LetsUpp Marathi
Open in Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Show more6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
6 624
👉 हॅप्पी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट
Let's Up Entertainment Katta
आज मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानचा बर्थ डे. 14 मार्च 1965 रोजी आमिरचा जन्म मुंबईत झाला. आमिर खानचे वडिल ताहिर हुसैन एक फिल्म निर्माता होते आणि त्यांचे काका, नासिर हुसैन एक फिल्म निर्मात्यासोबतच दिग्दर्शक देखील होते.
आमिर खान एका सिनेमाशी संबंधीत असलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे आमिर खानची आवड कायम सिनेमाशी जोडलेली आहे. गेल्या 3 दशकांपासून आमिर खानने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आमिर खानला भारत सरकारकडून 2003 साली पद्मश्री आणि 2010 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
आमिर विषयी फारशा माहित नसलेल्या काही गोष्टी...
👉 आमिर खानचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. मात्र आमिर खान बॉलिवूडमध्ये आमिर याच नावाने लोकप्रिय आहे.
👉 आमिर खानने वयाच्या 8 व्या वर्षी ‘यादों की बारात’ या सिनेमांत बालकलाकार म्हणून पहिले काम केले.
👉 आमिर खान लहानपणी गर्ल्स स्कूलमध्ये शिकला आहे. त्या शाळेत 5 वीपर्यंत मुलं देखील शिकू शकत होते. आणि हेच कारण आहे आमिर खानचे मित्र कमी असून मैत्रिणी जास्त आहेत.
👉 आमिर खानने 21 वर्षाचा झाल्यावर आपली गर्लफ्रेंड रिनासोबत गपचुप लग्न केले होते. त्याने जेव्हा लग्न केले तेव्हा त्याचा 'कयामत से कयामत तक' हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.
👉 आमिर खानने आपली पहिली पत्नी रिना हिच्याशी 17 वर्षाचे लग्नाचे नाते तोडून किरण राव सोबत लग्न केले होते. किरण रावची ओळख लगानच्या सेटवर झाली.
👉 आमिर खानची पत्नी किरण रावच्या मते आमिरला ईटिंग डिसऑर्डर असून त्याला आंघोळ करणे पसंद नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 कसोटी क्रमवारीत विराटची घसरण...
Let's Up Sports Katta
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराटने दोन्ही डावांमध्ये मिळून केवळ 40 धावा केल्याने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली.
विराटच्या खात्यात 847 गुण असून, पहिल्या स्थानावरच्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यात 936 गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 869 गुणांसह चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डनेडिन कसोटीत शतक ठोकले आहे.
तर दुसरीकडे आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विननं आपलं अव्वल स्थान कायम राखले आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 स्टॉईनिस - ग्लेन मॅक्सवेलमध्ये चुरस!
भारत दौऱ्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवण्यासाठी मार्कस स्टॉईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या व्हिक्टोरियाच्या खेळाडूंमध्ये मुख्य चुरस आहे. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला सहाव्या क्रमांकावर एखाद्या अष्टपैलू शिलेदाराची गरज आहे. ग्लेन मॅक्सवेल हा आधीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाचा घटक आहे. त्याचा त्याला लाभ होऊ शकतो. पण स्टॉईनिसची अष्टपैलू गुणवत्ता आणि प्रामुख्याने त्याचे स्विंग गोलंदाजीतले कौशल्यही दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातल्या वाढत्या दुखापती लक्षात घेता अॅश्टन अॅगर आणि उस्मान ख्वाजा यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.
👉 लायनच्या बोटाची त्वचा सोलून निघाली!
ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची त्वचा अक्षरश: सोलून निघाली आहे. पण त्यानंतरही आपण रांचीच्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकू, असा विश्वास लायनला वाटत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या तिसऱ्या कसोटीला 16 मार्चपासून रांचीत सुरुवात होत आहे. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना लायनच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची त्वचा सोलून निघाली आहे. लायनने पहिल्या डावात 50 धावांत आठ भारतीय फलंदाजांना माघारी धाडले पण दुसऱ्या डावात 33 षटकांत 82 धावा मोजूनही लायनला एकही विकेट मिळाली नव्हती.
