions incorporated.
Instructed that Pandharpur’s development be planned with a 50-year vision, focusing on better infrastructure, improved facilities for devotees and long-term economic growth. With the rising annual influx of pilgrims, integrated planning for the entire city is essential.
With the growing number of devotees visiting Pandharpur, crowd management for the future needs to be approached through scientific and systematic planning. Modern technology and digital tools will be integrated with traditional crowd-management practices to ensure efficient, safe and seamless movement of devotees.
Pandharpur’s ancient temples and maths will remain at their existing locations and will not be relocated. Proper rehabilitation will be ensured for affected shopkeepers, residents and business owners. Alternative shops will be provided, while suitable arrangements will be made for residents of more than 500 affected houses.
Emphasised that Pandharpur’s development must strengthen both pilgrimage infrastructure and the local economy. The plan will focus on making the city safer, more accessible and better equipped for the coming decades.
DCM Eknath Shinde ji, Minister Jaykumar Gore, MLA Samadhan Autade, senior officials and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #VitthalRukmini
https://x.com/Dev_Fadnavis/status/2093029261724766275?s=20
4 209
CMO Maharashtra Tweets:
वारकरी, भाविक आणि स्थानिकांना सोबत घेऊन पंढरपूरचा विकास!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली.
पंढरपूरच्या विकास आराखड्यात वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागण्यांचा समावेश करून सर्वांना विश्वासात घेतच आराखडा अंतिम करण्यात येईल. पंढरपूरचा विकास हा पुढील 50 वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे. दरवर्षी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन
पंढरपूरमध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यातील गर्दीचे व्यवस्थापन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध डिजिटल टूल्सचा वापर करण्यात येईल. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन व प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एकात्मिक नियोजनावर भर दिला जाईल. पंढरपूरचे नागरिक आणि येथे येणारे लाखो भाविक यांच्या हिताचा विचार करूनच विकास आराखडा तयार केला जात आहे. स्थानिक नागरिक, आर्किटेक्ट्स आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून आणि त्यातील शक्य त्या सर्व चांगल्या बाबी आराखड्यात समाविष्ट कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मंदिर-मठांना सुरक्षित ठेवून विकास
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाईल. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाही. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून ‘जागेस जागा’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने, तर बाधित होणाऱ्या 500 हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात एवढा मोठा मोबदला अन्यत्र दिला गेला नसावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंढरपूरच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेलाही चालना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धार्मिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास भाविकांची संख्या वाढते आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे पंढरपूरच्या विकासाकडे केवळ पायाभूत सुविधांचा विषय म्हणून न पाहता भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे. पुढील अनेक दशकांचा विचार करून पंढरपूर अधिक सक्षम, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विकासाच्या प्रक्रियेत काही उणिवा राहिल्यास सूचना कराव्यात. सर्व घटकांनी परस्पर समन्वयातून काम करून पंढरपूरच्या विकासासाठी सर्वोत्तम मार्ग काढण्यासह सर्वांना सोबत घेऊन पंढरपूरचा सर्वांगीण, सुरक्षित आणि दीर्घकालीन विकास करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #VitthalRukmini
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Strengthening Maharashtra’s Sacred Temples and Heritage 🛕
Chaired the Apex Committee meeting regarding the development plans of 3 Tirthkshetras across Maharashtra, in Mumbai, today.
Aundha Nagnath, one of the twelve Jyotirlingas, holds immense spiritual and historical significance. Approved the revised plan worth ₹1,93,55,20,474 for the temple, with a focus on preserving its ancient artistic heritage. Directed that its historic architectural legacy be preserved and conserved using natural colours, while ensuring that the stone and other materials used for the temple and lake precincts, along with all other works, meet the highest standards of quality.
Reviewed the plan prepared for the comprehensive transformation of the historic Kalyaneshwar Temple precinct in Mahal, Nagpur, and approved ₹72.49 crore for the temple, paving the way for its comprehensive conservation and development. Directed that parking facilities be expanded based on the requirements of the area.
Reviewed the progress of the Shivsrushti Historical Theme Park project at Ambegaon, based on the life and legacy of our greatest King, Chhatrapati Shivaji Maharaj. To carry forward this glorious legacy and bring his inspiring life and vision closer to future generations, ₹50 crore has been approved for the works under its fourth phase.
DCM Eknath Shinde ji, Minister Narhari Zirwal, MLA Pravin Datke, MLA Vijay Shivtare, MLA Santosh Bangar and senior officials were present.
#Maharashtra #MahaCulture
https://x.com/Dev_Fadnavis/status/2093024021835345973?s=20
4 209
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार प्रवीण दटके, आमदार विजय शिवतारे, आमदार संतोष बांगर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaCulture
4 209
CMO Maharashtra Tweets:
तीर्थक्षेत्रांचा विकासाद्वारे महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि इतिहासाचे जतन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली, कल्याणेश्वर मंदिर, नागपूर आणि शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे या 3 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करून त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ₹50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली मंदिराच्या ₹1,93,55,20,474 च्या तर, कल्याणेश्वर मंदिर, नागपूरच्या ₹72.49 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. 'शिवसृष्टी थीम पार्क, आंबेगाव, पुणे' येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यातील कामांसाठी ₹50 कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली.
'श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जि. हिंगोली' मंदिर परिसराचा विकास आराखडा
औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराची कामे पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरिहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून 2500 भाविक बसू शकतील अशा क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, या दृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्ती भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार आहे.
'कल्याणेश्वर मंदिर' विकास आराखडा
नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्या ठिकाणी 2 तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹72.49 कोटी इतक्या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र साकारणार
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाची विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
