JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 982
Subscribers
-224 hours
-207 days
-6230 days
Posts Archive
3 981
महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी/ अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज कालावधी - 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2025
3 981
♦️ प्रभू श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती..
श्रीराम -जगातील सर्वात उंच मूर्ती
◾️एकूण उंची - 77 फूट उंच
◾️चौथरा 12 फूट , मुर्ती -65 फूट उंच
◾️धातू - कांस्य
◾️ठिकाण : श्री संस्थान गोकर्ण पतंगाळी जीवोत्तम मठ, गोवा
◾️मूर्ती मठाच्या 550 व्या वर्धापनदिन सणाच्या निमित्ताने बांधली गेली.
◾️शिल्पकार - राम सुतार
◾️मूर्तीच्या सोबत "रामायण थीम पार्क" चेही उद्घाटन
3 981
INS तारागिरी
» भारतीय नौदलाचे नवीन स्टेलथ फ्रिगेट (जहाज)
» नौदलाकडे सुपूर्द - 28 नोव्हेंबर 2025
» ठिकाण - माझगाव डॉक, मुंबई
» प्रकार - निलगिरी क्लास
» प्रकल्प - प्रोजेक्ट-17अल्फा (Project-17A)
» निर्माता - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई.
» डिझाइन - वारशिप डिझाइन ब्युरो (WDB)
Join » https://t.me/WartmanNirnay
3 981
♦️भारत देशाने 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत श्रीलंकेला 'दितवा' चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून सावरण्यासाठी मदत केली आहे.
3 981
✡️ फिफा अंडर-१७ विश्वचषक २०२५ 🏆
◾विजेता= पोर्तुगाल🥇
◾उपविजेते =ऑस्ट्रिया🥈
◾तिसरे स्थान= इटली🥉
◾संस्करण = 20 वे
◾स्पर्धेचा कालावधी =२ ते २७ नोव्हें २०२५
◾यजमान देश = कतार
◾सहभागी संघ = ४८ संघ
◾स्पर्धेचे स्वरूप = हे स्वरूप वार्षिक असेल आणि २०२५ ही स्पर्धेची पहिली आवृत्ती असेल
🔰सर्वोत्तम खेळाडू= मॅटियस माइड
🔰सर्वोत्तम गोलकीपर= रोमारियो कुन्हा
🔰फेअर प्ले पुरस्कार = झेक प्रजासत्ताक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
https://t.me/WartmanNirnay
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 981
श्रीलंकेला चक्रीवादळाचा खूप मोठा तडाका बसला आहे, 'दित्वा' या चक्रीवादळाने कहरच केलाय, आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.. 💐🙏
=================
🍀भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी कोणते ऑपरेशन राबवले?
उत्तर -ऑपरेशन सागर बंधु
चालू घडामोडी -अत्यंत महत्त्वाचे..✍📕
====================
3 981
56 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, गोवा..
🏆IFFI2025 मधील सुवर्ण मयूर – सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार ‘Skin of Youth’ या चित्रपटाला प्रदान!
दिग्दर्शिक -अॅश मेफेअर
* चित्रपटाचे नाव लक्षात ठेवा.. 👍
चालू घडामोडी विशेष...✍
3 981
🔰आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विकसित होत असून ती भारताची पहिली एकत्रित आर्थिक सिटी बनणार आहे.
🔹भारतातील प्रथम: देशातील पहिली एकात्मिक वित्तीय नगरी म्हणून विकसित.
🔸मुख्य केंद्र: सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँका (उदा. SBI, PNB) आणि वित्तीय संस्था (उदा. LIC, NABARD) यांचे एकत्रीकरण.
🔹संस्था सहभाग: १५+ राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्था एकाच ठिकाणी.
🔸नोकरी: ६,५००+ थेट नोकऱ्यांची निर्मिती अपेक्षित.
🔹विकास: 'ग्रीनफिल्ड' (सुनियोजित) राजधानी शहर; जागतिक मास्टर प्लॅन.
🔸लक्ष्य: कृषी, अन्न प्रक्रिया, आणि बागायती क्षेत्राला सक्रिय पतपुरवठा करणे.
3 981
जीवशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या व्याख्या (Definitions in Biology)
🔑 मूलभूत व्याख्या
1. पेशी (Cell) – जीवनाची संरचनात्मक व कार्यात्मक एकक.
