LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
राज्यातील पालख्या निघाल्या विठुरायाच्या दर्शनी
LetsUpp | Trending
🚩 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरसाठी निघणाऱ्या पालख्या रवाना होऊ लागल्या आहेत.
🚌 राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, पण मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.
🛕 सरकारकडून मानाच्या 10 पालख्यांना आणि त्यासोबत 400 वारकर्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश असणार आहे.
▪️ *पुणे :* संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका शिवशाही एस.टी.बसने आळंदीतून पंढरपूरला आज सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाल्या. पहाटे पवमान अभिषेक,सकाळी आठ वाजता कीर्तन पार पडले. त्यानंतर पादुका पूजन व आरती संपन्न झाली. माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला.
▪️ *नाशिक :* ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू आणि नवनाथांपैकी एक असलेल्या निवृत्तीनाथांचे समाधी मंदिरापासून प्रस्थान होणाऱ्या पालखीला आषाढी वारीत मानाचे स्थान आहे. या पालखीची गेल्या साडेतीनशे वर्षापासून पायी जाणारी दिंडी वारी शिवशाही बसने रवाना करण्यात आली.
▪️ *जळगाव :* पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारी साठी मुक्ताईनगर हुन संत मुक्ताई पालखी पादुका पहाटे 04 वाजता पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. आदिशक्ती संत मुक्ताईचा जयघोष, तसेच विठ्ठल राखुमाईचा जयघोष, करत पहाटे चार वाजेपासून शेकडो वारकरी तसेच महिला वारकरी संत मुक्ताई पालखी प्रस्थानावेळी टाळ मृदुंगसह हजर होते.
To know more click here
https://letsup.app.link/9YESItDP0hb
6 624
भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार
LetsUpp | Cricket
🇮🇳भारत विरुद्ध 🇱🇰श्रीलंका यांच्यातील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
🏏 या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले.
🔥 तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं.
👉 तत्पूर्वी या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते.
🏏 कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती.
👉 भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/sipQRzVG0hb
6 624
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
LetsUpp l Trending
⚡ केंद्रीय कर्मचार्यांच्या मागणीचा विचार करता केंद्र सरकारने गेल्या दीड वर्षांपासून महागाई भत्त्यावरील बंदी काढून ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
👉 पूर्वी महागाई भत्ता १७ टक्के होता, जो आता वाढून २८ टक्के झाला. १ जुलै २०२१ पासून याची अंमलबजावणी झाली.
💫 महागाई भत्त्यातील DA वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होणार असून, त्यातही वाढ झाली आहे.
☑️ केंद्रीय कर्मचार्यांचे परिवहन भत्ते वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलत असतात.
🏙️ दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गाझियाबाद, बृहत्तर मुंबई, हैदराबाद, जयपूर, पाटणा अशी शहरे उच्च TPTA प्रकारात येतात.
📍 टीपीटीए कर्मचार्यांच्या विविध स्तरांसाठी निश्चित केले गेले आहेत, ज्यावर महागाई भत्ता जोडून कर्मचार्यांना परिवहन भत्ता मोजला जातो.
आता किती प्रवासी भत्ता मिळणार? :
● जर महागाई भत्ता २८ टक्के झाला तर एकूण प्रवासी भत्ता १७२८ रुपये, ४६०८ रुपये आणि ९२१६ रुपये होईल. अशा प्रकारे मासिक तत्त्वार १४९ रुपये, ३९६ रुपये आणि प्रवासी भत्त्यामध्ये ७९२ रुपयांची वाढ झाली आहे.
