cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

Mostrar más
Publicaciones publicitarias
28 749
Suscriptores
-1824 horas
-747 días
-49730 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
जीवनात काही व्यक्ती तात्पुरता काळासाठी येतात मात्र त्यांच्या आठवणी हृदयात कायमस्वरूपी घर करून जातात त्या माणसाला स्वतंत्रपणे हसू देत नाहीत आणि मनसोक्त रडण्याचे कारण ही मिळत नाही बाकी ते म्हणतात की कुठलीच टाळी एका हाताने वाजत नसते!,,,✍ Just filling👍❤️❤️❤️💗 एकमन#लेखक   @Ommshelke
49016Loading...
02
#संयम... "यशाची नशा जर करायची असेल तर निराशेच्या गावाला कधी फिरकायच नसतं." परीक्षा पुढे गेलेल्या आहेत माहित नाही कधी होतील पण एवढं नक्की आहे परीक्षा कधी ना कधी तरी नक्की होतील.जेव्हा होतील त्यावेळेस आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नक्की नाव असेल एवढा तर आपल्याला अभ्यास नक्की करायचा आहे. माझं वय 27/28/29/30/31/32..इ.झालंय आता माझं काही खर नाही.विशेषतः मुली घरचे आता ऐकणार नाही.अशा कितीतरी नकारात्मक गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात.या सर्वांमुळे तुम्ही खचले जात आहात.हे साहजिक आहे पण "खचून जाण्यापेक्षा खेचलेल बरं". या सर्व फालतू गोष्टींना पूर्णविराम देवून.सोलूशन ओरिएंटेड राहून आणखी ताकदीने अभ्यास करून जिंकण्यासाठी सज्ज व्हा. नोट-नाव ठेवणारी जनता...(स्वतःचा पोरगा काय काय दिवे लावतो हे सोडून साऱ्या गावाला माहित असते.)किती दिवस आणखी?आईबाप यांना किती दिवस बुडवणार?तुझं वय किती झालंय?लग्न कधी करणार? इ.प्रश्नांनी भंडावून सोडतात आपल्याला.निराशेत जायला ही लोक खुप असं अमूल्य योगदान आपल्या आयुष्यात देत असतात.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करूया. हात जोडून माझ्या भावा आणि बहिणींना विनंती कृपया करून चुकीचे पावलं उचलू नका.आत्महत्या इत्यादी गोष्टी खरचं करू नका.(नजीकच्या काळात घडलेला प्रसंग म्हणून हा लेख लिहिला) "आई वडील नेहमी आपल्या सोबत असतात त्यांची सोबत सोडू नका." "वेळ बदलते फक्त बदलत्या वेळेची वाट पाहावी लागते." तुमचा सर्वांचा achievers वाला 🙏
2 59756Loading...
03
Media files
4 08416Loading...
04
मानवी मन खूपच बाजींद असतं ना राव ते जास्त फिरत बसतं त्याला स्थिर करायला  हक्काचं ठिकाण लागतं ते शोधण्याच्या नादात फक्त मन भिर भिर फिरत असतं आणि या गडबडीत आपला आनंद दुसर्याच्या हातात देऊन स्वतःला त्रास करून घेत बसतो!,,,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
4 56934Loading...
05
राजकीय शिक्षण.. काळाची गरज.. ✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) ✍️"हल्ली लोकसभा निवडणुका सुरु आहे वर्तमानपत्र टीव्ही यावर सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणूक... कोण निवडून येणार..? खरं सांगायचं तर ग्रामीण भागात जर, कधी तुम्ही गेला तरं तिथल्या माणसाला लोकसभा म्हणजे काय?हे सुद्धा माहित नाही.. खासदार काय करतो?तो कुठे बसतो?याबद्दल थोडेफार सुशिक्षित लोक सोडले तर बहुतांश लोकांना माहितीच नसते.. खासदाराची नेमकी काय काम आहे..? हे सुद्धा लोकांना माहित नसतं.. अशी ही जनता निवडणूक आली की, कोणी हातावर पाचशेची नोट टेकवली की ते म्हणेल त्याला मतदान करायला तयार असते.. निवडणुकीत उभे असणारे उमेदवार मतदारांना 100/500रुपयात खरेदी करू पाहतात.. कारण इथल्या जनतेला संविधान काय आहे..? संसद काय आहे..? मतदान म्हणजे काय..? हे माहित नाही.. राजकीय शिक्षणाचा अभाव सगळीकडे दिसतो.. सुशिक्षित तरुण स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे तरुण तर म्हणतात राजकारण हे आपल काम नाही.. राजकारण नको.. अश्या तरुणांना मला डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य सांगावं वाटेल.. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की "सुशिक्षित तरुणांनी जर राजकारणाकडे दुर्लक्ष केल तर तुम्हाला अशिक्षित लोकांचे गुलाम व्हावं लागेल..!" हे वाक्य आजही खर ठरताना दिसतं आहे..15/16वर्ष शिक्षण घेवून व 7/8वर्ष UPSC /MPSC ची तयारी करुन IAS /IPS झालेल्या अधिकाऱ्यांना 10वी /12वी नापास झालेल्या मंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं.. त्यांना सलाम करावा लागतो.. राजकारणात येण्यासाठी शिक्षणाची अट नाही.. जेव्हा भारतीय संविधान तयार होत होत तेव्हा देशातील साक्षरता खूपच कमी होती.. सर्वसामान्य माणसाला लोकांच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून संविधानाने यासाठी शैक्षणिक पात्रता निर्धारित केली नव्हती.. हे काम नंतरचे राज्यकर्ते करतील अशी अपेक्षा संविधान निर्मात्याना होती.. पण नंतर सुद्धा आमदार, खासदार होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता संसदेने निर्धारित केली नाही..सरकार सद्या सुद्धा ते करू शकतं. पण तस करण्याची मानसिकता दिसतं नाही.. संविधान म्हणजे काय?संसद म्हणजे काय..? हे फक्त स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी व थोडाफार सुशिक्षित वर्ग सोडला तर इतरांना माहित नाही... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच असं मत होत की,स्वातंत्र्य मिळाल्यावर किमान 10वर्ष निवडणुका घेवू नये.. त्या 10वर्षात जनतेला राजकीय शिक्षण द्यावं... पण तस घडलं नाही.. निवडणुका झाल्याच आणि काँग्रेस सत्तेत आली...नंतर अनेक घटना घडतं गेल्या..अलीकडे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.. त्यात मतदानाची टक्केवारी 60%च्या वर जावू शकली नाही..100%मतदान कां होत नाही..? का मतदार मतदान करायला येतं नाही..? कारण राजकीय शिक्षणाचा अभाव... ही निवडणूक नेमकी कोणाची? हेच लोकांना माहित नाही... लोकांना फक्त ग्रामपंचायत माहित असते.. सुशिक्षित वर्गाला तर राजकारण म्हटलं की कपाळावर आढ्या पडतात.. आपल्याला काय करायच? कोणी पण निवडून येवो आपल्याला काय देणार..? असं समजतं सुशिक्षित वर्ग मतदान करण्यासाठी बाहेर पडतं नाही.. मतदानाची सुट्टी लोक फिरायला जातात पण मतदान करत नाही.. कारण त्यांना माहीतच नाही मतदान केल्याने काय होत? महत्वाचा मुद्दा असा आहे की, राजकारणी लोकांनी तर लाजच सोडली आहे.. सकाळी एका पक्षात, तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात.. कोणी पक्ष पळवतो,तर कोणी आमदार पळवतो हे अत्यंत घाणेरड राजकारण सद्या जनतेला अजिबात पसंद नाही.. वारंवार तेच ते लोक सत्तेत येतं असतील तर मतदान करुन फायदा काय..? हा प्रश्न आहे.. याकडे सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे..राजकीय नेत्यांनी निष्ठावंत राहील पाहिजे.. हे सगळी कारण बघितली तरी सुद्धा राजकीय शिक्षणाच्या आभावामुळे कमी मतदान होवून अयोग्य लोक सत्तेत येतं आहे.. आणि हे लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.. त्यामुळे योग्य व्यक्ती जर सत्तेत आणायचे असेल तर प्रत्येक घरी संविधान पोहोचवण आवश्यक आहे.. प्रत्येकाने संविधान वाचन आवश्यक आहे.. प्रत्येकाने राजकारण समजून घेणं आवश्यक आहे.. जर तुम्ही हे केल नाही तर देशात वारंवार ते ते लोक सत्तेत येतील आणि भ्रष्टाचाराला हातभार लागेल.. म्हणून मतदार जागरूक हवा.. सत्तेसाठी व स्वतः वरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी एखादा नेता रातोरात पक्ष बदलत असेल आणि तरीसुद्धा जनता त्यांना निवडून देतं असेल तर इथे भ्रष्टाचार आणि अयोग्य व्यक्ती सत्तेत येण्यास जनता जबाबदार आहे...म्हणून राजकीय शिक्षण ही काळाची गरज आहे..त्यामुळे सुशिक्षित वर्गान संविधान आणि राजकारण याचा अभ्यास करुन राजकारणात आपला सहभाग वाढवला पाहिजे.. व देशाच्या विकासासाठी इमानदार, सुशिक्षित लोकप्रतिनिधीला निवडून देतं देशाचा विकास करायला हवा...!" लिखाण दि.24एप्रिल 2024 प्रतिक्रिया नक्की कळवा.. ✍️लेखक संपर्क -:8806379959
4 43118Loading...
