en
Feedback
TAIT+CTET संघर्ष

TAIT+CTET संघर्ष

Open in Telegram
443
Subscribers
No data24 hours
-17 days
-830 days
Posts Archive
*नव शिक्षकांच्या जीवनाचा संघर्ष* आज अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस आहे. कागदपत्रे पडताळणी करताना अनेकांचे वय पाहिले तेव्हा लक्षात आले आपण सर्व अशा टप्प्यावर होतो जिथे तारण्यासाठी ही शिक्षक भरती होणे आवश्यक होते. पूर्वापार प्रचलित पद्धतीनुसार D.Ed साठी प्रवेश मिळाला की मुलगा किंवा मुलगी मास्तर/मास्तरीन झाल्यात जमा असायचे. गावातून जाता येता सर/मॅडम अशीच हाक मारली जायची. परंतु कालपरत्वे D.Ed झालेले प्रॉडक्ट बाहेर काढणाऱ्या इतक्या फॅक्टरी तयार केल्या गेल्या की प्रॉडक्शन सुरू आहे पण बाजारात तशी मागणी नाही. बर शिक्षण झाले असल्या कारणाने आणि समाज काय म्हणेल या लाजेने इतर कुठे कंपनी, दुकान किंवा कारखाना या ठिकाणी कामावर जाणेस थोडा कमी पणा वाटायचा. आज जाहिरात येईल, मी भरती होईन, मुलांना शिकवेन...अनेकांच्या दिवसाची सुरुवात या स्वप्नांनी व्हायची अन् शेवट ही याच स्वप्नांनी व्हायचा. पण त्यांचं दुर्दैव म्हणा किंवा जिल्हा परिषद शाळांप्रती शासनाची असणारी अनास्था म्हणा भरती काही लवकर होत न्हवती. पात्रता मात्र सतत बदलत राहायची. आम्ही प्रवेश घेतला तेव्हा फक्त CET होती, नंतर आली TET ती पात्र होण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि स्वप्नाच्या एक पाऊल जवळ आलो आहे असं वाटत असताना च TAIT परीक्षा आणली. अन् या घेण्याचा कालावधी २०१३ पहिली TET, त्यानंतर २०१७ मध्ये TAIT परीक्षा, भरती निघाली २०१७ मध्ये त्या भरती मध्ये निवड झालेले हजर झाले २०१९ मध्ये. पुन्हा दुसरी TAIT परीक्षा २०२२ मध्ये हजर झाली मुले २०२४ मध्ये. बर या सर्व परीक्षांची फी म्हणजे एकदम नाममात्र (फक्त शासनाच्या दृष्टीने). त्या परीक्षा देताना, त्याची फी भरताना, पुस्तके खरेदी करताना, परीक्षेसाठी परगावी जाताना प्रत्येक वेळी आई बापाच्या डोळ्यात आपला मुलगा-मुलगी मास्तर किंवा मास्तरीन झालेली दिसत होती. http://www.facebook.com/shikshakmitraa सरते शेवटी आपल्या मुलांच्या अथक प्रयत्नांना यश आले अन् आज अनेक जण आपल्या स्वप्नवत शिक्षकी पेशा मध्ये रुजू होऊन एक महिना पूर्ण झाला. अनेकांनी आपली फाटकी झोळी शिवण्यासाठी खाजगी शिकवण्या घेतल्या, काही जणांनी अगदी तुटपुंज्या पगारामध्ये खाजगी शाळेमध्ये शिकविले, अनेकांनी समाजा पासून लपवून अनेक छोटी मोठी कामे केली पण कोणी ही वाईट मार्गाला लागले नाही. कारण हीच पिढी समाजासमोर विद्यार्थ्यांसमोर आदर्श म्हणून उभी राहणार होती. काही झालं तरी हार पत्करायची नाही अनेक संकटांवर मात करून आपलं यश आपण खेचून आणायचं हे आपल्या कृतीमधून दाखविणार होती. ऑर्डर हातात पडल्यावर अनेकांच्या गालावर हसू आणि डोळ्यात आसू होते. कित्येक वर्षाचा संघर्ष थांबला होता. आपल्या आई-वडिलांना सुखाचा दिवस दाखविण्याची वेळ आली होती. नातेवाईकांचा विरोध पत्करून एखाद्या बापाने आपल्या मुलीला शिकविलं होत तिने आज त्या बापाचे पांग फेडले होते. एक नाही तर अशा अनेक यशोगाथा सज्ज होत होत्या ग्रामीण भागातील मुले तयार करण्यासाठी. आपणा सर्वांचे खूप मनापासून अभिनंदन...खूप आनंदात आजचा दिवस साजरा करूया. आपल्या खात्यावर रक्कम किती जमा झाली हे महत्वाचं नाहीये पण ३० दिवस काम करून देखील ज्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास आपल्याला झाला नाही, जिथे मान खाली घालून न जाता ताठ मानेने जगायला मिळालं, तुमच्या गावामध्ये तुमच्या माघारी बोलणारे लोक आज घरी येऊन अभिनंदन करून गेले, त्यांची तोंडे कायमची बंद झाली, एकेरी नावाने मारली जाणारी हाक आज अहो-जाओ पर्यंत आली, लोकांच्या डोळ्यांमधे असणाऱ्या कुचेष्टेची जागा आज आदराने घेतली होती या सर्वांपुढे ती रक्कम मोठी ठरत नाही. आज सुरुवात झाली आहे, उत्तरोत्तर आपण अशीच प्रगती करत राहू. एकट्याने प्रवास न करता आपण सर्व जण एकमेकांच्या सुख दुःखाचे भागीदार बनत राहू. नात्याची वीण अशीच घट्ट राहू देत. धन्यवाद...

👍

✔️पवित्र पोर्टल Conversion यादीत रयत संस्था 156 जागा भरल्या ✔️इतर संस्था 0 जागा भरल्या याचे कारण काय?

TAIT NT-D.pdf