en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 136
Subscribers
-324 hours
-127 days
-4430 days
Posts Archive
CMO Maharashtra Tweets: संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य यंत्रणा सज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एल निनो प्रभावाच्या परिणामांवरील उपाययोजनांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी सर्व विभागांनी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह ‘आयओडी’ विकसित झाल्यास एल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2015 मध्ये पावसाळा संपल्यानंतर राज्यातील पाणीसाठा केवळ 45% होता; मात्र सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तितका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास राज्याला या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करता येईल. 2015 मधील एल निनोच्या कालावधीतील अनुभवावरून, 2018 या वर्षी उपाययोजना केल्यामुळे पिके वाचविता आली. एल निनोच्या कालावधीत पावसातील अनियमिततेमुळे विशेषतः मराठवाड्यात मोठा परिणाम दिसून आला होता. दोन पावसाच्या सरींमध्ये दीर्घ खंड पडल्यास पिकांवर ताण येतो, मात्र संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिकांचे नुकसान कमी करता येते. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने व मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात यावीत. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे कमी पैशात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. कमी पावसाच्या परिस्थितीतही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी हीच साधने प्रभावी ठरणार असून, 'व्हीबी-जी राम जी योजने'तून होणारी जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच 'व्हीबी-जी राम जी योजने'मधून जास्तीत जास्त कामे मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यातील पर्जन्यमान 90% कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत नुकसान कमी करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात यावी. 'व्हीबी-जी राम जी योजने'अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचे, तसेच पिण्याच्या पाण्याबाबत केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून नियोजन करावे. पावसातील संभाव्य घट लक्षात घेऊन पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा काटेकोर वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावी. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्यात. एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. खतांच्या उपलब्धतेबाबत तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी. ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीशी खत वितरण जोडून पारदर्शकता वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासणी यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ElNino

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Effective Planning To Mitigate El Niño Impact Chaired a very important review meeting regarding the measures to address the impacts of the El Niño effect at Sahyadri Guest House in Mumbai, today. Directed that, in light of potential El Niño, the impact be mitigated through advance preparedness, effective implementation, and strong coordination, with all departments undertaking immediate measures. Emphasised accelerating water conservation projects, ensuring proper water management, and prioritising the repair and revival of old water sources. According to the Indian Meteorological Department, El Niño is expected to have its maximum impact in August and September, with below-average monsoon rainfall forecast. A positive Indian Ocean Dipole (IOD) could partly offset the El Nino's impact. Directed that projects under the Jalyukt Shivar Yojana and 'Galmukt Dharan, Galyukt Shivar' schemes be completed urgently and on a large scale. Instructed the finance department to release funds immediately and urged priority for the repair of old water structures, as they provide high storage capacity at a lower cost. Directed to form a task force to monitor the quality of works under the “VB-G RAM G” and to maximise its benefits. Emphasised that water planning should account not just for the current year but also for the following summer, stressing the need for strict water usage and storage. Directed that local task forces comprising District Collectors, irrigation officials, and representatives of local self-government bodies be established to ensure water conservation, implement supplementary measures, and promote disciplined water usage and storage. Minister Dattatray Bharane ji, MoS Adv. Ashish Jaiswal and other senior officials were present. #Maharashtra #ElNino https://x.com/Dev_Fadnavis/status/2046258413429301557?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी विकसित करण्यात आलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन केले. https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून आता ✅ ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा ✅ ऑनलाईन कागदपत्रांची तत्काळ पडताळणी ✅ ८ तासांत अर्थसहाय्य ✅ अर्ज स्थितीचे WhatsApp/SMS द्वारे अपडेट मिळणार आहे. #Maharashtra #CMReliefFund

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the 'Viksit Maharashtra 2047' Vision Management Regulatory Board. Minister Mangal Prabhat Lodha, Minister Atul Save, Minister Nitesh Rane, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'विकसित महाराष्ट्र 2047' व्हिजन मॅनेजमेंट नियामक मंडळाची आढावा बैठक. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'विकसित महाराष्ट्र 2047' विजन मैनेजमेंट नियामक मंडल की समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्य मंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑 2pm | 20-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २ वा. | २०-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #VisionMaharashtra

Full_Speech_भाजपाचे_उमेदवार_अक्षय_कर्डिले_यांच्यासाठी_प्रचार_सभा.mp486.47 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🪷 223-राहुरी विधानसभा पोटनिवडणूक भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी 'प्रचार सभा' 🕗 रा. ८.०६ वा. | २०-४-२०२६📍अहिल्यानगर. #Maharashtra #Rahuri #ByElection https://www.youtube.com/live/axSQX01IY6c?si=obcduTugHecJoyYt https://www.facebook.com/100044197187974/videos/1279738223657873 https://x.com/Dev_Fadnavis/status/2046236678617170039?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE|By-election| भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी प्रचार सभा| अहिल्यानगर https://www.youtube.com/live/axSQX01IY6c?si=4mTOTpCmaGDpIxS4

photo content

photo content

photo content

🔸CM Devendra Fadnavis arrives at Shirdi, Ahilyanagar. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी, अहिल्यानगर येथे आगमन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका शिर्डी, अहिल्यानगर में आगमन। 🕕 6.10pm | 20-4-2026📍Shirdi, Ahilyanagar | संध्या. ६.१०वा. | २०-४-२०२६📍शिर्डी, अहिल्यानगर. #Maharashtra #DevendraFadnavis #Shirdi

Full_Media Interaction_Shirdi-20-04-2026.mp41.24 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕕 6.11pm | 20-4-2026📍Shirdi. LIVE | Media Interaction #Maharashtra #Shirdi https://www.youtube.com/live/bY3DbbeBOMY?si=stcLuPatVHapBOC6 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1505073374736652 https://x.com/Dev_Fadnavis/status/2046207695867498747?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग रोखून विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला आहे. लोकतंत्र में महिलाओं की सहभागिता रोककर विपक्ष ने नारी शक्ति का अपमान किया है। (महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई | 20-4-2026) #Maharashtra #Mumbai #NariShaktiVandan

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्या काळात काँग्रेसकडे पूर्ण बहुमत होते, सत्ता होती तेव्हा देखील त्यांनी महिला आरक्षण विधेयक आणले नाही. जब कांग्रेस के पास पूर्ण बहुमत था, सत्ता थी, तब भी उन्होंने महिला आरक्षण विधेयक नहीं लाया। (महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई | 20-4-2026) #Maharashtra #Mumbai #LadkiBahinYojana