es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला एनसीबीकडून अटक LetsUpp | Trending ▪️ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ▪️ एनसीबीची ही एक मोठी कारवाई असून मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते. ▪️ त्यानंतर एनसीबीनं ही कारवाई करत मुंबईतून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ▪️ त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मागील वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. ▪️ या कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले. ▪️ दरम्यान, पुराव्यांच्या आधारे ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं एनसीबीच्या लक्षात आले. To know more click here https://letsup.app.link/qDrHEpg1jhb

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट LetsUpp | Trending ● मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. ● मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट ● मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. 76 तालुक्यांपैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट* ● मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील 76 पैकी 60 तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस होत नसल्यानं 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. लाखो शेतकरी हवालदिल ● पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. To know more click here https://letsup.app.link/9OegDwxWjhb

ब्रेकिंग! अखेर राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला LetsUpp | Breaking ▪️ राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ▪️ मागील दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे. ▪️ राज्यातील आशा वर्कर्स15 जून 2021 पासून संपावर होते. या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलावली होती. ▪️ या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा 1 हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला. ▪️ मात्र, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला होता. ▪️ अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये आशा वर्कर्सना १ हजार रुपये मानधनवाढीसोबतच ५०० रुपये कोविड भत्तादेखील देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं आहे. ▪️ येत्या १ जुलैपासून ही नवी मानधनवाढ आणि कोविड भत्ता लागू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. To know more click here https://letsup.app.link/lnDFjTLNjhb

शरद पवार आणि प्रशांत किशोर आज तिसऱ्यांदा भेटणार LetsUpp | Trending ● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ● साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत आहे. ● दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ● गेल्या 48 तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे. ● अशातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा विषय नव्हता. ● मात्र सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यामध्ये विरोधकांना कसं आणखी आक्रमक होता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. ● अशातच प्रशांत किशोर यांनी यापूर्वीत आपण निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच या भेटीच्या सत्राबाबत सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. To know more click here https://letsup.app.link/6lkIXw6Njhb

'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये कोरोना विषाणूचा नवा 'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जाणून घ्या नेमके काय म्हणाले जिल्हाधिकारी... (रिपोर्टर - योगिता सोनवणे) https://youtu.be/Y8XKny0JZfM

राज्यामध्ये लसीकरणाचा नवा उच्चांक! LetsUpp l Trending ● राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस
राज्यामध्ये लसीकरणाचा नवा उच्चांक! LetsUpp l Trending ● राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. ● राज्यात दिवसभरात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला आहे. ● आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. ● राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. ● ही आकडेवारी मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतची असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे. ● यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस दिल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले आहे. To know more click here https://letsup.app.link/71AILgMsjhb

भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, किवींना मिळाली आघाडी LetsUpp | Trending ● वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात आज न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केला आहे. तरी किवींना 32 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. ● न्यूझीलंडकडून सलामीवीर कॉनवे याने 54 तर कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी केली. तसेच टीम साऊदीने 30 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले. ● तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ● कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. To know more click here https://letsup.app.link/995RTEbFihb

राष्ट्रवादीला शिर्डी साई संस्थान तर काँग्रेसकडे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान LetsUpp | Trending ● शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ● अखेर आज याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे. ● या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ● यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसकडे गेले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत. ● कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे. ● महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली, तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली. ● काही महामंडळांचे वाटप झालं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. तिन्ही पक्षांकडे महामंडळे असतील. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ ठरवले जातील, आघाडीत विसंवाद नाही, गैरसमज नाहीत. To know more click here https://letsup.app.link/RxWIQPRBihb

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी LetsUpp | Bulletin ● मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल; भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात दिली माहिती ● कोरोनामुळे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवस येत्या 5 आणि 6 जुलैला मुंबईत होणार, अधिवेशनात, प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाही ● सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलैला होणार मतमोजणी ● डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचे प्रमाण अधिक, तरी घाबरू नका आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती ● अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना जातपडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिली स्थगिती ● आषाढी वारीसाठी 17 ते 25 जुलै या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू, परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही ● घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत टास्क फोर्सची नियमावली तयार; राज्य सरकारने सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर केलाय. मात्र, धोरणात्मक निर्णयासाठी राज्य सरकारने आठवड्याचा अवधी मागितला ● भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही, राकेश झुनझुनवाला यांनी केला दावा; तसेच तिसरी लाट येईल म्हणून मार्केटमधील गुतंवणूकदारांनी काळजी करू नये, असा सल्लाही दिला ● CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ● भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर, बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी To know more click here https://letsup.app.link/ZFIXlwdCihb

