MSRTC Official
Open in Telegram
Official Telegram Channel Of MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल
Show more2 215
Subscribers
+324 hours
+137 days
+4130 days
Posts Archive
2 215
+1
परिवर्तनाचा वाटसरू!
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष 'कार्यअहवाल कॉफी टेबल पुस्तकाचे' दिमाखात प्रकाशन संपन्न झाले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पार पडलेल्या या सोहळ्याला मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सर्व मंत्री महोदय उपस्थित होते. 'लालपरी'चे आधुनिकीकरण, ई-बस सेवा आणि परिवहन विभागातील डिजिटल क्रांतीचा संपूर्ण प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
2 215
प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकरिता NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड लॉंच करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून हे कार्ड सवलतधारक प्रवाशांसाठी बंधनकारक असेल.
#FIFA #MSRTC #PratapSarnaik
2 215
सटी महामंडळातर्फे भारतीय महिला क्रिकेट संघाला महिला विश्वचषक स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
#womensworldcup #cricket #MSRTC #PratapSarnaik
2 215
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.
#MSRTC #PratapSarnaik #NCMC
2 215
परळी एक्स्प्रेसवे लातूर आता प्रवास अधिक जलद!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परळी एक्स्प्रेसवे लातूर सेवेमुळे प्रवाशांना परळी, दादर, कुर्ला, वाशी, पनवेल, सोलापूर मार्गे लातूरपर्यंत आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही सेवा प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरणार आहे.
परळ येथून सकाळी ०८:४५ वाजता सुटणारी ही बस धुळे येथे रात्री १२:३० वाजता पोहोचेल. फुल तिकीट दर १०२५ रुपये असून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचा दर ५१५ रुपये ठेवण्यात आला आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.
एसटी संगे करा सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास
2 215
ई-बस सेवेद्वारे एसटी महाराष्ट्राच्या प्रगतीला पर्यावरणपूरक दिशा देत आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldEnvironmentDay #MSRTC
2 215
+3
संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छता, सुविधा आणि आपुलकीचा अनुभव घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत बसून गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला.
प्रवाशांशी थेट संवाद साधत, बदलत्या एसटीचा सकारात्मक चेहरा अनुभवण्याचा हा संस्मरणीय क्षण!
#MSRTC #PratapSarnaik
2 215
तीर्थयात्रा आता अधिक सोपी आणि तुमच्यासाठी खास!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना अंतर्गत ४० जणांचा गट असल्यास तुम्हाला मिळते स्वतंत्र एसटी बस सुविधा, ज्यामुळे गटाने एकत्रितपणे आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येतो. ही योजना विशेषतः महिला मंडळे, भजनी मंडळे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असून, प्रवाशांच्या मागणीनुसार हवे त्या तीर्थक्षेत्रासाठी बस उपलब्ध करून दिली जाते.
एसटीच्या विश्वासार्ह सेवेसह आता तुमचा श्रद्धेचा प्रवास होणार अधिक सुखकर, सुरक्षित!
2 215
१ जून २०२६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पारंपारिक पोषाखात उपस्थित राहून या आनंद सोहळ्यात रंग भरा..!
#MSRTC #PratapSarnaik
2 215
आपल्या एसटीचा ७८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे…
महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यांना जोडणारी आपली लाडकी लाल परी काळानुसार झपाट्याने बदलत आहे. आधुनिक सोयी सुविधा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी कटिबद्ध एसटी महामंडळ नेहमीच कटिबद्ध आहे.
अशा या आपल्या एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नवे संकल्प करण्यासाठी आणि एसटीला अधिक सक्षम बनवण्यासाठी आयोजित विविध योजनांचे लोकार्पण आणि गुण गौरव सोहळ्याचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..
दिनांक: १ जून २०२६
वेळ: सायं. ६:०० वाजल्यापासून पुढे
स्थळ : रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई
#MSRTC #PratapSarnaik #आपली_एसटी
2 215
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’ राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
सन २०२५-२६ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ‘अ’ वर्गात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने ९७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ‘ब’ वर्गात भंडारा विभागातील लाखणी बसस्थानकाने ९७ गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले, तर ‘क’ वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकाने ९८ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रादेशिक विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागातील औरसा नवीन, मुंबई विभागातील रत्नागिरी, नागपूर विभागातील चंद्रपूर, पुणे विभागातील बारामती, नाशिक विभागातील सटाणा आणि अमरावती विभागातील उमरखेड या बसस्थानकांनी आपल्या-आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
#MSRTC #PratapSarnaik
2 215
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र लिहून गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर शासनाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असा आग्रह धरला होता. त्यानुसार शासनाने उप-महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची एस टी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
श्रीमती प्रियांका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असून, पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि दक्षता यंत्रणेला निश्चितच होणार आहे.
2 215
आम्हाला यांचा सार्थ अभिमान!
एसटी महामंडळाच्या पालघर आगारातील महिला वाहक सौ.नेहा पाटील यांनी २०/०५/२०२६ रोजी प्रवासी महिलेची हरवलेली पर्स परत केली. असे प्रसंग एसटी आणि प्रवाशांचे नाते घट्ट करतात.
2 215
नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ते कसारा या मार्गावर नव्या इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आल्या आहेत. दर अर्ध्या तासाला सेवा देणाऱ्या या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुविधाजनक होत आहे.
#MSRTC #ElectricBus #Nashik #Triambakeshwar #Kasara
2 215
+8
अधिक दराने विक्री करणाऱ्या एनसीएमसी कार्ड विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एसटीने राबवलेल्या कडक धोरणाची विविध माध्यमांनी दखल घेतली.
2 215
जादा दर आकारलात तर थेट परवाना रद्द!
एसटीच्या NCMC कार्डसाठी ठरलेले दर स्पष्ट करण्यात आले असून, प्रवाशांकडून अधिक पैसे घेणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नवीन कार्डासाठी ₹१९९ आणि जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी ₹१४९ असा निश्चित दर लागू आहे. पारदर्शक आणि डिजिटल सेवा सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली राज्यभर राबवली जात आहे. प्रवाशांनीही जागरूक राहून योग्य दरातच सेवा घ्यावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तक्रार करावी.
2 215
एसटी महामंडळातर्फे १ मे पासून ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान राबवण्यात येत असून या अभियानांतर्गत पालघर विभागात सेवा अधिक परिणामकारक व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. माननीय नियंत्रण अधिकारी तथा महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनुसार फोकल पॉइंटवर प्रवाशांना बसमध्ये बसविण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामधून प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देत विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
#MSRTC #AapliBusAapliSeva
2 215
प्रवाशांसोबत सुसंवाद साधून त्यांना वेळेत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १ मे पासून सुरु केलेल्या ‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाची अंमलबजावणी राज्यभर उत्साहाने होत आहे. त्याबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अधिकारी, चालक व वाहकांचे अभिनंदन केले.
#MSRTC #AapliBusAapliSeva
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
