SHIVSHABD | शिवशब्द
Open in Telegram
"शिवशब्द" हा एक साहित्यिक मंच आहे, जिथे मी स्वतःच्या कविता व इतर साहित्य शेअर करतो, तसेच नवोदित लेखकांचेे लेखन प्रमोट करतो. जर तुमच्याकडे उत्तम साहित्य असेल, तर येथे तुमच्या शब्दांना स्थान मिळू शकते. Founder @Shiv_gond7
Show more1 125
Subscribers
No data24 hours
-37 days
-1730 days
Posts Archive
1 125
नमस्कार मी नवोदित कवी शिवशंकर सूर्यकांत गोंड, हा माझा प्रथम प्रयास आहे आणि याला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे, कविता आवडल्यास like आणि comment करून तुमचा आशीर्वाद द्या 🙏🏻❤️😊
1 125
श्रीकृष्ण कहते है..जाने दो जिसको जहा जाना है पार्थ ,मांगे हुए प्रेम को प्रेम नही भिख कहते है..!
Follow me on instagram:-@rutuja_writes1203
1 125
राम भजावा राम स्मरावा
राम मनात वसावा राम जागावा
राम नामात जीव सुखावा
राम जगण्यात असावा ||
राम नाम ह्रदयात वसावे
राम नामात हे मन रमावे
राम राम नित्य गावे
राममय जीवन व्हावे||
राम मार्गाचा करावा स्विकार
राम गुणांनी द्यावा आकार
राम गुणांनी होईल जीवन साकार
राम जगावा,राम नामाचा घ्यावा आधार||
गजानन दशरथ पोटे
अकोला
1 125
ओशट रात्र,
वषट प्राण
तिन्ही त्रिकाळ
उघडे कान
उघड्या कानात
उजाड वारा
दोन्ही डोळ्यात
दोन गारा
या गारा
वेचील कोण?
....आता वाजले
फक्त दोन...
म्हातारीची
लांब बोटे
काय झडली?
गेली कोठे?
पावसा पावसा
पड पड
दार लावून
रड रड
: विंदा करंदीकर
@shivshabd
1 125
आयुष्यात गरजा कमी ठेवल्या की पुढे येणार दुःखं आपोआपच वजा होतं जात फरक इतकाच असतो की कोणी स्वतःच्या गरजा पूर्ण करत करत मरत असतो तर कोणी त्या अपुऱ्या राहिल्या आहेत म्हणून शेवटपर्यंत जगत असतो। प्रत्येकानं कसं जगावं हा ज्यांच्या त्यांच्या प्रश्न आहे मात्र आपण त्यातून काय शोधावं यात सर्व जीवनाचं सुखं लपलेलं आहे,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke1 125
राहिले रे अजून श्वास किती
जीवना,ही तुझी मिजास किती
आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती ?
मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती
दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?
ओळखीचे कुणीतरी गेले..
ओळखीचा इथे सुवास किती
हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?
सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती
सुरेश भट
1 125
सांग देवा
देवा देवा कोणाचा रे तू
सांग सांग कोणाला पावतो तू ||
तुझ्यावर खर्च करणारे मानतात
आहेस खास त्यांचा तू ||
तुला देवा लोकांनी वाटून घेतलं
गरीब,सामान्य जनांना तुझ्या
दर्शनासाठी ताटकळत ठेवलं
तुझ्या दर्शनासाठी खास बोर्ड लावलं
पैशावाल्यांना व्ही.आय.पी तू केलं||
सामान्य म्हणतात तू भावाचा भुकेला
धनवानांनी तुला नवसाचा केला ||
तुला काय देवू आम्ही सांग देवा
आमच्याकडे आहे तूच दिलेला ठेवा ||
तू तर आमच्या मनातच वसतो
चांगले कर्म करणारा फक्त नाव तुझे घेतो ||
तुझ्या नावाचा काहीजण घेतात गैर फायदा
खोटा मुखवटा लावून भंग करतात तुझाच कायदा||
गजानन दशरथ पोटे
अकोला
1 125
Shivshabd या instagram page ला follow करा. एकदम उत्तम रचनेचा कविता,गझल व चारोळी असेल.❤️🪴📚✍
1 125
उगाच प्रेमाचा देखावा, पण का? 🦢
#marathicharoli #marathikavita #gazal #instatrend
#InstaPoetry #shayari #marathikavya #ghibli
https://www.instagram.com/share/reel/_5mX4QCSY
1 125
निःपक्ष काम करण्याचा पूर्ण पणे आम्ही प्रयत्न केला आहे. काही चूक झाली असेल तर क्षमस्व. 🙏😊🌸🪴📚
1 125
शब्द शस्त्र
तू असताना गंध दरवळतो,
शब्द न बोलताही अर्थ खुलतो.
हळव्या स्पर्शाने मन पाझरतं,
तुझ्या चाहुलीने जग मोहून जातं.
तू हासताना फूलही हसते,
नजरेत तुझ्या चांदणी वसते.
केसातल्या गंधाचा भास होतो,
स्वप्नांत तुझाच प्रकाश होतो.
तू रात्रीच्या ताऱ्यांची शान,
सांग, कशी जिंकतेस मनाची जान?
सावलीसारखी साथ देत राहावी,
पावलोपावली सोबत असावी.
तू नभाची सावली, तू चांदण्याची शाल,
तू पावसाची सर, तू गाण्याचा ताल.
तू नसताना क्षणही विरसतो,
हृदय माझं मग हळवं होतो.
कवी : अतुल दत्तात्रय राखडे
📍 कविता क्रमांक ०१/२०
गुण ९.५/१०
@shivshabd
1 125
बाप.....❤️
धावपळ, दगदग त्याची असते जगापल्याडं त्याची ओढ, काम, घर लेकरांसाठी गोडं..
नसतो रिकामा कधी तो हिंडतो बेभाणं घर सुखी ठेवण्या त्याणं घेतलीयं आणं..
जगतो हसत हसत तो इसरून काळजाचे घाव घरासाठी मरमर करतो वेगळी ना त्याची धाव..
किती ऐकून घेतो जगी खातो लय खस्ता प्रवास एका बापाचा नाही रे गड्या सस्ता..
माण वर करून जगण्या स्वाभिमान नाही गमावतं बाप नाव विश्वातलं एका कवितेत नाही मावतं एका कवितेत नाही मावतं.
कवी : माधव कुदळे.
📍 कविता क्रमांक ०२/१०
गुण ९.२५/१०
@shivshabd
