en
Feedback
मराठी व्याकरण - MPSCExams.com

मराठी व्याकरण - MPSCExams.com

Open in Telegram

प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न Join @Marathi_Grammar 🔗 व्हॉट्सॲप चॅनेल : https://bit.ly/JoinWhatsAppGrp

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण - MPSCExams.com

Channel मराठी व्याकरण - MPSCExams.com (@marathi_grammar) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 13 590 subscribers, ranking 15 009 in the Education category and 33 628 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 13 590 subscribers.

According to the latest data from 01 May, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -256 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न Join @Marathi_Grammar 🔗 व्हॉट्सॲप चॅनेल : https://bit.ly/JoinWhatsA...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 May, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

13 590
Subscribers
No data24 hours
-547 days
-25630 days
Posts Archive
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - स्वरसंधी स्वरसंधी १) दीर्घत्व संधी : दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. दीर्घत्व संधी ओळखण्याची खूण – संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते. सूत्रे : अ / आ + अ / आ = आ (काना) इ / ई + इ / ई = ई (दुसरी वेलांटी) उ / ऊ + उ / ऊ = ऊ (दुसरा उकार) --- उदाहरणे : १) अ + अ = आ - सूर्य + अस्त = सूर्यास्त - कट + अक्ष = कटाक्ष - रूप + अंतर = रूपांतर - स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार - मिष्ट + अन्न = मिष्टान्न - स + अभिनय = साभिनय - प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय - सह + अध्यायी = सहाध्यायी - पुरुष + अर्थ = पुरुषार्थ - सह + अनुभूती = सहानुभूती - मंद + अंध = मंदांध २) अ + आ = आ - हिम + आलय = हिमालय - देव + आलय = देवालय - फल + आहार = फलाहार - अनाथ + आश्रम = अनाथाश्रम - गोल + आकार = गोलाकार - मंत्र + आलय = मंत्रालय - शिशिर + आगमन = शिशिरागमन - सिंह + आसन = सिंहासन - धन + आदेश = धनादेश 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आदेश म्हणजे काय ? 👉 संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे. यालाच आदेश असे म्हणतात. २) गुणादेश संधी : 👉 दोन स्वर एकत्र आल्यावर ते बदलून ए, ओ, अर् असे रूप धारण करतात, त्यास गुणादेश संधी म्हणतात. सूत्र : अ / आ + इ / ई = ए अ / आ + उ / ऊ = ओ अ / आ + ऋ = अर् गुणादेश संधीची उदाहरणे : १) अ + इ = ए - ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा - स्व + इच्छा = स्वेच्छा - लोक + इच्छा = लोकेच्छा - मनुष्य + इतर = मनुष्येतर - राष्ट्र + इतिहास = राष्ट्रिहास २) अ + ई = ए - गण + ईश = गणेश - राम + ईश्वर = रामेश्वर - गुण + ईश = गुणेश ३) आ + इ = ए - महा + इंद्र = महेंद्र - यथा + इष्ट = यथेष्ट ४) आ + ई = ए - रमा + ईश = रमेश - उमा + ईश = उमेश - महा + ईश = महेश ५) अ + उ = ओ - अयोध्या + ईश = अयोध्येश - राजा + ईश = राजेश - लंका + ईश्वर = लंकेश्वर - चंद्र + उदय = चंद्रोदय - सूर्य + उदय = सूर्योदय - पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम - अन्य + उक्ती = अन्योक्ती - निसर्ग + उपचार = निसर्गोपचार - गणेश + उत्सव = गणेशोत्सव - प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर - दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी - स्वभाव + उक्ती = स्वभावोक्ती - अल्प + उपाहार = अल्पोपाहार - राष्ट्र + उत्तेजक = राष्ट्रोत्तेजक - उत्तम + उत्तम = उत्तमोत्तम 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ३. वृद्ध्यादेश : जर खालीलप्रमाणे दोन स्वर एकत्र येऊन ऐ, औ स्वर तयार झाल्यास त्यास वृद्ध्यादेश असे म्हणतात. अ / आ + ए / ऐ = ऐ अ / आ + ओ / औ = औ उदाहरणे : १) अ + ए = ऐ - क्षण + एक = क्षणैक - एक + एक = एकैक २) आ + ए = ऐ - सदा + एव = सदैव ३) अ + ऐ = ऐ - मत + ऐक्य = मतैक्य - जन + ऐक्य = जनैक्य ४) आ + ऐ = ऐ - प्रजा + ऐक्य = प्रजैक्य - विद्या + ऐश्वर्य = विद्यदैश्वर्य ५) अ + ओ = औ - जल + ओघ = जलौघ ६) आ + ओ = औ - गंगा + ओघ = गंगौघ - यमुना + ओघ = यमुनौघ ७) अ + औ = औ - वृक्ष + औदार्य = वृक्षौदार्य - बाल + औत्सुक्य = बालौत्सुक्य - वन + औषधी = वनौषधी ८) आ + औ = औ - महा + औदार्य = महौदार्य - क्षमा + औचित्य = क्षमौचित्य 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ४. यणादेश : इ, उ, ऋ (हस्व / दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास — - 'इ/ई' बद्दल 'य्' - 'उ/ऊ' बद्दल 'व्' - 'ऋ' बद्दल 'र्' हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे य्, व्, र् असे बदल होतात. त्याला यणादेश असे म्हणतात. उदाहरणे : १) इ + अ = य् + अ = य - प्रीति + अर्थ = प्रीत्यर्थ - अति + अल्प = अत्यल्प - अति + अंत = अत्यंत - प्रति + अक्ष = प्रत्यक्ष - प्रति + अंतर = प्रत्यंतर - कोटि + अवधि = कोट्यवधि २) इ + आ = य् + आ = या - इति + आदी = इत्यादी - अति + आचार = अत्याचार - अति + आनंद = अत्यानंद - वि + आसंग = व्यासंग महत्त्वाचे नियम : य्, व्, र् ऐवजी अनुक्रमे इ, उ, ऋ असे बदल होतात. तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात. उदा. - येथे → इथे - नव → नऊ - गाय → गाईला ५. आदेश नियम : 'ए, ऐ, ओ, औ' या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो. उदाहरणे : १) ए + अ = अय् + अ = अय - ने + अन = नयन २) ऐ + अ = आय् + अ = आय - गै + अन = गायन ३) ओ + ई = अव् + ई = अवी - गो + ईश्वर = गवीश्वर

