en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 143
Subscribers
-324 hours
-117 days
-4130 days
Posts Archive
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो रुग्णालय) येथे भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. विविध विभागांची व सुविधांची पाहणी:- ✅ शल्यचिकित्सा विभाग ✅ नेत्र विभागाचा मॉड्युलर ओ.टी. विभाग ✅ सिकल सेल व थॅलेसेमिया विभाग ✅ निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी उभारण्यात येणारी वसतिगृहाची इमारत ✅ प्रशासकीय इमारत येथील ॲडव्हान्स स्कील लॅब ✅ रुग्ण नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेला निवारा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, रुग्णांना दर्जेदार सेवा व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असा दृढ विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. विशेषतः मेयो रुग्णालयातील वसतीगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Nari Shakti to Economic Strength! Empowering Women and building a Viksit Maharashtra Inaugurated ‘Mahalaxmi Saras 2026’ exhibition in Mumbai today. Over the years, this exhibition has grown into a truly world-class platform, showcasing the strength and talent of women entrepreneurs. Hon PM Narendra Modi Ji’s vision of 'Nari Shakti' is powering the journey towards a ‘Viksit Bharat’ by empowering women and bringing their potential into the mainstream economy. Over the past decade, initiatives like ‘Umed’ and ‘MAVIM’ have built a strong self-help group movement across Maharashtra, connecting millions of women, supporting families, and enabling women to create, brand, and market their own products. Maharashtra has already created around 50 lakh ‘Lakhpati Didis’ and is now moving in mission mode towards 1 crore, transforming women into strong economic leaders. Women-led Self-Help Groups are a true powerhouse. Along with the Saras exhibition, the ‘Umed’ platform has created a permanent digital marketplace with thousands of products, ensuring sustained opportunities. The expansion of ‘Umed Malls’ across districts, with a long-term vision down to the taluka level, is building a strong and accessible market network for women entrepreneurs. Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Jaykumar Gore, MoS Yogesh Kadam, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #MahalaxmiSaras2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2050558781130723803?s=20

CMO Maharashtra Tweets: सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- 'महालक्ष्मी सरस' द्वारे 'उमेद'ची गरुड भरारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे 'महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. देशात नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. महिला अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे. 'महालक्ष्मी सरस'मुळे बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ व ग्राहक मिळून महिलांना अपेक्षित लाभ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बचत गटांच्या उत्पादनांमध्ये आता केवळ गुणवत्ता नव्हे, तर आकर्षक पॅकेजिंग, उत्पादनाची माहिती, पोषणमूल्ये आणि वापर याबाबतची सविस्तर माहिती दिली जात असून त्यामुळे बचत गटांची स्पर्धात्मकता वाढली आहे. बचत गट आता मोठ्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम झाले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय, 'उमेद' अंतर्गत उभारण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म हा एक व्हर्च्युअल मार्केटप्लेस म्हणून विकसित होत असून, ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रवाहात महिलांना स्थान मिळवून देण्यासाठी तो महत्त्वाचा ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर आज 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी योजना तयार करण्यात येईल. त्यामार्फत महिला बचत गटांना नर्सरी उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, याद्वारे महाराष्ट्राच्या 300 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि पर्यावरण संवर्धनात हातभार लावतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras2026

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕕 5.50pm | 2-5-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://youtu.be/7ngYuH7NXT0 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1417565503468274 https://x.com/Dev_Fadnavis/status/2050551214937366691?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Infrastructure to Healthcare: Creating a Roadmap for a Modern and Inclusive Mumbai Chaired a review meeting regarding various issues of the Mumbai North Lok Sabha constituency in the presence of Hon Union Minister Piyush Goyal ji. Various infrastructure projects are underway in the MMR, which will boost transportation speed. Instructed officials to create a policy for effectively using ‘housing stock’ reserved for project-affected citizens. Development is ongoing on several MMRDA land parcels, with more projects proposed. Directed to conduct a joint survey with central agencies, and to send a consolidated land proposal to the Central Government. Additionally, instructed that, as per court orders, a nodal officer must be appointed to expedite pending legal cases involving the lands under MMRDA. Directed that the BMC must upgrade equipment, sanitation and staffing at Shatabdi and Bhagwati hospitals. Instructed that the demarcation of Mumbai’s village settlements must be fast-tracked to ensure all residents receive civic amenities. Also directed to develop a master plan for a 'Convention Centre' in Gorai, modelled after Delhi’s Bharat Mandapam. These initiatives will go a long way in redefining Mumbai’s urban landscape, delivering faster connectivity, superior healthcare, and a dignified standard of living for every citizen. Senior officials were present. #Maharashtra #Mumbai #MumbaiNorth https://x.com/Dev_Fadnavis/status/2050550870866358769?s=20

CMO Maharashtra Tweets: मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील विकास कामांना गती; पायाभूत सुविधा व नियोजनाला गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासकामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा. विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांसाठी एकत्रित प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची आवश्यकता आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत येथील जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा करावा. दिघी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. मुंबई महापालिकेने शताब्दी आणि भगवती रुग्णालयामध्ये दर्जेदार रुग्णसेवेसाठी आधुनिक यंत्रसामग्री, स्वच्छता आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी दिले. मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी. गोराई भागात दिल्ली येथील भारत मंडपमच्या धर्तीवर 'कन्व्हेन्शन सेंटर' निर्माण करण्याकरिता कार्यवाही करावी. यासाठी बृहत नियोजन आराखडा बनवावा. या केंद्राचा उपयोग व्यावसायिक स्तरावर होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiNorth

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content