en
Feedback
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क MPSC Combined Preliminary Exam STI ASO PSI SR MPSC गट ब MPSC गट क MPSC Group B MPSC 20

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क MPSC Combined Preliminary Exam STI ASO PSI SR MPSC गट ब MPSC गट क MPSC Group B MPSC 2026

Open in Telegram

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क MPSC Combined Preliminary Exam STI ASO PSI SR MPSC गट ब MPSC गट क MPSC Group B MPSC इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना विज्ञान गणित बुध्दीमत्ता चालू घडामोडी

Show more
1 385
Subscribers
No data24 hours
+77 days
+6230 days
Posts Archive
MPSC ( तलाठी ) पूर्व परीक्षा टार्गेट २४ ऑगस्ट २०२६ १) विषय भूगोल महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार आणि सीमा (शेजारील राज्ये आणि समुद्रकिनारा). राज्याची भूरचना: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत (घाट व शिखरे), आणि महाराष्ट्र पठार (पूर्व व पश्चिम विभाग). २) गणित :- गुणोत्तर व प्रमाण ३) राज्यघटना:- भारताचा महान्यायवादी , न्यायव्यवस्था. https://t.me/mpsc_group_c_2026

ॲप मध्ये भारतीय राज्यघटना टेस्ट 01 अपलोड झाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता विज्ञान टेस्ट 02 अपलोड होईल. ॲप लिंक :- https://play
+1
ॲप मध्ये भारतीय राज्यघटना टेस्ट 01 अपलोड झाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता विज्ञान टेस्ट 02 अपलोड होईल. ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj ॲप डाऊनलोड करून MPSC गट क 2026 टेस्ट सिरीज बॅच वर क्लिक करा खाली स्क्रोल करा Free contest दिसेल तिथे Test 01 समोर Attempt ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा टेस्ट सुरू होईल 🛑 टेस्ट 01 भारतीय राज्यघटना आणि टेस्ट 02 विज्ञान या दोन्ही टेस्ट फ्री आहेत त्या साठी फी भरण्याची गरज नाही 🛑 आज 23 ऑगस्ट पासून रोज रविवार आणि बुधवार नवीन टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल 30 विषय टेस्ट आणि 10 फुल्ल टेस्ट सर्व टेस्ट स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह असतील. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे असेल त्यांच्या साठी फी 249/- आहे तिथे ऑफर मध्ये FIRST80 नावाचे कूपन दिसेल त्यावर क्लिक करा ₹80 फी कमी होईल फी ₹170 होईल. 🛑 पहिल्या दोन टेस्ट साठी फी भरण्याची गरज नाही ✅

आज राज्यघटना विज्ञान गणित बुध्दीमत्ता जे टॉपिक काल पर्यंत अभ्यसाले त्या टॉपिक ची चांगली revision करा Selection साठी Revision ला खूप महत्त्व असते 🛑 उद्या विषय निहाय टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल टेस्ट ०१ राज्यघटना ( ३० प्रश्न ३० गुण वेळ १८ मिनिट ) टेस्ट ०२ विज्ञान ( २० प्रश्न २० गुण वेळ १२ मिनिट ) टेस्ट अभ्यासक्रम ( या आठवड्यात ज्या टॉपिक वर टार्गेट दिले होते ते सर्व टॉपिक असतील ) टेस्ट लॅपटॉप कम्प्युटर मोबाइल वर ऑनलाईन सोडवता येते. टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क्स लगेच पाहता येतील काय चुकले आहे ते समजेल टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहता येईल. 🟢 उद्या ( 23 ऑगस्ट 2026 ) च्या दोन्ही टेस्ट सर्वांना फ्री असतील ✅ 🟢 उद्या (२३ ऑगस्ट २०२६ ) दिवसभरात सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत दोन्ही टेस्ट तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येतील ✅ 🟢 टेस्ट लिंक उद्या सकाळी ११ वाजता Telegram चॅनेल वर मिळेल. ✅ Telegram channel link :- https://t.me/mpsc_group_c_2026