06
आजचा माझा लेख राजकीय शिक्षण काळाची गरज... नक्की वाचा....❤️
4 03813Loading...
07
Media files
5 56230Loading...
08
मी शुध्द हरपू पाहिली, चिंधड्या चिंधड्या आयुष्याचे अवशेष आपल्या आपण शुध्दीत कसे वेचणार, तुकडा तुकडा सांधून लत्करलेलं आयुष्य घ्यावं पांघरूण या निर्मनुष्य गारठ्यात, म्हणून मी वाचली पुस्तक, भळभळणाऱ्या जखमांवर बांधल्या कवितेच्या ओळी वाचली थोरामोठ्यांची चरित्रं काढली चित्र... आयुष्याच्या गारठणाऱ्या कॅनव्हासावर रक्तात बुडवून कुंचला, दारू प्यालो , भांग खाल्ली, पण साली शुध्द हरपतच नाही... नागराज मंजुळे 👏
8 41413Loading...
09
तुमचे लिखाण आणि चॅनल विषय काही Suggestions साठी इथे पाठवा👉 @Shyam_barse आता आपल्या WhatsApp channel वर तुमचे पोस्ट टाकण्यासाठी https://wa.me/919623141040
3300Loading...
10
जीवनातील प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोचं फक्त तो शोधण्याकरता आपल्या मध्ये थोडा संयम असावा लागतो। ते म्हणतात ना वेळ प्रत्येकाची येत असते मात्र।आपल्या वाईट वेळेत साथ देण्याऱ्या माणसानंकडे आपलं लक्ष नसते😞असो!..,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
8 64242Loading...
11
मुकी जनावरे ❤️ जपूया मुक्या जीवाला जगण्याचा अधिकार आहे त्यालाही . थोडा जरी त्याला जीव लावला की अख्खा जीव आपल्यावर ओवाळून टाकते. मुक्या जनावराला खूप चांगली प्रेमाची परिभाषा कळते. एकनिष्ठ , इमानदारीने ते माणसावर प्रेम करतात. मुकी जनावरे असून त्यांना भावना कळतात.✍N.P.Dhanve (✍27एप्रिल2024) 🥰Happy world veterinary Day 🩺💉 🦜🐐🐂🐕🦌🐄🦒🦣🐘🐃🐑🐎🦍🐕‍🦺🐈🦚🐿🦥🦨🐇 ☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀
7 7779Loading...
12
Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X
7 0021Loading...
13
ध्येय 🎯
7 00522Loading...
14
Media files
8 5195Loading...
15
✍.....जीवनात इतरांना नावबोट ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा...🎯 जीवनात कोणत्याही व्यक्तीचा एवढा जास्तच विरोध करू नये.वाईट वाटत भारतातील लोक भारतातील खेळाडूंनाच विरोध करतात.सर्व खेळाडू भारतीय आहेत आणि आपल्या देशासाठी खेळतात ही बाब लक्षात ठेवावी.एक व्यक्ती म्हणून आपल्याला कोणाचे विचार,कृती आवडत नसेल तोपर्यंत ठीक आहे परंतु असा खेळाडू जो भारताला एका allrounder ची गरज होती तेव्हा मिळाला,champion trophy मध्ये पाकिस्तान कडून लाजिरवाणी हार होताना वाचवली,खूपदा शेवटच्या षटकात सामने जिंकून दिले.कित्येकदा उत्तम झेल घेऊन महत्वपूर्ण सामने जिंकवले.खूपदा क्षेत्ररक्षण करताना injured झाला अश्या खेळाडूला छप्परी,कुत्रा जर मैदानात गेला तर त्याला त्या खेळाडूच्या नावाने ओरडले जाते,हे खूप लाजिरवाणे स्वतः भारतीयांसाठी.अरे पण जरा विचार करा त्याने आपल्या देशासाठी ह्या अगोदर काय केलंय,एका आरोप संपत नाहीत तोपर्यंत दुसरे आरोप काय परस्थिती होत असेल त्याचा विचार करा. मान्य आहे त्या खेळाडूच्या चुका झाल्या असतील,तो आपल्या senior खेळाडूचा आदर करायला विसरला असेल पण एवढं त्याला troll करणे की स्वतः सारख्या काही महान खेळाडूंना आता हे थांबवा असे भर मैदानात सांगावे लागते.आपण संघासाठी सामना पाहत असतो व्यक्तितीक खेळाडूच्या कामगिरीसाठी नाही आणि तो संघाचा कर्णधार बनला ही त्याची चूक नाही आहे,टीम मॅनेजमेंट ची आहे.जर कोणाचे समर्थन केले ह्याचा अर्थ असा नाही की इतरांना विरोध केला जातो. एक साधा विचार करा आपण जुन्या कंपनीत कामाला होतो जेव्हा नवीन कंपनीत जातो तेव्हा काही काळाने जुन्या कंपनीकडून आपल्याला ऑफर येते परत जॉइंनिगची आणि वरून जास्त पगार पण व मुख्य बनवलं पणं जाते त्या संघाचा आणि ती कंपनी खूपच नामिवंत आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलं असत जुनीच कंपनी जॉईन केली असती ना है चुकीचं आहे मान्य आहे परंतु आपण काय केलं असत त्याचा पण विचार करा ना. व्यकक्तिक खेळाडूला एवढे पण troll करण्याचा प्रयत्न करू नका,शेवटी तोपण एक माणूस आहे,जर तुम्हाला त्याचे वागणे पटत नसेल तर त्याला support नका करु.किमान भारतीय संघाल support करा.आयपीएल काही काळाने संपेल आगामी वर्ल्डकप येईल त्याचा विचार करा.जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा त्यातून बाहेर निघ्यन्यासाठी अश्याच अष्टपैलू खेळाडूची उणीव भाजते असे नाही की बाकीचे खेळाडू चांगले नाही आहेत परंतु आपण कोणत्याही भारतीय खेळाडूला ह्या स्तरापर्यंत विरोध करणे माणूस म्हणून चुकीचे वाटते सर्वांचा जीवनात मग तो कोणतही खेळाडू असो वाईट काळ येत असतो इतर नावबोट ठेवत असतात अश्या काळात भारतीय म्हणून आदर देणे गरजेचे आहे शेवटी चुका ह्या सर्वणाकडून होतात माणूस म्हणून त्यांना माफ करणे पुढे जाणे गरजेचे आहे. .............🦋🌺😇💞.............. शब्दांकन✍ -B.S Kendre(Student) Telegram -@Bskendre5 आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...☘✍🏻😇
8 83816Loading...
