MཽpscPDFཽ
Open in Telegram
👉This group is only Designed for Upsc and राज्यसेवा beginer... 👉If u dont knw the syllabus of mpsc n upsc ask urslf "Are u Really serious about It ..?"
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
7 738
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 738
*उद्धवा अजब तुझे सरकार !*
एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणजे, आयुष्याच्या रणांगणावर सतत लढत असणारे योद्धे आहेत. टुकारगीरी करणारे, बापाच्या जीवावर आणि पैशावर मौज मजा करणारे, तरुण मुलींना आणि महिलांना छेडछाड करणारे रोड रोमिओ आणि एमपीएससीचा अभ्यास करणारी मुले यांच्यात खूप फरक आहे साहेब.
तरुणाईतील चांगुलपणाचा अर्क म्हणजे, हे विद्यार्थी आहेत. यांच्यावर फक्त त्यांच्या आईवडिलांचीच नाही, तर संपूर्ण समाजाची भिस्त असते. खेड्यात येऊन पहा साहेब ! एमपीएससीला निवड झालेला मुलगा, अधिकारी म्हणून ज्यावेळी गावात येतो, त्यावेळी संपूर्ण गाव त्याची मिरवणूक काढून, त्याच्या आई-वडिलांसह त्याचा जाहीर सत्कार करते.
आपल्या प्रत्येक घरातील तरुण मुला-मुलींना ज्यांचा आदर्श म्हणून दाखविला जातो, ती एमपीएससीचा अभ्यास करणारे मुले आणि मुली आहेत.
गेली दोन वर्षे परीक्षेची वाट पहात, सतत अभ्यास करणाऱ्या या लेकरांची मानसिक अवस्था आपल्या एका निर्णयाने काय झाली असेल ? याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
ज्या कोरोनासाठी आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून, आपण या परीक्षेची तारीख पुढे ढकलली, त्याच्याविरोधात अभ्यास करणारी संपूर्ण मुले आणि मुली महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात रस्त्यावर उतरली.
*एमपीएससीच्या परीक्षेमुळे जेवढा करोनाचा प्रसार झाला नसता, त्याच्या शंभरपट प्रसार कदाचित कालच्या आंदोलनामुळे होऊ शकतो, याला जबाबदार कोण ?*
सहा-सात दिवस चालणारी वार्षिक परीक्षा चालू असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण घरातील वातावरण बदललेले असते. जी मुले एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत, त्यांच्यासाठी त्या मुलांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आपणाच परीक्षेला बसलोय, असा भाव मनात आणून, वाट्टेल तो त्याग त्या मुलांसाठी करीत असते.
ही सर्व मुले कळती आणि जाणती आहेत. आपल्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा त्याग त्यांना समजतो. जीवाचे रान करून, अभ्यास करून, यावर्षी मी अधिकारी होणारच ! अशा जिद्दीने ही या मैदानात उतरलेली असतात.
*निर्णय घेणाऱ्या नेत्यांच्या घरातील मुले, या भानगडीत पडतच नाहीत, त्यामुळे या नेत्यांना एमपीएससीसाठी लढणाऱ्या बहाद्दर मुलांची आणि त्यांच्या कुटुंबाची मानसिक अवस्था कधीच कळणार नाही.*
कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, शेतमालाला भाव नाही, वीज बिलासाठी कनेक्शन सोडवलेली आहेत, घरात बाहेरून येणारा कोणताच पैसा नाही, अशा अवस्थेत शहरात जाऊन अभ्यास करणारी मुले, हा शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा असतो. काही मुले तर आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून अतिशय कमी सुविधा असलेल्या किंवा सुविधाच नसलेल्या, कमी भाडे असलेल्या खोलीत रहात आहेत. काही मुले अभ्यास करून स्वतः स्वयंपाक करून जेवत आहेत, काही मुले आई-वडीलांना खर्च नको म्हणून फक्त एक वेळ जेवत आहेत साहेब.
*शहरात करोनाची सर्वात जास्त भीती आहे, हे माहीत असूनही या शेतकऱ्यांनी आपल्या काळजाचा तुकडा डावावर मांडला आहे.*
रस्त्यावर उतरलेली ही बहुतांशी एकुलती एक मुले आहेत. या शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अशा सर्वच्या सर्व या मुलांमध्ये अडकलेल्या आहेत. तरीही आपल्या मुलांना लढण्याचे बळ शेतकरी देत आहे.