👉 'चॅंपियन्स ट्राॅफी ठरवेल धोनीचे भविष्य'
येत्या तीन महिन्यात होत असलेली चॅपियन ट्राॅफी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे भविष्य ठरवेल असे मत धोनीचे बालपणातील प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या धोनीने सर्व लक्ष चॅपियन्स ट्रॅफीवर केंद्रीत केले आहे. त्यात तो यशस्वी झाला तर विश्व कप 2019 पर्यंत तो खेळू शकेल. धोनी चाणाक्ष आहे पण वय वाढले की खेळाडूचा परफॉर्मन्स पूर्वीप्रमाणे होऊ शकत नाही याचीही त्याला जाण आहे. धोनीची खेळाची समज विलक्षण आहे व त्याची इच्छा शक्ती जबरदस्त आहे हे त्याचे गुण आहेत असे सांगतानाच ते म्हणाले, स्वतःच्या खेळण्याची लय बिघडू नये यासाठीच तो विजय हजारे ट्राॅफी खेळतो आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 चेहरा धुताना काय काळजी घ्यावी
Let's Up Health Tips
चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल कि चेहरा धुताना कसली आलीये चुकीची पद्धत? पण तुम्ही पुढील काही चुकीच्या पद्धती जाणून घेतल्या तर तुमचा हा समज निघून जाईल...
👉 चेहरा जास्त घासण्याने रंग गोरा दिसेल असा विचार डोक्यातून काढून टाका कारण जास्त घासणं चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
👉 चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काहीजण दिवसभरात सतत फेस वॉशने चेहरा धुतात. यामुळे त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊन त्वचेचे नुकसान होते.
👉 चेहरा धुण्यासाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधन वापरतो. यामध्ये साबण, फेसवॉश आदींचा समावेश होतो. पण या गोष्टी आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरात असतो. त्यामुळे चुकीच्या उत्पादनांची निवड केल्यानंतर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर होतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 चेहऱ्यावरील निर्जीव त्वचा निघुन जाण्यासाठी अनेक जण स्क्रबिंग करत असतात मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त स्क्रबिंग केल्यास त्वचेचे नुकसान होते.
👉 चेहऱ्यावर तुम्ही सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला असेल तर घाईघाईने चेहरा धुवू नका. यामुळे चेहऱ्यावर केमिकल्स तसेच राहतात व चेहऱ्यावरील छिद्रे बुजतात.
👉 चेहरा कायम स्वच्छ तलम सुती कपड्याने पुसावा व घासून पुसण्याऐवजी फक्त हलक्या हाताने पुसावे. अनेकजण चेहरा धुतल्यानंतर तो टॉवेलने घासून पुसतात त्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
👉 फेसवॉशने चेहरा धुताना पाणी जास्त गरम नसलं पाहिजे याने स्किन खराब होते. त्वचेसाठी जास्त गार पाणी ही योग्य नाही म्हणून ताज्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवायला हवा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 BSF सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती
Let's Up Job Update
पोस्ट : असिस्टंट कमाण्डन्ट (Works) - जागा : 07 - पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
पोस्ट : असिस्टंट कमाण्डन्ट (Electrical) - जागा : 08 - पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी
शारीरिक पात्रता : पुरुष - उंची : 165 cm - छाती : 81 cm - वजन : 50 kg I महिला - उंची : 157 cm - वजन : 46 kg
वय : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट)
अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 01 एप्रिल 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/eUaStM
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 BSF सीमा सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती
पोस्ट : सहाय्यक उपनिरीक्षक (Steno) - जागा : 219 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वय : दि. 25 एप्रिल 2017 रोजी 18 ते 25 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 25 एप्रिल 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/ijk9b9
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/R22KKU (Starting : 27 मार्च 2017)
👉 L.I.C हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती
पोस्ट : असिस्टंट - जागा : 50 - पात्रता : B.Com/BBA/LLB/M.Com
वय : दि. 01 मार्च 2017 रोजी 21 ते 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 13 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/Bjwy5p
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/fUzj1T
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - राष्ट्रपतींनी मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला, अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, पर्रीकर उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
