Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 139
Suscriptores
+224 horas
-137 días
-4130 días
Archivo de publicaciones
4 138
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : नगर विकास विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 138
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Boosting High-Tech Industries and Employment
Chaired a meeting of the Cabinet Sub-Committee of the Industries Department at Mantralaya in Mumbai today.
Approved special incentives for 18 major projects worth ₹2,56,137.01 crore to attract large-scale investments and accelerate job creation across the State, with the potential to generate over 1 lakh direct and indirect employment opportunities.
These proposals focus on thrust sectors and high-technology industries, including renewable energy (solar cells, modules, ingots, wafers), green technology (green steel and ammonia), advanced manufacturing (electronics, lithium-ion batteries, and EV components), strategic sectors (aerospace and defence), and heavy industry (steel and gas-to-chemical manufacturing).
The projects will significantly boost industrial development across Konkan, Vidarbha, Marathwada, and other regions, strengthening local economies while driving technical innovation, advancing R&D, and building robust supply chains. They will also empower MSMEs and enhance employment opportunities for local youth through expanded skilling and training initiatives.
DCM Eknath Shinde ji, Minister Uday Samant and other senior officials were present.
#Maharashtra #IndustrialDevelopment #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046988963748208826?s=20
4 138
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्रात उद्योगक्रांती! ₹2.56 लाख कोटींच्या गुंतवणुकीतून लाखो रोजगारांची निर्मिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून सुमारे 1,00,000 हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इन्गॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम-आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस-टू-केमिकल निर्मिती अशा विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
✅नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. ₹800 कोटींची गुंतवणूक करून 500 जणांना रोजगार.
✅अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि. ₹1000 कोटींची गुंतवणूक.
✅छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. ₹1000 कोटींची गुंतवणूक करून 1000 नवीन रोजगार.
✅पुण्यातील शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. ₹1500 कोटींच्या गुंतवणुकीतून 3000 रोजगार निर्मिती.
✅गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ₹3135 कोटींची गुंतवणूक करून 8000 रोजगार निर्मिती.
✅अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस ₹4000 कोटींच्या गुंतवणुकीसह 1000 रोजगार निर्मिती.
✅पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. ₹4200 कोटींची गुंतवणूक आणि 12,000 रोजगार निर्मिती.
✅चंद्रपूरमध्ये मिलियन स्टील प्रा. लि. ₹256.01 कोटींच्या गुंतवणुकीतून 360 रोजगार निर्मिती.
✅भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. ₹10,000 कोटींची मोठी गुंतवणूक करून 1000 रोजगार निर्मिती.
✅नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. ₹11,400 कोटींची गुंतवणूक करून 7000 रोजगार निर्मिती, तर याच कंपनीचा रायगड व पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्पात ₹11,000 कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार निर्मिती.
✅नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. ₹12,780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6825 रोजगार निर्मिती.
✅ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनी अहिल्यानगर व धाराशिवमध्ये ₹15430 कोटींची गुंतवणूक करून 3600 रोजगार निर्मिती.
✅रायगड येथे बालासोर अलॉयज लि. ₹17,479 कोटींची गुंतवणूक आणि 3200 रोजगार निर्मिती.
✅छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. ₹27,515 कोटींची गुंतवणूक करून 4000 रोजगार निर्मिती.
✅रायगड व पालघरमध्ये ॲकमे क्लीनटेक प्रा.लि. चा ग्रीन अमोनिया प्रकल्प ₹37,800 कोटींची गुंतवणूक करून 4500 रोजगार निर्मिती.
✅गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. ₹40,000 कोटींची भव्य गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्मिती.
✅ एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये ₹56,852 कोटींची गुंतवणूक करून 25,000 रोजगार निर्मिती.
या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 138
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 138
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 138
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs the Cabinet Sub-Committee of Industries Department meeting.
DCM Eknath Shinde, Minister Uday Samant and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में उद्योग विभाग के मंत्रिमंडल उपसमिति की बैठक।
इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तथा वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.40pm | 22-4-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.४० वा. | २२-४-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
