es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 728 suscriptores, ocupando la posición 5 597 en la categoría Educación y el puesto 11 988 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 728 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -76, y en las últimas 24 horas de 9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.19%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 438 visualizaciones. En el primer día suele acumular 1 275 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 728
Suscriptores
+924 horas
+27 días
-7630 días
Archivo de publicaciones
‼️‼️Buy online Books ‼️‼️ 👉Simplified Publication Store www.simplifiedcart.com Up to 30% discount Home delivery in 4-5 days
+4
‼️‼️Buy online Books ‼️‼️ 👉Simplified Publication Store www.simplifiedcart.com Up to 30% discount Home delivery in 4-5 days

🟪२९ एप्रिल : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ▪️साजरा करण्यास सुरुवात : १९८२ पासून ▪️भारतातील लोकनृत्ये 🔱 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य 🔱 तामिळनाडू : भरतनाट्यम 🔱 केरळ : कथकली 🔱 आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम 🔱 गुजरात : गरबा , रास 🔱 ओरिसा : ओडिसी 🔱 जम्मू व काश्मीर : रौफ 🔱 पंजाब : भांगडा , गिद्धा 🔱 आसाम : बिहू , झूमर नाच 🔱 उत्तराखंड : गर्वाली 🔱 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला 🔱 मेघालय : लाहो 🔱 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी 🔱 मिझोरम : खान्तुंम 🔱 गोवा : मंडो 🔱 मणिपूर : मणिपुरी 🔱 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम 🔱 झारखंड : कर्मा 🔱 छत्तीसगढ : पंथी 🔱 राजस्थान : घूमर 🔱 पश्चिम बंगाल : गंभीरा 🔱 उत्तर प्रदेश : कथक

🟪हेलिकॉप्टरच्या स्वदेशी इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान विकसित. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) हेलिकॉप्टरच्या स्वदेशी इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान विकसित केले आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DRDO-DMRL) या प्रयोगशाळेने निकेल धातू-आधारित सुपर मिश्रधातूचा उपयोग करून सिंगल क्रिस्टल हाय प्रेशर टर्बाइन (HPT) ब्लेड तयार केले आहेत. सिंगल क्रिस्टल ब्लेडचा आकार आणि भूमिती अगदी जटिल असते. वर्तमानात केवळ अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या देशांकडेच सिंगल क्रिस्टल ब्लेडची रचना व निर्मिती करण्याची क्षमता आहे. भूतानमध्ये ‘प्रोजेक्ट दंतक’चा हिरक महोत्सवी वर्ष साजरा भूतान देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. भूतानचे तिसरे राजा आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाचा परिणाम म्हणून 24 एप्रिल 1961 रोजी ‘प्रोजेक्ट दंतक’ची स्थापना केली गेली. ‘प्रोजेक्ट दंतक’ची अंमलबजावणी भारताची सीमा रस्ते संघटना (BRO) करीत आहे. भारताच्या मदतीने भूतान देशात वाहनांसाठी रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

🟪पॉवरग्रिड पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना झाली. भारतीय पॉवरग्रिड महामंडळ (PGCIL) या सार्वजनिक कंपनीने त्याच्या ‘InvIT’ म्हणजेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना केली आहे. त्याला ‘पॉवरग्रिड पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास’ असे नाव देण्यात आले आहे. ▪️ठळक बाबी वीज क्षेत्रात एखादा सार्वजनिक उपक्रम प्रथमच InvIT पद्धतीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तेचे परीक्षण करून मालमत्ता पुनर्वापराचे कार्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर नवीन आणि निर्माणाधीन भांडवल प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. ‘InvIT’ याच्या माध्यमातून सध्याच्या विशेष उद्दिष्ट वाहनासाठी (SPVs) निश्चित केलेल्या दराच्या आधारे स्पर्धात्मक बोलीसाठी मालमत्तांमधून पॉवरग्रिडला मोबदला घेता येणार. पॉवरग्रिड ‘InvIT’ याच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी दराच्या आधारे स्पर्धात्मक बोली, ज्या निर्माणाधीन किंवा भविष्यात कंपनीकडून अधिग्रहण केली जावू शकतात अश्या विशेष उद्दिष्ट वाहनासाठी मोबदला घेणार आहे, हे भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि निश्चित लक्ष्यानुसार करण्यात येणार. पहिल्या टप्प्यामध्ये पॉवरग्रिड 5 मालमत्तेतून जवळपास 7164 कोटी रुपयांची कमाई करू शकणार आहे. 👉पॉवरग्रिड विषयी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेला पॉवरग्रिड हा एक सार्वजनिक उपक्रम असून त्याच्या व्यावसायिक कामकाजाला वर्ष 1992-93 मध्ये सुरुवात झाली. ही एक महारत्न कंपनी आहे, जी वीज पारेषणच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

