वैभव बावनकर / Vaibhav Bawankar / educational activity / fact check
Open in Telegram
2 443
Subscribers
-124 hours
-47 days
-3130 days
Posts Archive
The Indian government is planning a new social media code of conduct to stop public servants from making reels, shooting videos, or sharing personal opinions while on duty
मोठी घोषणा
महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
+6
🇮🇳 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त...
९ ऑगस्ट १९४२ रोजी देशभरात ‘चले जाव’ आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनाला विदर्भातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.या आंदोलनातील विदर्भातील हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा लोकमतने आजच्या अंकामध्ये विशेषत्वाने मांडला आहे.नव्या पिढीला आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास आणि हुतात्म्यांचे योगदान समजावे, यासाठी आजचा हा विशेष अंक प्रत्येकाने आवर्जून वाचावा, म्हणून हा ग्रुपवर शेअर करत आहे.
खासगी वाहनांवर पोलीस लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
मतदारांसाठी मोठा दिलासा
विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) सुरू असताना आता 1950 वर ECI <स्पेस> EPIC क्रमांक असा SMS पाठवून SIR नोंदणीची स्थिती तसेच BLO ने माहिती नोंदवली आहे की नाही, हे काही क्षणांत तपासता येणार आहे.
1 ऑगस्टपासून तात्काळ तिकिटासाठी नवे नियम!रेल्वेत टोकन सिस्टिमची होणार सुरुवात
काय बदलणार
• 1 ऑगस्ट 2026 पासून तात्काळ तिकिटासाठी टोकन सिस्टिम लागू.
• सुरुवातीला पश्चिम मध्य रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर अंमलबजावणी.
• टोकन क्रमांकानुसारच प्रवाशांना तिकीट काउंटरवर बोलावले जाईल.
• यामुळे गोंधळ, गर्दी आणि दलालांवर नियंत्रण
टोकन कधी मिळणार?
AC तात्काळ तिकीट बुकिंग: सकाळी 10:00
टोकन वाटप: सकाळी 8:30 ते 9:00
स्लीपर तात्काळ तिकीट बुकिंग: सकाळी 11:00 टोकन वाटप: सकाळी 9:30 ते 10:00
प्रवाशांना काय फायदा?
• लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
• टोकननुसार स्वतःची वेळ येईपर्यंत आरामात प्रतीक्षा करता येईल.
• तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होईल.
• दलालांची मनमानी कमी करण्यास मदत होईल.
नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा!
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २९ जुलै २०२६ रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश-*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीकच्या प्रकरणांवर कडक पावले उचलत अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' (Fast Track Courts) स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटी रोखण्याबाबत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत मोठे निर्णय जाहीर केले जातील व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
+3
सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! बीपी, डायबिटीज आणि हृदयविकाराची ३९ औषधे होणार स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह, हृदयविकार, HIV किंवा डोळ्यांच्या संसर्गावरील औषधे घेणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने ३९ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किरकोळ किंमती (Retail Price) निश्चित केल्या आहेत. त्यामुळे आता ही औषधे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत विकता येणार नाहीत.
रेल्वे प्रवास करताना WhatsApp वरील तिकीट चालणार नाही
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. RailOne अॅपवरून बुक केलेले अनारक्षित (Unreserved) तिकीट आता WhatsApp वर किंवा स्क्रीनशॉट काढून दाखवल्यास ते वैध मानले जाणार नाही. तिकीट फक्त त्याच नोंदणीकृत मोबाईलवर वैध असेल, ज्यावरून ते बुक केले आहे. तसेच प्रवाशांना सोबत मूळ फोटो ओळखपत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अवीक्ली लाँच! आठवड्यातून एकदाच घ्यावे लागणार इन्सुलिन
भारतात फार्मा कंपनी नोवो नॉर्डिस्क ने 'अवीक्ली' नावाचे जगातील पहिले 'वन्स-अ वीकली' (आठवड्यातून एकदा घेण्याचे) इन्सुलिन लाँच केले आहे. यामुळे टाईप-1 आणि टाईप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांना दररोज टोचाव्या लागणाऱ्या सुयांपासून मुक्ती मिळेल. आता वर्षाला 365 वेळा घ्यावे लागणारे इन्सुलिन आता केवळ 52 वेळा घ्यावे लागेल. या इन्सुलिनच्या 70 युनिट्सच्या साप्ताहिक डोसची किंमत 261 रुपये आहे.
*औषधांबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा*
केंद्र सरकारने औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी ड्रग्स रुल्स 1945 मध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता 12 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असलेले कफ सिरप किंवा ओरल लिक्विड आता 'शेड्यूल H1' अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मेडिकलमधून अशी औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक असेल. शिवाय मेडिकल चालकांना अशा औषधांच्या विक्रीची संपूर्ण नोंद नियमानुसार ठेवावी लागणार आहे.
*शेड्यूल H1' औषध नियमावली म्हणजे काय?*
'शेड्यूल H1' ही अशा औषधांची अधिकृत यादी आहे, ज्यांच्या विक्रीवर सरकारचे विशेष नियंत्रण असते. या यादीत जे-जे औषधं येतात ती खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) बंधनकारक असते. इतकंच नाही तर, मेडिकल मालकाला औषधांची विक्री, ग्राहकाचे नाव आणि तारखेची स्वतंत्र नोंद ठेवावी लागते. औषधांचा वाढता गैरवापर, नशा आणि प्रतिजैविकांचा (Antibiotics) अतिवापर रोखण्यासाठी हा कडक नियम लागू केला जातो
TET पेपरफुटी प्रकरणात दिल्ली कनेक्शन, तिघांना अटक
महाराष्ट्रातील टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी विमानतळ परिसरातून 3 आरोपींना अटक केली असून, त्यांचे दिल्ली आणि हरियाणा कनेक्शन समोर आले आहे. या पेपरचा सौदा तब्बल 1.5 कोटी रुपयांमध्ये ठरला होता. पोलिसांनी आरोपींकडून 4 सेट पेपर जप्त केले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे.
उद्या २८ जून ला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी TET) २०२६ पुढे ढकलण्यात आली.....
विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले आता शाळेतच मिळणार !'आपले सरकार सेवा केंद्र' थेट शाळांमध्ये पोहोचणार
विद्यापीठाकडून चार वर्षात २२.६ टक्के शुल्कवाढ
