cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

Mostrar más
Advertising posts
28 859Suscriptores
-524 hours
-1357 days
-58430 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

✍.....जीवनात इतरांना नावबोट ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा...🎯 जीवनात कोणत्याही व्यक्तीचा एवढा जास्तच विरोध करू नये.वाईट वाटत भारतातील लोक भारतातील खेळाडूंनाच विरोध करतात.सर्व खेळाडू भारतीय आहेत आणि आपल्या देशासाठी खेळतात ही बाब लक्षात ठेवावी.एक व्यक्ती म्हणून आपल्याला कोणाचे विचार,कृती आवडत नसेल तोपर्यंत ठीक आहे परंतु असा खेळाडू जो भारताला एका allrounder ची गरज होती तेव्हा मिळाला,champion trophy मध्ये पाकिस्तान कडून लाजिरवाणी हार होताना वाचवली,खूपदा शेवटच्या षटकात सामने जिंकून दिले.कित्येकदा उत्तम झेल घेऊन महत्वपूर्ण सामने जिंकवले.खूपदा क्षेत्ररक्षण करताना injured झाला अश्या खेळाडूला छप्परी,कुत्रा जर मैदानात गेला तर त्याला त्या खेळाडूच्या नावाने ओरडले जाते,हे खूप लाजिरवाणे स्वतः भारतीयांसाठी.अरे पण जरा विचार करा त्याने आपल्या देशासाठी ह्या अगोदर काय केलंय,एका आरोप संपत नाहीत तोपर्यंत दुसरे आरोप काय परस्थिती होत असेल त्याचा विचार करा. मान्य आहे त्या खेळाडूच्या चुका झाल्या असतील,तो आपल्या senior खेळाडूचा आदर करायला विसरला असेल पण एवढं त्याला troll करणे की स्वतः सारख्या काही महान खेळाडूंना आता हे थांबवा असे भर मैदानात सांगावे लागते.आपण संघासाठी सामना पाहत असतो व्यक्तितीक खेळाडूच्या कामगिरीसाठी नाही आणि तो संघाचा कर्णधार बनला ही त्याची चूक नाही आहे,टीम मॅनेजमेंट ची आहे.जर कोणाचे समर्थन केले ह्याचा अर्थ असा नाही की इतरांना विरोध केला जातो. एक साधा विचार करा आपण जुन्या कंपनीत कामाला होतो जेव्हा नवीन कंपनीत जातो तेव्हा काही काळाने जुन्या कंपनीकडून आपल्याला ऑफर येते परत जॉइंनिगची आणि वरून जास्त पगार पण व मुख्य बनवलं पणं जाते त्या संघाचा आणि ती कंपनी खूपच नामिवंत आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलं असत जुनीच कंपनी जॉईन केली असती ना है चुकीचं आहे मान्य आहे परंतु आपण काय केलं असत त्याचा पण विचार करा ना. व्यकक्तिक खेळाडूला एवढे पण troll करण्याचा प्रयत्न करू नका,शेवटी तोपण एक माणूस आहे,जर तुम्हाला त्याचे वागणे पटत नसेल तर त्याला support नका करु.किमान भारतीय संघाल support करा.आयपीएल काही काळाने संपेल आगामी वर्ल्डकप येईल त्याचा विचार करा.जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा त्यातून बाहेर निघ्यन्यासाठी अश्याच अष्टपैलू खेळाडूची उणीव भाजते असे नाही की बाकीचे खेळाडू चांगले नाही आहेत परंतु आपण कोणत्याही भारतीय खेळाडूला ह्या स्तरापर्यंत विरोध करणे माणूस म्हणून चुकीचे वाटते सर्वांचा जीवनात मग तो कोणतही खेळाडू असो वाईट काळ येत असतो इतर नावबोट ठेवत असतात अश्या काळात भारतीय म्हणून आदर देणे गरजेचे आहे शेवटी चुका ह्या सर्वणाकडून होतात माणूस म्हणून त्यांना माफ करणे पुढे जाणे गरजेचे आहे. .............🦋🌺😇💞.............. शब्दांकन✍ -B.S Kendre(Student) Telegram -@Bskendre5 आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...☘✍🏻😇
Mostrar todo...
