𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Open in Telegram
6 972
Subscribers
+324 hours
+47 days
+1630 days
Posts Archive
बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम
Join @mpscguidnce
दि.९ जून २०२६
*महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार;दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यासाठी आयोग सकारात्मक*
*शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांची आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांसोबत महत्वपूर्ण चर्चा; विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर*
मुंबई.दि.९: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी एक विद्यार्थी व्यासपीठ ' सुरू करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली, ज्यावर आयोगाने सहकार्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
डॉ.गोऱ्हे यांनी आज MPSC कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सचिव श्री. महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. याप्रसंगी महेश बडे व रवींद्र बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकी दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले कि परीक्षांच्या तारखा ऐनवेळी बदलण्याऐवजी, त्यांचे अचूक पूर्वनियोजन करून त्या वेळेतच जाहीर कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्हा स्तरावर आयोगाची स्वतःची हक्काची परीक्षा केंद्रे सुरू करण्यासाठी शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि तांत्रिक अडचणींना तत्काळ उत्तरे मिळण्यासाठी 'FAQ' आधारित स्वयंचलित उत्तर व्यवस्था (Automated Response System) विकसित करावी. यासोबतच २४x७ हेल्पडेस्क, डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था आणि आयोगाचे स्वतंत्र मोबाईल ॲप सुरू करून तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
महिला परीक्षार्थींचा संवेदनशीलतेने विचार करून, महिला उमेदवारांना प्रसूती काळात विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सवलती आणि अटींमध्ये योग्य सुधारणा करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
*निवेदनातील अन्य प्रमुख मागण्या:*
* 'एक उमेदवार, एक पद' धोरणाची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जागा वाया जाणार नाहीत.
* प्रतीक्षा यादी (Waiting List) पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणली जावी.
* गट-क (Group C) परीक्षांची नवीन व सुधारित योजना त्वरित जाहीर करावी.
* पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
* पूर्व - मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यातील प्रक्रिया ११ महिन्यात पूर्ण करण्यात येईल व ज्या पूर्व - मुख्य या दोन टप्प्यातील प्रक्रिया आहेत त्या ६ महिन्यात पूर्ण कराव्यात.
प्रलंबित परीक्षांच्या तारखा तातडीने घोषित करून संपूर्ण भरती प्रक्रिया १ वर्षाच्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावी.
*राज्य सरकारसमवेत चर्चा करून पाठपुरावा करणार*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षांमधील विलंब आणि अनिश्चिततेमुळे मोठा मानसिक व आर्थिक ताण येत आहे. या बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष चर्चा करून शासन स्तरावर याचा गतीने पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आ डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी या बैठकीत सांगितले.
------
⚠️ चालू घडामोडी Batch मध्ये एप्रिल 2026 पर्यत नोट्स उपलब्ध करून दिली आहे...
👉🏻गट ब पूर्व 2026 साठी एकदा नोट्स वाचून घ्या.
+2
कर्जत - जामखेड मतदारसंघातील बावी (ता. जामखेड) येथील कन्या कु. सीमा सुधीर पवार यांनी अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (World Yogasana Sports Championship 2026) रौप्यपदक पटकावत भारतासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
पुणे येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सीमा यांनी नोकरी आणि क्रीडा यांचा उत्कृष्ट समतोल साधत हे यश संपादन केले आहे. यापूर्वी जिल्हास्तर व राज्यस्तरावर सुवर्णपदके तसेच राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकाविल्यानंतर आता त्यांनी जागतिक स्तरावरही आपली छाप उमटविली आहे.
७६ देशांतील खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत ‘Senior A Women – Twisting Body’ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी रौप्यपदक जिंकले. त्यांची जिद्द, परिश्रम आणि समर्पण ग्रामीण भागातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. सीमा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐🏅🇮🇳
#SeemaPawar #WorldYogasanaChampionship #PrideOfAhilyanagar #YogaSports
♦️#PSI #MPA नाशिक दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 127
👉 LIVE उदया सकाळी 7 वाजल्यापासून..
CLICK HERE
#FINAL_selection list
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी
जाहिरात क्रम ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत..
#GR
♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम निवड न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू योजना
Join 👉 @mpsc_achieverss
👉परिक्षा आणि निकालाला गती देण्यावर आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील.
महेंद्र हेरपालकर सचिव MPSC
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
पोरांच्या अवस्था 👉👉
पेपर झाल्यावर 110+
घरी आल्यावर 105
क्लास 🗝️ 100
आयोग की 95
उद्या परवा 90 😅😅😅
Join👉@Thesteelframeofmpsc
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026
सामान्य अध्ययन (GS) पेपरआयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे प्रथम उत्तरतालिका लवकरच येईल 👍
♦️गट ब पूर्व 2026 साठी चालू घडामोडी एप्रिल 2026 पर्यत करावे
👉🏻2026 मधील 4/5 प्रश्न
👉🏻 2025 मधील 8/9 प्रश्न असतील
👉🏻2024 मधील 1/2 प्रश्न असतील
@Thesteelframeofmpsc
✅ आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मधील चालू घडामोडी या विषयाची संभाव्य उत्तरे
सेट C
86) गोव्यातील नवीन तिसरा जिल्हा - कुशावती
87) 8 वा वेतन आयोग स्थापन करणारे राज्य - आसाम
88) ब्राझील ब्रिक्स चेयरशिप - वरील सर्व बरोबर
89) राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा - याची सुरवात चुकीची दिले आहे.
योग्य उत्तर - पर्याय क्रमांक 4 a,c,d
90) भारताचा आर्थिक अहवाल - 2025-26
योग्य पर्याय - 4 वरील सर्व बरोबर
91) प्रधानमंत्री धन धान्य योजना -
योग्य पर्याय - 1 a आणि b बरोबर
92) सुरेश कलमाडी आशियाई ॲथलेटिक्स संघटना अध्यक्ष - 2000-2013
93) नोबेल पुरस्कार - पर्याय क्रमांक 2
94) राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस - 2025 भोपाळ
उत्तर - 2 (b योग्य a अयोग्य)
95) अभिजात भाषा मान्यता क्रम - तमिळ, संस्कृत,तेलगू, ओडिया, पाली
उत्तर - पर्याय क्रमांक 4
96) इराण चाबहार बंदर - a,c,d बरोबर
उत्तर - पर्याय 3
97) महिला तंत्रज्ञान केंद्र - सर्व बरोबर
उत्तर - पर्याय 4
98) बहुआयामी दारिद्रय निर्देशांक - b,c,d बरोबर
99) वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स -
सुवर्ण -75 , रौप्य - 69, कांस्य -64
100) चिली अध्यक्ष - जोस अँटानियो कास्ट
