LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
🏏 IND vs SL 1st ODI : कुठे आणि कधी पाहता येणार ?
LetsUpp | Cricket
🇮🇳भारत आणि 🇱🇰श्रीलंका दरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या रविवारी १८ जुलै रोजी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौर्यावर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो प्रथमच टीम इंडियाचा कर्णधार होणार आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा २५वा खेळाडू ठरेल.
⌚सामना कधी सुरू होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १८ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.
📌सामना कुठे होणार?
हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियमवर खेळला जाईल.
📺 सामना कुठे पाहता येईल?
हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.
👀सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.
🏏 भारतीय संघ
💫 शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.
T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/BJA3EZXZXhb
6 624
नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या भेटीचे गुपित नवाब मलिक यांनी सांगितले
LetsUpp | Trending
👉राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटी मागचे नेमके कारण सांगण्यात आले.
💁♂️राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
📍तसेच, पीयूष गोयल यांना राज्यसभेत भाजपाचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर, पीयूष गोयल स्वतः शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. नेते पदी निवड झाल्यानंतर ते एक सदिच्छा भेट म्हणून ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. अशी देखील माहिती मलिक यांनी दिली.
📌संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एक बैठक झाली. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी संरक्षणमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांची बैठकीत उपस्थिती होती आणि लष्करप्रमुख बिपीन रावत, जनरल नरवणे देखील उपस्थित होते. सीमेवर ज्या प्रकारीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबाबत सरकारकडून माहिती दिली गेली. असे नवाब मलिक यांनी सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/Ge2N83CPXhb
6 624
युजीसीकडून महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी
Letsupp | Trending
● कोरोनामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामध्ये आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे. यावेळी युजीसीने काही निर्देश दिले आहेत.
● त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन १ ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केलं जाईल इंटरमिडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे आधीच्या सेमिस्टरच्या आधारे करण्यात यावं, त्या संबंधी २०२० साली दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावं असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.
● शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या ३१ ऑगस्टपूर्वी घेणं आवश्यक असून त्या ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत.
● बारावीचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात. जर काही कारणामुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबला तर महाविद्यालये १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करु शकतात असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/1fzCtFqJXhb
6 624
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा
⚡ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
👍 मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
💫 कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/JjgnPUqyXhb
6 624
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी भरती!
LetsUpp l Kolhapur
👨🏻⚕️ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
🗣️ कोल्हापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गट 'क' आणि 'ड' च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रियाही दोन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. आशा वर्कर्सना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
👍 तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रुपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे.
🚑 १५ वर्षांपूर्वीच्या १००० रुग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रुग्णवाहिका दिल्या असून, उर्वरित ५०० रुग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
💁♂️ तिसऱ्या लाटेआधी आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये १२२२ कोटी रुपयांची मंजुरी घेतली असून, निधीची अडचण भासणार नाही.
📍 कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना लस दिली आहे. कोल्हापूरचा हा पॅटर्न संपूर्ण राज्याने राबवण्याची गरज यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/e0bMZpvyXhb
6 624
ट्विटरची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर हे फीचर करणार बंद
LetsUpp | Trending
🌐 मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर आता येत्या 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचरची सुविधा बंद करणार आहे.
⚡ ट्विटरने ही फ्लिट फीचर सुविधा गतवर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये तपासणी तत्वावर सुरु केली होती.
💫 त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही सुविधा जागतिक स्तरावर सुरु करण्यात आली. या फीचरच्या माध्यमातून युजर आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करु शकत होते.
⚡ भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेले काही दिवस चर्चेचा विषय बनला आहे.
📍 भारतातही ट्विटरमुळे अनेक वाद उदभवले आहेत. असे असून सुध्दा ट्विटर हे आजही एक प्रमुख समाज माध्यम म्हणून वापरले जाते.
📌 दरम्यान, आता ट्विटरने फ्लिट फीचर सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/MjXj43EXVhb
6 624
मुसळधार पावसानं मुंबईची झाली 'तुंबई'; हार्बर, मध्य रेल्वे ठप्प
LetsUpp | Trending
🌦️ मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
🚃 याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
🏭 तसेच शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.
