en
Feedback
" छञपती श्री शिवाजी महाराज "

" छञपती श्री शिवाजी महाराज "

Open in Telegram
3 297
Subscribers
+124 hours
+77 days
+1330 days
Posts Archive
दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक : १) विष्णु गणेश पिंगळे २) कर्तारसिंह सराबा ३) सरदार बक्षीससिंह ४) सरदार जगनसिंह ५) सरदार सुरायणसिंह ६) सरदार बुटासिंह ७) सरदार ईश्वरसिंह ८) सरदार हरनामसिंह 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६५८ ( माघ वद्य चतुर्दशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, रविवार ) आरमार बांधणीला सुरुवात :- हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यातील पहिल्या आरमार बांधणीला सुरुवात केली. या आरमार बांधणीसाठी लागणारी लाकडे ही विरार, वसई येथून समुद्रमार्गाने गेल्याची नोंद आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/tZoQ1tRWE5c 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१७०३ औरंगजेब विरुद्ध मराठे औरंगजेब स्वतः सिंहगब वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला. तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घसदाना आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते. ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मरठूनद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण सनरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारणवर राग राग करू लागला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१८२९ कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू. (जन्म : २३ आॅक्टोबर १७७८) झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले . त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या ,परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीने झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/tZoQ1tRWE5c 📜 २१ फेब्रुवारी इ.स.१९१५ विष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.

📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८ #इंग्रज_आणि_सिंहगड:- नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला. सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली. ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳ 📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/NzW-G9TdxSQ 📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६० ( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार ) शाहिस्त्या नगरमध्ये! मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते. महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० फेब्रुवारी इ.स.१७०७ (काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे) रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब शिवराज्य संपवायला आला, आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली. महाराज म्हणायचे, "माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत, एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला. आपण जेवढे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवढे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा," माझे शहजादे, वजीर, सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे छत्रपती संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"...! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० फेब्रुवारी इ.स.१८०२ शिंदेंना इंग्रजांचा तह स्विकारला नाही इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही, शेवटी कॉलिन्स वैतागून मे १८०२ मध्ये शिंदेंच्या दरबारातून परत गेला,त्या अगोदर उज्जैन हून कलकत्ता येते पत्र पाठवले त्या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले होते. "दौलतराव शिंदे तर आपले स्वतंत्र गमावणारा तैनाती फौजेचा तह करणारच नाही उलट बाजीराव पेशव्याने अशा प्रकारचा त करू नये म्हणून आपल्या प्रभावाचा पूर्णपणे उपयोग करण्यास तीळ भर ही कसर बाकी ठेवणार नाही," 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/NzW-G9TdxSQ 📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८ अखेरचा सेनापती बापू गोखले युद्धात यांचा मृत्यू अतिशय सत्प्रवृत्त आणि सज्जन असा सेनापती बापू गोखले नावाचा मराठी राज्याचा अखेरचा सेनापती होता. दुसऱ्या बाजीरावानी पळ काढला आणि पुढे पळतच राहिला. १८१८ च्या मे महिन्यापर्यंत पळत राहिला. जेजूरी, पाडली, माहूली, पुसावळे, मिरज, गोकाक(कर्नाटक), पुन्हा माहूली, पंढरपूर, सिद्धटेक असा इंग्रजांची फौज पाठीशी घेऊन पळत सुटला. त्याला साथ देत होता सेनापती बापू गोखले ! धन्याच्या प्रामाणिक सेवेपोटी आणि स्वामिनिष्ठेसाठी ओतूरकडे बाजीराव जात असताना बापू ब्राम्हण वाड्याकडे येऊन राहिला. त्या ठिकाणी बापूचा मुलगा गोविंद तापाने वारला. सगळे दुःख गिळून बापू बाजीरावास साथ देत होता. अखेरीस पंढरपूरजवळ 'गोपाळअष्टी' येथे २० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांशी लढताना तो ठार झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳ 📜 १९ फेब्रुवारी इ.