🟪जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल. जगभरात दरवर्षी 26 एप्रिल या दिवशी ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ पाळला जातो. 2021 या वर्षाची संकल्पना - "आयपी अँड एसएमई: टेकिंग युवर आयडियाज टू मार्केट". नवकल्पना आणि रचनात्मकता यांना प्रोत्साहन देण्यामध्ये बौद्धिक संपदा (IP) अधिकारांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. ▪️पार्श्वभूमी बौद्धिक संपदा म्हणजे कल्पनेतून साकारलेल्या रचना, शोध, साहित्यिक आणि कलात्मक कार्ये आणि व्यवसायिक क्रियाकलापांमध्ये वापरली जाणारी चिन्हे, नावे आणि प्रतिमा होय. या दिनाची स्थापना 2000 साली जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) या संस्थेनी केली... भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडून पेटंट, रचना, ट्रेडमार्क आणि भौगोलिक निर्देशक (GI) या क्षेत्रांमध्ये दरवर्षी ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार’ उत्कृष्ट शास्त्रज्ञ, संघटना आणि कंपन्यांना दिला जातो. 1967 सालाच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटना स्थापना कराराच्या अनुषंगाने, जगभरातल्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) याची स्थापना झाली. संघटनेचे कामकाज 26 एप्रिल 1970 रोजी सुरू झाले. त्याचे मुख्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.

🟪आंतरराष्ट्रीय नृत्य दिन: 29 एप्रिल. दरवर्षी 29 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय रंगमंच संस्थेच्या (ITI) नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ साजरा करतात. मानवी जीवनात नृत्याचे महत्त्व प्रदर्शित करणे तसेच कार्यक्रम, उत्सवांच्या माध्यमातून या कलेत सहभाग आणि शिक्षण घेण्यास लोकांना प्रोत्साहन देणे हे या दिनाचे उद्दीष्ट आहे. आधुनिक बॅलेट नृत्यशैलीचे निर्माता जीन-जॉर्जेस नोव्हरे (1727–1810) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ▪️भारतीय नृत्य संस्कृती नृत्य भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. विविध प्रकारच्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा सात शास्त्रीय नृत्यपरंपरा अस्तित्वात असलेला भारत हा जगातील एकमेव देश म्हणता येईल. शास्त्रीय नृत्याप्रमाणेच येथील प्रदेशिक विविधतेनुसार अनेक प्रकारच्या लोकनृत्य-परंपराही भारतात रुजलेल्या आहेत. आज भारतात कथ्थक नृत्य, कथकळी नृत्य, भरतनाट्यम्‌ नृत्य व मणिपुरी नृत्य ह्या चार मुख्य परंपरा आणि ओडिसी नृत्य, कुचिपूडी नृत्य व मोहिनीआट्टम्‌ ह्या भरतनाट्यम्‌शी बरेच सामर्थ्य दाखविणाऱ्या तीन उपशैली अशा एकंदर सात परंपरा सादर केल्या जातात. भावाभिनयाबरोबरच शब्दार्थ दाखविण्यासाठी ‘हस्त’ वा नृत्यमुद्रांचा वापर केला जातो, हे भारतीय नृत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे. तमिळनाडूमध्ये उगम पावलेले भरतनाट्यम्‌ हा सर्वात पुरातन नृत्यप्रकार आहे. केरळमधील कथकळी ह्या अभिजात नृत्यनाट्याचा उदय ‘कृष्ण-नाट्टम्’, ‘रामनाट्टम्’ इ. नृत्यनाट्यांतून झाला. ‘कथक’ (कथ्थक) म्हणजे नृत्यसंगीतमय कथाकीर्तनातून हरिभक्ती करणारे कीर्तनकार होय. कथकांचा संप्रदाय उत्तर भारतात पुरातन काळापासून अस्तित्वात होता. त्यातून उगम पावलेले व मोगलकाळात विकसित झालेले कथ्थक हे एक शास्त्रीय नृत्य होय. मणिपूर, त्रिपुरा, आसाम व बंगाल या प्रदेशांत रूढ असलेल्या मणिपुरी नृत्याचे ‘अंगचलन’ हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे स्त्रीपुरूषांचे समूहनृत्य आहे. ओडिशामधील दासीनृत्य परंपरा म्हणजे ओडिसी नृत्य होय. या नृत्याची परंपरा मंदिरात नाचणाऱ्या देवदासी ‘महारी’ व स्त्रीवेशात नाचणारे नर्तक ‘गोटिपुआ’ यांनी जिवंत ठेवली.

