MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 213
Subscribers
-124 hours
+157 days
+22030 days
Posts Archive
ॲप मध्ये टेस्ट सिरीज साठी ऑप्शन दिला आहे
डेमो टेस्ट मध्ये 25 प्रश्न 50 गुण आणि 30 मिनिट वेळ आहे
बुधवारी सकाळी 10 वाजता ॲप मध्ये टेस्ट 01 दिसेल
डेमो टेस्ट आणि टेस्ट 01 दोन्ही टेस्ट सर्वांना फ्री आहेत.
त्या नंतर प्रतेक बुधवार आणि शनिवार नवीन टेस्ट अपलोड होईल ज्या साठी 119 + 5 ॲप चार्जेस फी आहे.
डेमो टेस्ट मध्ये फक्त 25 प्रश्न आहेत त्या नंतर प्रतेक टेस्ट मध्ये 100 प्रश्न असतील.
100 प्रश्न असलेली टेस्ट 01 बुधवारी मिळेल ती पण फ्री मध्येच सोडवता येईल.
फ्रॉम भरणे बाकी असेल तर आत्ता ट्राय करा वेबसाईट व्यवस्थित सुरू आहे ✅
मुदतवाढ
◾️धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025
◾️ अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
◾️शेवटची तारीख 6 ऑक्टोबर...
डेमो टेस्ट ॲप मध्ये अपलोड केली आहे.
टेस्ट रविवारी 10 वाजता सुरू होईल.
रविवारी 10 ते रात्री 12 या वेळेत टेस्ट सोडवता येईल.
डेमो टेस्ट साठी पेमेंट करण्याची गरज नाही
ज्यांना टेस्ट सिरीज विकत घ्यायची आहे त्यांना सोमवारी विकत घेता येईल.
TET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ.
Error येत असेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा.
Browser बदलून पहा पेमेंट होत आहे. (गूगल क्रोम, फायर फॉक्स, मायक्रोसॉफ्ट Edge )
ब्राऊझर अपडेट आहे की नाही हे चेक करा.
आज धर्मादाय आयुक्तालय साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
तारीख वाढेल याची शक्यता कमी आहे त्यामुळे ज्यांचा फ्रॉम भरणे बाकी असेल त्यानी आजच फ्रॉम भरा
फ्रॉम भरताना शक्यतो लॅपटॉप कम्प्युटर वरच भरा पेमेंट चा प्रोब्लेम येतो.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
ॲप मध्ये अजूनही टेस्ट अपलोड झाली नाही त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिलेल्या वेळेत टेस्ट देणं हे मझ कर्तव्य होत.
काल रात्री बऱ्याच विद्यार्थ्यांना पेमेंट करताना प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मला सारखे मेसेज आणि कॉल येत होते.
टेस्ट अपलोड करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे फॉर्म वेळेत सबमिट होणे हे जास्त महत्वाचे होते त्यामुळे टेस्ट अपलोड करण्याचे काम बंद करून मेसेज आणि कॉल ला रिप्लाय देणं महत्त्वाचं वाटलं.
आत्ता मी टेस्ट चे काम करत आहे थोडे प्रश्न अपलोड करणे बाकी आहे.
टेस्ट ॲप मध्ये पूर्ण अपलोड करण्यासाठी 8 ते 12 तासांचा वेळ लागतो.
टेस्ट आजच मिळेल संध्याकाळी 6 किंवा जास्तीत जास्त 7 पर्यंत.
+1
पोलिस भरती वेळापत्रक जाहीर
जाहिराती येत आहेत.
भू कर मापक आली
पोलिस भरती वेळापत्रक जाहीर
बाकी जाहिराती पण येतीलच
एक गोष्ट लक्षात ठेवा
या महिन्यात ज्या जाहिराती येतील त्यांचा प्रामाणिक अभ्यास करून मिळेल त्या पोस्ट साठी जॉईन व्हा नंतर लवकर सरळसेवा जाहिराती येण्याची शक्यता खूप खूप कमी..
ॲप मध्ये टेस्ट 01 अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ( टेस्ट ॲप मध्ये उद्या (3 oct ला सकाळी 10 वाजता दिसेल )
टेस्ट 01 सर्वांना फ्री असेल.
टेस्ट ऑनलाईन ॲप मध्ये लॅपटॉप कॉम्पुटर वर सोडवता येईल.
टेस्ट सोडवल्या नंतर स्कोअर दिसेल कोणता प्रश्न चुकला आणि त्याचे बरोबर उत्तर काय आहे आणि त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिसेल.
एक टेस्ट कितीही वेळा सोडवता येईल.
प्रत्येक बुधवार आणि शनिवारी नवीन टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल.