स.१६३० (फाल्गुन वद्य ३, तृतीया, शके १५५१, संवत्सर शुक्ल, वार शुक्रवार) पराक्रमी सुर्याचा जन्म! पराक्रमी सूर्याचा जन्म झाला... ज्यांच्यामुळे आज जगात ताठ मानेने मराठी म्हणून जगता येते. त्या जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजाचा, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले‌ शिवनेरी येथे जन्म झाला. अशा युगपुरूषोत्तम आणि जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. त्यांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वाकडे पाहून इतकंच म्हणावसं वाटतं, छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, आणि शिवरायांचा आचरावा प्रताप... भूमंडळी...! हिंदवी स्वराज्य संस्थापक, मर्यादा पुरूषोत्तम, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मानाचा मुजरा...!! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/2aXAPgE-6yA 📜 १९ फेब्रुवारी इ.स.१६८१ (फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शनिवार) औरंगजेब बादशहास बुन्हानपुर लुटीची बातमी! खानजहानला मराठ्यांनी दिलेल्या चकव्यामुळे लुटीच्या मालासकट मराठे चोपडा मार्गे साल्हेरला गेल्याने खानजहानला हात चोळत, बसावे लागले. याच बुन्हानपुर लुटीसंबंधी औरंगजेब दरबारात याची बातमीपत्रात खालील नोंद आहे. बुन्हाणपुरच्या वृत्तपत्रावरून असे समजते की, "शत्रू सैन् एकत्र जमून आले या बातमीमुळे खानजहान, काकरखान येथे आला. किल्ला बंद करून त्याने खबरदारी बाळगली. शत्रू मात्र करणपुऱ्यावर तुटून पडला. रजपुतांना निःशस्त्र केले. व ३, तीन दिवस शहरात राहून तो लुटून नेला" 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ फेब्रुवारी इ.स.१७६० निजामाच्या या पराभवानंतर सारी दक्षिण काबीज करावी हाच श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचा इरादा होता. उत्तरेकडील सरदारांस पाठविण्यात आलेल्या भाऊसाहेब दिनांक १९ फेब्रुवारी सन १७६० लिहितांत "तिकडील पेचामुळें इकडे आटोपते घ्यावे लागलें. नाही तरी सारी दक्षिण मोकळी होती.." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ फेब्रुवारी इ.स.१८१८ पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे झालेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या घनघोर लढाईत वीरमरण ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ फेब्रुवारी इ.स.१९५१ छत्रपती शिवाजी महाराज आणि व्हिएतनाम गूगलवर ‘shivaji staue in vietnam’ शोधल्यावर लांबून एक घोड्यावर बसलेल्या योध्याचा फोटो दिसतो. तो पुतळा दक्षिण व्हिएतनाम मधील एक शहर होचिमिन सिटी (जुनं नाव सैगोन) मधील आहे त्याच्या मागे एक फुलाच्या कळी सारखी काचेची इमारत दिसते तिचा नाव आहे ‘Bitexco Financial Tower’. तो एक व्हिएतनामी राज्याचा पुतळा आहे त्याचा नाव आहे ‘Trần Nguyên Hãn’. आणि त्याच्या हातात कबुतर आहे. होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता आणि शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे’ होची मिन यांचा कार्यकाळ १९ फेब्रुवारी १९५१ ते २ सप्टेंबर १९६९. यांना व्हिएतनामचे राष्ट्रपिता म्हणतात. त्यांच अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे एक्दम साधी राहणी. या माणसाचं सगळ्यात मोठा वैशिष्ठ्य म्हणजे ते व्हिएतनामचा खुपमोठा ऊर्जा स्रोत होते आणि आजही आहेत. https://youtu.be/2aXAPgE-6yA 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