👉 नवी दिल्ली - पहिल्यांदाच 450 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम नव्या ब्राह्मोस स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली
👉 नवी दिल्ली - बचत खात्यामधून पैसे काढण्यासाठी आजपासून कोणतीही मर्यादा नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली माहिती
👉 गडचिरोली - देसाईगंजमध्ये पत्यांच्या क्लबवर पोलिसांची कारवाई, स्थानिक काँग्रेस नगरसेवक गणेश फाफटसह 13 लोकांवर गुन्हा दाखल, 50200 रुपये जप्त
👉 छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यामुळे सीआरपीएकडून होळीचे सेलिब्रेशन रद्द, 3 लाख जवानांनी वाहिली श्रद्धांजली
👉 हैदराबाद - 500 आणि 100 च्या 1 कोटी 20 लाखांच्या जुन्या नोटा बदलण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 4 जणांना अटक
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 पेइचिंग - चीनच्या सरकारने कट्टरतेविरोधात आक्रमक पावले उचलत कट्टरवाद मोडून काढण्यासाठी नवी रणनीती आखली
-----------------------------------------------------------
दुष्काळच्या झळा सोसताना घेतलेले शासकीय कर्ज आणि प्रतिकुल परिस्थितीशी झगडणार्या एका सामान्य शेतकर्याची कहाणी अर्थात ’दावण’, हा लघुपट पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/B9IDtBKvvNk
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आवाहन
👉 इंफाळ - 32 आमदारांच्या पाठिंब्यासह भाजपने मणिपूरमध्येही सत्ता स्थापनेचा केला दावा, भाजपला एनडीएच्या राजकीय पक्षांचा तसेच अन्य 2 आमदारांचा मिळाला पाठिंबा
👉 इंफाळ - मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा पदाचा राजीनामा देण्यास नकार, काँग्रेसकडे बहुमताचा आकडा गाठण्याइतपत संख्याबळ असल्याचा इबोबी सिंह यांनी केला दावा
👉 लातूर - आंदोलनं होऊ द्या, आंदोलनाला घाबरायला मी काय ब्राह्मण आहे? राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातुरात केले वादग्रस्त विधान
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - धारावीतील संगम गल्लीमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू, पोलिस घटनास्थळी, मृताची ओळख अद्याप पटली नाही, आरोपीचा पोबारा
👉 भिवंडी - काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्या, सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह 19 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे ठाणे पोलिस आयुक्तांचे आदेश
👉 नाशिक - सिन्नर तालुक्यातील खंडागळी शिवारात तीन दिवसांत आज सकाळी दुसरा बिबट्या जेरबंद, कैलास ठोक यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या
👉 रत्नागिरी - मौजे कळंबुशी येथे होळी नेताना जुना लाकडी पूल कोसळला, ग्रामस्थ जखमी, 11 जणांवर उपचार सुरू
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28,946.23, निफ्टी : 8934.55, सोने भाव : 28,271 (प्रतितोळा), चांदी : 40,541 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 शाओमीने भारतात आपले मी इन-इयरफोन प्रो एचडी हे मॉडेल 1499 रूपये मूल्यात केले लाँच, ग्राहकाला एका सेटसोबत चार ‘इयरबड’ प्रदान करण्यात येतील
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - ज्युनियर अॅथलेटिक्समधला भारताचा विश्वविक्रमी भालाफेकपटू नीरज चोप्रा ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलाच्या सेवेत दाखल
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - लोकप्रिय हास्य बालकलाकार सलोनी दैनी आगामी टीव्ही शो 'एमटीव्ही बीग एफ सिझन 2' मध्ये झळकणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 दातांवर डाग का पडतात?
Let's Up Health Katta
रोज वेळेवर ब्रश करूनही अनेकदा काही दिवसांनी पांढरे शुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. जर आपण दातांची योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो आणि दातांवरचे डाग वाढू लागतात...
👉 दातावर डाग पडण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी. तसेच सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो.
👉 दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दररोज दोन वेळा दात घासायला हवेत. खाल्ल्यानंतर चूळ भरायला हवी. दातांच्या पोकळ्यांमध्ये अन्नकण साठू लागल्याने दात पिवळे पडतात आणि त्यांची झीज होते.
👉 फ्लोराइडचे प्रमाण जास्त असलेली टूथपेस्ट किंवा पाण्याचा वापर केल्याने दातांचा पांढरा रंग फिका होऊ लागतो. यामुळे फ्लोरोसिस नावाचा विकार होतो. या विकारामुळे दात पिवळट करडे दिसू लागतात. त्यांची झीज होते. या विकारात दातांवर पांढरट डाग पडतात.
👉 औषधांमुळेही दातांवर परिणाम होतो. बेनेड्रिल, प्रतिजैविकं आणि उच्च रक्तदाबावरच्या साध्या औषधांमुळे दात पिवळे पडतात. आयर्न सिरप आणि माउथवॉशमध्ये असलेल्या घातक रसायनांमुळे दातांवर डाग पडतात.