2. जनुक (Gene) – DNA चा तो भाग जो प्रथिन किंवा कार्यशील RNA साठी संकेत देतो.
3. ऊतक (Tissue) – समान रचना व कार्य करणाऱ्या पेशींचा समूह.
4. अवयव (Organ) – विविध ऊतक मिळून विशिष्ट कार्य करणारी रचना.
5. समस्थिति (Homeostasis) – बाह्य बदल असूनही शरीरातील अंतर्गत स्थिरता राखण्याची क्षमता.
6. चयापचय (Metabolism) – शरीरातील सर्व रासायनिक क्रिया (उपचय + अपचय) यांची एकत्रित संज्ञा.
7. एन्झाइम (Enzyme) – पेशीतील रासायनिक अभिक्रिया वेगवान करणारे जैव उत्प्रेरक.
🧬 आनुवंशिकी व उत्क्रांती
8. गुणसूत्र (Chromosome) – DNA व प्रथिनांनी बनलेली, आनुवंशिक माहिती वाहणारी तंतूसदृश रचना.
9. उत्परिवर्तन (Mutation) – DNA मधील अचानक, कायमस्वरूपी बदल.
10. नैसर्गिक निवड (Natural Selection) – पर्यावरणाशी जुळवून घेतलेले जीव टिकतात व प्रजनन करतात ही प्रक्रिया.
11. उत्क्रांती (Evolution) – अनेक पिढ्यांतून जीवसृष्टीत होणारा क्रमिक बदल.
12. प्रजाती (Species) – समान गुणधर्म असलेले व परस्पर संयोगाने सुपीक संतती निर्माण करणारे जीवसमूह.
🌱 वनस्पती शास्त्र
13. प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) – हरितद्रव्ययुक्त वनस्पती प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेत (ग्लुकोज) रूपांतरित करतात ती प्रक्रिया.
14. वाष्पोत्सर्जन (Transpiration) – वनस्पतीच्या पानांमधून वायुमध्ये होणारा पाण्याचा वाफ स्वरूपातील उत्सर्जन.
15. परागण (Pollination) – फुलातील केसरकोशातून परागकणांचा स्त्री-केसराच्या किंजपुटापर्यंत होणारा प्रवास.
16. फलन (Fertilization) – नर व मादी गॅमेट्स यांचे संयोग होऊन जायगोट तयार होण्याची प्रक्रिया.
17. प्रसरण (Osmosis) – अर्धपारगम्य पडद्याद्वारे विरल द्रावणातून सांद्र द्रावणाकडे द्रावकाचा प्रवास.
🧍 प्राणीशास्त्र / मानवी शरीरशास्त्र
18. पचन (Digestion) – अन्नातील गुंतागुंतीचे घटक साध्या व शोषणयोग्य रूपात बदलण्याची प्रक्रिया.
19. श्वसन (Respiration) – ग्लुकोजपासून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया (वायवीय / अवायवीय).
20. प्रतिरोधक क्षमता (Immunity) – शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता.
21. स्रावक (Hormone) – अंतःस्रावी ग्रंथींतून स्रवणारा रासायनिक दूत जो शारीरिक कार्य नियंत्रित करतो.
22. प्रतिवर्त क्रिया (Reflex Action) – अचानक, अविवेकपूर्ण व आपोआप होणारी प्रतिसाद क्रिया.
23. स्नायु पेशी (Neuron) – मज्जासंस्थेचे संरचनात्मक व कार्यात्मक एकक.
24. रक्तगट (Blood Group) – रक्तातील प्रतिजनांच्या उपस्थितीवर आधारित रक्ताचे वर्गीकरण (ABO व Rh प्रणाली).
3 981
🌿 वनस्पतींचे वर्गीकरण
1) वर्गीकरणाचे आधार
• आकार, आकृती, रचना यावर आधारित.
• पुनरुत्पादनाची पद्धत.
• ऊतकांची रचना.
• उत्क्रांतीसंबंध (Phylogeny).
• DNA/आण्विक पुरावे (Modern APG system).
2) वनस्पती राज्याचे मुख्य विभाग
(A) Thallophyta (थॅलॉफायटा)
• शरीर मुळ, खोड, पाने यांमध्ये विभाजित नसते.
• जलावरणात वाढ मुख्यतः.
• वाहक ऊतक नसतात.
• तीन प्रमुख गट: Algae, Fungi, Lichen.