👍 10 1
मतदान..👆🇮🇳 ✍️"मतदान हा देशातील प्रत्येक नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप संघर्ष करुन देशातील प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार मिळवून दिला.. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने या अधिकाराचा वापर करा.. आणि प्रत्येकाने मतदान करा...!" जय हिंद... 🇮🇳🇮🇳🇮🇳 ✍️ ABC's Academy 🇮🇳 🇮🇳 Good Evening 🇮🇳
Mostrar todo...
👍 28
100 लोकांची क्षमता असलेल्या एका वसतिगृहात दररोज सकाळी नाश्त्या मध्ये उपमा दिला जात असे. त्या 100 लोकांपैकी 80 लोक रोज तक्रार करायचे की उपमा ऐवजी वेगवेगळे पदार्थ बनवावेत. पण, इतर 20 लोक उपमा खाऊन खूश होते. उरलेल्या 80 लोकांना उपमा व्यतिरिक्त काहीतरी वेगळे हवे होते. या गोंधळाच्या परिस्थितीत वसतिगृहातील वॉर्डन ने मतदान घेण्याचा प्रस्ताव ठेवला व ज्या मेन्यू ला सर्वात जास्त मते पडतील, तो पदार्थ सकाळी न्याहारीला दिला जाईल, असे ठरले. उपमा हवा असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी अचूक मतदान केले. उर्वरित 80 लोकांनी खालीलप्रमाणे मतदान केले. 18 - मसाला डोसा 16 - आलू परोटा आणि दही 14 - रोटी आणि सब्ज 12 - ब्रेड आणि बटर 10 - नूडल्स 10 - इडली सांबार त्यामुळे, मतदानाच्या निकालांनुसार, उपमाला सर्वाधिक मते मिळाली आणि पुन्हा तोच उपमा दररोज दिला जाऊ लागला. *धडा*: जोपर्यंत 80% लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली आहे, 20% लोक आपल्यावर राज्य करतील. हा एक मूक संदेश आहे. हुशारीने मतदान करा
Mostrar todo...
👍 64👌 5💯 3
*☘️फुंकर☘️* *✍️फुंकर किती सुंदर पण तितकाच खोलवर अर्थ असलेला शब्द नुसता शब्द वाचला तरी डोळ्यांपुढे तरळतो तो ओठांचा चंबू...* *पण या फुंकरचे प्रकार तरी किती ..प्रेमात व्याकूळ असताना,ती माया,ती ममता,तो स्नेह ,ती संवेदना, ती संवेदनशीलता,आणि फू मधला फुंकर ...* *पण फुंकर ही फक्त आग लावण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी असते का ?* *ज्याप्रमाणे लहान मुलगा भुकेने व्याकूळ होऊन दुधासाठी आईकडे येतो ..* *आणि मग आई दुधावरची साय पडदा बाजूला करून दूध गार करून देते . त्याप्रमाणे एखादाच्या आयुष्यात आलेल्या दुःख रूपी पडद्यावर फुंकर मारून दूर करण्याचे काम आपण ही करू शकतो ...* *यासाठी "फुंकर"पाहीजे ती सहानुभूतीची,आपुलकीची आणि याचीच आज समाजात वाणवा आहे* *आपलेपणा हा आता आपलाच राहिला आहे. यामुळे सामाजिक दृष्ट्या बांधीलकी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात धूळ खात पडली आहे..* *आपल्या भोवती बरेच असे लोक आहेत त्यांना गरज आहे आपल्या मायेची,का ?मारू नये आपण मायेची फुंकर मग अशा‌ लोकांना* *जर आपली एक फुंकर अशा लोकांच्या जीवनातील कष्ट ,दुःख दूर लोटत असेल तर मारूया ना हळूवार फुंकर तेच्या जीवनातील जखमांवर..* *कधी कधी संकटकाळात खांद्यावर ठेवलेला हात धीर देऊन जातो,तर कधी मी आहे ना एवढासा शब्द पुरेसा असतो ,तर कधी तुमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हीपुढच्याला आधार देऊन जाते,तर कधी काळजी घे हा शब्द आयुष्य वाढवतो* *सगळ्यांनाच काय पैशांची अपेक्षा नसते पण त्यांना गरज असते ती हळूवार मनावर घातलेल्या फुंकर ची ...* *अशी बरेच लोकं फार कमी वेळा* *आपल्याजवळ येतात हळवं होऊन आपल्या मनाची कवाडं उघडी करतात दुःख सांगतात हे सांगताना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात ही जखम किती काळ गेला तरी ओलीच असते...अशावेळी त्यांना गरज असते ती निखळ अशा फुकंरची.हळूवारपणे त्यांच्या जखमेवरून फुंकर घालावी .इथे प्रत्येकजण संघर्ष घेऊन फिरतोय आपल्याला आपल्या पडता काळात,संघर्षात अशीच कोणीतरी फुकंर घातली असावी याची जाणीव सतत राहावी...चला तर मग आपली एक फुंकर एखाद्याचे आयुष्य आनंदमय करू शकते ...* *आणि हो यात वसंत बापटांची "फुंकर" ही आली हं..😊* *लेखन* *प्रसाद सुतार* *9970820227*
Mostrar todo...