💦 मुंबई आणि परिसरात बुधवार पासूनच पावसाचा जोर दिसून येत असून पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
📍 त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
📌 दरम्यान, शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/0T0EONrHVhb
6 624
आज दहावीचा निकाल... कसा पहायचा? जाणून घ्या
LetsUpp | Trending
💻 दहावीचा बोर्डाचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
📜 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार केला आहे.
🗣️ शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
⚡ दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
💁♂️ असा पहा निकाल :
▪️ निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
▪️ त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
▪️ ऑप्शनवर क्लिक करून तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करा.
▪️ खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
▪️ त्यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
📌 दरम्यान, निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार असून निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/wLPdkpDDVhb
6 624
पीकविमा भरण्यासाठी केंद्र सरकारकडून मुदत वाढ
LetsUpp | Trending
▪️ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा अर्ज भरण्यासाठी 23 जुलै मुदतीसाठी प्रस्ताव पाठवला होता त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
▪️ सन 2021-22 या वर्षातील खरीप पिकविमा भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, याबाबत आ. कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
▪️ दादाजी भुसे यांनी पिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली आहे.
▪️ या वर्षातील खरीप पिकविमा भरण्यासाठी 15 जुलै 2021 ही अंतीम तारीख देण्यात आलेली आहे. परंतु सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात टाळेबंदी करण्यात आलेली आहे, यामुळे आपले सरकार सेवा केंद्र (CSC सेंटर), महा-ई-सेवा केंद्र, बँक शाखा, विमा कंपनी, कृषी पतसंस्था अपुऱ्या वेळेतच सुरु आहेत.
▪️ पिकविमा ऑनलाईन भरत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत व सध्या नुकताच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे सुरु आहेत, यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पिकविमा भरणे शक्य होणार नाही.
To know more click here
https://letsup.app.link/zkijviFTUhb
6 624
या घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्यासाठी 23 जुलैपर्यंत मुदत वाढ मिळावी असा प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळाली
● दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल; बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर उपलब्ध
● भाजपला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धक्का; BMC मध्ये विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच; भाजपने महापालिकेत आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचा दावा केला होता
---------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क* : ७७९८६५५६५५
----------------------
● शासकीय सेवेतील मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांना संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘एसईबीसी’ कायदा वैध ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
● आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; 966 आयटीआयमध्ये 1 लाख 36 हजार जागा उपलब्ध- उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
● राजकारण्यांची 'नाटकं' खूप झाली, रंगभूमीवरील नाटकांना परवानगी कधी देणार? ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले याचा सवाल
● केंद्र सरकारचा दिलासा; जीएसटी भरपाईपोटी राज्यांना वितरित केले ७५ हजार कोटी; महाराष्ट्राला ६५०१.११ कोटी रुपये निधी मिळणार
● "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट
● "दाऊद इब्राहिम ठणठणीत, कराचीत रोज बॅडमिंटन खेळतो", दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची NCB चौकशीत माहिती
● राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; राकेश मौर्यला पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या
To know more click here
https://letsup.app.link/dNGuCQkvVhb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांची माहिती
▪️ ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा; मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा
▪️ भारतीय स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग सेवा 16 आणि 17 जुलैला 150 मिनिटांसाठी बंद राहणार; स्टेट बँकेची ट्विटरद्वारे माहिती
▪️ दुर्दैवाने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत; जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांची माहिती
▪️ डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल,
▪️ मागील दोन दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस, तर 18 जुलैपर्यंत सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाची माहिती
▪️ अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात घराच्या खोदकामात सापडला हंडा; या हंड्यात आढळली लाखो रुपये किमतीची चांदीची नाणी
▪️ ठाणे एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी 800 बसेस कोकणात जाणार; आजपासून बुकींग सुरू
▪️ डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा, जामीनातील कठोर अटीशर्तीतून तीन आठवड्यांची सूट
▪️ नांदेडमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; मोर्चाला पालकमंत्री अशोक चव्हाणांसह दिग्गज नेत्यांची हजेरी
To know more click here
https://letsup.app.link/H9hfkDdLUhb