• उदाहरणे: स्पायरो gyra, ब्राउन algae, यीस्ट, मशरूम.
(B) Bryophyta (ब्रायॉफायटा) – “वनस्पतींचे उभयचर”
• पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे वाढ.
• वाहक ऊतक अनुपस्थित.
• शरीर साधे, अधिवृक्ष (gametophyte) प्रबळ.
• उदाहरणे: Marchantia, Funaria (mosses).
(C) Pteridophyta (प्टेरिडॉफायटा)
• पहिल्या खऱ्या वाहक ऊतक असलेल्या वनस्पती.
• बीज तयार होत नाही; बीजुक (spores) तयार होतात.
• Sporophyte प्रमुख अवस्था.
• उदाहरणे: Ferns, Lycopodium, Selaginella.
(D) Gymnosperms (जिम्नोस्पर्म)
• बीज उघडे (नग्न) असते, फळात बंद नसते.
• मोठी, दीर्घायुषी झाडे.
• वाहक ऊतक उत्तम विकसित.
• उदाहरणे: Cycas, Pinus, Gnetum.
(E) Angiosperms (ॲन्जिओस्पर्म) – फुलझाडे
• बीज फळामध्ये बंद असते.
• सर्वात विकसित व सर्वाधिक आढळणारा गट.
• फुले, फळे, बीजाची निर्मिती.
• दोन उपगट:
• Monocots (एकबीजपत्री): एक बीजपत्र, समांतर शिरा, रेशेदार मुळे (तांदूळ, गहू).
• Dicots (द्विबीजपत्री): दोन बीजपत्र, जाळीदार शिरा, मुख्य मुळ (आंबा, गुलाब).
3) वर्गीकरणाच्या आधुनिक प्रणाली
• Linnaeus: कृत्रिम प्रणाली (फुलांवर आधारित).
• Bentham & Hooker: नैसर्गिक पद्धत.
• Engler & Prantl: उत्क्रांतीवर आधारित.
• APG System: DNA/अनुवंशिकीवर आधारित आधुनिक पद्धत.
4) आर्थिक महत्त्व (Points)
• अन्न: तांदूळ, गहू, डाळी.
• औषधी: तुळस, आले, अश्वगंधा.
• तंतू: कापूस, ज्यूट.
• लाकूड: साग, देवदार.
• औद्योगिक: चहा, कॉफी, रबर.
• सौंदर्यवर्धक: गुलाब, कमळ.
3 981
हायड्रोजनचे समस्थानिक – मुख्य मुद्दे (Points):
1️⃣ हायड्रोजनचे तीन समस्थानिक आहेत – प्रोटियम, ड्युटेरियम आणि ट्रिटियम.
2️⃣ तिन्हीमध्ये १ प्रोटॉन आणि १ इलेक्ट्रॉन असतो.
3️⃣ फरक फक्त न्युट्रॉनांच्या संख्येत असतो.
4️⃣ प्रोटियम (¹H) – 0 न्युट्रॉन, सर्वाधिक प्रमाणात (~99.98%), स्थिर.
5️⃣ ड्युटेरियम (²H किंवा D) – 1 न्युट्रॉन, स्थिर, हेवी वॉटर (D₂O) मध्ये आढळतो.
6️⃣ ट्रिटियम (³H किंवा T) – 2 न्युट्रॉन, रेडिओधर्मी (Radioactive), अर्धायुष्य ~12.3 वर्षे.
7️⃣ सर्वांचे रासायनिक गुणधर्म समान, पण भौतिक गुणधर्म वेगळे असतात.
8️⃣ ट्रिटियम बीटा किरणोत्सर्ग करते.
9️⃣ ड्युटेरियम ऑक्साईड (D₂O) अणुभट्टीत न्युट्रॉन मंदक म्हणून वापरले जाते.
🔟 हायड्रोजनचे हे समस्थानिक अणू संशोधन आणि ऊर्जा निर्मिती मध्ये उपयुक्त आहेत.