🟪भूतानमध्ये ‘प्रोजेक्ट दंतक’चा हिरक महोत्सवी वर्ष साजरा भूतान देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. 24 एप्रिल 2021 रोजी भूतानमधील भारतीय राजदूत श्रीमती रुचिरा कंबोज यांनी सिमतोखा येथील दंतक स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत करण्यासाठी भूतानमधील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारताना दंतक सैनिकांनी केलेल्या त्यागांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 🎆‘प्रोजेक्ट दंतक’ विषयी. भूतानचे तिसरे राजा आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाचा परिणाम म्हणून 24 एप्रिल 1961 रोजी ‘प्रोजेक्ट दंतक’ची स्थापना केली गेली. हा भारत आणि भूतान या देशांचा एक मैत्रीपूर्ण संयुक्त प्रकल्प आहे. ‘प्रोजेक्ट दंतक’ची अंमलबजावणी भारताची सीमा रस्ते संघटना (BRO) करीत आहे. भारताच्या मदतीने भूतान देशात वाहनांसाठी रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत काही उल्लेखनीय कार्यांमध्ये पारो विमानतळ, योन्फुला हवाई क्षेत्र, थिंफू-त्राशिगंग महामार्ग, दूरसंचार व जलविद्युत पायाभूत सुविधा, शेरूब्त्से महाविद्यालय, कांगलुंग आणि इंडिया हाऊस इस्टेटचे बांधकाम समाविष्ट आहे. 🎆भूतान देश हा दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. भारत व चीन यांच्या सीमेवर हा देश आहे. ‘ड्रॅगन भूमी’, ‘दक्षिणेचे ‘नंदनवन’ (पॅरडाइझ ऑफ द साउथ) इ. नावांनीही हा देश ओळखला जातो. थिंफू हे शहर देशाची उन्हाळी, तर पारो हे हिवाळी राजधानी आहे. भूतानी ङुलत्रुम हे राष्ट्रीय चलन आहे.

🟪ऑस्कर पुरस्कार 2021. 93 वा अकॅडमी पुरस्कार म्हणजेच ‘ऑस्कर पुरस्कार 2021’ सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिस येथे पार पडला. ✌️विजेत्यांची यादी ➡️सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'नोमडलँड' ➡️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - क्लोई झाओ (‘नोमडलँड’ चित्रपटासाठी) ➡️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सिस मॅकडॉर्मंड (‘नोमडलँड’ चित्रपटासाठी) ➡️सर्वोत्कृष्ट अभिनेता - अँथनी हॉपकिन्स ('द फादर' चित्रपटासाठी) ➡️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - यूह-जुंग यून (73 वर्षीय दक्षिण कोरियाई अभिनेत्री) ➡️जीन हरशॉल्ट ह्यूमनिटेरियन अवॉर्ड - टेलर पॅरी आणि ‘द मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन फंड’ ➡️सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म – ‘सोल’ ➡️सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (फीचर फिल्म) – ‘एनादर राउंड’ ▪️ठळक बाबी सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावणारे 83 वर्षीय अँथनी हॉपकिन्स हे सर्वात वयस्कर अभिनेते ठरले आहेत. यूह-जुंग यून या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या अभिनेत्री आणि आशिया खंडातील दुसऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत.क्लोई झाओ या ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या द्वितीय तर प्रथम आशियाई महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. ▪️ऑस्कर पुरस्काराविषयी "ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) तर्फे 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते. दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता.