● वार्षिक आधारावर या कर्मचार्यांना १७८८ रुपये, ४७५२ रुपये आणि ९५०४ रुपये अधिक मिळतील. महागाई भत्ता १७ टक्के होता जो आता वाढून २८ टक्के झाला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/7t0FeI1C0hb
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला
▪️ मुंबई आणि कोकण किनारपट्टीला ५ दिवस ऑरेंज अॅलर्ट; ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार
▪️ दिल्लीपासून जवळच असलेल्या गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळून अनेक जण मलब्याखाली अडकल्याची भीती; जिल्हा प्रशासन आणि अन्य टीम बचाव कार्यात कार्यरत
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
▪️ राज्यात पोलिस दलात १२,५०० जागा भरण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी - गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई; लवकरच प्रक्रिया सुरू होणार
▪️ पालकमंत्र्यांनी केली पाहणी: मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी; धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करावे : पालकमंत्री आदित्य ठाकरे
▪️ सोलापुरात राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल; नियमापेक्षा जास्त गर्दी करून कोरोना नियमाचे उल्लंघन
▪️ राज्यात रविवारी नऊ हजार रुग्णांची भर तर ५,७५६ रुग्णांना डिस्चार्ज; १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद
▪️ कृषी कायदे रद्द करण्यासाठी २२ जुलैला संसदेला घेराव; दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली असून आंदोलकांची मनधरणी सुरु
▪️ काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड; प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडीची घोषणा
▪️ नेपाळ काँग्रेसचे प्रमुख शेर बहादुर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान, १६५ मतांनी विश्वासमत जिंकलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
▪️ भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सात विकेट्सनं विजय मिळवला
To know more click here
https://letsup.app.link/Llq5igxu0hb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ मुसळधार पावसामुळं मुंबईतील चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना; दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
▪️ अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे अर्ज उद्यापासून सुरु; तर दोन दिवसांत परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
▪️ मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील तीन तासात अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा
▪️ पंढरपूरसह 10 गावात आजपासून संचारबंदी, महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी, मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची माहिती
▪️ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील; राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं भाकित
▪️ भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट
▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटलांची नाशिकमध्ये 15 मिनिटं खलबतं; भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अद्याप अस्पष्टच
▪️ विठूनामाच्या जयघोषात मानाच्या 10 पालख्यांचे उद्या ‘शिवशाहीमधून वाखरी तळाकडे प्रस्थान होणार; 10 पालख्यांसाठी 20 शिवशाही बसेस सज्ज
▪️ देशभरात मागील 24 तासांत कोरोनाचे 41 हजार 157 नवे रुग्ण; तर 42 हजार 004 रुग्णांची कोरोनावर मात, 518 रुग्णांचा मृत्यू
▪️ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचे छापे
To know more click here
https://letsup.app.link/NydOb99HZhb
6 624
ब्रेकिंग! बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू
LetsUpp | Nandurbar
● नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
● बोलेरो गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. यासाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे. कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नसल्याने माहिती आणि बचाव कार्यात अडथळा येत आहे. पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/uduh50DDZhb
6 624
विक्रोळी दुर्घटना : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर
LetsUpp l Mumbai
⛈️ मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
💁♂️ मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी जाहीर केले आहे.
🌊 मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.
🚑 एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
केंद्राकडून २ लाखांची मदत :
👉 मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.
📍 मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/5cCviCkfZhb
6 624
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा
LetsUpp l Trending
⚡ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
👉 नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा व घरं आहेत.
📍 यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/ZAr2Rz47Yhb
6 624
https://youtu.be/JlPgirJJn7M
अभंग झाला,ओवी झाली,कीर्तन झालं आता ऐका विठ्ठलाचा मराठामोळा रॅप..!
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
पहा, तल्लीन व्हा, आणि शेअर करा.
6 624
आज दिवभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
🙏 शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट; सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा; नवाब मलिक यांची माहिती
🧑🔬 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती पूर्ण; येत्या दोन महिन्यांत आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
📍 सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर दहावीतील गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार
🦠 डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय, शासकीय, सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा
🛣️ नाशिक-पुणे या महामार्गाचे चौपदरीकरण झाले पूर्ण; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे बायपासचे फोटो केले शेअर
📌 UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अॅडमिशन करा; 1 ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्र 2021-2022 सुरु करण्याची सूचना
🎬आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश; प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
📌 उद्यापासून पंढरपुरात संचारबंदी, 400 वारकऱ्यांसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त; आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई
✈️ मुंबई विमानतळावर खासगी विमानात RDX ठेवण्याचा निनावी फोन, यंत्रणा सतर्क! पोलिसांकडून हायअलर्ट जारी
👉 गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सुनावण्यांचे होणार लाईव्ह प्रक्षेपण; सरन्यायाधीश एनव्ही रामण यांच्या हस्ते शुभारंभ
🏂 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; स्पर्धेच्या ठिकाणी सापडला कोरोनाचा रुग्ण; 23 जुलै ते 8 ऑगस्ट कालावधीत होणार स्पर्धा
To know more click here
https://letsup.app.link/2FDIBA34Xhb