👉 वय वाढलं की, दात पिवळे पडू लागतात. वाढते वय दातांवर परिणाम करू लागते. वाढत्या वयात दातांवरच्या एनामलचा थर कमी होतो. धूम्रपान आणि मद्यपान करणार्या ज्येष्ठ नागरिकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
👉 तोंडातल्या लाळेमुळे कोणत्याही जंतूसंसर्गापासून संरक्षण मिळते. लाळेमुळे तोंडातल्या पीएचची पातळीही नियंत्रणात राहते. आजार किंवा जंतूसंसर्गामुळे लाळेची निर्मती कमी प्रमाणात होत असेल तर दातांवर डाग पडू शकतात.
👉 जीवनशैलीत काही बदल करून तसेच तोंडाचं आरोग्य राखून दातांवरच्या डागांची समस्या कमी करता येऊ शकते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 विद्याने दिला आठवणींना उजाळा...
Let's Up Entertainment Katta
अभिनेत्री विद्या बालनने होळी निमित्ताने तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यानिमित्ताने वयाच्या सोळाव्या वर्षी नकळत प्यायलेल्या भांगेमुळे दिवसभर आपण कसे हसत राहिलो याची आठवण तिने सांगितली. त्याचबरोबर रंगांचा हा उत्सव हा आपला आवडता सण असल्याचेही सांगितले.
होळीनिमित्त बनत असलेली इमृती ही एक प्रकारची जिलेबी तिचे आवडते पक्वान्न असल्याचे आणि रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणे सर्वात आवडते असल्याचेही ती म्हणाली. होळी म्हटले की, हे गाणे आठवणे अपरिहार्य आहे असेही तिचे म्हणणे आहे. रंग खेळत असताना सावधानी हवी असे सांगताना विद्या म्हणते, रंगांमुळे त्वचा व केस खराब होतात त्यामुळे रंग खेळण्याअगोदर खोबरेल तेल अवश्य केसांना व अंगाला लावावे. आगामी बेगमजान बद्दल बोलताना ती म्हणाली यात 1947 मध्ये झालेल्या भारत पाक फाळणीची पार्श्वभूमी असून यात विद्याने वेश्यालयाच्या मावशीची भूमिका केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इला अरूण, गहरखानसह 11 अभिनेत्री आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 ‘ट्रॅप्ड’ इंटरव्हलशिवाय दाखवला जाणार
‘ट्रॅप्ड’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे या सिनेमाची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली. या सिनेमातून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. या अनुभवात कुठेही खंड पडू नये म्हणून या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी इंटरव्हलशिवाय खेळ दाखवला जाणार आहे. त्यामुळे या सिनेमाचा विनाखंड अनुभव घेता येणार आहे.
विक्रामादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ या सिनेमाचा कालावधी एकूण 105 मिनिटांचा असून हा सिनेमा येत्या 17 मार्चला रिलीज होणार आहे. ‘Trapped’ हा सिनेमा एका अपार्टमेंटमध्ये अडकून पडलेल्या एका व्यक्तीची रोमांचक, थ्रिलर कथा आहे. हा व्यक्ती एका अपार्टमेंटमध्ये अडकला आहे आणि त्याच्याकडे ना पिण्यासाठी पाणी आहे, ना खाण्यासाठी अन्न, नाही इलेक्ट्रिसीटी. अशात तो त्याची सुटका कशी करतो. सुटका करतो का? हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाला लगातार बघण्यात अधिक मजा आहे. इंटव्हलमुळे कॅरेक्टरच्या भावनांचा फिल घेता येणार नाही. त्यामुळेच इंटरव्हलशिवाय सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
इंटरव्हलशिवाय सिनेमा रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘धोबी घाट’ या सिनेमावेळीही असच रिलीज करण्यात आले होते.
👉 राम गोपाल वर्माचं पुन्हा आक्षेपार्ह ट्वीट
महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनचा संदर्भ घेत दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. आता पुन्हा होळीच्या शुभेच्छा देताना आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. ‘होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात’, असे ट्वीट राम गोपाल वर्माने केले आहे. ‘मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो’ असेही वर्माने म्हटले आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 सनग्लासेस निवडताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
Let's Up Faide Ki Baat
उन्हाळा आला की, आपल्याला आठवण येते ती सनग्लासेसची. विशेषतः तरुणांमध्ये या सनग्लासेसची क्रेझ जास्त पहायला मिळते. आपल्याकडे जसे ब्रँडेड सनग्लासेस मिळतात, तर रस्त्यावर स्वस्तात मस्त स्टाईलिश असे सनग्लासेस देखील मिळतात. त्यातून एखाद्या हिरो-हिरोईनची सनग्लासेसची स्टाईल आपल्याला आवडली की, आपण तशाच प्रकारचे सनग्लासेस घेतो. पण कधी-कधी तिथेच चुकतो. कारण ते आपल्या चेहर्यावर साजेसे दिसतच नाहीत. म्हणूनच सनग्लासेसची निवड करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यावर एक नजर टाकुयात...
