cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

💞Marathi Motivational Videos, Quotes, Stories आणखी बरचं काही...💞 ✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨ ✨Admin Contact: @Nmcontactbot✨ ✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨

Show more
Advertising posts
5 415
Subscribers
+524 hours
+197 days
+4530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
जर करशील आज तू आपले संपूर्णपणे काम, तरच कुठेतरी उद्या तुला जगायला भेटेल दाम. त्यासोबत नक्की होईल तुझ्या कार्यला सलाम. आज संघर्षच्या काळात जर गालशील तू घाम. तेव्हाच उद्या कुठेतरी होईल तुझे मोठे नाम. नाहीतर तुला जीवनभर रहावे लागेल गुलाम. त्यामुळे कदाचित आयुष्य होऊ शकते जाम. शेवटी वरचा तर बघत असतो भगवान राम ............🦋🌺✍🙏............ शब्दांकन✍ -B.S Kendre Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp) आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
Show all...
👌 5
00:31
Video unavailableShow in Telegram
आपला भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो परंतु खरच आत्ताच्या पिढीतील किती लोक शेती व्यवसायाकडे येत आहेत?त्यांची संख्या हातावर असेल.असे का होत आहे ते सांगाने कठीण आहे.खर पाहिल गेल तर शेती सारखा हक्काचा आणि कोणत्याही परिस्थितीत टिकवून राहणारा व्यवसाय दुसरा कोणताच नाही तरीही ह्या व्यवसायाकडे कमीपनाने पाहिल जाते,ही चुकीची बाब आहे.कदाचित ह्यालाच घाबरून लोक इकडे येत नसतिल,पण हे खूप चुकीचे आहे. जर आपण शेतीचा नीट अभ्यास करून काटेकोरपणे शेती केली तर,नक्कीच फायदात असेल.सिंचनाच्या आधुनिक पद्धतींमध्ये-पृष्ठभाग सिंचन, ठिबक सिंचन,स्प्रिंकलर सिंचन,भूपृष्ठ सिंचन ह्याचा वापर करावा.खतांचे योग्य वापर केला तर नक्कीच फायदा होईल.सेंद्रिय शेती ही जास्त योग्य असेल.अडचणी वर मात करण्यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावे.आपल्या शेतातील मातीचे व पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.योग्य उपाय केले तर नक्कीच उत्पन वाढेल.सर्व व्यवसायात चढ-उतार तरी येत असतात. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते त्यामुळे त्यात पुढे चालत रहावे.. ...........🦋🌺✍🙏............ शब्दांकन✍ -B.S Kendre Telegram -@Bskendre5 Contact-7218160575(what)प्रतिक्रीया कळवा.
Show all...
2.44 MB
👍 2🔥 2
Photo unavailableShow in Telegram
🇮🇳🔥🏆...... *दिल से हिंदुस्तानी* ....🇮🇳🔥🏆 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖ 🔥🇮🇳🏆ये icc world cup trophy🇮🇳🔥 🏆 तू नही जानती कितना चाहते है तुझे हम!* बहुत भार तेरे लिये सहे है हर हिंदुस्तानी ने गहरे जख्म!🇮🇳 🏆मगर सच ये है,तेरे जैसा खुबसूरत  नही है दुसरा सनम*🇮🇳 एस भार तुझे उठाकरही लिया हमने अखरी दम!🔥 तेरे को पाकर मिट गये अब तक के सारे गम!* 🇮🇳 🇮🇳🔥 *East or west india is the best🔥* 🇮🇳 ...........🦋🌺😇💞............ शब्दांकन✍ -B.S Kendre Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp) आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा✍🏻
Show all...
👍 8🔥 3
🟣✍..कोणालाही कमी लेखू नका,वेळ प्रत्येकाची येते ..🟣✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖   आज तुमच्यावर हसणारे,तुमची चेष्टा करणारे लोक उद्या जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुमच्या साठी त्याच तोंडातून आभार काढून टाळ्या वाजवतील,ज्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू असतिल त्याच डोळ्यांत आनंदाचे अश्रू असतिल आणि एक प्रकाराचा बदला पूर्ण होईल.जे तुम्हाला निव्वळ साधे समजतात,त्यांना तुमचे महत्त्व त्याच दिवशी समजेल,फक्त अट आहे एकाच आहे,हा  जो प्रवास थांबला नाही पाहिजे,यश हे आज ना उद्या नक्की मिळेल.तुमची मेहनत नक्कीच फळ देणार पण केव्हा ते सांगू शकत नाही,कदाचित यश तुमच्या पासून एक पाउल असेल तेव्हाच तुम्ही प्रयत्न सोडून दिले तर ते आतापर्यंतची सर्व मेहनत वाया जाईल.प्रत्येक मेहनती,वेदनादायक कथेचा यशस्वीपणे शेवट होत असतो,हे लक्षात ठेवून पुढे चालायला पाहिजे. आपण "change is the only constant" हे वाक्य एकलच असेल.जीवनातील एकमेव स्थिरता म्हणजे बदल होय. बदल हा वेळेनुसार नक्की येत असतो.जर तुम्हाला वेळ जशी बदल जाते त्या बदलांशी जुळवून घेण्यात अडचण येते,पण जो त्या बदलांशी जो जुळवून घेतो तोच जिंकतो किंवा निकाल फिरवू शकतो.फक्त लढण्याची क्षमता असावी लागते,कोणत्याही परिस्थितीत आपले संतुलन टिकवून ठेवता आले पाहिजे. ...........🦋🌺😇💞............ शब्दांकन✍ -B.S Kendre Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp) आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा✍🏻
Show all...
