अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
Open in Telegram
MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO आणि सरळसेवा परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम
Show more4 259
Subscribers
-1524 hours
+2547 days
+1 19530 days
Posts Archive
Photo from SANDIP P JADHAO
https://x.com/AdvAshokBNCP_SP/status/2096954457947013514
मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकी संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला देतो.
उद्या मोर्चा असणार आहे👍👍
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत
लढेंगे और जितेंगे
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार!
#MPSC #MPSCपेपरफुटी #MPSCExam #विद्यार्थीन्याय #MPSCसुधारणा #SIT #पारदर्शकता #स्पर्धापरीक्षा #MPSCStudents
रोहित दादा यांची पत्रकार परिषद चालू आहे MPSC परीक्षा पेपरफुटी बाबतीत..
🔴Live लिंक : https://www.youtube.com/live/f8LSLTfuejc?si=7wp4meWpfaXEdt-C