👉 साधारण आपल्या चेह-याचे आकार बदामाकृती, गोलाकार, अंडाकृती आणि चौकोनी असे असतात. तुमच्या चेहर्याचा आकार कोणता हे पहिलं शोधा. साधारण चौकोनी चेहर्याची माणसं सोडली तर सगळ्यांना रेट्रो स्क्वेअर आकारातले सनग्लासेस छान दिसतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 वेगवेगळ्या स्टाईलचे सनग्लासेस निवडताना आपल्या चेहर्याची ठेवण कशी आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे सनग्लासेसची निवड करा. बदामी, गोलाकार चेहर्याच्या माणसांना कॅट आय सनग्लासेस, अंडाकृती, चौकोनी चेहर्याच्या माणसांना एव्हिएटर प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात. त्याचप्रमाणे अंडाकृती चेहर्यांच्या माणसांना ओव्हर साईझ सनग्लासेस देखील छान दिसतात.
👉 सनग्लासेसचा एकदा आकार ठरला की, मग कोणत्या रंगाचे सनग्लासेस निवडायचे ते ठरवा. हा रंग ठरवताना देखील आपल्या त्वचेचा रंग लक्षात घ्या. स्कीन टोन दोन प्रकारचे असतात एक कूल आणि दुसरा वॉर्म स्कीन टोन. जर तुमच्या त्वचेचा रंग साधारण गुलाबी असेल आणि हातांच्या नसांचा रंग निळा असेल तर तुमचा स्कीन टोन कूल आहे. जर त्वचेचा रंग सोनेरी किंवा बदामी असेल आणि हातांच्या नसांचा रंग हिरवा असेल तर तुमचा स्कीन टोन वॉर्म आहे असे समजावे.
👉 कूल स्कीन टोनच्या व्यक्तींनी निळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी आणि गुलाबी, करडा, काळा, गुलाबी, जांभळ्या किंवा प्रिंटेड रंगछटा असेल्या फ्रेम निवडाव्यात.
👉 वॉर्म स्कीन टोनच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी.
👉 तसेच सनग्लासेस निवडताना ते युव्ही प्रोटक्टेड आहेत की नाही हे पाहून घ्यावे. कारण सनग्लासेसचा उपयोग डोळ्यांचे उन्हापासून रक्षण करणे हा आहे. रस्त्यावरून चालताना बिल्डिंग, गाडीच्या काचा यावरून प्रकाश परावर्तित होऊन तुमच्या नाजूक डोळ्यांवर पडत असतो. त्यामुळे डोळ्यांना याचा त्रास होऊ शकतो.
👉 युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेसच्या लेन्सवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केली जाते. यामुळे सूर्यापासून निघणारे प्रकाशकिरण परावर्तित होतात आणि डोळ्यांना थंडावा मिळतो.
👉 सनग्लासेसच्या लेन्स ग्रीन, ब्राऊन, यलो, ब्ल्यू, ग्रे आणि पिंक अशा रंगात येतात. या रंगांचा वेगवेगळा उपयोग आहे. ग्रीन रंगाचे सनग्लासेस हे सगळ्याच ठिकाणी वापरायला योग्य आहेत. हे तुम्ही पावसाळ्यात आणि सूर्यप्रकाशात देखील वापरू शकता.
👉 ब्राऊन किंवा अंबर रंगाचे सनग्लासेस ढगाळ किंवा प्रखर उन्हाच्या ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे. तुम्ही जर आउटडोर स्पोर्ट अॅक्टिव्हिटी करत असाल तर अशा रंगाचे सनग्लासेस घ्या.
👉 तुम्ही गिर्यारोहणाला किंवा थंड हवेच्या ठिकाणी राहत असाल किंवा फिरायला जात असाल तर यलो शेडचे सनग्लासेस घ्या, कारण या सनग्लासेसमुळे धुसर ठिकाणी स्पष्ट दिसण्यास मदत होते.
👉 जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर निळ्या काचेचे सनग्लासेस वापरणे टाळा.