🚨 मराठी व्याकरण - समानार्थी शब्द 3 🎯 अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी अश्रू = आसू अंबर = वस्त्र अंधार = काळोख, तिमीर, तम अमृत = पीयूष, सुधा अहंकार = गर्व अंक = आकडा आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज आसन = बैठक आदर = मान आवाज = ध्वनी, रव आवाजमां = आवाजात आज्ञा = आदेश, हुकूम आपुलकी = जवळीकता 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

🎯 मराठी व्याकरण - शब्दसमूहाबद्दल एक शब्द १) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग २) देव आहे असे मानणारा – आस्तिक ३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद ४) दक्षिण सामु्द्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल ५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक ६) मोजता येणार नाही इतके – असंख्य, अमाप ७) ज्याचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय ८) अन्नदान करणारा – अन्नदाता ९) खूप दानधर्म करणारा – दानशूर १०) जिवाला जीव देणारा – जिवलग ११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू १२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू १३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार १४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक १५) देशासाठी झटणारा – देशभक्त, देशभक्ती १६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती १७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही १८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक १९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी २०) जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी, सनातनी 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏼 द्या.

Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जाणून घ्या e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया! https://mpsctestse
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जाणून घ्या e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया! https://mpsctestseries.in/mukhyamantri-ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-for-all-check-how-complete-this-process/

मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा. मराठी व्याकरण https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आरोग्य विभाग परीक्षा 2025 https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B मराठी नोकरी संदर्भ https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K Daily - Free Online Test https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Learn English Grammar https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H Current Affairs | चालू घडामोडी 2025 https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v पोलीस भरती मार्गदर्शन 2025 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 MPSCExams Job Update https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I Daily Motivation Quotes https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f