👍 4👌 3
संकलनातुन......✍️ *Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक...?* घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूला विचारलं, "साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. हे सर्व गोंधळात टाकत आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?" साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले. साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?" पत्रकार : "येस !! का हो ?" साधू : "घरी कोण कोण असत?" आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं. कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते. तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला. तो म्हणाला : "माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत." साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?" (आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.) साधू : "तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?" पत्रकाराने राग आवरत सांगितलं : "बहुतेक एक महिना झाला असावा. साधू : "तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?" (आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?) तरी त्याने उत्तर दिले : "गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो" साधू : "त्यावेळी किती दिवस एकत्र होता?" पत्रकार (हळवा होत) : "तीन दिवस होतो" साधू : "तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?" (पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.) साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?" वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?" (असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं). साधू : "बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीय. You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी "लगावं" असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते. एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं... हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही... तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही. आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं. एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला. *आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं...* आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज... सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो... सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही... कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत...! आपण वरचेवर बदलत चाललोय... हेच खरं आहे..! इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय.... कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं... प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे... गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे... वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं...! *दाहक असलं...तरी सत्य हेच आहे...* *संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection..* वरील घटनेतील "साधू" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले *स्वामी विवेकानंद होते.* 🙏🏻
Show all...
👍 9👏 6
00:23
Video unavailableShow in Telegram
🟣परमेश्वरा भागवशील का बळीराजाची तहान?🟣✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖ देवा भागवशिल का रे?ह्या वर्षीतरी गरीब बळीराजाची तहान. ह्या वेळेस तरी पीकतील का रे?शेतातील सर्वच पिके छान. दरवर्षी निसर्ग साथ देत नसल्यामुळे उत्त्पन होते लहान केव्हा उंचावेल रे ह्या जगात शेतकऱ्याची मान? ही उष्ण झालेली,सुकी,तहानलेली माती वाट पाहत आहेत पावसा तुझी ही पूर्ण शेती किती दिवसापासून सर्व तुझीच वाट पाहतात पुढे करून छाती तुझी बळीराज्यासोबत असते जवळची नाती. गुरेढोरे सर्व लहान-मोठे सर्वच पाहत आहेत पावसा तुझ्या येण्याची वाट. पाहून तुझी वाट कळत नाही केव्हा होते पहाट.. ह्या मातीशी असुदे चांगली तुझी नेहमीच घट्ट साथ. होऊ नको देऊ ईश्वरा बळीराजाचा कष्टाचा खात. ...........🦋🌺😇💞............ शब्दांकन✍ -B.S Kendre Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp) आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
Show all...
1.57 MB
👍 8👌 5 2
00:29
Video unavailableShow in Telegram
ओढ तुझी..❣🤍 20/06/2024 तुझ्यासोबत हे जग पण स्वर्गाहून सुंदर वाटतं, तु नसताना सोबत माझं अंतःकरण दाटतं.. तुझ्यासोबत माझं असनं, म्हणजे शिवा सोबत पार्वती.. आणि नसे जेव्हा तु सोबती, वाटते जनू जिंदगी ही अधुरी.. जनू जिंदगी ही माझी अधुरी... #Ishq_Kiyaan💔 @Writer_ami
Show all...
2.94 MB
5🥰 2👌 2
00:46
Video unavailableShow in Telegram
🟣✍No need of caption🟣✍ आईच प्रेम सर्वांना दिसत,आईबदल भाषणे,पण वडिलांच प्रेम कुणालाच दिसत नाही,आईसाठी आपण कृतज्ञ असतो पण वडिलांचं,त्यांचे महत्त्व केव्हा समजणार,वडील म्हणजे घरचा मोठा आधारच.घरचा मुख्य पायाच होय.    सर्वांना भगवान श्रीकृष्णांना  जन्म दिलेल्या माता देवकी- पालन करणाऱ्या यशोदा माता दिसतात परंतु जोरात पाऊस चालू असताना व्यवस्थितपणे टोपलीत डोक्यभर नदीच्या पाण्यातून बाळाला सुखरूप ठिकाणी पोहचवणरा बाप कुणालाच दिसत नाही,श्याम ची आई ह्या सारखे आईबदलचे अनेक पुस्तके लिहाले गेले आहेत पण वडीलांबदल अल्पच पुस्तके लिहले जातात.पायाला ठेच लागली की लगेच तोंडातून आईग असे उच्चार निघतात परंतु जेव्हा मोठे संकट आल्यास,बापरे असे उच्चार बाहेर निघतात ह्यातून असे दिसून येते की मोठा संकटाचा सामना करण्यासाठी वडिलांचा आधार लागतोच,तुमचे नाव सुधा वडिलांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही,आणि आयुष्य पण नाही.आई फक्त एका दिवसाच्या भाकरीचा विचार करते,पण मुलांच्या संपुर्ण आयुष्याचा भाकरीचा विचार करणारा बाप असतो .....🦋🌺😇💞..... शब्दांकन✍-B.S Kendre Tel-@Bskendre5 Cont-7218160575 (What) बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
Show all...
1.66 MB
8👌 3👍 1
Photo unavailableShow in Telegram
_*आयुष्य जेंव्हा बीजगणित आणि भूमिती सारखं बनतं तेंव्हा आयुष्याची गणितं सोडवायला गरज असते ती खऱ्या शिक्षकाची... कारण खऱ्या आयुष्यात ना प्रमेय लागू होतात ना कुठली सूत्र..!!*_ ✨ Good Night ✨
Show all...
👍 6👌 3
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.