Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 137
Suscriptores
+224 horas
-137 días
-4130 días
Archivo de publicaciones
4 137
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 137
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 137
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs the Cabinet Sub-Committee of Industries Department meeting.
DCM Eknath Shinde, Minister Uday Samant and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में उद्योग विभाग के मंत्रिमंडल उपसमिति की बैठक।
इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तथा वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.40pm | 22-4-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.४० वा. | २२-४-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 137
CMO Maharashtra Tweets:
🔸 CM Devendra Fadnavis chairs the meeting of Cabinet Committee on Infrastructure.
DCM Eknath Shinde, Minister Chandrashekhar Bawankule, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक।
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐1.05pm | 22-4-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.०५ वा. | २२-४-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 137
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 137
CMO Maharashtra Tweets:
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनावर भर
राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12% तर 2015 मध्ये सुमारे 14% घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी तर याच दिवशी 2015 ला 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे निर्देश दिले.
महसूल विभागनिहाय पाणीसाठा (धरण संख्या) यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
नागपूर : (387) 80.79, 63.40
अमरावती : (276) 73.72, 65.13
छत्रपती संभाजीनगर : (929) 129.37, 97.09
नाशिक : (539) 101.96, 89.28
पुणे : (724) 206.55, 174.04
कोकण : (173) 61.24, 62.92
एकूण : (3028) 653.63, 551.86
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टिएमसीमध्ये) या क्रमाने -
कोयना : 33.62, 36.76
जायकवाडी : 42.03, 34.44
उजनी : 13.39, (0)
पेंच प्रकल्प समूह : 26.57, 26.35
इसापूर : 21.45, 17.82
भातसा : 15.70, 14.91
गोसीखुर्द : 14.31, 5.93
खडकवासला धरण समूह : 11.32, 9.82
मुळा : 9.54, 10.53
अप्पर वर्धा : 10.21, 9.53
अप्पर वैतरणा : 6.52, 5.95
भंडारदरा : 5.25, 6.04
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