🚨 UPSC EPFO APFC 2026 - Notification & Batch Update! 🚨 The official notification is out, and it's time to target one of the most prestigious Group 'A' Gazetted roles! Key Notification Dates: Application Started: August 22, 2026 Last Date to Apply: September 11, 2026 Exam Date: December 20, 2026 About the APFC Post: Salary: Level 10 (In-hand: ₹1 Lakh - ₹1.16 Lakh+ per month + perks). Power: Enjoys Quasi-Judicial Powers to enforce labor laws and penalize defaulters. Growth: Rapid promotions up to Regional PF Commissioner grades. Batch & Preparation Support: High-quality notes and test series will be available in our app starting August 25, 2026! https://t.me/upsc_epfo_apfc_2026_guidance

🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस पाचवा 🎯 🗓️ आज: २० ऑगस्ट 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना — संसद (Parliament) संसदेची रचना राज्यसभा (Rajya Sabha) रचना सदस्यसंख्या निवडणूक पद्धती कार्यकाळ सदस्यांची पात्रता राज्यसभेचे विशेष अधिकार लोकसभा (Lok Sabha) रचना सदस्यसंख्या निवडणूक कार्यकाळ सदस्यांची पात्रता लोकसभेचे विशेष अधिकार लोकसभा व राज्यसभा यांतील महत्त्वाचे फरक संसद सदस्यांची पात्रता व अपात्रता लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्यसभा सभापती व उपसभापती संसदेचे अधिवेशन स्थगन, सत्रावसान व लोकसभा विसर्जन गणपूर्ती (Quorum) मतदान २. विषय: बुद्धिमत्ता — सांकेतिक भाषा (Coding-Decoding) सांकेतिक भाषा (Coding-Decoding): अक्षरांवर आधारित Coding अक्षरांचे स्थान (A=1 ते Z=26) Letter Shifting Reverse Alphabet Coding शब्दांचे Coding संख्या आधारित Coding अक्षर + संख्या मिश्र Coding वेगवेगळ्या शब्दांचे संकेत शोधणे Coding मधील Pattern ओळखणे MPSC/PYQ मधील Coding-Decoding प्रश्न वेळ वाचवण्यासाठी Shortcuts ३. विषय: सामान्य विज्ञान — पेशी (Cell) पेशीची संकल्पना व महत्त्व पेशीचा शोध — Robert Hooke (रॉबर्ट हुक), 1665 Antonie van Leeuwenhoek (अँटोनी व्हॅन ल्यूव्हेनहॉक) पेशीसिद्धांत (Cell Theory) Schleiden (श्लायडन) Schwann (श्वान) Rudolf Virchow (रुडॉल्फ व्हिर्खो) पेशींचे प्रकार Prokaryotic Cell (प्रोकॅरियोटिक पेशी) Eukaryotic Cell (युकॅरियोटिक पेशी) पेशीची मूलभूत रचना Cell Membrane Cytoplasm Nucleus Cell Wall प्रमुख पेशीअंगके Mitochondria Ribosome Endoplasmic Reticulum Golgi Apparatus Lysosome Plastids Vacuole Centrosome वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांतील फरक सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे! 💪🔥 अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 https://t.me/mpsc_group_c_2026  

🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस चौथा 🎯 🗓️ आज: १९ ऑगस्ट 🔥 आजचे दिनविशेष (१९ ऑगस्ट): १९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day) म्हणून साजरा केला जातो. 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - केंद्रीय कार्यकारी मंडळ / Union Executive) राष्ट्रपती (President): पात्रता, निवड प्रक्रिया, शपथ, अधिकार (कायदेविषयक, कार्यकारी, वित्तीय, न्यायविषयक, आणीबाणी अधिकार) आणि महाभियोग प्रक्रिया. उपराष्ट्रपती (Vice-President) व पंतप्रधान/मंत्रीमंडळ (Prime Minister & Council of Ministers): यांची कलमे, कार्ये आणि अधिकार सविस्तर वाचा. (PYQ सराव): राष्ट्रपतींच्या अधिकारांवर आणि कलमांवर मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न सोडवून त्यांचा ट्रेन्ड समजून घ्या. २. विषय: गणित व बुद्धिमत्ता (घटक - शेकडेवारी / Percentage & गुणोत्तर-प्रमाण / Ratio & Proportion) शेकडा वाढ/घट, अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर, आणि निवडणुकीवर किंवा उत्पन्नावर आधारित महत्त्वाचे प्रश्न सोडवा. गुणोत्तर-प्रमाणामधील भागीदारी (Partnership) आणि वयांवर आधारित (Age Problems) बेसिक संकल्पना व शॉर्टकट ट्रिक्स समजून घ्या. ३. विषय: सामान्य विज्ञान (घटक - मानवी आरोग्य व आजार - भाग २) कालच्या रोगांवरील अभ्यास पुढे चालवत जीवाणू (Bacteria), विषाणू (Virus), व कवक (Fungi) मुळे होणारे आजार, त्यांचे प्रसारक (Vectors) आणि प्रतिबंधक लसींची नावे तक्त्याच्या स्वरूपात पाठ करा. सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 📌 https://t.me/mpsc_group_c_2026

🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस तिसरा 🎯 🗓️ आज: १८ ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो, कालच्या टार्गेटवर तुम्ही नक्कीच पूर्ण निष्ठा आणि ताकदीने मात केली असेल. अभ्यासात सातत्य (Consistency) हेच यश मिळवून देणारे सर्वात मोठे हत्यार आहे! 🔥 आजचे दिनविशेष (१८ ऑगस्ट): स्वातंत्र्यसंग्राम इतिहास: १८ ऑगस्ट १९४५ हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताशी जोडला गेलेला आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारे नेताजींचे "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा" हे वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करते. या महान पराक्रमी विचारांची ऊर्जा मनात ठेवून, आजच्या टार्गेटवर तुटून पडूया! 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - मार्गदर्शक तत्त्वे / DPSP & मूलभूत कर्तव्ये) DPSP (कलम ३६ ते ५१): समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी-बुद्धीवादी तत्त्वे यांनुसार कलमांचे वर्गीकरण करून समजून घ्या. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (उदा. ४२ वी, ४४ वी, ८६ वी, ९७ वी) विशेष नोंदवून ठेवा. मूलभूत कर्तव्ये (कलम ५१A): स्वर्णसिंह समितीच्या शिफारशी आणि सर्व ११ कर्तव्ये पाठ करा. (PYQ सराव): DPSP आणि मूलतत्त्वे यांवरील मागील वर्षांचे सर्व प्रश्न सोडवा आणि विधानांमधील सूक्ष्म फरक (Key nuances) समजून घ्या. २. विषय: गणित व बुद्धिमत्ता (घटक - नफा-तोटा / Profit and Loss) खरेदी किंमत, विक्री किंमत, छापील किंमत, सुट (Discount) आणि शेकडा नफा/तोटा यांवरील सूत्रे व शॉर्टकट ट्रिक्स समजून घ्या. (PYQ सराव): प्रामाणिक/अप्रामाणिक व्यापारी, सलग सुट, आणि वस्तूंच्या संख्येशी संबंधित मागील परीक्षांमध्ये आलेले प्रश्न वेळेचे नियोजन करून सोडवा. ३. विषय: सामान्य विज्ञान मानवी आरोग्याशी संबंधित प्रमुख रोग आणि त्यांच्या कारकांचा (Pathogens) प्राथमिक अभ्यास सुरू करा. 💡 महत्त्वाची टीप: वाचनापेक्षा PYQ आणि Revision यावर जास्त भर द्या. चुकलेल्या प्रश्नांची नोंद वेगळ्या वहीत नक्की करा! आजचे टार्गेट आजच पूर्ण करायचे, हा निर्धार कायम ठेवा! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 📌 https://t.me/mpsc_group_c_2026

