Devendra Fadnavis
Open in Telegram
4 143
Subscribers
No data24 hours
-117 days
-3930 days
Posts Archive
4 143
CMO Maharashtra Tweets:
'मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून, या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याला 'मिसिंग लिंक' म्हणण्यापेक्षा 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने व प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
'मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून, यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अद्ययावत अग्निशामन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर दोन बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याच प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच महामार्ग केबल-स्टेड पुलाची निर्मितीही करण्यात आली असून, 182 मीटर उंचीचा हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. या पुलाच्या डिझाइनसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला असून, विंड टनेल मॉडेलिंगच्या आधारे त्याची आखणी करण्यात आली आहे.
ही 'मिसिंग लिंक' इकोनॉमिक मल्टिप्लायर म्हणून पुढे येईल आणि यामुळे ₹70,000 कोटींपेक्षा अधिकची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होणार असून नागरिकांचा वेळ देखील वाचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
एमएसआरडीसीच्या टीमने व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून, ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही 'मिसिंग लिंक' आज आपल्याला उदघाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The #MissingLink between Mumbai and Pune is no more missing !
#Maharashtra #MumbaiPuneMissingLink
#MahaInfra
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्यासाठी उंबरखिंडीत लढाई केली. ही लढाई याच खोऱ्यात झाली.
महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने कारतलब खान के घेरे को तोड़ने के लिए उंबरखिंड में युद्ध किया था, यह युद्ध इसी घाटी में हुआ था।
('मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण | रायगड | 1-5-2026)
#Maharashtra #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'मिसिंग लिंक’ प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण असून, भारतासह 7 देशांच्या योगदानातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
‘मिसिंग लिंक’ परियोजना अंतरराष्ट्रीय सहयोग का एक उत्कृष्ट उदाहरण है, भारत सहित 7 देशों के योगदान से इस परियोजना को विकसित किया गया है।
('मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण | रायगड | 1-5-2026)
#Maharashtra #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणे देत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची फाईल बंद केली होती, परंतु महायुती सरकारने या प्रकल्पाला पुन्हा गती देत काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
2014 के तत्कालीन सरकार ने 13 कारण देते हुए ‘मिसिंग लिंक’ परियोजना की फाइल बंद कर दी थी, लेकिन महायुति सरकार ने इस परियोजना को फिर से गति देकर काम शुरू करने का निर्णय लिया।
('मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण | रायगड | 1-5-2026)
#Maharashtra #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे.
'मिसिंग लिंक' परियोजना के टनल को गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में दुनिया की सबसे चौड़ी टनल के तौर पर दर्ज किया गया है।
('मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण | रायगड | 1-5-2026)
#Maharashtra #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