16
Media files
6 7237Loading...
17
मतदान..👆🇮🇳 ✍️"मतदान हा देशातील प्रत्येक नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप संघर्ष करुन देशातील प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार मिळवून दिला.. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने या अधिकाराचा वापर करा.. आणि प्रत्येकाने मतदान करा...!" जय हिंद... 🇮🇳🇮🇳🇮🇳 ✍️ ABC's Academy 🇮🇳 🇮🇳 Good Evening 🇮🇳
6 24227Loading...
18
100 लोकांची क्षमता असलेल्या एका वसतिगृहात दररोज सकाळी नाश्त्या मध्ये उपमा दिला जात असे. त्या 100 लोकांपैकी 80 लोक रोज तक्रार करायचे की उपमा ऐवजी वेगवेगळे पदार्थ बनवावेत. पण, इतर 20 लोक उपमा खाऊन खूश होते. उरलेल्या 80 लोकांना उपमा व्यतिरिक्त काहीतरी वेगळे हवे होते. या गोंधळाच्या परिस्थितीत वसतिगृहातील वॉर्डन ने मतदान घेण्याचा प्रस्ताव ठेवला व ज्या मेन्यू ला सर्वात जास्त मते पडतील, तो पदार्थ सकाळी न्याहारीला दिला जाईल, असे ठरले. उपमा हवा असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी अचूक मतदान केले. उर्वरित 80 लोकांनी खालीलप्रमाणे मतदान केले. 18 - मसाला डोसा 16 - आलू परोटा आणि दही 14 - रोटी आणि सब्ज 12 - ब्रेड आणि बटर 10 - नूडल्स 10 - इडली सांबार त्यामुळे, मतदानाच्या निकालांनुसार, उपमाला सर्वाधिक मते मिळाली आणि पुन्हा तोच उपमा दररोज दिला जाऊ लागला. *धडा*: जोपर्यंत 80% लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली आहे, 20% लोक आपल्यावर राज्य करतील. हा एक मूक संदेश आहे. हुशारीने मतदान करा
6 54439Loading...
19
Media files
6 17217Loading...
20
*☘️फुंकर☘️* *✍️फुंकर किती सुंदर पण तितकाच खोलवर अर्थ असलेला शब्द नुसता शब्द वाचला तरी डोळ्यांपुढे तरळतो तो ओठांचा चंबू...* *पण या फुंकरचे प्रकार तरी किती ..प्रेमात व्याकूळ असताना,ती माया,ती ममता,तो स्नेह ,ती संवेदना, ती संवेदनशीलता,आणि फू मधला फुंकर ...* *पण फुंकर ही फक्त आग लावण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी असते का ?* *ज्याप्रमाणे लहान मुलगा भुकेने व्याकूळ होऊन दुधासाठी आईकडे येतो ..* *आणि मग आई दुधावरची साय पडदा बाजूला करून दूध गार करून देते . त्याप्रमाणे एखादाच्या आयुष्यात आलेल्या दुःख रूपी पडद्यावर फुंकर मारून दूर करण्याचे काम आपण ही करू शकतो ...* *यासाठी "फुंकर"पाहीजे ती सहानुभूतीची,आपुलकीची आणि याचीच आज समाजात वाणवा आहे* *आपलेपणा हा आता आपलाच राहिला आहे. यामुळे सामाजिक दृष्ट्या बांधीलकी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात धूळ खात पडली आहे..* *आपल्या भोवती बरेच असे लोक आहेत त्यांना गरज आहे आपल्या मायेची,का ?मारू नये आपण मायेची फुंकर मग अशा‌ लोकांना* *जर आपली एक फुंकर अशा लोकांच्या जीवनातील कष्ट ,दुःख दूर लोटत असेल तर मारूया ना हळूवार फुंकर तेच्या जीवनातील जखमांवर..* *कधी कधी संकटकाळात खांद्यावर ठेवलेला हात धीर देऊन जातो,तर कधी मी आहे ना एवढासा शब्द पुरेसा असतो ,तर कधी तुमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हीपुढच्याला आधार देऊन जाते,तर कधी काळजी घे हा शब्द आयुष्य वाढवतो* *सगळ्यांनाच काय पैशांची अपेक्षा नसते पण त्यांना गरज असते ती हळूवार मनावर घातलेल्या फुंकर ची ...* *अशी बरेच लोकं फार कमी वेळा* *आपल्याजवळ येतात हळवं होऊन आपल्या मनाची कवाडं उघडी करतात दुःख सांगतात हे सांगताना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात ही जखम किती काळ गेला तरी ओलीच असते...अशावेळी त्यांना गरज असते ती निखळ अशा फुकंरची.हळूवारपणे त्यांच्या जखमेवरून फुंकर घालावी .इथे प्रत्येकजण संघर्ष घेऊन फिरतोय आपल्याला आपल्या पडता काळात,संघर्षात अशीच कोणीतरी फुकंर घातली असावी याची जाणीव सतत राहावी...चला तर मग आपली एक फुंकर एखाद्याचे आयुष्य आनंदमय करू शकते ...* *आणि हो यात वसंत बापटांची "फुंकर" ही आली हं..😊* *लेखन* *प्रसाद सुतार* *9970820227*
7 0329Loading...
21
निसर्ग वाचवा... आजचा माझा लेख नक्की वाचा... 💚💚🌿🌿
5 9302Loading...
22
वस्ताद.... ✍️"वस्ताद लहुजी साळवे इंग्रजाच्या विरोधात आवाज उठणारे ते एक महत्वपूर्ण क्रांतिकारक होते.. मातंग समाजात जन्म झालेले लहुजी साळवे यांना वस्ताद यामुळे म्हणतात कारण ते स्वतः पहिलवान होते आयुष्यात एकही कुस्ती न हरलेल्या लहुजीने पुण्यात पहिलवानाना प्रशिक्षण देण्यासाठी सत्त्यशोधक आखाडा स्थापन केला.. पुण्यातील कट्टरवादी ब्राम्हण फक्त दोनच व्यक्तीला घाबरायचे एक म्हणजे वस्ताद लहुजी साळवे आणि दुसरे ज्योतिबा फुले.. महात्मा ज्योतिबा फुले हे लहुजीच्या आखाड्यात शिकलेले पहिलवान होते...फुले दडपट्टा चालवण्यात तरबेज होते..फुलेनी जेव्हा पुण्यात महार,मांग समाजाच्या मुलासाठी शाळा सुरू केल्या तेव्हा त्या शाळेत जाणाऱ्या मुलावर हल्ले होत.. सावित्रीबाईच्या अंगावर सुद्धा शेण माती फेकण्यात आली.. जेव्हा ही बातमी लहुजीला कळली तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या शेकडो पहिलंवानांना सोबत घेवून फुलेच्या शैक्षणिक कार्याला सुरक्षा पुरवली...वास्ताद लहुजीमुळे फुलेची चळवळ यशस्वी झाली आणि फुले महात्मा झाले व लहुजी क्रांतीकारक ठरले.. अश्या या महान नायकास कोटी कोटी प्रणाम...!" ✍️ संदर्भ -सत्त्यशोधक..
