en
Feedback
Maitreya (मैत्रेय) -UPSC

Maitreya (मैत्रेय) -UPSC

Open in Telegram

Descriptive GS | Ethics | Essay | Current Affairs | Prelims Guidance by Dr. Ashish Jaitpal 🇮🇳 Building ethical & democratic civil servants for India's future. Address- https://maps.app.goo.gl/R1oEYDRTq2x65kMb8 Contact - @maitreyaupscmpscoffice

Show more
3 957
Subscribers
+424 hours
+197 days
+5530 days
Posts Archive
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखती पुढ़े ढकलण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. मुलाखतीचे सुधारित दिनांक २१ ते २४ सप्टेंबर २०२६ , २६ व २८ सप्टेंबर २०२६ https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

मुलीच्या शिक्षणासाठी 'अमृत दौड' दोन मुलींच्या भविष्यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित अमृत दौडमध्ये स्वयंपाकाचे काम करणाऱ्या ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी चक्क साडी नेसून सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर विजयही मिळवला. ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना कसले प्रशिक्षण अशा स्थितीत स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांकाचे तीन हजारांचे बक्षीस पटकावले. व्यावसायिक तयारी करणाऱ्यांना मागे टाकत त्यांनी हा विजय मिळवला. या खुल्या धावण्याच्या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी होऊन धावत होते. याच गर्दीत सर्वांत मागच्या रांगेत रमाबाई रणवीर सहभागी झाल्या. घरकाम करणाऱ्या रमाबाई रणवीर रोजच्या साडीत स्पर्धेत सहभागी झाल्या. स्पर्धा सुरू झाल्यावर तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. मात्र काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली. पावसाने ओला झालेला रस्ता आणि पायाला टोचणारे खडे अशा प्रतिकूल परिस्थितीत साडीचा पदर सांभाळत त्या धावत होत्या. मुलीच्या शिकवण्याची जिद्द मनात धरून त्यांनी धावण्याचा वेग वाढवला आणि एक एक स्पर्धकाला मागे टाकून फिनिशिंग लाइन गाठली. 'संसारासाठी रोज धावपळ करते. आज स्वतःसाठी धावले,' अशी प्रतिक्रिया रमाबाईनी व्यक्त केली. पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी रमाबाईंवर आली आहे. मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न समोर असल्याने त्या त्यांचे मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास आल्या आहेत. लोकांकडे स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांची एक मुलगी 'बीएससी'चे शिक्षण घेत आहे, तर दुसरी मुलगी पोलिस भरतीची तयारी करत आहे. तिची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने रमाबाईंनी बक्षीस जिंकायचे ठरवले. जिंकलेले बक्षीस त्यांच्या मुलींच्या फीसाठी उपयोगी येणार आहे.

Data for Mains - Corporate Social Responsibility (GS2,GS3,GS4 या पेपर मधे CSR वर प्रश्न येऊ शकतो. UPSC ने या टॉपिक वर अनेक प्रश्न विचारले आहेत.) (तुमच्या मेन्स च्या नोट्स मधे/ data बँक मधे लिहून घ्या) केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांत देशातील कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पांसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत रु. १.४४ लाख कोटींपेक्षा अधिक खर्च केला. देशात दरवर्षी ४० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कॉर्पोरेट निधी सामाजिक क्षेत्रासाठी उपलब्ध होत आहे. यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे २१ टक्के (८,६३१ कोटी रुपये) एकट्या महाराष्ट्राला मिळाले. महाराष्ट्र हे सलग दहाव्या वर्षी सर्वाधिक सीएसआर निधी प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. पण निधी किती आला, यापेक्षा तो राज्यात कुठे गेला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गडचिरोली, नंदुरबार, पालघर, वाशिमसारख्या जिल्ह्यांत, जिथे गरज सर्वाधिक आहे, तिथे निधीची पोहोच तोकड़ी आहे. हा पैसा कोणत्या सामाजिक गरजांवर आणि सामाजिक सुधारणांसाठी खर्च झाला? हे बघणेही गरजेचे आहे. देशाच्या पातळीवर २०२४-२५ मध्ये शिक्षणावर रु.१३,८७७ कोटी (३४ टक्के), आरोग्यसेवेवर रु. ८,५३१ कोटी (२१टक्के), पर्यावरणीय शाश्वततेसाठी रु. ३,३९७ कोटी (८ टक्के), उपजीविका वृद्धीवर रु. २,५४८ कोटी (६ टक्के) आणि ग्रामीण विकासासाठी रु. २,४७७ कोटी (६ टक्के) मिळाले. म्हणजेच शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांवर मिळून रु. २२,४०८ कोटी, म्हणजे एकूण सीएसआरच्या सुमारे ५५ टक्के निधी खर्च झाला. #dataformains #mains #gs2 #gs3 #gs4

