en
Feedback
नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

Open in Telegram

मराठी + इंग्लिश + गणित + बुध्दीमत्ता + सामान्य ज्ञान + तांत्रिक नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

Show more
2 338
Subscribers
-124 hours
-157 days
-7030 days
Posts Archive
पगार किती असे पण विचारणारे विद्यार्थी असतात त्यांच्या साठी माहिती टाकावी लागतेच आणि हा मुद्दा बरोबर आहे की आपली ability पाहून
पगार किती असे पण विचारणारे विद्यार्थी असतात त्यांच्या साठी माहिती टाकावी लागतेच आणि हा मुद्दा बरोबर आहे की आपली ability पाहून अर्ज करावा मला वाटलं नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त चॅनेल आहे तर इथे ही जाहिरात टाकावी बाकी महसूल सेवक ( कोतवाल ) भरती पण लवकर येणार आहे आणि gmc लातूर गट ड साठी जाहिरात आली आहे त्या जाहिराती या चॅनेल वर नाही टाकल्या , बाकी ability असेल तरच अर्ज करावा हा मुद्दा 100% बरोबर आहे.. ✅ राहिला प्रश्न बॅच जॉईन कराच असा फोर्स कोणी करत नाही... तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता 👍

🚨 UPSC EPFO APFC 2026 - Notification & Batch Update! 🚨 The official notification is out, and it's time to target one of the most prestigious Group 'A' Gazetted roles! Key Notification Dates: Application Started: August 22, 2026 Last Date to Apply: September 11, 2026 Exam Date: December 20, 2026 About the APFC Post: Salary: Level 10 (In-hand: ₹1 Lakh - ₹1.16 Lakh+ per month + perks). Power: Enjoys Quasi-Judicial Powers to enforce labor laws and penalize defaulters. Growth: Rapid promotions up to Regional PF Commissioner grades. Batch & Preparation Support: High-quality notes and test series will be available in our app starting August 25, 2026! https://t.me/upsc_epfo_apfc_2026_guidance

🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस तिसरा 🎯 🗓️ आज: १८ ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो, कालच्या टार्गेटवर तुम्ही नक्कीच पूर्ण निष्ठा आणि ताकदीने मात केली असेल. अभ्यासात सातत्य (Consistency) हेच यश मिळवून देणारे सर्वात मोठे हत्यार आहे! 🔥 आजचे दिनविशेष (१८ ऑगस्ट): स्वातंत्र्यसंग्राम इतिहास: १८ ऑगस्ट १९४५ हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताशी जोडला गेलेला आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारे नेताजींचे "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा" हे वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करते. या महान पराक्रमी विचारांची ऊर्जा मनात ठेवून, आजच्या टार्गेटवर तुटून पडूया! 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - मार्गदर्शक तत्त्वे / DPSP & मूलभूत कर्तव्ये) DPSP (कलम ३६ ते ५१): समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी-बुद्धीवादी तत्त्वे यांनुसार कलमांचे वर्गीकरण करून समजून घ्या. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (उदा. ४२ वी, ४४ वी, ८६ वी, ९७ वी) विशेष नोंदवून ठेवा. मूलभूत कर्तव्ये (कलम ५१A): स्वर्णसिंह समितीच्या शिफारशी आणि सर्व ११ कर्तव्ये पाठ करा. (PYQ सराव): DPSP आणि मूलतत्त्वे यांवरील मागील वर्षांचे सर्व प्रश्न सोडवा आणि विधानांमधील सूक्ष्म फरक (Key nuances) समजून घ्या. २. विषय: गणित व बुद्धिमत्ता (घटक - नफा-तोटा / Profit and Loss) खरेदी किंमत, विक्री किंमत, छापील किंमत, सुट (Discount) आणि शेकडा नफा/तोटा यांवरील सूत्रे व शॉर्टकट ट्रिक्स समजून घ्या. (PYQ सराव): प्रामाणिक/अप्रामाणिक व्यापारी, सलग सुट, आणि वस्तूंच्या संख्येशी संबंधित मागील परीक्षांमध्ये आलेले प्रश्न वेळेचे नियोजन करून सोडवा. ३. विषय: सामान्य विज्ञान मानवी आरोग्याशी संबंधित प्रमुख रोग आणि त्यांच्या कारकांचा (Pathogens) प्राथमिक अभ्यास सुरू करा. 💡 महत्त्वाची टीप: वाचनापेक्षा PYQ आणि Revision यावर जास्त भर द्या. चुकलेल्या प्रश्नांची नोंद वेगळ्या वहीत नक्की करा! आजचे टार्गेट आजच पूर्ण करायचे, हा निर्धार कायम ठेवा! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 📌 https://t.me/mpsc_group_c_2026