6 33112Loading...
23
Telegram Monetization ❓❓ 1 ते 2 हजार Subscribers आणि जास्त प्रमाणात views असणारे बऱ्यापैकी Telegram चॅनल्स YouTube सारखं Monetization होण्याच्या मार्गावर आहेत.😱 YouTube सारखी Telegram ची Policy काय आहे बघावी लागेल. 31 मार्च पासून Telegram ने Monetization चा पर्याय दिलाय. सध्या हे टेलिग्रामसाठी नवीन आहे. Views मुळे आपल्या चॅनलवर ॲड ॲटोमॅटिक ॲक्टिव झाल्या आहेत तरी Revenue हा टेलिग्राम Policy नुसार डॉलर मध्ये 50:50 आहे. सध्या चॅनलवरील सभासदांनी ॲड दुर्लक्ष कराव्यात कारण त्या Telegram Policy नुसार आपोआप लागू झाल्या आहेत. ॲड बंद करायचा ऑप्शन असेल तर तो लवकरच करु
6 9395Loading...
24
चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य "वेळी" योग्य ते "निर्णय" घ्यावे लागतात, केलेले "उपकार", दिलेला "शब्द" आणि उपयोगी पडलेली "माणसं" कधीही विसरायची नसतात... 🥰
6 44451Loading...
25
आयुष्यातील निर्णय 🦋 आयुष्यात खुप काही गोष्टी सुटतात, ज्या कि आपल्याला कधीच सोडायच्या नसतात.. पण कसं असतं ना, जर त्या आपण आज नाही सोडल्या तर आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींची किंमत कधीच समजू शकणार नाही.. म्हणून आयुष्यात काही गोष्टींवर आपण कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित नाही केला पाहिजे.. जर देवावर विश्वास असेल ना, तर तुमच्यासोबत कधीच आणि काहीच चुकीचे घडू शकणार नाही... - अमोल मोरे..✍ @AmolmoreAm
6 48149Loading...
26
❤️🥺
5 51112Loading...
27
मस्तक ठिकाणावर ठेवायचं तर पुस्तक जवळ ठेवलं च पाहिजे जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तकं प्रेमींना हार्दिक शुभेच्छा ✨♥️😍 ✍🏻#शब्दांगण
5 69231Loading...
28
माझ्या एका मित्राने माझं वाचनवेड पाहून मला विचारलं होतं, "पुस्तकं वाचून तुला काय मिळतं बरं?" तेंव्हा मी त्याला उत्तर दिलं होतं, "मला त्यातून विचार मिळतात".. मग तो मला म्हणाला, "माणसाला विचारांपेक्षा भाकरीची जास्त गरज असते, भाकरीची सोय करणाऱ्या शिक्षणाची पुस्तकं वाचली तरी बस्स होतंय की! बाकी नसते विचार मिळवून मनातला गोंधळ कशाला वाढवून घ्यायचाय?" मला तेंव्हा लक्षात आलं की , एखाद्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला असं वाटू शकतं म्हणजे आपल्या शिक्षणातच त्रुटी आहे.. एकतर आपल्याकडे वाचनाचा छंद अगदीच कमी लोकांना आहे, त्यात बऱ्याच जणांचं वाचन मृत्युंजय, छावा, पानिपत, यापुढे जातच नाही.. बऱ्याच जणांची पुलं, वपु यांची इयत्ता पार होतच नाही.. आणि अलीकडे तर वाचन म्हणजे चेतन भगत, पाउलो कोअलो नाहीतर गेलाबाजार शिव खेरा, अब्दुल कलाम वगैरे, असंच सूत्र बनलं आहे.. असो.. डोकं गहाण ठेऊन मेंढरू म्हणून जगण्यासाठी तुम्हाला वैचारिक बैठक असण्याची काही गरज नसते, आणि विशेष म्हणजे रोजच्या जगण्यात ते नसल्यानं तुमचं काही बिघडत देखील नाही.. अशी अशिक्षित/सुशिक्षित/उच्चशिक्षित निर्बुद्ध मेंढरं समाजात ढिगानं भरलीयेत.. मग कोणीही येतं आणि त्यांना आपल्या बाजूनं हाकतं.. कोणताही बाबा बुवा अथवा कोणताही दादा भैय्या किंवा कोणताही नेता त्यांना हाकू शकतो, हायजॅक करू शकतो.. आपल्याकडे कॉमर्स आणि सायन्स साईड घेणाऱ्याला (अभ्यासक्रमात नसल्याने) समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानव्यशास्त्र वगैरे शिकण्याचा दुसरा मार्ग नाही, त्यात अवांतर वाचनही नाही.. त्यामुळे बरेच जण व्हाट्सएप युनिव्हर्सिटी वरच पोसले जातात.. आजूबाजूच्या पोलराईज्ड बातम्यांतूनच आपलं मत बनवतात.. आपल्या सभोवतालच्या समाजालाच 'पूर्ण भारत' समजायची चूक करतात.. आपल्यावरूनच जग ओळखतात.. 'आपली मतं हीच सगळ्यांची मतं असणार आहेत' असा समज करून घेतात.. आपली संस्कृती / आपला इतिहास / आपलं ज्ञान हेच महान आहे, अशा भ्रमात असतात.. आणि असेच विचार असणाऱ्यांच्या अशा कंपूत तळ्यातल्या बेडकाप्रमाणे मश्गुल जगतात.. हे इथलं वास्तव आहे.. तुमची स्वतःची योग्य विचारांची बैठक नसेल, तर कोणीही तुमचं वैचारिक अपहरण करू शकतो.. आणि तुमचं विचारविश्व समृद्ध नसेल किंवा वैचारिक दृष्टिकोन ब्रॉड नसेल तर तुम्ही अयोग्य आयडिओलॉजीच्या आहारी पण जाऊ शकता.. कारण तलवारीपेक्षा विचार घातक असतात. विचारांच्या अंमलाने आजवर जितका रक्तपात झाला आहे, तितका तर पोटाच्या भुकेमुळेही झालेला नसेल! आपण असं म्हणतो की, 'विचार हे माणसाला प्रगतीकडे नेतात!' पण हे अर्धसत्य आहे. विचारांच्या तुरुंगाइतका इतका दुसरा अभेद्य तुरुंग नाही. We are victim of our own mind! जर एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणी साखळदंडाने बांधून ठेवले तर तो तिथून सुटण्याची हरएक धडपड करेल.. पण या कामासाठीच तुझी निवड झाली (किंवा प्रत्यक्ष प्रभू/अल्ला/येशू यांनीच केली) आहे, असा विचारांचा तुरुंग त्याच्या मनात निर्माण करता आला, तर त्याला तिथं बसविण्यासाठी साखळदंडाची गरज भासणार नाही, तो स्वतःच ते त्याचं भूषण समजेल, अन वर आणखी दहा जणांना तिथं बसण्यासाठी प्रेरित करेल! असो.. अशा सगळ्याच बऱ्या वाईट विचारांच्या आयडिओलॉजीची पण पुस्तके असतात.. तुम्हाला वर आणणारी जशी पुस्तकं असतात, तशी तुम्हाला खड्ड्यात घालणारीही पुस्तकं असतात! म्हणून योग्य पुस्तकांची निवड आपल्याला जमली पाहिजे.. त्यासाठी विषयवैविध्य आणि सातत्य हवं.. म्हणून , 'किती वाचतोय' यापेक्षा 'काय वाचतोय' हे खूप महत्त्वाचे आहे.. - डॉ. सचिन लांडगे
5 72221Loading...