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मार्क्सच्या बाबतीत अनेक प्रतिक्रिया येताय. Fairness ची मागणी करताना आपण Genuine efforts घेऊन मेहनत करून मुलाखती साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या efforts ला devalue तर करत नाही ना? याची खबरदारी घ्यायला हवी ही माफक अपेक्षा.

MPSC 2025 Mains Marks - निर्माण प्रश्न! https://youtu.be/4iF_E2lMT0s

मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे
मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे

सतत ऐकत राहण्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ लक्ष वेधत आहेत. संबंधित विषयांवरील वाचन न करता केवळ ऐकत राहिल्याने माहितीत भर पडत असली, तरी विषयाचे आकलन करून घेण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम होतो, असे निरीक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आले आहे. केवळ ऐकतच राहिल्याने, संबंधित विषय आपल्याला पूर्णपणे समजला असल्याचा भ्रम (इल्युजन ऑफ लर्निंग) निर्माण होत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अशा श्रवणभक्तीतून ढोबळ मुद्दे लक्षात राहतात; विषयाचे पूर्ण आकलन होतेच असे नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बहुतेक जण चालताना किंवा वाहन चालवताना पॉडकास्ट ऐकत असतात. वक्ते सांगत असलेल्या मुद्द्यांचे टिपण ते काढतातच असे नाही. अभ्यासकांच्या मते, हे ऐकणे निष्क्रिय असे असते. एखादा विषय वा मुद्दा पुस्तके वाचून स्वतःहून समजावून घेतल्यानंतर दीर्घ काळ लक्षात राहू शकतो; निव्वळ ऐकल्याने तसे होत नाही. त्याचबरोबर वक्त्यांची भूमिका एकारलेली असेल, तर आपणही त्याच्या विचारांकडे झुकण्याची शक्यता असते; त्यामुळे अन्य विचार वा दुसरी बाजू समजून घेण्याकडील कल कमी होतो. एकंदरीत हळूहळू आपण स्वतः विचार करणे थांबवतो आणि त्याचा परिणाम आपल्या कल्पनशक्तीवर होतो, असे अभ्यासक सांगतात. दुसरे म्हणजे सतत ऐकत राहिल्याने आवाजाची, गोंगाटाची सवय होते. वेगवेगळ्या गोंगाटाच्या आजच्या काळात, असा आवाज फार होणे आपल्या कल्पनशक्तीसाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठी चांगले नाही. या पार्श्वभूमीवर कवी हिमांशू कुलकर्णी यांची क्षमा मागून असे म्हणता येईल, 'ऐकणे जपून ठेवा, आवाज फार झाला!' - श्रीधर लोणी #अभ्यासपद्धती #ऐकण्याच्यापलीकडेसमजूनघेणे #activelearning

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

कोणत्या विषयात तुमची काय अपेक्षा होती, पेपर कसा गेला होता, मार्क्स मधे ते reflect झाले का हे पण सांगता आल तर नक्की सांगा.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ दिली होती पण मुलाखती साठी निवड झाली आहे अशा उमेदवारांचे मार्क्स आयोगाने उपलब्ध केले आहेत. एकंदर marking scheme चा नीट अंदाज यावा यासाठी तुमचे गुणपत्रक मला पाठवा. Quick आणि superficial judgement पेक्षा थोड नीट analysis करायला मदत होईल. Telegram id - @ashishjaitpal