*शेतकऱ्यांची जाण नसलेल्या आणि लढणार्याची किंमत नसलेल्या, आपल्या शहरी वृत्तीच्या माणसाला या गोष्टी कधीच समजल्या नाहीत आणि समजणार नाहीत.*
आठच दिवसात पुन्हा परीक्षा घेणार ! हे वचन देताना परीक्षेसाठी तयारी केलेल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार आपल्या डोक्यात का आला नाही ? कदाचित सात दिवसांनी करोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर आपण आपले वचन मोडणार ! याचा ताण तणाव काय असतो ? हे तुम्हाला कधी कळणारच नाही.
याअगोदरही राजा हरिश्चंद्राच्या अविर्भावात, आपण दिलेले वचन मोडलेले आहे, हे सर्व महाराष्ट्र जाणतो.
*आपल्या आयुष्यात आपण किती स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत ? आणि आपल्याला याचा किती अनुभव आहे ?* हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसाला सहज पडतो.
*आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात नामुष्कीचा आणि मूर्खपणाचा निर्णय, आपण परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भात घेतला आहे. आज संपुर्ण तरुणाईच्या मनातून आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातून आपल्या प्रतिमेच्या ठिकर्या उडालेले आहेत.*
नरवीर तानाजी मालुसरे यांचे इतिहास प्रसिद्ध वाक्य आहे, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे ! आज एमपीएससीला अभ्यास करणारा मुलगा सुद्धा हेच म्हणतोय *आधी लगीन एमपीएससी परीक्षेचे आणि मग माझे !*
एमपीएससी रुपी लग्नाची वरमाई, मुख्यमंत्री या रूपाने आपण आहात. या वरमाईवरच लग्नाचे रूप, स्वरूप आणि भवितव्य अवलंबून असते. महाराष्ट्रातील संपूर्ण वऱ्हाड आपल्याकडे डोळे लावून बसलेले आहे. आपल्याला परमेश्वर कृपेने वरमाईच्या कर्तव्याची जाण आणि भान वेळेत येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
7 738
Live येऊन संयम पाळण्याचे आणि COVID सोबत एकत्र लढण्याचे भिकार सल्ले आम्हास देऊ नयेत...🙏
कारण परीक्षा ही 14 मार्च लाच घ्यावी लागणार
#Mpsc14March
7 738
#ISHQ-E-MPSC Part 2
10-10 तास अभ्यास करताना पाच-सहा
महिन्यातून एकदा तरी वाटतं की...आपल्यालाही गर्लफ्रेंड असावी.
नजरेला नजर भिडवत अगदी तिच्या जवळ जावं
आणि
तिच्या स्पंदनांचा भास माझ्या हृदयाला व्हावा.
अचानक भगतसिंग समोर येतात आणि कानाखाली आवाज काढून बोलतात ..
Oye काक्के कीतथे खोया तू पढाई पे ध्यान दे|
अन जाणीव करून देतात...
अधिकाऱ्याची वर्दी पोरान घालावी म्हणून
फाटकचं बनियन घालून शेतात राब राब राबणाऱ्या आणि महिन्याला पाच हजार रुपये पाठवणाऱ्या बापाची.
-शब्दरचना: Akash B Khetre
7 738
'मेकॉले आणखी जिवंत आहे.'
👉इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल हे वाक्य ऐकल्यानंतर मला तरी असं वाटतं की मेकॉले आणखी जिवंत आहे...त्याला भारतात ब्रिटिश साम्राज्य चालवण्यासाठी इंग्रजी बोलणाऱ्या कारकुनांची गरज होती आता आयोगाला कोणाची गरज आहे त्यालाच माहित.
👉भारतात एकूण लोकसंख्येच्या 12% इंग्रजी बोलतात.तरीही English official language ... जपान चीन रशिया इंग्रजी न बोलता पुढे आहेत.
👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा इंग्रजीतील अभ्यासक्रमच अधिकृत का...? मराठीतील का नको...
आणि
असेच असेल तर इथून पुढे मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा न दिलेल्याच बर्या
-Akash B Khetre
7 738
Preamble of the Constitution
A) अमेरिकेच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेतील संपूर्ण प्रस्ताविका घेतलेली आहे.
B) अमेरिकेच्या राज्य घटनेतून WE THE PEOPLE वाक्य घेतलेल आहे.
7 738
माउंटबॅटन योजनेनुसार
1) संविधान सभेला पूर्णता सार्वभौम बनवण्यात आले
2)संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला 3) भारत व पाकिस्तान दोन राष्ट्र निर्माण झाले.
7 738
सर्वांना अगदी हृदयापासून जय शिवराय
शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा...!!!
Portrayist- My Nephew (Aniket)
- 8th class Student
7 738
खालीलपैकी कोणते कलमे भारतीय संविधानाचे सुवर्ण त्रिकोण आहेत..?(Golden Triangle of the Ind. Constitution)