29
पुस्तकं, वाचनवेड आणि विचारविश्व - डॉ. सचिन लांडगे आज पुस्तक दिन आहे, पुस्तकांचे आभार मानण्याचा दिवस.. अवांतर वाचनाची सवय मला अगदी लहानपणापासून लागली. आज्जीला पेपरात येणारे महाभारत वाचून दाखवायचो तेंव्हा मी दुसरीत असेन. मग रामायण महाभारतातील गोष्टीची पुस्तकं वाचायला लागलो. मग गावातल्या लायब्ररीतून चांदोबा आणून वाचायचो.. चांदोबा कडून गाडी अकबर बिरबल, विक्रम वेताळ , तेनालीरामा अशी भटकत होती.. मग साने गुरुजी सापडले. गोप्या, स्वर्गीय ठेवा, श्यामची आई वाचले.. माझ्या आईला पुस्तकं वाचायची आवड होती.. आमच्या त्या छोट्याश्या खेड्यात दुपारची सामसूम झाल्यावर लोळत पडायच्या ऐवजी ती वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचत असे, आणि आम्हालाही (मला आणि बहिणीला) वाचायला देत असे. शाळेच्या लायब्ररीतून वडील पुस्तकं आणत आमच्यासाठी वाचायला. सुट्टीच्या दिवसात आम्ही तिघंही दोन तीन दिवसांतच फडशा पाडत असू एका पुस्तकाचा.. घरी टिव्ही नसल्याचं लहानपणी फार वाईट वाटत असे, पण आता मात्र 'नव्हता तेच खूप बरं झालं' असं वाटतं.. आठवीत मृत्युंजय वाचलं, मग स्वामी, छावा, पानिपत अशा सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या झाल्या.. दहावी अकरावी बारावी रोजचे पेपर सोडून विशेष काही वाचलं नाही.. आमच्याकडं कुणीतरी दिलेली ओशोंच्या प्रवचनाची कॅसेट्स होती, ती आवडली होती म्हणून बारावीच्या सुट्टीत आजोळच्या जैन लायब्ररीत जाऊन ओशोंबद्दल वाचले.. बरंचसं डोक्यावरून गेलं, पण मनात खळबळ उडवून गेलं.. वय आणि वाचन वाढेल तसं आपण वाचनाचे विषय आणि लेखक बदलले पाहिजेत हे मला जरा लवकरच कळलं.. आपलं बौद्धिक वय वाढवायचं असेल तर ऐतिहासिक कादंबऱ्यात किंवा त्याच-त्याच वाचन प्रकारात अडकून पडायचं नाही हे मनाशी ठरवलं. एमबीबीएस चं पहिलं वर्ष संपल्यानंतर लायब्ररी लावली. लायब्ररीत पुलं देशपांडे, वपु काळे, विस खांडेकर यांना खूप डिमांड होती, त्यांची पुस्तकं फक्त वशिलेबाजांनाच मिळत.. म्हणून मग मी शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ, आचार्य अत्रे, जवळ केले. त्यातच एके दिवशी मला 'जी ए कुलकर्णी' नावाचं रत्न सापडलं. त्यांचं 'सांजशकुन' वाचून झपाटून गेलो. मग मी आणि माझा मित्र सगळी लायब्ररीतली सगळी कपाटं पालथी घालून आपल्याला हवी ती पुस्तके शोधायचो, आणि तत्त्वज्ञानाच्या कपाटात लपवून ठेवायचो, दर दिवसाआड येऊन ते घेऊन जायचो, अन तिथं दुसरं पुस्तक लपवून ठेवायचो.. नंतर नंतर आमच्या लक्षात आलं, इतरही बरेच जण चांगली चांगली पुस्तकं शोधून तिथंच लपवून ठेवताहेत. मग तर आमचे स्वतः शोधण्याचे कष्टही कमी झाले.. जी ए कुलकर्णींचे तर एकूनएक पुस्तक वाचले, शिवाय त्यावर मित्राबरोबर चर्चाही केल्या.. तत्वज्ञानाचं कपाट शोधता शोधता तत्त्वज्ञानाची पुस्तकंही मोठ्या कष्टानं वाचली. नंतर नंतर थोडं समजायला लागलं.. मग 'भारतीय तत्त्वज्ञान: वैचारिक आणि सामाजिक संघर्ष' असली बोजड नावं असलेली काही पुस्तकं वाचली. सॉक्रेटिस वाचलं. शरद बेडेकर, अरुण सारथी, अशा अनवट लेखकांनी काही दिवस डोकं खाल्लं.. 'गीता' वाचून नास्तिक झालो. त्याला अजून पुष्टी मिळावी म्हणून मग पोथ्या-पुराणे देखील वाचली. कथा, कादंबऱ्या यासोबतच कविताही वाचल्या.. सुरुवात 'झेंडूची फुले' याने झाली होती. मग ग्रेस , मंगेश पाडगावकर, सुरेश भट, रवींद्रनाथ टागोर, एमिली डिकिन्स, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे अशांच्या कविता, आणि शायरी, गझल्स आणि चारोळ्याही वाचल्या. ग्रेस आणि कुसुमाग्रजांच्या कवितांनी तर obsessच केलं.. एमबीबीएस चं दुसरं आणि तिसरं वर्ष जास्तीत जास्त पुस्तकं वाचली, मोफत असलेली नाटकं पहिली आणि नाष्ट्याचे पैसे वाचवून पिक्चर पाहिले.. मग परीक्षा तोंडावर आल्यावर रात्रंदिवस जागून अभ्यास केला.. इंटर्नशिप मध्ये वपु काळे आणि उरलेले ग्रेस वाचले.. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वर्षांत एक पानही वाचायला वेळ मिळाला नाही.. त्यानंतर मात्र स्टीफन हॉकिंग्ज, तस्लिमा नसरीन, अँन फ्रॅंक, अच्युत गोडबोले यांची पुस्तकं वाचली.. अच्युत गोडबोलेंमुळे माझ्या वाचनाचा स्पेक्ट्रम आता 'सायन्स'कडं शिफ्ट झाला होता.. जॉबच्या सुरुवातीच्या काळात सायन्स आणि सायन्सफिक्शन वरची पुस्तकं वाचली.. चेतन भगत आणि पाउलो कोअलो पण वाचले.. प्रॅक्टिसच्या सुरुवातीला मानसशास्त्रात आवड वाढली.. म्हणून मग सायकियाट्री आणि सायकॉलॉजी यावरची सिगमंड फ्राऊड पासून अल्बर्ट एलिस पर्यंतची पुस्तकं वाचली.. डोटोव्हस्कीचं 'ब्रदर्स कारमाझव्ह्फ' वाचलं.. ब्रट्रॉंड रसेल च 'Conquest of happiness' आणि unpopular essays वाचलं.. रिचर्ड डॉकिन्स आणि युआल नोव्हा हरारी वाचायचेत अजून.. खूप पुस्तक waiting list वर आहेत.. खूप पुस्तकं आणि खूप लेखक मेन्शन करायचे राहिले.. काही फालतू पुस्तकंही वाचली, तर काही पुस्तकं अर्ध्यातच सोडली.. पण तरी अजून खूप पुस्तकं वाचायचियेत असं सारखं वाटत राहतं.. माझ्या पर्सनल लायब्ररीत वेगवेगळ्या विषयांवरची आता शेकडो पुस्तकं आहेत.. असो..
