पवित्र पोर्टल शिक्षक भरती महाराष्ट्र TAIT/TET/CTET -All In One parbhanikar
Open in Telegram
4 981
Subscribers
+724 hours
+527 days
+18930 days
Posts Archive
📌 प्रशासकीय कारणास्तव दि.११/०९/२०२६ रोजी होणारे समुपदेशन रद्य करण्यात आलेले आहे. सदर समुपदेशन दि.१५/०९/२०२६ रोजी वंसतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद, यवतमाळ येथे ठिक सकाळी ९.३० वाजता ठेवण्यात आलेले आहे. सदर समुदेशनाच्या दिवशी उमेदवार अनुपस्थिती राहील्यास याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यवतमाळ
दिनांक - ०९/०९/२०२६
प्रति,
मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब,
शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
विषय : TAIT-2025 अंतर्गत सध्या कार्यरत शिक्षकांची इतर जिल्ह्यांमध्ये शिफारस झाल्यामुळे त्यांच्या विद्यमान आस्थापनेवर रिक्त होणारी पदे ‘Converted Round’ मध्ये भरण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
TAIT-2025 अंतर्गत सध्या विविध ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काही शिक्षकांची इतर जिल्ह्यांतील पदांवर शिफारस होत आहे. संबंधित शिक्षकांनी नव्या ठिकाणी नियुक्ती स्वीकारल्यानंतर त्यांच्या विद्यमान आस्थापनेवरील पदे रिक्त होणार आहेत.
TAIT-2022 च्या भरती प्रक्रियेतही अशाच प्रकारे कार्यरत शिक्षकांची इतर ठिकाणी शिफारस झाल्याने त्यांच्या मूळ आस्थापनेवरील पदे रिक्त झाली होती. त्यामुळे TAIT-2025 मध्येही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष रिक्त होणाऱ्या पदांचा याच भरती प्रक्रियेत समावेश करणे आवश्यक आहे.
ही पदे रिक्त राहिल्यास, विशेषतः दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच TAIT-2025 मध्ये पात्र ठरलेल्या आणि वयोमर्यादेच्या काठावर असलेल्या अनेक उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी गमवावी लागू शकते.
त्यामुळे आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
१. TAIT-2025 अंतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये शिफारस झालेल्या सध्या कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र यादी तयार करून, त्यांच्या विद्यमान आस्थापनेवरील पदांची माहिती निश्चित करण्यात यावी.
२. संबंधित शिक्षकांनी नव्या ठिकाणी नियुक्ती स्वीकारल्यानंतर त्यांच्या विद्यमान आस्थापनेवर प्रत्यक्ष रिक्त होणारी पदे नियमानुसार निश्चित करून ती TAIT-2025 च्या ‘Converted Round’ मध्ये समाविष्ट करण्यात यावीत.
३. सदर रिक्त पदे TAIT-2025 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ताक्रमाने व शासनाच्या प्रचलित नियमांनुसार भरण्यात यावीत.
विशेषतः दुर्गम भागातील शाळा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत शिक्षकांच्या स्थलांतरामुळे रिक्त होणाऱ्या पदांचा यामध्ये प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना वेळेत शिक्षक उपलब्ध होतील, तर दुसरीकडे पात्र उमेदवारांपैकी वयोमर्यादेच्या काठावर असलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळू शकेल.
त्यामुळे TAIT-2025 अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या स्थलांतरामुळे प्रत्यक्ष रिक्त होणारी पात्र पदे याच भरती प्रक्रियेतील ‘Converted Round’ मध्ये उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर तातडीने स्पष्ट आदेश निर्गमित करावेत, ही नम्र विनंती.
हजारो पात्र उमेदवारांचे भवितव्य तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
आपला विश्वासू,
रिक्त_जागा_रायगड_जिल्हा_.pdf3.69 MB
केंद्र_निहाय_मंजूर_कार्यरत_रिक्त_पदांचा_अहवाल_xlsx.pdf9.44 KB
Created and shared using Adobe Scan.