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडले LetsUpp | Mumbai ● मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. ● डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ● हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. ● रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्यानं निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्यानं लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली. ● श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं समोर आलं आहे. ● यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं. रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. To know more click here https://letsup.app.link/DKzoeARzihb

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल LetsUpp | Trending ▪️ मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ▪️ मराठा आरक्षणाबाबत आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. ▪️ त्याप्रमाणे राज्य सरकाने आमची प्रमुख मागणी मान्य केली असून त्यानुसार आज राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. ▪️ माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिशिष्टदेखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे. ▪️ मराठा आरक्षणाबाबत येत्या 8 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसेच एक समिती नेमून मागण्या सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. To know more click here https://letsup.app.link/6RD7EjInihb

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार 4000 रुपये LetsUpp | Trending ● केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. ● काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे. ● पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल. 4000 रुपये मिळवण्यासाठी काय कराल? ● गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत आहे. ● तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील. रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल? 1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. 2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा. 3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल. 4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा. 5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा. 6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. आर्थिक मदत कधी मिळणार? एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील. To know more click here https://letsup.app.link/Sz7o6Zmoihb

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर LetsUpp | Trending ● सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर, पालघर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. ● रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ● 6 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. To know more click here https://letsup.app.link/rFWX7z0pihb

भाजपने माझ्या कुटुंबालाही त्रास दिला; शंकरराव गडाखांचा गौप्यस्फोट LetsUpp | Trending ● शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेण्याबाबत पत्र पाठविल्यानंतर आता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ● ‘राज्यात भाजपची सत्ता असताना मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देण्यात आला होता. मात्र, म्हणून शिवसेनेने भाजपशी जुळवून घेण्याची मागणी आम्हाला मान्य नाही,’ असा गौप्यस्फोट शंकरराव गडाख यांनी केला आहे. काय म्हणाले शंकरराव गडाख?: ● ‘भाजपच्या सत्ताकाळात तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना माझ्या कुटुंबालाही त्रास झाला होता. पूर्वी एका शेतकरी आंदोलनाच्या वेळी गुन्हा दाखल झाला होता. ● ते प्रकरण न्यायालयात सुरू झाल्यानंतर न्यायालयाकडून समन्स मिळालेले नव्हते, त्यामुळे न्यायालयात हजर होऊ शकलो नव्हतो. त्यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा पाठवून माझ्या घराची झडती घेतली होती. याचा खूप त्रास झाला. ● सरनाईक यांचे कुटुंबही सध्या अशाच त्रासातून जात आहे. त्यामुळे त्यांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. ज्यांना त्रास होतोय, ते लोक आता बोलू लागले आहेत. मात्र, यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे, याच्याशी सहमत नाही.’ To know more click here https://letsup.app.link/3sdoshWdihb

ब्रेकिंग! खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! LetsUpp | Breaking ▪️ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अंतिम सुनावणीपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे. ▪️ खा. राणा यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांना २ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयं स्थगिती दिली आहे. ▪️ मुंबई उच्च न्यायालयानं बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मिळवून नंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळवल्याबद्दल राणा यांना दंड ठोठावला होता. ▪️ दरम्यान, निवडणुकीनंतर जातीचा खोटा दाखला मिळवून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवल्याचा आरोप आरोप अडसूळ यांनी खा. राणा यांच्यावर केला होता. ▪️ या संदर्भात अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. To know more click here https://letsup.app.link/6agnMqRgihb

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवसांचेच..!!! LetsUpp | Trending ● मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ● ५ आणि ६ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून, अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. ● दरम्यान, राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ● करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने विरोधकांकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची तसेच १५ दिवसांचं विधिमंडळांचं अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. ● विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ● दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला. To know more click here https://letsup.app.link/7PsQcyhdihb

महाआघाडीची चाचपणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्षांची बैठक LetsUpp | Trending ● राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. ● देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ● त्याचबरोबर संभाव्य बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जात आहे. ● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. ● ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. ● २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची रणनीती आखली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी आज होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीत काँग्रेसचा सहभाग नाही? : ● काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटातील नेते कपिल सिबल यांना या बैठकीचे निमंत्रण असले तरी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होण्याची नाही. ● ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार व अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. 'या' १५ पक्षांना निमंत्रण : ’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. To know more click here https://letsup.app.link/tDhQ85TQhhb