en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्य
+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे.

दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे केंद्रावर दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर, 2021 कालावधीत आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उत्तर तालिकेवरील हरकती केवळ विहित ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.