🟪2021 तिरंदाजी विश्वचषकाच्या प्रथम टप्प्यात भारतीय रीकव्र्ह संघाला सुवर्णपदक दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि कोमालिका बारी यांचा समावेश असलेल्या भारताच्या रीकव्र्ह संघाने 2021 तिरंदाजी विश्वचषकाच्या प्रथम टप्प्याच्या (stage 1) स्पर्धेत मेक्सिकोला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. 2021 तिरंदाजी विश्वचषक प्रथम टप्पा (stage 1) स्पर्धा ग्वाटेमाला सिटी (ग्वाटेमाला देशाची राजधानी) येथे खेळवली गेली. ▪️ठळक बाबी भारताच्या रीकव्र्ह महिला संघाचे हे पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी भारतीय संघाने शांघाय (2011), मेडेलिन (2013), रॉकलॉ (2013 आणि 2014) अशी चार सुवर्णपदके मिळवली होती. आता 17 मे ते 23 मे 2021 या काळात लॉसन (स्वित्झर्लंड) येथे 2021 तिरंदाजी विश्वचषक द्वितीय टप्पा (stage 2) स्पर्धा खेळवली जाईल. जूनमध्ये पॅरिसला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेचा तिसरा टप्पा होणार आहे, जी टोकियो ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेसाठी पात्रतेची अखेरची संधी असेल. ▪️जागतिक तिरंदाजी महासंघ विषयी. जागतिक तिरंदाजी महासंघ तिरंदाजी या क्रिडाप्रकाराची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. त्याचे 156 राष्ट्रीय महासंघ आणि इतर तिरंदाजी संघ सदस्य आहेत. संस्थेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली आहे. जागतिक तिरंदाजी महासंघ याची स्थापना 4 सप्टेंबर 1931 रोजी झाली. त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंड देशाची राजधानी असलेल्या लॉसन या शहरात आहे. जागतिक तिरंदाजी महासंघाकडून (WAF) तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाते, ज्याची सुरुवात 2006 साली झाली. या संपूर्ण स्पर्धेचे चार टप्पे आहेत, जे चार भिन्न देशांत वेगवेगळ्या टप्प्यात खेळले जातात आणि त्यातून प्रत्येक दोन याप्रमाणे आठ सर्वोत्तम तिरंदाज निवडले जातात जे विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात स्पर्धा करतात.

🟪भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’. भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या व्यापार मंत्र्यांनी 27 एप्रिल 2021 रोजी ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ (Supply Chain Resilience initiative) याचा औपचारिकपणे प्रारंभ केला. हिंद-प्रशांत प्रदेशात बळकट, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ प्राप्त करण्याच्या उद्देशाने पुरवठा साखळीच्या लवचिकतेत वृद्धी करण्याचे एक चक्र तयार करण्याचे उद्दीष्ट या उपक्रमाचे आहे. जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. तसेच हा औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक आहे. जपानच्या पश्चिमेला जपानी समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते. टोकियो ही जपानची राष्ट्रीय राजधानी आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

‼️‼️Buy online Books ‼️‼️ 👉Simplified Publication Store www.simplifiedcart.com Up to 30% discount Home delivery in 4-5 days
+4
‼️‼️Buy online Books ‼️‼️ 👉Simplified Publication Store www.simplifiedcart.com Up to 30% discount Home delivery in 4-5 days

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

1307

🟪 लसीकरणासाठी खालील लिंकवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करता येईल. 🔲 सर्वांनी नक्की रजिस्ट्रेशन करा. https://selfregistration.cowin.gov.in/

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟪 लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी? 👉 असे करा रजिस्ट्रेशन १) आरोग्य सेतू अॅप्लीकेशन २) कोविन (Cowin.government.in) ▪️या ठिकाणी न
🟪 लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी? 👉 असे करा रजिस्ट्रेशन १) आरोग्य सेतू अॅप्लीकेशन २) कोविन (Cowin.government.in) ▪️या ठिकाणी नोंदणी करावी लागेल 👉 नोंदणी केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल. त्यावरून तुमचा मोबाईल नंबर ची पडताळणी होईल. 👉 आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कोणत्याही फोटो आयडी वरून तुमची माहिती भरावी लागेल. 👉 पिन कोड वगैरे माहिती भरल्यानंतर लसीकरण केंद्र आणि वेळ यांची निवड करावी लागेल. 👉 एका मोबाईल नंबर वरून किमान चार जणांची नोंदणी होऊ शकेल. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या👇 www.simplifiedcart.com ________________________________

photo content
+3