3 981
✅ सर्व व्हिटॅमिन्स – एकत्र (Vitamin A to K)
1) Vitamin A (Retinol)
कार्य:
• दृष्टीसाठी आवश्यक
• रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
• त्वचा व केस निरोगी ठेवते
अभाव:
• रात्रांधळेपणा
• कोरडी त्वचा
स्रोत:
• गाजर, पपई, टोमॅटो
• लोणी, अंडी, दूध
2) Vitamin B-Complex
एकूण 8 प्रकार → B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12
B1 – Thiamine
• कार्य: नर्व्हस सिस्टीम, ऊर्जा
• अभाव: बेरीबेरी
• स्रोत: धान्य, कडधान्य
B2 – Riboflavin
• कार्य: त्वचा, डोळे
• अभाव: चिरा, ओठ फुटणे
• स्रोत: दूध, अंडी
B3 – Niacin
• कार्य: ऊर्जा मेटाबॉलिझम
• अभाव: Pellagra (3 D’s — Dermatitis, Diarrhoea, Dementia)
• स्रोत: मांस, शेंगदाणे
B5 – Pantothenic Acid
• कार्य: हार्मोन निर्मिती
• स्रोत: जवळजवळ सर्व अन्न
B6 – Pyridoxine
• कार्य: हिमोग्लोबिन
• अभाव: रक्तक्षय
• स्रोत: केळी, धान्य
B7 – Biotin
• कार्य: केस, नखं
• स्रोत: अंडी, शेंगदाणे
B9 – Folic Acid
• कार्य: गर्भविकास, RBC
• अभाव: मेगालोब्लास्टिक अॅनिमिया
• स्रोत: हिरव्या पालेभाज्या
B12 – Cobalamin
• कार्य: नर्व्हस सिस्टीम
• अभाव: Pernicious anemia
• स्रोत: मांस, दूध, अंडी
3) Vitamin C (Ascorbic Acid)
कार्य:
• रोगप्रतिकारक शक्तीसाठी
• जखम भरून येणे
• लोह शोषण वाढवते
अभाव:
• स्कर्व्ही (हात-पाय सूज, रक्तस्राव)
स्रोत:
• लिंबू, संत्रे, अमरूद, आवळा
4) Vitamin D
कार्य:
• हाडांसाठी (कॅल्शियम शोषण)
अभाव:
• मुलांमध्ये रिकेट्स
• प्रौढांमध्ये ऑस्टीओमलेशिया
स्रोत:
• सूर्यप्रकाश
• दूध, अंडी
5) Vitamin E (Tocopherol)
कार्य:
• अँटीऑक्सिडेंट
• त्वचा आणि प्रजनन आरोग्य
स्रोत:
• बदाम, सूर्यफूल तेल
अभाव:
• स्नायू कमजोरी
6) Vitamin K
कार्य:
• रक्त गोठवणे (Blood clotting)
अभाव:
• रक्तस्राव थांबत नाही
स्रोत:
• पालक, कोबी, ब्रोकली
3 981
🧬 व्हिटॅमिन A (Vitamin A)
🔹 वैज्ञानिक नाव:
रेटिनॉल (Retinol)
🔹 स्वरूप:
हे चरबीत विरघळणारे (Fat-soluble) व्हिटॅमिन आहे.
🔹 मुख्य कार्ये (Functions):
1. दृष्टीसाठी आवश्यक — डोळ्यांच्या रेटिनामधील रॉड पेशींमध्ये र्होडॉप्सिन तयार करण्यासाठी आवश्यक.
2. त्वचा आणि श्लेष्मल झिल्लींचे आरोग्य टिकवते.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
4. वाढ आणि हाडांची निर्मिती यासाठी मदत करते.
🔹 मुख्य स्त्रोत (Sources):
प्राणिजन स्त्रोत वनस्पतीजन स्त्रोत
दूध, लोणी, अंडी, मासे तेल गाजर, पपई, टोमॅटो, भोपळा, हिरव्या पालेभाज्या
🌿 वनस्पतीजन अन्नामधील बीटा-कॅरोटीन (β-carotene) हे व्हिटॅमिन A चे पूर्वरूप आहे.
🔹 कमतरतेमुळे होणारे आजार (Deficiency Diseases):
1. रातांधळेपणा (Night Blindness) — रात्री दिसण्यात अडचण.
2. झेरोफ्थाल्मिया (Xerophthalmia) — डोळ्यांची कोरडेपणा व नुकसान.
3. त्वचेचा कोरडेपणा (Dry Skin)
4. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
🔹 अति सेवनाचे दुष्परिणाम (Excess Intake):
• डोकेदुखी, मळमळ, त्वचेवर सूज, यकृताचे नुकसान (Hypervitaminosis A).
🧠 लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक:
A = “Aankh” (डोळे)
👉 म्हणजेच डोळ्यांचे व्हिटॅमिन = Vitamin A
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