प्रत्येक टेस्ट साठी TCS पॅटर्न गृप टायमर असेल.✅
परीक्षा नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात असेल तर किमान 10 टेस्ट मिळतील.
परीक्षा नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात असेल तर 15 टेस्ट मिळतील.
परीक्षा डिसेंबर महिन्यात गेली तर 18-20 टेस्ट मिळतील.
टेस्ट सिरीज फी ₹119/- राहील.
उद्याची फ्री टेस्ट सोडवा त्या नंतर वाटलं तर टेस्ट सिरीज जॉईन करा.
फक्त टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी ऑप्शन उद्या ॲप मध्ये येईल.
कोर्स साठी प्रवेश सुरू आहेत.
जॉईन करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा.
https://t.me/+dEoQVXaLNhpjMzM1
विजयादशमी आपल्याला सत्य आणि धैर्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देते. आज एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करा. आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनाने प्रत्येक परीक्षेवर विजय मिळवा.
तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी खूप खूप शुभेच्छा! शुभ दसरा!
English Vocabulary Day 16.pdf1.13 MB
5_6260005831392106154.pdf
भूमी अभिलेख विभागात अर्ज करण्याची प्रक्रिया
1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर
परीक्षा
13 व14 नोव्हेंबर ला परीक्षा आहे
पेपर IBPS कंपनी घेणार आहे
मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची लिंक :- https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
Link उद्या सुरू होईल.
सविस्तर जाहिरात उद्या येईल.
https://t.me/ibps_tcs_pattern
आदिवासी विकास विभाग पेपर नंतर आलेला रिप्लाय
आणि आदिवासी विकास विभाग मध्ये 38 विद्यार्थी सिलेक्ट आहेत आणि कोर्स मध्ये बाकी क्लासेस सारखे खूप विद्यार्थी जॉईन नव्हते
नवीन आणि छोटा क्लास आहे.
तुम्ही स्वतः स्टडी मटेरियल pdf नोट्स व्हिडीओ लेक्चर टेस्ट सिरीज पाहूनच कोर्स विकत घ्या. डेमो आणि एक दिवस फ्री ट्रायल आहे.
धर्मादाय आयुक्तालय कोर्स साठी उद्या सकाळी 7 नंतर ऍडमिशन घेऊ शकता.
आणि टेस्ट सिरीज परवा 2 oct पासून जॉईन करू शकता.
Test Series आणि कोर्स साठी खूप मेसेज येत आहेत, आपण आधी Teachmint ॲप वापरत होतो.
Teachmint ॲप मध्ये लेक्चर मध्ये आवाज ब्रेक होत होता आणि टेस्ट साठी नवीन पॅटर्न गृप टायमर असा ऑप्शन नव्हता म्हणून आपण नवीन ॲप बनवले आहे.
थोडे technical काम बाकी आहे आज रात्री ते पूर्ण होईल अंदाजे 11 वाजता त्या नंतर डाऊनलोड साठी लिंक मिळेल.
उद्या सकाळी 7 पासून नवीन ॲप मध्ये कोर्स जॉईन करता येईल
ज्यांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांना फक्त टेस्ट सिरीज 2 oct ला जॉईन करता येईल.
आधी कोर्स कंटेंट पाहू शकता डेमो नोट्स, लेक्चर टेस्ट सिरीज आणि 1 दिवस ट्रायल घेऊ शकता.
नंतर कोर्स फी भरू शकता.
Select the most appropriate tense form to fill in the blank.
The team ____ their final game of the tournament last weekend.
1. wins
2. winning
3. win
4. won
Exam Guide Sagar
योग्य उत्तर आहे: 4. won
पूर्ण वाक्य: The team won their final game of the tournament last weekend.
(टीमने त्यांच्या स्पर्धेतील अंतिम सामना गेल्या आठवड्यात जिंकला.)
योग्य उत्तराचे स्पष्टीकरण (Explanation of the Correct Answer)
Won हे क्रियापद "to win" (जिंकणे) चे साधे भूतकाळी (Simple Past Tense) रूप आहे.
वाक्यात "last weekend" (गेल्या आठवड्यात) हा भूतकाळातील वेळेचा स्पष्ट निर्देशक (time marker) आहे. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी पूर्ण झाली असते, तेव्हा आपण साध्या भूतकाळाचा वापर करतो. म्हणूनच, "won" हा सर्वात योग्य पर्याय आहे.
Exam Guide Sagar
प्रत्येक पर्यायाचे विश्लेषण (Analysis of Each Option)
1) wins
काळ: साधे वर्तमानकाळ (Simple Present Tense, third-person singular).
वापर: हे क्रियापद सवयीने, वारंवार किंवा नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी वापरले जाते.