5 52119Loading...
30
प्रत्येकाच्या आयुष्यात एकच प्रश्न असतो की आपलं चांगलं कधी होणार? मुळात खराब कोणाचं नसते। सर्वजण आपापल्या परीने जगत असतात। मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधून काढणे प्रत्येकाला शक्य नसत आणि या उत्तराला समजून घेण्यासाठीचं हक्काच्या व्यक्तीची।हवं असते आणि ज्यांच्या कडे अशी व्यक्ती असते त्याल प्रश्न पडण्याची शक्यता खूप कमी असते। कारण ती व्यक्ती काही न बोलता आपल्यामनातील सर्व प्रश्न समजून त्याचं उत्तर उमजून सांगण्याचा प्रयत्न करते!,,,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
5 31234Loading...
31
ABC's डायरी..💚💚 ✍️"ABC's डायरी हा माझा 200+पानाचा अमूल्य ग्रंथ 2023या वर्षात प्रकाशित झाला... लवकरच यामधील एक प्रकरण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 9वी च्या पुस्तकात येतं आहे.. ABCs डायरीच्या वाचकांना जागतिक पुस्तकं दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!" ✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) ✍️संपर्क -:@ABCs1432
5 6463Loading...
32
निसर्ग वाचवा.... 🌿🌿🌿 ( जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष लेख...) ©️®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) 🌿 ✍️"एक शेतकरी होता नदीच्या कडेला त्याच शेत होतं नदीला बरेच दिवस पाणी असायच. त्यामुळे शेतकऱ्यांला दोन पिकं सहज घेता येतं होते..नदीच्या कडेला पुष्कळ झाड होती.. ही झाड वादळ वाऱ्यापासून त्या शेताच संरक्षण करत होते..एकदा पावसाळ्यात शेतकऱ्यांने शेतात पिकं पेरलं.पिकं लवकरच मोठं झालं पिकं मोठं झाल्यावर नदीच्या तिरावर माकड येवून त्या उभ्या पिकात दुडघूस घालायला लागली.. उड्या मारायला लागली.. शेतकरी त्यांना रोज हाकलून देतं होता.. पण ही माकड रोज झाडावर बसून उड्या मारायचे शेतकऱ्यांने बघितलं की, या झाडावर माकड बसतात या झाडामुळेच ते आपल्या शेतात येतात आणि उड्या मारतात.. शेतकऱ्यांने ठरवलं की ही सगळी झाडाच तोडून टाकायची..त्या वर्षी उन्हाळ्यात त्याने JCB लावून सर्व झाड तोडून टाकली.. त्यामुळे नदीच्या कडेल एक पण झाड शिल्लक राहील नाही... पर्यायाने माकड येणं बंद झालं.. माकडाचा बंदोबस्त झाला पण त्या वर्षी पाऊसच पडला नाही.. केवळ सुसाट वारा सुटायचा. थोड्या उशिरा पाऊस पडला कस बस शेतकऱ्यांने शेत पेरलं पण.. शेतातील पिकं जस जस मोठं होतं होतं तस तस जोरात येणाऱ्या वाऱ्याने ते मोडून पडतं होतं.शेतकरी कंटाळला.. काय करावं सुचेना काही काळाने पाऊस पडणं कायमच बंद झालं.. आणि त्या शेतात शेतकऱ्यांला काहीच उत्त्पन्न मिळाल नाही.. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आणि तो कर्जबाजारी झाला... सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की झाड, प्राणी, पक्षी ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे त्यामुळे झाड तोडणं थांबवलं पाहिजे.. झाडे तोडल्यामुळे पाऊस पडला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. आज तुम्ही शेती तयार करण्यासाठी झाड तोडता तर उद्या पाऊसच पडला नाही तर काय खाणार? झाडावर माकड बसतात म्हणून झाड तोडणं योग्य नाही.. आणि माकड तरी कुठे बसतील जे जंगल त्यांच घर होत ते जंगल तोडून माणसाने घर, रस्ते व शेती विकसित केली.त्यामुळे प्राण्याना निवाराच शिल्लक राहिला नाही...पर्यायाने वन्यजीव व मनुष्य संघर्ष सुरू झाला.. अलीकडच्या काळात अनेक गावात बिबट्या व वाघ, अस्वल सारखे प्राणी आल्याच्या बातम्या येतात.. कां येतं आहे हे प्राणी गावात..? तर जंगलच शिल्लक राहील नाही तर ते राहणार कुठे..?झाड तोडले, पर्वत सपाट करून शेती केली नद्या नाले दाबून त्यावर अतिक्रमण केल.. मग काय होणार..? प्रगती आणि विनाश ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहे.. एकीकडे प्रगती आहे तर दुसरीकडे प्रदूषण, विषारी रसायन नदीत व हवेत सोडली जातं आहे.. त्यामुळे कोणत्याही नदीच पाणी पिण्यास योग्य राहील नाही..पूर्वीला लोक नदीच पाणी पीत होते ते पाणी फिल्टर करावं लागतं नव्हतं.. पण आता कोणतंही पाणी फिल्टर केल्याशिवाय पिवू शकतं नाही.त्यामुळे कुठेतरी हे थांबवून पर्यावरण व निसर्ग वाचवण काळाची गरज आहे..22एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे त्यामुळे ही वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे जल, जंगल,जमीन वाचवण्याचा संकल्प करून येणाऱ्या काळात झाडें लावा आणि जगवा.....!" ✍️लिखाण दी.22एप्रिल 2024 (जागतिक वसुंधरा दिवस ) प्रतिक्रिया नक्की कळवा.... ✍️लेखक संपर्क -:8806379959 टेलिग्राम ID -:@ABCs1432
6 67611Loading...
33
Media files
6 2933Loading...
34
♦पहिले जागतिक वसुंधरा 🌎 दिन - २२ एप्रिल १९७० ♦२०२४ साठीची थीम - पृथ्वी विरुद्ध प्लास्टिक☑️☑️
6 41812Loading...
35
✨Vaishu naikade ✨
6 32812Loading...
36
Happy Civil Services Day to all the Civil Servants and the Civil Servants to be💐💐💐
6 4964Loading...
37
खरंच ना देवाच पण कुठे तरी चुकतं! ज्यांची परिस्थिती नसते त्याला मन द्यायचं नसतं। कारण जिथ मन आलं तिथे भावना आल्या आणि या काळात परिस्थिती समोर भावनांना काडी मात्र किंमत दिली जाते। हे एक कडू सत्य आहे💯!,,,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
7 55339Loading...