🎯 ७० दिवसांचे संकल्प नियोजन : दिवस दुसरा 🎯 🗓️ आज: १७ ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! सण-उत्सव साजरे करताना आपल्याला आपल्या अभ्यासाचे ध्येय विसरून चालणार नाही. 🔥 आजचे दिनविशेष (१७ ऑगस्ट): आजच्या दिवसाला अत्यंत प्रेरणादायी आणि अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवकालीन इतिहास: १७ ऑगस्ट १६६६ - याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांनी अत्यंत शिताफीने औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली होती! संकटाच्या चक्रव्यूहातून बुद्धी, संयम आणि साहसाच्या जोरावर कसे बाहेर पडावे, याचा हा सर्वोच्च आदर्श आहे. आधुनिक इतिहास: १७ ऑगस्ट १९०९ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना लंडनच्या पेन्टोनविले तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. १ जुलै १९०९ रोजी लंडनमध्ये ब्रिटिश अधिकारी सर विल्यम कर्झन वायली याचा वध केल्याबद्दल त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. देशासाठी हसत हसत फासावर जाणारे हे वीर आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहेत. या महापुरुषांच्या अफाट शौर्यातून प्रेरणा घेऊन, आज आपणही पूर्ण ताकदीने अभ्यासाला लागूया! 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - मूलभूत हक्क) कलम १२ ते ३५ मधील सर्व तरतुदी, अपवाद आणि विशेषतः कलम ३२ मधील प्राधिलेख (Writs) अतिशय काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. या घटकावर आजवर आयोगाने विचारलेले सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQ) सोडवा. इतर तीन पर्याय का चुकीचे आहेत, याचेही विश्लेषण करा. २. विषय: गणित (घटक - शेकडेवारी / Percentage) शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर, सलग वाढ/घट आणि महत्त्वाच्या ट्रिक्स समजून घेऊन उदाहरणे सोडवा. (PYQ सराव): लोकसंख्या, निवडणुका, पास-नापास यावरील मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न वेळेत सोडवण्याचा सराव करा. ३. विषय: सामान्य विज्ञान (घटक - वनस्पती रोग) बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचे व बाधित पिकांचे वर्गीकरण वाचून त्याचा एक तक्ता (Chart) तयार करा आणि पाठ करा. यावर विचारलेले 'जोड्या लावा' किंवा थेट वन-लायनर प्रश्न सोडवून हा घटक पक्का करा. लक्षात ठेवा: फक्त पुस्तके वाचून पोस्ट मिळत नाही, तर प्रश्नांचा सराव (PYQ) तुम्हाला यशाच्या जवळ नेतो. आजचे हे टार्गेट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच हा निर्धार करूया! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴

आज पासून 70 दिवस रोज टार्गेट दिले जाईल.. आज 16 ऑगस्ट सकाळी 4/5 तास राज्यघटना ( घटनानिर्मिती , संघराज्य व त्यांचे क्षेत्र , नागरिकत्व ) दुपारी बुद्धिमत्ता 2 तास ( बैठक व्यवस्था ) संध्याकाळी 1 तास चालू घडामोडी ( जानेवारी २०२६ )

अभिनंदन! कु. अनघा शिवाजी सुतार एका वर्षात ४ (STI, SR, धर्मादाय निरीक्षक आणि भूमी अभिलेख) पोस्ट मिळवणे ही खूप मोठी आणि प्रेरणा
अभिनंदन! कु. अनघा शिवाजी सुतार एका वर्षात ४ (STI, SR, धर्मादाय निरीक्षक आणि भूमी अभिलेख) पोस्ट मिळवणे ही खूप मोठी आणि प्रेरणादायी कामगिरी , तुझ्या कष्टाचे आणि जिद्दीचे हे फळ आहे. भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🛑Exam Guide Sagar🛑

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 ज्यांच्या बलिदानामुळे आणि अथांग संघर्षामुळे आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांना आणि वीर जवानांना मानाचा मुजरा!

१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १५३९ जागा २. तांत्रिक सहायक: ३ जागा ३. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (गट-क): ११ जागा ४. सहायक अधीक्षक (गट-क): ११ जागा शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही!). वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्ग: १९ ते ४३ वर्ष 📅 परीक्षा व अर्ज शुल्क माहिती: परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग ₹ ३९४/- | मागासवर्गीय प्रवर्ग ₹ २९४/- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२६ ऑनलाइन अर्ज लिंक: mpsconline.gov.in/candidate 📝 परीक्षा पद्धत व वेळापत्रक: पूर्व परीक्षा तारीख: २५ ऑक्टोबर २०२६ (स्वरूप: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे, ०.२५ निगेटिव्ह मार्किंग) मुख्य परीक्षा तारीख: २७ डिसेंबर २०२६ ही परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेतली जाईल. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी खूप कमी वेळ मिळणार असल्याने, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रच करणे गरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या एकत्रित आणि अचूक तयारीसाठी विशेष बॅच उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून काटेकोर नियोजनबद्ध अभ्यासाची सुरुवात दररोजचे अचूक डेली टार्गेट आणि त्यावर आधारित विशेष व्हिडिओ मार्गदर्शन जास्तीत जास्त PYQ चा सराव संपूर्णपणे परीक्षाभिमुख व दर्जेदार नोट्स MPSC आयोगाच्या नव्या पॅटर्न व धर्तीवर आधारित सराव टेस्ट सिरीज https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

पुरवठा निरीक्षक जागा याच जाहिराती मध्ये येऊ शकतात.