🎯 ७० दिवसांचे संकल्प नियोजन : दिवस दुसरा 🎯 🗓️ आज: १७ ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! सण-उत्सव साजरे करताना आपल्याला आपल्या अभ्यासाचे ध्येय विसरून चालणार नाही. 🔥 आजचे दिनविशेष (१७ ऑगस्ट): आजच्या दिवसाला अत्यंत प्रेरणादायी आणि अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवकालीन इतिहास: १७ ऑगस्ट १६६६ - याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांनी अत्यंत शिताफीने औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली होती! संकटाच्या चक्रव्यूहातून बुद्धी, संयम आणि साहसाच्या जोरावर कसे बाहेर पडावे, याचा हा सर्वोच्च आदर्श आहे. आधुनिक इतिहास: १७ ऑगस्ट १९०९ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना लंडनच्या पेन्टोनविले तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. १ जुलै १९०९ रोजी लंडनमध्ये ब्रिटिश अधिकारी सर विल्यम कर्झन वायली याचा वध केल्याबद्दल त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. देशासाठी हसत हसत फासावर जाणारे हे वीर आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहेत. या महापुरुषांच्या अफाट शौर्यातून प्रेरणा घेऊन, आज आपणही पूर्ण ताकदीने अभ्यासाला लागूया! 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - मूलभूत हक्क) कलम १२ ते ३५ मधील सर्व तरतुदी, अपवाद आणि विशेषतः कलम ३२ मधील प्राधिलेख (Writs) अतिशय काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. या घटकावर आजवर आयोगाने विचारलेले सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQ) सोडवा. इतर तीन पर्याय का चुकीचे आहेत, याचेही विश्लेषण करा. २. विषय: गणित (घटक - शेकडेवारी / Percentage) शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर, सलग वाढ/घट आणि महत्त्वाच्या ट्रिक्स समजून घेऊन उदाहरणे सोडवा. (PYQ सराव): लोकसंख्या, निवडणुका, पास-नापास यावरील मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न वेळेत सोडवण्याचा सराव करा. ३.  विषय: सामान्य विज्ञान (घटक - वनस्पती रोग) बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचे व बाधित पिकांचे वर्गीकरण वाचून त्याचा एक तक्ता (Chart) तयार करा आणि पाठ करा. यावर विचारलेले 'जोड्या लावा' किंवा थेट वन-लायनर प्रश्न सोडवून हा घटक पक्का करा. लक्षात ठेवा: फक्त पुस्तके वाचून पोस्ट मिळत नाही, तर प्रश्नांचा सराव (PYQ) तुम्हाला यशाच्या जवळ नेतो. आजचे हे टार्गेट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच हा निर्धार करूया! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 https://t.me/mpsc_group_c_2026

अभिनंदन! कु. अनघा शिवाजी सुतार एका वर्षात ४ (STI, SR, धर्मादाय निरीक्षक आणि भूमी अभिलेख) पोस्ट मिळवणे ही खूप मोठी आणि प्रेरणा
अभिनंदन! कु. अनघा शिवाजी सुतार एका वर्षात ४ (STI, SR, धर्मादाय निरीक्षक आणि भूमी अभिलेख) पोस्ट मिळवणे ही खूप मोठी आणि प्रेरणादायी कामगिरी , तुझ्या कष्टाचे आणि जिद्दीचे हे फळ आहे. भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🛑Exam Guide Sagar🛑

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 ज्यांच्या बलिदानामुळे आणि अथांग संघर्षामुळे आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांना आणि वीर जवानांना मानाचा मुजरा!