मराठी व्याकरण घटक 2 : संधी जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्यास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधने ▲ संधीचे प्रकार १) स्वर संधी : दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा एक स्वर बनतो, त्यास स्वरसंधी असे म्हणतात. (स्वरसंधी = स्वर + स्वर) उदाहरणे : १. देवालय = देव + आलय २. गुरुपदेश = गुरू + उपदेश ३. महींद्र = मही + इंद्र ४. इत्यादी = इती + आदी ५. महर्षी = महा + ऋषी ६. सूर्यास्त = सूर्य + अस्त ७. विद्यार्थी = विद्य + अर्थी ८. महिलाश्रम = महिला + आश्रम ९. महीश = मही + ईश १०. मुनीच्छा = मुनी + इच्छा २) व्यंजन संधी : जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरणे : १. वाक्पती = वाग् + पती २. षट्शास्त्र = षड् + शास्त्र ३. विपत्काल = विपद् + काल ४. वाङ्मय = वाक् + मय ५. भगवद्गीता = भगवत् + गीता ६. जगन्नाथ = जगत् + नाथ ७. सज्जन = सत् + जन ८. सदाचार = सत् + आचार ९. चिदानंद = चित् + आनंद १०. उच्छेद = उत् + छेद ३) विसर्ग संधी : एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिले वर्ण विसर्ग व दुसरे वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N उदाहरणे : १. मनोरंजन = मनः + रंजन २. दुर्जन = दुः + जन ३. तेजोनिधी = तेजः + निधी ४. निरंतर = निः + अंतर ५. अधोवदन = अधोः + वदन ६. दुष्काळ = दुः + काळ ७. आयुर्वेद = आयुः + वेद ८. बहिरंग = बहिः + अंग ९. मनोराज्य = मनः + राज्य १०. यशोगिरी = यशः + गिरी पूर्वरूप संधी – दोन स्वर एकापुढे एक आल्यास पहिला स्वर (पूर्वस्वर) न बदलता कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. पोटशब्द जवळ येणारे स्वर जोडशब्द काही + असा ई + अ = ई काहीसा नाही + असा ई + अ = ई नाहीसा खिडकी + आत ई + आ = ई खिडकीत किती + एक ई + ए = ई कितीक शब्दांना अनुरुप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दांचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होते. उदा. १) गरज + अनुरुप = गरजेनुरुप २) गरज + अनुसार = गरजेनुसार --- पररूप संधी – दोन स्वर एकापुढे एक आल्यास दुसरा स्वर न बदलता कायम राहतो व पहिला स्वर लोप पावतो. पोटशब्द जवळ येणारे स्वर जोडशब्द कर + ऊन अ + ऊ = ऊ करून घाम + ओळे अ + ओ = ओ घामोळे एक + एक अ + ए = ए एकेक 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

✒️ लेखक परिचय लेखक नाव: अण्णा भाऊ साठे जन्म आणि मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ नाव / टोपणनाव: तुकाराम भाऊराव साठे (_लोकशाहीर अण्णा भाऊ साठे_) कादंबरी: आवडी, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा (१९४५), पाझर, फकिरा (१९५९), मथुरा, माकडीचा माळ (१९६३), रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ (१९६८), वैजयंता, वैर, तारा, रानबोका, संघर्ष, सुगंधा कथा संग्रह: आबी, खुळंवाडा, गजाआड, निखारा, नवती, जिवंत काडतूस, फरारी, चिरानगरची भुतं (१९७८), पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी (१९६०), कृष्णाकाठच्या कथा 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N नाटक: इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान लोकनाट्य: अकलेची गोष्ट (१९४५), कापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे (१९४६), पुढारी मिळाला (१९५२), बेकायदेशीर (१९४७), माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२), शेटजींचे इलेक्शन (१९४६) प्रवासवर्णन: कविता आणि माझा रशियाचा प्रवास काव्ये: अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या इतर योगदान: मराठी चित्रपटांसाठी लेखन (वैजयंता, सौख्यभरे), आयपीटीएशी संलग्नता, साम्यवादी आणि आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

**मराठी व्याकरण - अलंकारिक शब्द** अष्टपैलू – अनेक चांगले गुण असणारा अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस अक्षरशत्रू – निरक्षर माणूस, अडाणी अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य अकबरी प्रथा – चांगली प्रथा अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे अठरा विश्वे दारिद्र्य – अत्यंत दारिद्र्य अरुण्यरूदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N अडेलतट्टू – आपलाच हेका चालविणारा आग्यावेताळ – अत्यंत रागीट मनुष्य ओनामा – सुरुवात, प्रारंभ अंगठा बहाद्दूर – अशिक्षित उंबराचे फूल – अगदी दुर्मिळ वस्तू उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे होणारे व्यक्त्यव्य कळीचा नारद – कळीचा नारद 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 133 जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/ydcc-bank-recruitment-2025/
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 133 जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/ydcc-bank-recruitment-2025/