उदाहरण: The team usually wins at home. (टीम सहसा घरी जिंकते.)
अयोग्य का: "last weekend" (गेल्या आठवड्यात) या भूतकाळातील वेळेसाठी ते जुळत नाही.
2) winning
रूप: वर्तमान कृदंत (Present Participle).
वापर: हे रूप मुख्य क्रियापद म्हणून वापरण्यासाठी यापूर्वी सहाय्यकारी क्रियापदाची (is, was, were, etc.) गरज असते.
उदाहरण: The team was winning when I left. (मी निघालो तेव्हा टीम जिंकत होती.)
अयोग्य का: या वाक्यात कोणतेही सहाय्यकारी क्रियापद नाही, त्यामुळे ते एकटे मुख्य क्रियापद म्हणून काम करू शकत नाही.
3) win
काळ: साधे वर्तमानकाळ (Simple Present Tense, base form).
वापर: हे क्रियापद अनेकवचनी कर्त्यांसाठी किंवा क्रियापदाचे मूळ रूप म्हणून वापरले जाते.
उदाहरण: They often win their games. (ते त्यांचे सामने वारंवार जिंकतात.)
अयोग्य का: "last weekend" (गेल्या आठवड्यात) या भूतकाळातील वेळेसाठी ते जुळत नाही.
4) won
काळ: साधे भूतकाळ (Simple Past Tense).
वापर: हे क्रियापद भूतकाळात पूर्ण झालेल्या कृतीसाठी वापरले जाते, खासकरून जेव्हा वेळ नमूद केलेला असतो.
उदाहरण: The team won two years ago. (टीम दोन वर्षांपूर्वी जिंकली.)
योग्य का: हे "last weekend" (गेल्या आठवड्यात) या वेळेनुसार पूर्णपणे योग्य आहे.
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern
Select the most appropriate tense form to fill in the blank.
The team ____ their final game of the tournament last weekend. TCS पॅटर्न English Exam Guide Sagar
महाराष्ट्रातील तापमानातील फरकांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
1. अंतर्गत भागांच्या तुलनेत किनारी प्रदेशांमध्ये तापमानात कमी फरक आढळतो.
2. उन्हाळ्यात नागपूरमध्ये उच्च तापमान असते.
3. महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान सर्व प्रदेशांमध्ये समान असते.
a) केवळ 1
b) केवळ 2 आणि 3
c) 1, 2 आणि 3
d) केवळ 1 आणि 2
Exam Guide Sagarउत्तरासाठी खालील विधानांचे विश्लेषण करूया: विधानांचे विश्लेषण 1) अंतर्गत भागांच्या तुलनेत किनारी प्रदेशांमध्ये तापमानात कमी फरक आढळतो. * सत्य (True): मुंबई आणि कोकणासारख्या किनारी प्रदेशांमध्ये समुद्राच्या सान्निध्यामुळे तापमान वर्षभर साधारणपणे स्थिर राहते (उष्णता समशीतोष्णता - moderating effect of the sea). याउलट, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या अंतर्गत (inland) भागांमध्ये दिवसाचे व वार्षिक तापमान कक्षेत (तापमानातील फरकात) मोठा फरक आढळतो. 2) उन्हाळ्यात नागपूरमध्ये उच्च तापमान असते. * सत्य (True): नागपूर हे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात आणि अंतर्गत भागात (inland) येते. येथे समुद्राचा समशीतोष्ण परिणाम जाणवत नाही. उन्हाळ्यात नागपूरचे तापमान अनेकदा सर्वाधिक असते आणि ते 45°C पर्यंत किंवा त्याहून अधिक देखील पोहोचू शकते, ज्यामुळे ते देशातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक बनते. 3) महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान सर्व प्रदेशांमध्ये समान असते. * असत्य (False): महाराष्ट्रातील हिवाळ्यातील तापमान सर्व प्रदेशांमध्ये समान नसते. दख्खनचे पठार (उदा. पुणे, छत्रपती संभाजीनगर) आणि विदर्भ (उदा. नागपूर) या अंतर्गत प्रदेशांमध्ये किनारी प्रदेशांच्या (उदा. मुंबई, रत्नागिरी) तुलनेत हिवाळ्यात अधिक थंडी असते आणि तापमान लक्षणीयरीत्या कमी होते. किनारी भागांमध्ये थंडी कमी असते. निष्कर्ष फक्त विधान 1 आणि विधान 2 सत्य आहेत. म्हणून, योग्य पर्याय d) केवळ 1 आणि 2 आहे. उत्तर: d) केवळ 1 आणि 2
Exam Guide Sagarhttps://t.me/ibps_tcs_pattern