👍 11
निसर्ग वाचवा... आजचा माझा लेख नक्की वाचा... 💚💚🌿🌿
Mostrar todo...
वस्ताद.... ✍️"वस्ताद लहुजी साळवे इंग्रजाच्या विरोधात आवाज उठणारे ते एक महत्वपूर्ण क्रांतिकारक होते.. मातंग समाजात जन्म झालेले लहुजी साळवे यांना वस्ताद यामुळे म्हणतात कारण ते स्वतः पहिलवान होते आयुष्यात एकही कुस्ती न हरलेल्या लहुजीने पुण्यात पहिलवानाना प्रशिक्षण देण्यासाठी सत्त्यशोधक आखाडा स्थापन केला.. पुण्यातील कट्टरवादी ब्राम्हण फक्त दोनच व्यक्तीला घाबरायचे एक म्हणजे वस्ताद लहुजी साळवे आणि दुसरे ज्योतिबा फुले.. महात्मा ज्योतिबा फुले हे लहुजीच्या आखाड्यात शिकलेले पहिलवान होते...फुले दडपट्टा चालवण्यात तरबेज होते..फुलेनी जेव्हा पुण्यात महार,मांग समाजाच्या मुलासाठी शाळा सुरू केल्या तेव्हा त्या शाळेत जाणाऱ्या मुलावर हल्ले होत.. सावित्रीबाईच्या अंगावर सुद्धा शेण माती फेकण्यात आली.. जेव्हा ही बातमी लहुजीला कळली तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या शेकडो पहिलंवानांना सोबत घेवून फुलेच्या शैक्षणिक कार्याला सुरक्षा पुरवली...वास्ताद लहुजीमुळे फुलेची चळवळ यशस्वी झाली आणि फुले महात्मा झाले व लहुजी क्रांतीकारक ठरले.. अश्या या महान नायकास कोटी कोटी प्रणाम...!" ✍️ संदर्भ -सत्त्यशोधक..
Mostrar todo...
👍 49🙏 13
Telegram Monetization ❓❓ 1 ते 2 हजार Subscribers आणि जास्त प्रमाणात views असणारे बऱ्यापैकी Telegram चॅनल्स YouTube सारखं Monetization होण्याच्या मार्गावर आहेत.😱 YouTube सारखी Telegram ची Policy काय आहे बघावी लागेल. 31 मार्च पासून Telegram ने Monetization चा पर्याय दिलाय. सध्या हे टेलिग्रामसाठी नवीन आहे. Views मुळे आपल्या चॅनलवर ॲड ॲटोमॅटिक ॲक्टिव झाल्या आहेत तरी Revenue हा टेलिग्राम Policy नुसार डॉलर मध्ये 50:50 आहे. सध्या चॅनलवरील सभासदांनी ॲड दुर्लक्ष कराव्यात कारण त्या Telegram Policy नुसार आपोआप लागू झाल्या आहेत. ॲड बंद करायचा ऑप्शन असेल तर तो लवकरच करु
Mostrar todo...
👍 15
चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य "वेळी" योग्य ते "निर्णय" घ्यावे लागतात, केलेले "उपकार", दिलेला "शब्द" आणि उपयोगी पडलेली "माणसं" कधीही विसरायची नसतात... 🥰
Mostrar todo...
👍 38 2