कागदपत्र_पडताळणीअंती_पात्र_अपात्र_यादी_दिनांक_7_स_260907_193125.pdf12.60 MB
📌 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
रिक्त जागांचा तपशील - मुलाखतीशिवाय यादी
१. व्यवस्थापन निहाय रिक्त पदे:
📌- जिल्हा परिषद:13,225 - 8,481 = 4,744 रिक्त
📌- नगर पालिका: 280 - 226 = 54 रिक्त
📌- महानगरपालिका: 1,954 - 1,306 = 648 रिक्त
📌- आदिवासी विकास विभाग: 2,421 - 1,601 = *820* रिक्त
📌- शासकीय विद्यानिकेतन:* 56 - 54 = 2 रिक्त
📌-खाजगी संस्था:1,818 - 1,451 = 367 रिक्त
एकूण: 19,754 - 13,119 = 6,635 रिक्त
📌२. इयत्ता निहाय रिक्त पदे:
- इयत्ता १ ली ते ५ वी: 12,671 - 7,541 = 5,130 रिक्त
- इयत्ता ६ वी ते ८ वी: 5,421 - 4,207 = 1,214 रिक्त
- इयत्ता ९ वी ते १० वी: 1,218 - 1,119 = 99 रिक्त
- इयत्ता ११ वी ते १२ वी: 364 -252 = 112रिक्त
यात सगळ्यात जास्त रिक्त जागा ZP मध्ये 4,744 आणि इयत्ता 1 ते 5 मध्ये 5,130 आहेत. वरील सर्व जागामध्ये ST 802 तर ST PESA 1408 जागा आहेत.

यात सगळ्यात जास्त रिक्त जागा ZP मध्ये 4,744 आणि इयत्ता 1 ते 5 मध्ये 5,130 आहेत. वरील सर्व जागामध्ये ST 802 तर ST PESA 1408 जागा आहेत
📌 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
रिक्त जागांचा तपशील - मुलाखतीशिवाय यादी
१. व्यवस्थापन निहाय रिक्त पदे:
📌- जिल्हा परिषद:13,225 - 8,481 = 4,744 रिक्त
📌- नगर पालिका: 280 - 226 = 54 रिक्त
📌- महानगरपालिका: 1,954 - 1,306 = 648 रिक्त
📌- आदिवासी विकास विभाग: 2,421 - 1,601 = *820* रिक्त
📌- शासकीय विद्यानिकेतन:* 56 - 54 = 2 रिक्त
📌-खाजगी संस्था:1,818 - 1,451 = 367 रिक्त
एकूण: 19,754 - 13,119 = 6,635 रिक्त
📌२. इयत्ता निहाय रिक्त पदे:
- इयत्ता १ ली ते ५ वी: 12,671 - 7,541 = 5,130 रिक्त
- इयत्ता ६ वी ते ८ वी: 5,421 - 4,207 = 1,214 रिक्त
- इयत्ता ९ वी ते १० वी: 1,218 - 1,119 = 99 रिक्त
- इयत्ता ११ वी ते १२ वी: 364 -252 = 112रिक्त
यात सगळ्यात जास्त रिक्त जागा ZP मध्ये 4,744 आणि इयत्ता 1 ते 5 मध्ये 5,130 आहेत. वरील सर्व जागामध्ये ST 802 तर ST PESA 1408 जागा आहेत.
फक्त पात्र उमेदवारांना सूचना
Created and shared using Adobe Scan.
Repost from Pavitra portal / Tait / Tet / Ctet
📌 कन्व्हर्ट राऊंड 15 तारखे पर्यत लावण्याचे नियोजित होते,आज परीक्षा परिषद मध्ये भेट दिल्यानंतर सांगण्यात आले की पुढील 4 दिवसात म्हणजे 15 तारखेच्या आत कन्व्हर्ट राऊंड लागेल
जॉईन @pavitraportal
✍............विट्ठल सरगर