38
मैत्री,दोस्ती हे असे नाते आहे ज्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या जमिनीच्या प्रदेशाला जोडणाऱ्या मजबूत रस्त्यासारखी असते.जी विश्वास,समज आणि आपुलकी ह्या बाबींवर तिची रचना होते. हे एक रक्तच्या नात्यापलीकडचं बंधन आहे जे जीवनाच्या प्रवासाला एक वेगळाच आकार देत असते. आपले खरे मित्र ते नव्हे जे फक्त सुखाच्या,भरभराटीच्या क्षणी जवळ असतात,खरे मित्र ते असतात जे अडचणीच्या,दुःखाच्या आणि आधाराच्या क्षणांचे भागीदार असतात.खरी मैत्री ही एक दुर्मिळ रत्न आहे,जी मिळवणे,कमवणे ह्या काळात कठीण आहे.खरे मित्र ते असतात जे आपल्यापासून दूर जरी असले तरीही नेहमी जवळच असतात,जशी जेवणाला मीठा शिवाय चव येत नाही,तसे जीवन मित्रांशिवाय पूर्णच होत नाही.जीवनात अनेक नवीन नवीन मी दोस्त मिळत जातात,पण सर्वांमध्ये काहीतरी खास असतं हे नक्की.कृष्ण सुदामा,छ.शंभूराजे व कवी कलश,श्री राम व सुग्रीव,कर्ण व दुर्योधन,धोनी कोहली ह्या सारखे अनेक निष्ठावंत मैत्रीचे उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत. परंतु आजकाल खऱ्या मैत्रीचा उद्देश बदलत जात आहे,आजच्या काळातील मैत्री म्हणजे पैश्याची गरज पडल्यास पटकन मदत करणारा,मोबाईल च रिचार्ज संपल्यास 1GB च इंटरनेटपॅक टाकणारा,चहा पाजवणारा म्हणजे आपली खरी मैत्री इथपर्यंतच आपण मैत्रीच्या सीमा मर्यादित करत आहोत,खरी मैत्री ही ह्या पलिकडची असते.ह्या जगात रक्तपलिकडच सर्वात पवित्र नात म्हणजे मैत्री अश्या मैत्रीत स्वार्थ नसावा,मोह नसावा,पारदर्शकता हवी.आपण बाहेर असलो आणि आपल्या आईला दवाखाण्यात ने म्हणून सांगणे लागत नाही म्हणजे ती खरी मैत्री.चेहरा,राज्य,गाव, पैसे,स्वार्थ पाहून केलेली मैत्री कधीच जास्त काळ टिकत नाही.मित्रांची quantity पेक्षा qualtily महत्वाची असते.खरा मित्र तुमच्यासोबत नेहमी रबरसारखा असतो जो तुमच्या चुकांना सुधारत असतो.तुमचा आनंद ज्याचात आहे,तिथेच त्याचा आनंद समजतो.आपले यश पण तो साजरे करतो. खऱ्या मैत्रीची किंमत तेव्हा कळते जेव्हा जेव्हा आपले जुने मित्र शिक्षणानुसर,वेळेनुसार दूर दूर जातात.जेव्हा अश्या जुन्या मित्रांशी खूप दिवसाने अनवधानाने संवाद होतो त्या क्षणांचा आनंद व्यक्त करणे शक्य नाही.असे काही मित्र,माणसे असतात ज्यांची किंमत जवळ असताना कळतं नाही जेव्हा अशे मित्र खूप दूर जातात तेव्हा त्यांची किंमत काय होती त्याची उणीव भाजते.प्रसंगानुसार मित्र बदलू नका,वाद जरी होत असतिल तर माघार घ्ययला शिका,आणि मनापासून मैत्री जपा. "आयुष्यात लाख मित्र बनतील,पण त्या लाखात जुने मित्र नसतील" .............🦋🌺😇💞.............. शब्दांकन✍ -B.S Kendre(Student) Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp) आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...☘✍🏻😇
7 48245Loading...
Photo unavailableShow in Telegram
जीवनात काही व्यक्ती तात्पुरता काळासाठी येतात मात्र त्यांच्या आठवणी हृदयात कायमस्वरूपी घर करून जातात त्या माणसाला स्वतंत्रपणे हसू देत नाहीत आणि मनसोक्त रडण्याचे कारण ही मिळत नाही बाकी ते म्हणतात की कुठलीच टाळी एका हाताने वाजत नसते!,,,✍ Just filling👍❤️❤️❤️💗 एकमन#लेखक   @Ommshelke
Mostrar todo...
8👍 3
#संयम... "यशाची नशा जर करायची असेल तर निराशेच्या गावाला कधी फिरकायच नसतं." परीक्षा पुढे गेलेल्या आहेत माहित नाही कधी होतील पण एवढं नक्की आहे परीक्षा कधी ना कधी तरी नक्की होतील.जेव्हा होतील त्यावेळेस आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नक्की नाव असेल एवढा तर आपल्याला अभ्यास नक्की करायचा आहे. माझं वय 27/28/29/30/31/32..इ.झालंय आता माझं काही खर नाही.विशेषतः मुली घरचे आता ऐकणार नाही.अशा कितीतरी नकारात्मक गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात.या सर्वांमुळे तुम्ही खचले जात आहात.हे साहजिक आहे पण "खचून जाण्यापेक्षा खेचलेल बरं". या सर्व फालतू गोष्टींना पूर्णविराम देवून.सोलूशन ओरिएंटेड राहून आणखी ताकदीने अभ्यास करून जिंकण्यासाठी सज्ज व्हा. नोट-नाव ठेवणारी जनता...(स्वतःचा पोरगा काय काय दिवे लावतो हे सोडून साऱ्या गावाला माहित असते.)किती दिवस आणखी?आईबाप यांना किती दिवस बुडवणार?तुझं वय किती झालंय?लग्न कधी करणार? इ.प्रश्नांनी भंडावून सोडतात आपल्याला.निराशेत जायला ही लोक खुप असं अमूल्य योगदान आपल्या आयुष्यात देत असतात.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करूया. हात जोडून माझ्या भावा आणि बहिणींना विनंती कृपया करून चुकीचे पावलं उचलू नका.आत्महत्या इत्यादी गोष्टी खरचं करू नका.(नजीकच्या काळात घडलेला प्रसंग म्हणून हा लेख लिहिला) "आई वडील नेहमी आपल्या सोबत असतात त्यांची सोबत सोडू नका." "वेळ बदलते फक्त बदलत्या वेळेची वाट पाहावी लागते." तुमचा सर्वांचा achievers वाला 🙏
Mostrar todo...
👍 55 4
Photo unavailableShow in Telegram
👍 68🥰 6😎 4🔥 2😱 1
Photo unavailableShow in Telegram
मानवी मन खूपच बाजींद असतं ना राव ते जास्त फिरत बसतं त्याला स्थिर करायला  हक्काचं ठिकाण लागतं ते शोधण्याच्या नादात फक्त मन भिर भिर फिरत असतं आणि या गडबडीत आपला आनंद दुसर्याच्या हातात देऊन स्वतःला त्रास करून घेत बसतो!,,,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
Mostrar todo...
