es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
photo content

अन् बच्चु कडू हे युसुफ खान पठाण बनतात तेव्हा... LetsUpp l Amravati ● राज्याचे शालेय शिक्षण व जलसंपदा राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत, असाच प्रकार सोमवारी अकोला आणि पातुर या शहरात घडला आहे. ● बच्चु कडू यांनी वेशांतर करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा धास्तावल्याचे दिसून येत आहे. ● त्यांनी चक्क मुस्लिम समाजातील व्यक्तीचा पेहराव करून तोंडाला रुमाल बांधून विविध प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. ● जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने, जिल्ह्यातील गुटखा विक्री सुरू आहे का? हे देखील त्यांनी तपासले असता यात अनेकांचे पितळ उघडे पडले आहेत. ● दरम्यान पोलीस यंत्रणांनीदेखील धसका घेतला आहे. त्यांनी अकोला महापालिकेत प्रहार संघटनेच्यावतीने घरकुलासाठी आंदोलन सुरु होते, या आंदोलनात सहभाग घेऊन येथील प्रशासकीय यंत्रणेची चौकशी केली आहे. ● त्यांनी पातुर येथील कलश व एसबी या दोन पान सेंटरवर गुटखा मागितला, तेथील पान सेंटरवाल्यांनी तुम्हाला पुष्कळ गुटखा देऊ असे देखील सांगितले. त्यामुळे त्या पान सेंटर वाल्यांचे पितळ सुद्धा उघडे आले आहे. ● अशा आगळ्या वेगळ्या विषयात बच्चू कडू यांनी यंत्रणेचा आढावा घेतला आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा एकंदरीत चक्क झाली आहे. To know more click here https://letsup.app.link/2XqdqSHPhhb

चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर आता 'निपाह'चा धोका? LetsUpp | Trending ● राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ● पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे. ● निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातील महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या. ● याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता, अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली. ● देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो. निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. ● निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. ● गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. To know more click here https://letsup.app.link/Y99NPBn0hhb

'बाबूराव पेंढारकर' ऐसा नटश्रेष्ठ होणे नाही LetsUpp | Special ● नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांचा जन्म २२ जून, १८९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ख्याती होती. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ● बाबूराव पेंढारकरांनी १९२० साली 'सैरंध्री' या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ● १९२० च्या दशकापासून १९६० दशकापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर ६८ चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. ● दोन चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांच्या असंख्य चित्रपटांपैकी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे 'अयोध्येचा राजा' होय. ● व्ही. शांताराम दिग्दर्शित 'अयोध्येचा राजा' हा बोलपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. ● 'अयोध्येचा राजा'मध्ये बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, शंकरराव भोसले, मानाजीराव माने, बुवासाहेब, कुमार दिगंबर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ● प्रभात कंपनी पुण्याला हलवण्यात आली. परंतु, बाबुराव पेंढारकर पुण्याला गेले नाहीत. मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी' काढली आणि बाबूरावांना मॅनेजर करण्यात आले. ● 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी'चा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये बाबूरावांनी अभिनय केला होता. पुढे त्यांनी मित्राच्या सहाय्याने 'हंस पिक्चर्स' नवी कंपनी उभारली. ● 'श्यामची आई,' 'महात्मा फुले,' 'धर्मवीर,' 'देवता,' 'अर्धांगी अमृत,' 'पहिला पाळणा,' 'भक्त दामाजी,' 'पुनवेची रात,' 'जय मल्हार,' 'मी दारू सोडली' यांसारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटही केले. ● यामध्ये 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'नवरंग', 'दो आँखे बारह हाथ' या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. ● पोटाच्या कर्करोगाने बाबूराव यांचे ९ नोव्हेंबर, १९६७ रोजी निधन झाले. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/xjgatwjQhhb

मराठा मूक आंदोलनासंदर्भात खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा LetsUpp | Trending ● राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ● जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणाम दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ● खासदार संभाजीराजे यांनी आज नाशिकमध्ये मूक आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले : ● 'राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे. ● या मागण्यांची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी होत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील मूक आंदोलनाच्या समन्वयकांनी हे आंदोलन थांबवायचे नाही, असा निर्धार केला आहे. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन तूर्तास १ महिन्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ● आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. जर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर मात्र आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. To know more click here https://letsup.app.link/4hRgJcfVghb

...तर मला शिक्षा द्या, माजी मंत्री संजय राठोड LetsUpp | Jalna ▪️ पूजा चव्हाण प्रकरणात दोषी असेल तर मला शिक्षा द्या, अन्यथा परत मी काम करायला तयार आहे. अशी साद माजी मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=AvxLWSmKE8w राठोड म्हणाले : ▪️ पुजा चव्हाण प्रकरणात झालेल्या आरोपांची आधी चौकशी करा. ▪️ मग शिक्षा द्या, अशी माझी भूमिका होती. मात्र, इथे चौकशी आधीच फाशी देणं हे योग्य नाहीये. ▪️ आरोप करायचे आणि लगेच फासावर चढवायचं हे चुकीचं आहे. ▪️ या प्रकरणाची चौकशी करून मी दोषी असेल तर शिक्षा द्या, अन्यथा मला काम करू द्या. दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड आज जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. To know more click here https://letsup.app.link/Rms7l28Oghb