Marathi Grammar Mock Test मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 21 https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-21/
Marathi Grammar Mock Test मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 21 https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-21/

Repost from Vidarbha Academy
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा. मराठी व्याकरण https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आरोग्य विभाग परीक्षा 2025 https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B मराठी नोकरी संदर्भ https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K Daily - Free Online Test https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Learn English Grammar https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H Current Affairs | चालू घडामोडी 2025 https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v पोलीस भरती मार्गदर्शन 2025 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 MPSCExams Job Update https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I Daily Motivation Quotes https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f

स्वरादी वर्ण : स्वरांच्या सहाय्याने उच्चारले जाणारे काही विशेष चिन्हांचा समावेश स्वरादी गटात होतो. त्यात अनुस्वार, विसर्ग व अनुनासिक यांचा समावेश आहे. १) अनुस्वार (ं) : - ज्या शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्यास अनुस्वार म्हणतात. - एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार म्हणजे अनुस्वार. उदा. गंगा, घंटा, दंगल इ. (दंगल = द + अ + अनुस्वार = दं) २) विसर्ग (ः) : - विसर्गाचा उच्चार करताना त्याच्या आधी स्वर येतो. - विसर्ग म्हणजे एक प्रकारची श्वासाची झटका स्वरानंतर दिल्यासारखा उच्चार. उदा. दुःख = द् + उ + विसर्ग = दुः (इथे 'उ' स्वरानंतर श्वास सोडल्याप्रमाणे उच्चार होतो.) ३) अनुनासिक (ँ) : - ज्या शिरोबिंदूंचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो त्यास अनुनासिक म्हणतात. - उच्चारताना ध्वनी नाकावाटे बाहेर पडतो. उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये इ. अनुस्वार – विसर्ग – अनुनासिक यांतील फरक : १) अनुस्वार (ं) - शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो. - एका उच्चारावर दुसरा उच्चार स्वार झाल्यास अनुस्वार होतो. - ध्वनी पूर्णपणे नाकावाटे जात नाही, पण ओठ बंद होऊन नाद तयार होतो. - उदा. गंगा, घंटा, दंगल २) विसर्ग (ः) - स्वरानंतर श्वास झटक्यासारखा सोडला जातो. - 'हः' सारखा हलका स्वर व श्वास एकत्रितपणे उच्चारला जातो. - उच्चारताना स्वरानंतर गळ्यापासून निघणारा श्वास जाणवतो. - उदा. दुःख, दःशरथ ३) अनुनासिक (ँ) - उच्चार ओझरता किंवा नाकातून होतो. - ध्वनी नाकावाटे बाहेर पडतो. - साधारणतः अनुस्वाराच्या जागी काही शब्दांमध्ये नासिक्य ध्वनी दर्शविण्यासाठी वापरले जाते. - उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये

व्यंजनांचे प्रकार : व्यंजनांचे उच्चारप्रकार व उच्चाराच्या पद्धतीनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते – १) स्पर्श व्यंजन : - उच्चाराच्या वेळी जिभेचा किंवा ओठांचा इतर अवयवांशी स्पर्श होतो. - हे कठोर व मृदू अशा दोन गटांत विभागले जातात. (अ) कठोर स्पर्श व्यंजन – क्, ख् च्, छ ट्, ठ् त्, थ् प्, फ् (आ) मृदू स्पर्श व्यंजन – ग्, घ् ज्, झ् ड्, ढ् द्, ध् ब्, भ् (इ) अनुनासिक स्पर्श व्यंजन – ङ्, ञ्, ण्, न्, म् २) अर्धस्वर : य्, र्, ल्, व् ३) उष्म व्यंजन : श्, ष्, स्, ४) महाप्राण व्यंजन : ह् , क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ (उच्चारताना जोरदार श्वास बाहेर पडतो.) ५) स्वतंत्र व्यंजन : ळ्, क्ष, ज्ञ (क्ष व ज्ञ ही प्रत्यक्षात संयुक्त व्यंजने असून त्यांना आधुनिक व्याकरणात विशेष संयुक्त व्यंजने म्हटले जाते.) ----------------------------------- टीप : - क्ष = क् + ष - ज्ञ = ज् + ञ

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 शेवटचे ३० मिनिट त्यानंतर ऑफर बंद होईल.