👍 51 20💯 1
राजकीय शिक्षण.. काळाची गरज.. ✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) ✍️"हल्ली लोकसभा निवडणुका सुरु आहे वर्तमानपत्र टीव्ही यावर सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणूक... कोण निवडून येणार..? खरं सांगायचं तर ग्रामीण भागात जर, कधी तुम्ही गेला तरं तिथल्या माणसाला लोकसभा म्हणजे काय?हे सुद्धा माहित नाही.. खासदार काय करतो?तो कुठे बसतो?याबद्दल थोडेफार सुशिक्षित लोक सोडले तर बहुतांश लोकांना माहितीच नसते.. खासदाराची नेमकी काय काम आहे..? हे सुद्धा लोकांना माहित नसतं.. अशी ही जनता निवडणूक आली की, कोणी हातावर पाचशेची नोट टेकवली की ते म्हणेल त्याला मतदान करायला तयार असते.. निवडणुकीत उभे असणारे उमेदवार मतदारांना 100/500रुपयात खरेदी करू पाहतात.. कारण इथल्या जनतेला संविधान काय आहे..? संसद काय आहे..? मतदान म्हणजे काय..? हे माहित नाही.. राजकीय शिक्षणाचा अभाव सगळीकडे दिसतो.. सुशिक्षित तरुण स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे तरुण तर म्हणतात राजकारण हे आपल काम नाही.. राजकारण नको.. अश्या तरुणांना मला डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य सांगावं वाटेल.. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की "सुशिक्षित तरुणांनी जर राजकारणाकडे दुर्लक्ष केल तर तुम्हाला अशिक्षित लोकांचे गुलाम व्हावं लागेल..!" हे वाक्य आजही खर ठरताना दिसतं आहे..15/16वर्ष शिक्षण घेवून व 7/8वर्ष UPSC /MPSC ची तयारी करुन IAS /IPS झालेल्या अधिकाऱ्यांना 10वी /12वी नापास झालेल्या मंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं.. त्यांना सलाम करावा लागतो.. राजकारणात येण्यासाठी शिक्षणाची अट नाही.. जेव्हा भारतीय संविधान तयार होत होत तेव्हा देशातील साक्षरता खूपच कमी होती.. सर्वसामान्य माणसाला लोकांच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून संविधानाने यासाठी शैक्षणिक पात्रता निर्धारित केली नव्हती.. हे काम नंतरचे राज्यकर्ते करतील अशी अपेक्षा संविधान निर्मात्याना होती.. पण नंतर सुद्धा आमदार, खासदार होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता संसदेने निर्धारित केली नाही..सरकार सद्या सुद्धा ते करू शकतं. पण तस करण्याची मानसिकता दिसतं नाही.. संविधान म्हणजे काय?संसद म्हणजे काय..? हे फक्त स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी व थोडाफार सुशिक्षित वर्ग सोडला तर इतरांना माहित नाही... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच असं मत होत की,स्वातंत्र्य मिळाल्यावर किमान 10वर्ष निवडणुका घेवू नये.. त्या 10वर्षात जनतेला राजकीय शिक्षण द्यावं... पण तस घडलं नाही.. निवडणुका झाल्याच आणि काँग्रेस सत्तेत आली...नंतर अनेक घटना घडतं गेल्या..अलीकडे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.. त्यात मतदानाची टक्केवारी 60%च्या वर जावू शकली नाही..100%मतदान कां होत नाही..? का मतदार मतदान करायला येतं नाही..? कारण राजकीय शिक्षणाचा अभाव... ही निवडणूक नेमकी कोणाची? हेच लोकांना माहित नाही... लोकांना फक्त ग्रामपंचायत माहित असते.. सुशिक्षित वर्गाला तर राजकारण म्हटलं की कपाळावर आढ्या पडतात.. आपल्याला काय करायच? कोणी पण निवडून येवो आपल्याला काय देणार..? असं समजतं सुशिक्षित वर्ग मतदान करण्यासाठी बाहेर पडतं नाही.. मतदानाची सुट्टी लोक फिरायला जातात पण मतदान करत नाही.. कारण त्यांना माहीतच नाही मतदान केल्याने काय होत? महत्वाचा मुद्दा असा आहे की, राजकारणी लोकांनी तर लाजच सोडली आहे.. सकाळी एका पक्षात, तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात.. कोणी पक्ष पळवतो,तर कोणी आमदार पळवतो हे अत्यंत घाणेरड राजकारण सद्या जनतेला अजिबात पसंद नाही.. वारंवार तेच ते लोक सत्तेत येतं असतील तर मतदान करुन फायदा काय..? हा प्रश्न आहे.. याकडे सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे..राजकीय नेत्यांनी निष्ठावंत राहील पाहिजे.. हे सगळी कारण बघितली तरी सुद्धा राजकीय शिक्षणाच्या आभावामुळे कमी मतदान होवून अयोग्य लोक सत्तेत येतं आहे.. आणि हे लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.. त्यामुळे योग्य व्यक्ती जर सत्तेत आणायचे असेल तर प्रत्येक घरी संविधान पोहोचवण आवश्यक आहे.. प्रत्येकाने संविधान वाचन आवश्यक आहे.. प्रत्येकाने राजकारण समजून घेणं आवश्यक आहे.. जर तुम्ही हे केल नाही तर देशात वारंवार ते ते लोक सत्तेत येतील आणि भ्रष्टाचाराला हातभार लागेल.. म्हणून मतदार जागरूक हवा.. सत्तेसाठी व स्वतः वरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी एखादा नेता रातोरात पक्ष बदलत असेल आणि तरीसुद्धा जनता त्यांना निवडून देतं असेल तर इथे भ्रष्टाचार आणि अयोग्य व्यक्ती सत्तेत येण्यास जनता जबाबदार आहे...म्हणून राजकीय शिक्षण ही काळाची गरज आहे..त्यामुळे सुशिक्षित वर्गान संविधान आणि राजकारण याचा अभ्यास करुन राजकारणात आपला सहभाग वाढवला पाहिजे.. व देशाच्या विकासासाठी इमानदार, सुशिक्षित लोकप्रतिनिधीला निवडून देतं देशाचा विकास करायला हवा...!" लिखाण दि.24एप्रिल 2024 प्रतिक्रिया नक्की कळवा.. ✍️लेखक संपर्क -:8806379959
Mostrar todo...
👍 24 2
आजचा माझा लेख राजकीय शिक्षण काळाची गरज... नक्की वाचा....❤️
Mostrar todo...
👍 14
Photo unavailableShow in Telegram
👍 74💯 4🔥 2
मी शुध्द हरपू पाहिली, चिंधड्या चिंधड्या आयुष्याचे अवशेष आपल्या आपण शुध्दीत कसे वेचणार, तुकडा तुकडा सांधून लत्करलेलं आयुष्य घ्यावं पांघरूण या निर्मनुष्य गारठ्यात, म्हणून मी वाचली पुस्तक, भळभळणाऱ्या जखमांवर बांधल्या कवितेच्या ओळी वाचली थोरामोठ्यांची चरित्रं काढली चित्र... आयुष्याच्या गारठणाऱ्या कॅनव्हासावर रक्तात बुडवून कुंचला, दारू प्यालो , भांग खाल्ली, पण साली शुध्द हरपतच नाही... नागराज मंजुळे 👏
Mostrar todo...
👍 46 6
तुमचे लिखाण आणि चॅनल विषय काही Suggestions साठी इथे पाठवा👉 @Shyam_barse आता आपल्या WhatsApp channel वर तुमचे पोस्ट टाकण्यासाठी https://wa.me/919623141040
Mostrar todo...
Share on WhatsApp

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

1

👍 51 9💯 1