#नैतिकता #नैतिक मार्ग - सुशीलकुमार लवटे

Repost from N/a
१.आज पासून interview date पर्यंत newspaper रोज वाचा. २.आपण ६ सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी चालू घडामोडींची आणि त्यासोबत interview techniques बाबत काही चर्चा करूया. ३.उद्यापासून raw interview घ्यायला आपण सुरुवात करत आहोत. या interview च्या basis वर पुढील दिवसात नक्की काय करायचे आहे याची तुम्हाला idea येईल. ४.Interview साठी slot book करण्यासाठी पुढील नंबर वर तुमच पूर्ण नाव आणि interview date communicate करा. +91 92261 28894 (Telegram id - @maitreyaupscmpscoffice )

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from N/a
🎯 MPSC Mains | Interview Guidance Program (नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार 275 मार्कांचा पहिला व डिसाईडिंग इंटरव्ह्यू!) MPSC Mains चा निकाल जाहीर झाला असून 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान केवळ 438 विद्यार्थ्यांचे मुलाखतीचे टप्पे पार पडणार आहेत. वेळेचे गांभीर्य लक्षात घेता, मैत्रेय UPSC MPSC घेऊन येत आहे विशेष 'फोकस इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम'! 💡 इंटरव्ह्यूमध्ये 275 गुणांचे महत्त्व का मोठे आहे? मुलाखत ही केवळ ज्ञानाची परीक्षा नसून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची (Personality) परीक्षा आहे. 📌 प्रोग्रामची प्रमुख वैशिष्ट्ये: 1️⃣ Raw Interview (प्राथमिक टप्पा): फॅकल्टी लेव्हलला (सुशील सर व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली) अनप्रिपर्ड/रॉ मुलाखत. बॉडी लँग्वेज, बसण्याची पद्धत, आवाज व कॉन्फिडन्सचे प्रायमरी ऑब्झर्व्हेशन. तुमच्या प्रोफाईलवर (DAF) आधारित पर्सनलाईज्ड Question Bank. 2️⃣ Actual Panel Mock Interview (अंतिम टप्पा): मुख्य मुलाखतीपूर्वी प्रत्यक्ष पॅनलसमोर मॉक इंटरव्ह्यूचा अनुभव. रिअल टाइम फिडबॅक व स्ट्रॅटेजिक इम्प्रूव्हमेंट. 3️⃣ 6 Key Pillars वर विशेष काम: 🔹 Basic Profile & District Info: ओळख, कौटुंबिक पार्श्वभूमी. 🔹 Graduation / Post-Graduation: पदवी विषय व अकॅडेमिक्स. 🔹 Academic Gap Justification: गॅप कसा योग्य प्रकारे जस्टिफाय करावा? 🔹 Hobbies & Interests: आवडी-निवडी व अवांतर व्यक्तिमत्त्व. 🔹 Service Preferences: पदांचे प्राधान्यक्रम व त्याविषयीचे लॉजिक. 🔹 Current Affairs & Daily Newspaper Reflection: चालू घडामोडींवर मते कशी मांडायची? 4️⃣ One-to-One Discussion & Guidance: मुलाखतीतील रॅन्डम प्रश्नांना सामोरे जाण्याची कौशल्ये आणि औपचारिक भाषेचा (Formal Communication) सराव. उत्तर माहीत नसल्यास पॅनलसमोर कसे व्यक्त व्हावे, याचे मार्गदर्शन. 📲 प्रवेश / सहभागी कसे व्हावे? मुलाखतीसाठी क्वालिफाय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम उपलब्ध आहे. विशेष Telegram Group (Focused Interview Prep) मध्ये ॲड होण्यासाठी तुमच्या DAF / Interview Call Letter सह संपर्क साधा. 📞 संपर्क: [9226128894] 📍 सेंटर: मैत्रेय (Maitreya) UPSC MPSC, पुणे.

MPSC Mains 2026 Time table
MPSC Mains 2026 Time table

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Women empowerment is not a myth!
Women empowerment is not a myth!