🔥 स्पेशल ऑफर 🥳 संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री आज संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स जॉइन केल्यास संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री Course Lin
🔥 स्पेशल ऑफर 🥳 संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री आज संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स जॉइन केल्यास संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री Course Link : https://compact.link/YnbOF 👉🏻 फक्त पहिल्या ३० विद्यार्थ्यांना ऑफर मिळेल 👉🏻ऑफर फक्त आज रात्री 10.00 पर्यंत अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही. 🤙💯

वर्णांचे एकूण ३ प्रकार – १) स्वर : मुखावाटे ध्वनी बाहेर पडताना ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही, त्या ध्वनींना *स्वर* म्हणतात. स्वतःच अक्षर असलेले वर्ण व स्पष्ट उच्चार असलेले वर्ण म्हणजे स्वर होय. मराठी वर्णमालेत मूळ *बारा स्वर* होते, पण सद्या *चौदा स्वर* झाले आहेत. ते पुढील क्रमाने – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, अॅ, ऐ, ओ, ऑ, औ. *स्वरांचे प्रकार :* 'उच्चार' करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून स्वरांचे तीन प्रकार पडतात. ⅰ) *हस्व स्वर* – या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. उदा. अ, इ, उ, ऋ, लृ, अॅ ⅱ) *दीर्घ स्वर* – या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, ऑ, औ ⅲ) *संयुक्त स्वर* – दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. उदा. ए (अ+इ/ई), ऐ (आ+इ/ई), ओ (अ+उ/ऊ), औ (आ+उ/ऊ) *स्वरांच्या उच्चारस्थानावरून स्वरांचे दोन प्रकार पडतात :* ⅰ) *सजातीय स्वर* – एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर. उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ ⅱ) *विजातीय स्वर* – भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर. उदा. अ-इ, अ-ऊ, ई-ए, उ-ए २) नवे स्वर : सन २००९ च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधील 'अॅ' व 'ऑ' हे दोन स्वर वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. उदा. बॅट, फॅशन, बॉल, ऑफिस इ. ३) स्वरादी : अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या आधी स्वर येतो. म्हणून त्यांना *स्वरादी* म्हणतात. स्वरादीत *अं (अनुस्वार)* आणि *अः (विसर्ग)* या दोन वर्णांचा समावेश होतो. उदा. - *दंगल* या शब्दात अनुस्वाराच्या आधी 'अ' स्वर येतो. (दंगल = द + अ + अनुस्वार = दं) - *दुःख* या शब्दात विसर्गाच्या आधी 'उ' स्वर येतो. (दुःख = द् + उ + विसर्ग = दुः) *अनुस्वार (शिरोबिंदू) :* ज्या शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्यास *अनुस्वार* म्हणतात. अनुस्वार म्हणजे एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार. उदा. गंगा, घंटा इ. *अनुनासिक :* ज्या शिरोबिंदूंचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो त्यास *अनुनासिक* म्हणतात. उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये इ. ४) व्यंजने : ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी 'अ' या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते अशा वर्णांना *व्यंजने* किंवा *स्वरांत* किंवा *परवर्ण* असेही म्हणतात. अक्षर बनण्यासाठी दुसऱ्या वर्णाची मदत घेणारा वर्ण म्हणजे व्यंजन होय. मराठी वर्णमालेत एकूण *३४ व्यंजने* आहेत.

🔥 पोलीस भरती स्पेशल ऑफर 🥳 संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स फ्री Demo लेक्चर्स उपलब्ध आहेत आज फक्त ₹99/- मध्ये 🔥 Course Link : h
🔥 पोलीस भरती स्पेशल ऑफर 🥳 संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स फ्री Demo लेक्चर्स उपलब्ध आहेत आज फक्त ₹99/- मध्ये 🔥 Course Link : https://compact.link/YnbOF एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯

🚨 मराठी व्याकरण - एक शब्दाबद्दल शब्दसमूह 🎯 🔹 कृतज्ञ : उपकार जाणणारा 🔹 असंख्य / अमाप : संख्या मोजता न घेता येणारा 🔹 मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा 🔹 वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा 🔹 गुप्तहेर : गुप्त बातम्या काढणारा 🔹 विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता 🔹 दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा 🔹 कवयित्री : कविता करणारी 🔹 तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत 🔹 स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा 🔹 तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा 🔹 दानशूर : खूप दानधर्म करणारा 🔹 दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा 🔹 अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे 🔹 गुराखी : गुरे राखणारा 🔹 निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा 🔹 अंगण : घरापुढील मोकळी जागा 🔹 गवंडी : घरे बांधणारा 🔹 चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा 🔹 शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

१. वर्णविचार १) भाषा : माणुस आपल्या मनातील विचार वा कल्पना ज्याद्वारे प्रकट करतो ती भाषा होय. म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द 'भाष' या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. मराठी भाषा ही संस्कृत-प्राकृत भाषेपासून निर्माण झाली. अभिजात भाषा : देशातील ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्या पुढीलप्रमाणेः- १. तमिळ (२००४) २. संस्कृत (२००५) ३. तेलुगु (२००८) ४. कन्नड (२००८) ५. मल्याळम (२०१३) ६. ओडिया (२०१४) ७. मराठी (२०२४) ८. बंगाली (२०२४) ९. आसामी (२०२४) १०. पाली (२०२४) ११. प्राकृत (२०२४) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 'रंगनाथ पठारे समिती' नेमण्यात आली होती. २) लिपी : आवाजाच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ब्राम्ही लिपी, खरोष्ठी लिपी (गंधारी लिपी), मोडी लिपी, देवनागरी लिपी इ. प्राचीन लिपी आहे. ३) देवनागरी लिपी : मराठी भाषेसाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी किंवा बालबोध लिपी असे म्हणतात. मराठी भाषेशिवाय संस्कृत, गुजराथी, हिंदी, बंगाली व पाली या सहा भाषांची लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपीत लिहीण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. ४) मोडी लिपी : देवनागरी लिपी जलद लिहिता यावी यासाठी यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना मुरड घालून लिहिण्याची पध्दत पूर्वी प्रचलित होती तिला मोडी लिपी असे म्हणत. ५) व्याकरण : व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. इंग्रजी अभ्यासक विल्यम कॅरी यांनी 'द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज' हे मराठी व्याकरणावरील पहिले इंग्रजीतील पुस्तक लिहिले आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक लिहिले. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते. मोरो केशव दामले यांनी 'शास्त्रीय मराठी व्याकरण' हे खूप मोठे पुस्तक लिहिले. ६) वाक्य : वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाचे बोलणे होय. म्हणजेच वाक्यात एक किंवा अनेक शब्दांच्या समूच्चयाने आपण एक विचार पूर्ण करतो. ७) शब्द : अक्षरांचा समूह ठराविक क्रमाने येऊन त्यास काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्दांनाच 'पद' असेही म्हणतात. ८) अक्षरे : अक्षरे म्हणजे ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा होत. म्हणून त्यास ध्वनीचिन्हे असेही म्हणतात. अक्षरे ही पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण होत. म्हणून सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षरे म्हणतात. उदा. अ, आ, क, ख, ग. व्यंजनात स्वर मिसळल्यानंतर अक्षर तयार होते म्हणजेच व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे अक्षर होय. ९) वर्ण : आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी भाषेत मुळचे एकूण ४८ वर्ण आहेत. परंतु सन २००९ च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधील 'अ‍ॅ ' व 'ऑ' हे दोन स्वर नव्याने समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे मराठी भाषेत एकूण ५० वर्ण तयार झाले आहेत. या ५० वर्णांच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे म्हणतात. तसेच क्ष व ज्ञ यांना आधुनिक वर्णमालेत 'विशेष संयुक्त व्यंजने' म्हटल्यामुळे मराठी भाषेत एकूण वर्ण ५२ होऊ शकतात. या ५२ वर्णांतील लृ, ञ हे वर्ण लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लृ या स्वरापासून तयार झालेला मराठीतील क्लृप्ती हा एकच शब्द आहे. १०) चौदाखडी : व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात बारा स्वर व दोन स्वरादी यांची चिन्हे मिळवून आपण चौदा अक्षरे तयार करतो. त्यांना चौदाखडी म्हणतात (यापूर्वी यांस बाराखडी म्हणत). उदा. क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, के, को, कॉ, कौ, कं, कः

मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 19 https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-19/
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 19 https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-19/