सर्वांनी मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली तरी चालेल तुमचं काहीही नुकसान होणार नाही फायदाच होईल. NMMC मुख्य परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम MPSC गट क गट ब मुख्य परीक्षे सारखाच आहे MPSC गट क ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तलाठी आणि इतर पदे आहेत यातच पुरवठा निरीक्षक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग निरीक्षक ही पदे आगामी काळात add होऊ शकतात. पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर आणि मुख्य परीक्षा 27 डिसेंबर ला आहे. मुख्य साठी आत्ता पासूनच अभ्यास सुरू करा पूर्व परीक्षेनंतर जास्त वेळ मिळणार नाही..

महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर पूर्व परीक्षेत 3 ते 5 प्रश्न विचारले जातात वरील नोट्स 11 वी च्या जुन्या पुस्तकांतील आहेत सर्वांनी आज आणि उद्या या नोट्स काळजीपूर्वक वाचून शॉर्ट नोट्स तयार करा बुधवारी या घटकावर सर्व समावेशक नोट्स आणि MPSC ने आज पर्यंत या घटकावर जे प्रश्न विचारले असतील ते प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह pdf नोट्स मध्ये मिळतील गुरुवारी या घटकावर लेक्चर होईल https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) First Response Sheet आज दुपारी 3/4 वाजता उपलब्ध होईल 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १५३९ जागा २. तांत्रिक सहायक: ३ जागा ३. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (गट-क): ११ जागा ४. सहायक अधीक्षक (गट-क): ११ जागा शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही!). वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्ग: १९ ते ४३ वर्ष 📅 परीक्षा व अर्ज शुल्क माहिती: परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग ₹ ३९४/- | मागासवर्गीय प्रवर्ग ₹ २९४/- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२६ ऑनलाइन अर्ज लिंक: mpsconline.gov.in/candidate 📝 परीक्षा पद्धत व वेळापत्रक: पूर्व परीक्षा तारीख: २५ ऑक्टोबर २०२६ (स्वरूप: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे, ०.२५ निगेटिव्ह मार्किंग) मुख्य परीक्षा तारीख: २७ डिसेंबर २०२६ ही परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेतली जाईल. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी खूप कमी वेळ मिळणार असल्याने, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रच करणे गरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या एकत्रित आणि अचूक तयारीसाठी विशेष बॅच उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून काटेकोर नियोजनबद्ध अभ्यासाची सुरुवात दररोजचे अचूक डेली टार्गेट आणि त्यावर आधारित विशेष व्हिडिओ मार्गदर्शन जास्तीत जास्त PYQ चा सराव संपूर्णपणे परीक्षाभिमुख व दर्जेदार नोट्स MPSC आयोगाच्या नव्या पॅटर्न व धर्तीवर आधारित सराव टेस्ट सिरीज https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

🎯 टार्गेट MPSC गट क 🎯 शुक्रवार ( 24/07/2026 ) daily Target + दर्जेदार नोट्स PYQ with explanation आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज आत्ता पासूनच पूर्व सोबत मुख्य परीक्षा ची नियोजन बद्द परिपूर्ण तयारी अधिक माहिती साठी Telegarm चॅनेल जॉईन करून ठेवा https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

30 जुलै पर्यंत फर्स्ट रिस्पॉन्स शिट उपलब्ध होतील त्या नंतर कट ऑफ बद्दल चर्चा करू ज्या पेपर मध्ये टेक्निकल विषय असतात त्यांचा कट ऑफ आत्ता पर्यंत कमी लागत होता पण आपल्या केस मध्ये अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ होता त्यात जागा कमी आहेत 60 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार आहेत असो कट ऑफ बद्दल आत्ता चर्चा किंवा यूट्यूब व्हिडीओ पाहण्यात वेळ वाया घालू नका 7-8 दिवसांनी कामगार विभाग भरती आहे त्यावर फोकस करा.

नवी मुंबई महानगरपालिका नियोजित पदभरती परीक्षा जाहीर केल्याप्रमाणे विहित वेळेत होणार
नवी मुंबई महानगरपालिका नियोजित पदभरती परीक्षा जाहीर केल्याप्रमाणे विहित वेळेत होणार

पुढारी पेपर मध्ये बातमी आहे दुसरा काही सोर्स नाही सर्वांनी पेपर साठी तयार रहा ✅