es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
🔝 नंबर वन! उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री LetsUpp l Trending 👍 देशात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा आहे. उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यांपासून पंजाब आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. 💁‍♂️ या राज्यांत, पक्षांचे अंतर्गत संघर्ष, नेतृत्त्वाच्या समस्या आणि वाढत्या दुफळी याविषयी बरीच चर्चा झाली आहे, जे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला आणि त्यांच्या सरकारच्या सत्तेला आव्हान देत आहेत. 💫 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील काही सारख्याच परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. 👉 प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यात उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. 🗣️ देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७ हजार ५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारली. प्रश्नमने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे. 📍 पहिल्या फेरीत १३ ज्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत. To know more click here https://letsup.app.link/iU86pUZ5Thb

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर LetsUpp | Trending 📜 दहावीचा निकाल उद्या (16) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. ⚡ दहावीचा निकाल कधी लागणार? याची उत्सूकता राज्यातील विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. 📍 दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. 📌 दरम्यान, दहावीचा बोर्डाचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहत येणार आहे. To know more click here https://letsup.app.link/xkL3c9zoUhb

🔗 राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यात लॉकडाऊन कायम LetsUpp | Breaking 👉 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. 🗣️ त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. 🗓️ आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे. 📉 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. 💁‍♂️ त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. To know more click here https://letsup.app.link/PVbU8mc3Shb

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी LetsUpp | Bulletin ● राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार आहे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले जाहीर ● तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना; मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले ● 15 जुलै पासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार गरोदर महिलांचा कोविड लसीकरणात समावेश ● महाराष्ट्रात उद्यापासून कोरोनामुक्त भागात शाळा होणार सुरु; ऐक्यांशी टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार ● MPSC मार्फत वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात १५ हजार ५०० पदांसाठी लवकरच मेगा भरती; राज्य सरकारची घोषणा ● आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय आता ६२ वर्ष; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी देणार ● माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनंतर आता पत्नी आरती देशमुखांनाही ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश ● 'वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी! ● गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; केंद्रीय रेल्वे रावसाहेब दानवे यांची घोषणा ● केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कोरोना काळात बंद केलेला महागाई भत्ता आता वाढवून मिळणार To know more click here https://letsup.app.link/GMD7E0B1Shb

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय LetsUpp | Trending 💷 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून तीन टप्प्यांत मिळून 11 टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ⚡ मागील वर्षी करोना संक्रमणाच्या सुरुवातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 📍 मागील वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता. 📌 दरम्यान, महागाई भत्याचा हप्ता प्रत्येक 6 महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा 1 जानेवारी आणि दुसरा 1 जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो. To know more click here https://letsup.app.link/tosDO6lQShb

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा LetsUpp | Trending ✒️ कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला. 📌 त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णय कृषीमंत्र्यांनी घेतला आहे. 💁‍♂️ विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवणूक करू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. To know more click here https://letsup.app.link/DVCbPuVPShb

'या' शहरात चक्क नालीत आढळल्या 500 च्या अनेक नोटा! LetsUpp l Latur 💸 लातूरच्या उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी नालीत वाहून जात असताना 500 रुपयांच्या अनेक नोटा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 👀 उदगीर शहरात रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. या पावसाच्या पाण्याने 500 रुपयांच्या नोटा नालीवाटे वाहून जात असल्याच्या चर्चेने परिसरात जोर धरला होता. 🚨 दरम्यान या नोटांची माहिती उदगीर शहर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन 500 च्या काही नोटा ताब्यात घेतल्या आहेत. 💫 नालीवाटे वाहत असलेल्या 500 च्या नोटा फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्या असून नोटा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. To know more click here https://letsup.app.link/x4COqsVFShb

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लांबणीवर LetsUpp | Trending 💫 केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसईने दहावीचा निकाल २० जुलै
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लांबणीवर LetsUpp | Trending 💫 केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसईने दहावीचा निकाल २० जुलैला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. ✨ पण नव्या माहितीनुसार या निकालाची घोषणा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. ⚡ सीबीएसई दहावी निकालास उशीर लागू शकतो. यामागे दोन कारणे असू शकतात. 👉 पहिले म्हणजे रिझल्ट तयार करण्यासाठी टॅब्युलेशन पॉलिसी तयार करण्यात आली. ⚡ दिल्ली हायकोर्टमध्ये निकालाच्या पद्धतीबद्दल याचिका दाखल होणे हे दुसरे कारण असू शकते. 📖 निकाल वेळेवर जाहीर केले जातील, असे बोर्डातील सुत्रांनी सांगितले असून २० जुलैपर्यंत निकाल देण्यास बोर्ड कटीबद्ध आहे. 🎯 सीबीएसई बारावी निकाल अधिकृत नोटीसनुसार ३० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. 📍 अधिकाऱ्यांनी निकालाच्या तारखेत बदल होण्यासंदर्भात कोणते भाष्य केले नाही. 📌 दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींनी आपल्या निकालाबद्दलची नवी माहिती पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे असे सांगण्यात आले आहे. To know more click here https://letsup.app.link/NQ4qjSuaRhb

photo content

जेसीबीने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करणं पडलं महागात LetsUpp l Kolhapur ⚡ उपसभापतीपद मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीने उधळलेला गुलाल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीच्या उपसभापतींसह सोळा जणांना महागात पडला. 👉 कोरोना संसर्ग वाढत असताना गर्दी करून नियम मोडल्याबद्दल या सर्वांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 📍 कागल पंचायत समितीचे उपसभापतीपद बाणगे येथील मनीषा संग्राम सावंत यांना मिळाले. त्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावात जेसीबीने गुलाल उधळला होता. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. नेमकं घटना काय? : ● कागल तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश तोडकर यांची सभापती म्हणून तर शिवसेनेच्या मनिषा संग्राम सावंत यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. ● तोडकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे तर सावंत माजी आमदार संजय घाटगे गटाचे. चार वर्षांपासून या पंचायत समितीत मुश्रीफ व घाटगे गटाची आघाडी आहे. ● पंचायत समितीत एकत्र असलेले मुश्रीफ व घाटगे गट नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकमेकांसमारे उभे ठाकले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुश्रीफांचे सुपूत्र नाविद व घाटगेंचे सुपूत्र अंबरिष हे दोन वेगवेगळ्या आघाडीतून निवडून आले. ● ही सर्व पार्श्वभूमी असताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये बानगे येथील सावंत यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली. घरात प्रथमच पद आल्याने सावंत कुटुंबीयांना इतका आनंद झाला की, त्यांनी थेट जेसीबीने गुलाला उधळला. ● आनंदोत्सवात दंग होत संपूर्ण गावात ही विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या या विजयोत्सवी मिरवणुकीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात सुरू असताना आता संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आनंदोत्सवाचे रंग फिके झाले आहेत. To know more click here https://letsup.app.link/rJn4UM4XQhb