📜 १७ फेब्रुवारी १७३८ पोर्तुगीजांनी धारावी जिंकला १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/duAs82TtPFg 📜 १७ फेब्रुवारी १७३९ मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ फेब्रुवारी इ.स.१७६४ निजामाच्या मोहिमेवरून परतल्यावर माधवरावांनी दि. १८ सप्टेंबर १७६३ या दिवशी पुण्याच्या पुन:भारणीसाठी कामाला सुरुवात केली. अनेक पेठांची पुनर्रचना करून नवीन पेठा वसवण्यास जागा दिल्या. निजामाच्या स्वारीत ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते, त्यांना सरकारातून नुकसानभरपाई देण्यात आली. एकूणच राक्षसभुवनाच्या लढाईनंतर माधवरावसाहेबांची हुशारी, मुत्सद्देगिरी आणि कर्तव्यतत्परता नुसती पुण्यालाच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानालाच दिसून येऊ लागली. दि. १७ फेब्रुवारी १७६४ या दिवशी माधवराव पेशवे मोहिमेवर निघाले. पानिपत-उदगीरच्या सुमारासच म्हैसूर संस्थानात हैदरअलीचा उगम झाला होता. त्याच्या उपद्व्यापांना लगाम घालण्यासाठी पेशवे दक्षिणेत निघाले. याआधीही १७६२ मध्ये माधवरावांनी धारवाडवर स्वारी केली होती. आताच्या स्वारीत गदग, उंबळी, कुंदगोळ इ. ठाणी जिंकून माधवरावांनी तुंगभद्रेच्या उत्तर तीरांपर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. याला प्रतिकार करण्यासाठी आलेल्या हैदरला माधवरावांनी धारवाड आणि सावनूरच्या लढाईत सपशेल हरवले. शेवटी कर्नूळच्या जवळ असलेल्या अनंतपूर येथे पेशवे आणि हैदरअली यांच्यात तह झाला. या तहानुसार हैदरअलीने पेशव्यांना ३२ लाख रुपये रोख खंडणीदाखल दिले. जून सन १७६५ मध्ये माधवराव पेशवे कर्नाटकाच्या स्वारीवरून पुण्यात परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ फेब्रुवारी १८८३ क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू, एडन,येमेन (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५) त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १७ फेब्रुवारी इ.स.१६७९ शके १६००, कालयुक्त संवछरे पौष शुद्ध १०, दशमी युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत! शिवाजीराजे कित्येक कामांबद्दल शंभूराजेंशी त्रासून कंटाळले होते. यामुळे शंभूराजेंबद्दल महाराजांच्या मनात फारच वाकडेपणा येऊन शिवाजीराजे अत्यंत त्रासले होते..... शिवाजीराजांनी मनात आणले की, शंभूराजेस हर एक बहाण्याने पकडून जीवे मारावे किंवा कैद करावे. शंभूराजेंने शिवाजीराजांचा इरादा ओळखला व दिलेरखानाकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. दिलेरखानाला पत्र दिले व दिलेरखानाला मिळण्यास निघाले. १७ फेब्रुवारी ला सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या अधिकाऱ्यांना कळवितात, 'दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी त्यांच्यावर (शिवाजीराजेंवर मोठा) विजय मिळविला आहे. सर्वात त्यांची मनःशांती अधिक ढळवणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र (संभाजी) त्यांच्यावर नाखूष होऊन बादशाही सरदार दिलेरखान याच्याकडे निघुन गेले. (Which hath more disturbed him is that his eldest son hath left him in high discontent and is fled to owne Dillele Kaune (dilerkhan) a great Umbrow of this king's lying neere his country and as fame gives out resolves to turne moore....) जेधे शकावलीतील नोंद - शके १६०० कालयुक्त संवछरे पौष शुध १० संभाजीराजे परली गडावरून निघुन दिलेरखाना कडे गेले त्यांनी त्यासी हप्त (सप्त) हजारी दिली, सन्मान केला." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/duAs82TtPFg 📜 १७ फेब्रुवारी इ.स.१६८३ शहजादा अकबराविषयीची अखबारातून नोंद! "नादान अकबराने बंडखोराने आपल्या अधिकारात नविन २ हजार स्वार व २ हजार पायदळ चाकरीत ठेवले होते. त्यांचा पगार छत्रपती संभाजी महाराज देत असत. "छत्रपती संभाजी महाराजांनी एक पोवळ्याची माळ व एक हत्ती नादान अकबरास बंडखोरास भेट म्हणून दिला होता. परंतू नादान अकबराने बंडखोराने एका वेश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेवले व तिला माळ वगैरे भेट म्हणून आलेले तीस बक्षिस दिले. ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली. "नादान अकबरास बंडखोरास निरोप पाठविला की, मी माळ वगैरे तुझ्यासाठी भेट दिली होती". "नादान अकबराने ऊत्तर पाठविले की, आम्ही बादशहा आहोत. मनास येईल ते करू". "नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी निरोप पाठविला की, तुझ्याकडील वस्तू मजकडे पाठवावी." "त्यामुळे नादान अकबर लाचार झाला. त्याने डेरा जाळून टाकला व फकीर बनून फिरंग्यांच्या मुलखात निघाला होता." "छत्रपती संभाजी महाराजांनी फिरंग्यांना लिहिले की, नादान अकबरास बंडखोरास जाऊ देऊ नये". तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे नादान अकबर बंडखोर परत येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखात रहात होता. तेथे रहात आहे म्हणून बादशहा गप्प बसला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ फेब्रुवारी इ.स.१६८३ विजरईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद! छत्रपती संभाजी महाराजांचे वकील येसाजी गंभीर इकडे आले असून ते माझ्याशी तहाची बोलणी करीत आहेत. पण राजांनी त्यांना व शिष्टमंडळास तहावर सही करण्याचे अधिकार दिले नाहीत. राजांचे हे वेळकाढूपणाचे धोरण योग्य नाही. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य आणि आरमार आपणावर चालून येत आहे. आम्ही त्या सैन्यास आणि आरमारास आमच्या राज्यातून वाट दिली आहे. मोगलांशी आमचा तह होण्यापूर्वी तुमचा तह होणे गरजेचे आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ फेब्रुवारी इ.स.१६८९ (फाल्गुन शुद्ध ८, अष्टमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार) छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बादशहाच्या दरबारात उभे करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा" छत्रपती संभाजी महाराज कशासच बधत नाहीत हे पाहून किमान छत्रपती संभाजी महाराजांनी पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले. सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते. त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल. परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती. अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली. या वज्राघातापुढे मुघल साम्राज्याचा मत्त हत्ती गडबडला. बादशाहने तहाची बोलणी आरंभली. सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. २८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७४५ शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी सन १७४५ रोजी सावनूर येथे श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिनांक २० रोजी माधवराव पेशवा झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१८३१ उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते, इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५१० हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने गोवा हस्तगत केले (१६ फेब्रुवारी १५१०). त्यात त्याला विजयानगरचा नौदल प्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी १५७० पर्यंत गोव्याखेरीज सासष्टी, बारदेश आणि तिसवाडी एवढा प्रदेश बळकावला. त्याचप्रमाणे मोगलांविरुद्ध मदत करण्याच्या मिषाने चौल व वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानांकडून मिळविले आणि दीव-दमणचे किल्ले बांधले (१५३५ व १५५९). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/tGx2Too4ssg 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५८५ बिरबलाचा मृत्यू काराकार डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना १६ फेब्रुवारी रोजी 'झैन खान कोका' याने एक धोक्याची सूचना 'बिरबल' याला दिलेली होती की शत्रू रात्री हल्ला करेल परंतु ती सूचना 'बिरबल' याने मान्य केली नाही. 'बिरबल' याचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला. अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्या खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. दगड धोंड्याचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला. यामध्ये बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत सुटले या गोष्टीमुळे सैन्याची महत्वाची फळी अस्ताव्यस्त होऊन अजून गोंधळ वाढला. मुघल सैन्यामधले पळत असलेले लोकं मारले गेले. याच दरम्यान बाकीचे सैन्य चुकून एका घळीजवळ पोहोचले तेथे 'युसुफझाई' टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्याजवलील ८००० सैनिकांची कत्तल केली. यामध्ये जीवानिशी पळून जाणारा 'बिरबल' मात्र मारला गेला आणि 'झैन खान कोका' व 'हकीम अब्दुल फतेह' हे थोडक्यात बचावले. जेव्हा या 'स्वात' जवळील खिंडीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 'बिरबल' मारला गेल्याचे वृत्त जेव्हा दुसऱ्या दिवशी 'अकबर' याला कळाले तेव्हा त्याला खूप दु:ख झाले. याबाबत 'अबुल फझल' लिहितो की "स्वामिनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्यात धार्मिक बाबीमधला त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले. दोन दिवस त्याने अन्नपाण्याला स्पर्श देखील केला नाही." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६३५ मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६८४ सुरतकरांच्या पत्राची नोंद! शहजादा मुअज्जमचा माघारी जाण्याचा निर्णय. छत्रपती संभाजी महाराज २२ हजार स्वारांनिशी दमणवर चालून जात आहेत असे म्हटले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६८९ शंभूराजेंना लष्करापासून दोन कोसांवर नेऊन त्यास इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर जसा पोशाख घालतात तसा घालावा आणि विदुषकासारखी लाकडी टोपी चढवावी. त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदुषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करणे, ढोल बडवीत शिंगे, कण वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे.” त्याप्रमाणे शंभूराजेंची लष्करातून धिंड काढून बादशहासमोर आणण्यात आले. बादशहाने त्याचवेळी आज्ञा केली की, “त्यांना कैदखान्यात घेऊन जा" बादशहासमोर शंभूराजेंना उभे करण्यात आले तेव्हा त्यांनी बादशहाला ताजीम देऊन यत्किंचितही मान लवविली नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी बादशहाने रुहुल्लाखानास आज्ञा केली की त्याने जाऊन शंभूराजेंशी चौकशी करावी, " की तुझे खजिने जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोणकोण तुझ्याशी संबंध ठेऊन पत्रव्यवहार करीत होते. " हे विचारल्यावर शंभूराजेंनी यांनी बादशहासंबंधी अनुद्गार काढले आणि त्यांची निंदानालस्ती केली. जीविताची आशा सुटल्यामुळे शंभूराजेंनी अनुदार उद्गार काढले असणार. शंभूराजेंनी बादशहासंबंधी जे अनुद्गार उच्चारले होते त्यांचा सारांश रुहुल्लाखानाने बादशहास सांगितला. https://youtu.be/tGx2Too4ssg 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७१९ मराठ्यांची दिल्लीला धडक फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती. शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले. बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले.

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६३८ ( फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५५९, संवत्सर ईश्वरी, गुरुवार ) बागलाणचे पाहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले :- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील परिसरात मुल्हेर हा प्रसिद्ध किल्ला आहे. १०० फूट उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे. औरंग्याच्या आदेशानुसार मोगली सेनेने मुल्हेरला वेढा देऊन हल्ला केला. ह्या हल्ल्याने बागलाणचा राजा बहिर्जी ढेपळाला व प्रतिकार न करता मुल्हेर किल्ला मोगलांना नजर केला. आजच्या दिवशी ३५० वर्षांची परंपरा असणारे एक हिंदुराष्ट्र औरंग्याच्या राक्षसी वृत्तीने गिळंकृत केले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/GoShm2a2_PA 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६६२ शहजादा अकबर याची सुंता-विधी झाली. पादशहाजादा महमंद अकबर याचा जन्म ११ सप्टेंबर इ.स.१६५७ रोजी झाला. अकबर हा युवराज संभाजीराजेंपेक्षा अवघा ४ महिण्यांनी लहान होता. अकबराच्या मातेचे नाव दिलरसबानू, ती रजपुत कन्या होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६६७ ( फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार ) मुहम्मद कुलिखान :- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्‍याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्‍याला पाठवायची व्यवस्था केली. दि.१५ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६८४ (फाल्गुन शुद्ध १० दशमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार शुक्रवार) शहजादा मुअज्जमचा माघारी जाण्याचा निर्णय! रागारागात संयम गमावलेल्या मुअज्जमला नियोजनाच्या गलथानपणाचा खूप फटका बसला. ४० हजार घोडेस्वार, ६० हजार पायदळ, ३ हजार उंट आणि १९०० हत्ती एवढ्या प्रचंड फौजेसाठी आता रसद उपलब्ध नव्हती. अन्नाचे हालहाल जाणवू लागले, त्याने स्वतःनेच दक्षिण कोकणची अमानुष जाळपोळ करून बंदरे जाळून टाकल्याचे चटके त्याला जाणवू लागले होते. भरपूर द्रव्य आहे पण अन्न नाही, भरपुर माणके देऊन सुद्धा जनावरांना चारा नाही अशा महाभयंकर परिस्थितीत मुअज्जम सापडला. अखेर मनातून पुर्णपणे खचून जाऊन या शहजाद्याने जाण्याचा निर्णय घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६८९ औरंगजेब अकलुजहून बहादुरगड येथे आला औरंगजेब बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखान व बहादुरखान हे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश व इतर सर्व कैद्यांसह बहादुरगड येथे पोहोचले. बादशहा औरंगजेब अकलुजहून बहादुरगड येथे आला व कैद्यांना आपल्या समोर आणावे अशी औरंगजेबाने आज्ञा दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/GoShm2a2_PA 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१७३८ धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले. दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८) नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते. वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले (चुलता) याने त्यास सांभाळण्यासाठी वऱ्हाडात नेले. तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७५७ इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा - “आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/VOPQ9cVJNuE 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७६३ माधवराव निजामाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा मधल्या काळात पुण्यातही काही घटना घडून गेल्या होत्या. फाल्गुन शु. द्वितीया शके १६८४, चित्रभानुनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. १४ फेब्रुवारी सन १७६३ रोजी विश्वासराव पेशव्यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या. विश्वासराव गेल्यानंतर त्यादेखील पूर्णपणे खचून गेल्या होत्या व अशातच आजारपण येऊन वारल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩☀

⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६५८ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र 'शिवाजीचे मान्यतेसाठीचे विनंती पत्र आपल्या शाहजाद्याला आले, त्यामुळे त्याच्यापासुन आपल्याला संकट नाही',असा विचार करुन असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते. राजांनी डाव साधला.२३ एप्रिल १६५७ रोजी वरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात ३० एप्रिल १६५७ रोजी राजांनी अचानक जुन्नर वर हल्ला केला. वैशाख कृ. द्वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या परकोटाला दोराच्या शिड्या लावल्या, मावळे आत शिरले. पहारेकऱ्यांना मारुन त्यांनी लुटिस सुरवात केली आणि राजांनी जुन्नर लुटली. ३० एप्रिल १६५७ रोजी जुन्नर लुटून २०० घोडे, ३ लाख होन नगद, कापड, जडजवाहीर घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले. याच वेळी औरंगजेब बीदर जिंकून कल्याणीस वेढा टाकण्यास निघाला होता. वाटेतच त्याला 'ही' बातमी समजली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कार्तलबखनास जुन्नरच्या बंदोबस्तसाठी व होशेदारखान, रायकरणसिंह, रायसिंह, शाएस्ताखान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले. व त्यांना कडक हुकुम दिले, 'शिवजीच्या मुलुखांतील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा! दयामाया दाखवु नका! त्यांचे सर्वस्व लुटून आणा! पुणे व चाकण ही शिवाजीची ठाणी धुळीस मिळवा! आपल्या मुलुखांतील जे कोणी शिवाजीला सामील असतील त्याची सरसहा मुंडकी उडवा!' पण कार्तलबखन जुन्नरकडे पोहचेल तोपर्यंत महाराज लूटिसह निघुन गेले होते. नंतर त्यांनी ४ जुन १६५७ रोजी मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरवरही हल्ला चढवुन लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले. हे असे होणार हे महाराजांना माहित होतेच. त्यांनी आपला धूर्त व बिलंदर वकील रघुनाथपंत कोरडे याला औरंगजेबाकडे रवाना केले. कश्यासाठी? तर, जुन्नर व अहमदनगर येथील लूटीबाबत पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी! माफी मागण्यासाठी! पंत औरंगजेबाकडे गेले. अत्यंत पश्चात्तापी मुद्रेने त्यांनी माफी मागितली. पण चुकुनही, 'आम्ही आपली लूट परत करतो' असे शब्द उच्चारले नाहीत! औरंगजेबाने राजांना माफ केले. त्याला कारणही तसेच होते. त्यावेळी मुघल बादशहा शहाजहान हा आजारी होता. आणि मुघलीया सल्तनतीच्या शाही रीवाजाप्रमाणे बाप आजारी पडला, म्हणजे त्याचे मूलं फार काळजी करत. कश्याची ? तर, आपला बाप मरण्याच्या आतच आपल्याला गादी कशी मिळेल याची! त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमधून आग्र्यात जायचे वेध लागले होते. म्हणून ही माफी! त्याने राजांना पत्रही लिहीले, 'तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांज बरोबर जी पाविलीत ती आम्हास पावली. मजकूर ध्यानांत आला. तुम्हीं केलेलीं कृत्यें विसरण्याजोगीं नाहीत. तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाहीं हे तुम्ही जाणलेत. आता मनात तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचेच ठायी आहे, हे आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल कांहीही मनात किल्मिष ठेवीत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानुन असावें. आमचे लोभाची पूर्तता समजावी.' या पत्रावर तारीख होती जखर १ हिजरी १०६८ म्हणजेच दि १४ फेब्रुवारी १६५८. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/VOPQ9cVJNuE 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६६६ औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६७१ ( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार ) दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली :- होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ-ए-जंजिरा! याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते. जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७५५