ब्रेकिंग! अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई LetsUpp | Breaking पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ४० कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त केली आहे. नेमकं प्रकरण काय : ▪️ काही दिवसांपूर्वी व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील ABIL हाऊस या कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. ▪️ त्यांनी फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून कारवाईसह त्यांची चौकशी करण्यात आली होती. कोण आहेत अविनाश भोसले? : ▪️ अहमदनगरमधील अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. ▪️ त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. ▪️ तदनंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली. पुण्यातील बाणेर भागात त्यांनी उभारलेला व्हाईट हाऊस हा बंगला डोळे दिपवणारा आहे. ▪️ हाऊसच्या टेरेसवर अविनाश भोसलेंच्या मालकीचे हेलिकॉप्टरही आहेत. रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा प्रवास अवघ्या काही वर्षांचा आहे. ▪️ अविनाश भोसले यांचा हा प्रवास सर्वांच्याचं दृष्टीनं अचंबित करणारा आहे. दरम्यान, भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. ▪️ २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. ▪️ त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. ▪️ दरम्यान, ईडीने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. To know more click here https://letsup.app.link/dkMzuMwRghb

त्याने निजामाचा वंशज असल्याचा बनाव करून जमिनीची केली विक्री LetsUpp | Trending निजामाचा वंशज असल्याचं सांगत औरंगाबादेतील जमिनीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदरील व्यक्तीने बनावट शिक्यांच्या आधारे हिमायत बागेतील ४०० एकर जमिनीवर दावा केला आहे. नेमकं काय प्रकरण : ▪️ अली खान ऊर्फ दिलशाद जहां हे स्वतःला निजामाचे वंशज असल्याचं सांगतात. ▪️ आमच्या हिश्श्यात हिमायतबाग येथे चारशे एकर जमीन येत असल्याचे ते सांगतात. ▪️ निजामांनी आपल्याला या जमिनीच्या विक्रीसंदर्भातली पावर ऑफ अ‍ॅटर्नी दिल्याचं सांगत आहेत. ▪️ त्याने एक एकर जमीन शिक्षक मोहंमद नदीम सलीम पाशा यांना 25 लाखात बॉंडवर विकली आहे . ▪️ मोहम्मद पाशा यांनी सदरील व्यक्तीला जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी वारंवार विनवणी केली. ▪️ त्यातच सरकारच्या लक्षात आलं की फळबाग संशोधन विद्यापीठाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण झालं आहे. ▪️ दरम्यान, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी हे अतिक्रमण काढून टाकलं. त्याच वेळी मोहम्मद पाशा यांच्या आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. ▪️ त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि निजामाचा वंशज सांगणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. To know more click here https://letsup.app.link/7MGPpJ2Kghb

🤔 गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय 'अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड!' ✔️ खास गुंतवणूकदारांसाठी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड सादर करत आहे अधिकृत मोबाईल अ‍ॅप... 👍 अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड अ‍ॅपसह केवळ 5 मिनिटांत जलद, सोपी आणि कागदीविरहित गुंतवणूक. 🤓 अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडामध्ये नवीन काय?: एसआयपी/ लुंप्सम गुंतवणूक करा आता फक्त पॅन नंबरच्या माध्यमातून (पेपरलेस ट्रान्झॅक्शन) 😇 मग विचार कसला करताय? गुंतवणूक सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित 👉 पहिल्यांदा गुंतवणूक करताय? त्यासाठी क्लिक करा : https://cost.affcost.com/click?campaign_id=784&pub_id=659&p1=%7byour-transaction-id%7d&source=%7byour-sub-aff-id%7d (ADVT)

photo content

...म्हणून २१ जूनलाच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतात LetsUpp | Special आज आंतरराष्ट्रीय योग दिन. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची आपण थोडक्यात माहिती पाहुयात. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे. योग एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्यदेखील प्रदान करतो. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. योग दिनाचं महत्त्व : योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले गेले आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे. योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. महर्षि पतंजली हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते. योग साधनेत जीवनांचं संपूर्ण सार समाविष्ट आहे. पहिला योग दिवस कधी साजरा केला गेला? : २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. २१ जूनच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. म्हणून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/YzwODvecghb

पाच जणांच्या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं LetsUpp | Trending ● एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची
पाच जणांच्या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं LetsUpp | Trending ● एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडली आहे. या हत्याकांडाने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. ● एका व्यक्तीनं पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं का? याचा तपास आता नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. ● आलोक पातुरकर असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नावं असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीने आधी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. To know more click here https://letsup.app.link/n1kS7Mjyghb

पाच जणांच्या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं LetsUpp | Trending ● एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडली आहे. या हत्याकांडाने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. ● एका व्यक्तीनं पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं का? याचा तपास आता नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. ● आलोक पातुरकर असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नावं असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीने आधी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. To know more click here https://letsup.app.link/n1kS7Mjyghb

झाडे लावा...झाडे जगवा...अधिक मार्क मिळवा; विद्यार्थ्यांसाठी अनोखी मोहीम LetsUpp | Trending ● हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. ● या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करणाऱ्या आणि झाडांची काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. ● ही योजना राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ● अतिरिक्त गुणांसाठीच्या तरतुदीचा मसुदा लवकरच तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ● “नवीन धोरणाअंतर्गत हरियाणामध्ये 'ऑक्सी-वन' ही संकल्पना पुढे नेण्यासाठी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रोपांची देखभाल व संगोपन करण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येतील”, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे. To know more click here https://letsup.app.link/MliW01cvghb

photo content