👉 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 3 ते 4 तासांहूनही अधिक काळ उन्हात फिरत असाल तर रस्त्यावरून घेतलेले स्वस्त सनग्लासेस वापराने टाळा. कारण यामुळे तुमच्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
🎯 आता फेसबुकवर शोधा सिटी
Let's Up Techno Katta
फेसबुक नेहमीच सोशल नेटवर्कींगच्या पलीकडे जाऊन आपल्या युजर्सला नवनवीन फिचर देण्याचा प्रयत्न करत असते. त्यात फेसबुकने नुकतेच ‘सिटी गाईड’ हे फिचर अॅड केले असून या फीचरमुळे कोणत्याही युजरला विविध ठिकाणांबद्दल माहिती मिळणार असून या फिचरची सुविधा ‘ट्रिप अॅडव्हायजर’ या संकेतस्थळाप्रमाणे देण्यात आली आहे.
या फिचरमध्ये आंतरराष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंतच्या सर्व ठिकाणाचा समावेश असणार आहे. फेसबुकच्या कोणत्याही युजरला त्याच्या मित्रांनी भेट दिलेली शहरे आणि त्यातील विविध ठिकाणांची माहितीसुद्धा पाहता येणार आहे. सोबतच या ठिकाणांना भेट देण्याच्या नियोजनासाठी त्या ठिकाणांना ‘प्लॅनर’मध्ये टाकता येणार आहे. याची सर्व माहिती ‘एक्सप्लोअर’ या एकाच ठिकाणी पाहता येणार असून सध्या हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस प्रणाली वापरणार्या युजर्सला देण्यात आले आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 लेनोव्होचा स्वस्तातला 4G स्मार्टफोन
भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हल स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात याच गोष्टीचा आधार घेऊन लेनोव्होने नवीन 'व्हाईब बी' हा 4G स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला असून हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असणार आहे.
👉 या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच आकाराचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच 854 बाय 480 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
👉 या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि इनबिल्ट स्टोअरेज 8 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
👉 अँड्रॉइडच्या मार्शमॅलो व्हर्जिनवर हा स्मार्टफोन चालणार आहे.
👉 यामध्ये मुख्य कॅमेरा 5 मेगापिक्सल तर फ्रंट 2 मेगापिक्सलचा असणार आहे.
👉 बॅटरीची क्षमता 2000 मिलीअँपिअर असणार आहे.
👉 'लेनोव्हो व्हाईब बी' या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,799 रूपये असणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या 15 मार्चच्या आढावा बैठकीत पेट्रोल-डिझेलचे दर दोन ते अडीच रुपये प्रतिलिटर कमी होण्याची शक्यता
👉 नवी दिल्ली - गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर 2016 या नऊ महिन्यात बँकेच्या फसवणुकीच्या यादीत ICICI बँक अव्वल, तर SBI बँक दुसऱ्या क्रमांकावर, RBI ने केली आकडेवारी प्रसिद्ध
👉 नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच सन्मानपत्र एक महिन्यानंतर दिल्ली जवळच्या संगम विहारमधील जंगलात सापडलं
👉 हरिद्वार - हेलिकॉप्टरमध्ये चढताना हात सुटल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घसरले, या घटनेत त्यांना किरकोळ जखम झाली असून, आता ते सुखरुप आहेत
👉 छत्तीसगड - सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रसाठा केला जप्त
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 इस्लामाबाद - कुख्यात दहशतवादी हाफिझ सईदचा मेहुणा हाफिझ अब्दुल रेहमान मक्की याची जमात उल दावा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती
👉 हैती - हैती राज्यातील गोनाइव्ह शहरात गजबजलेल्या बाजारात एका अनियंत्रित बसने घेतला 34 जणांचा बळी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे मनोहर पर्रिकरांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण, बहुमत सिद्ध करण्यासाठी दिली 15 दिवसांची मुदत
👉 नवी दिल्ली - मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षकांचा अहवाल आल्यानंतर अमित शाह निर्णय घेणार : जे.पी. नड्डा,भाजपा नेते
👉 नवी दिल्ली - मनोहर पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा अजून दिलेला नाही, गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याआधी त्यांना राजीनामा द्यावा लागेल : नितीन गडकरी
👉 मणिपूर - भाजप, एनपीपी आणि लोकजनशक्ती पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार, भाजप नेते राम माधव यांची माहिती
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 10 लाखाची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
👉 नाशिक - चंदू चव्हाणने केले रामकुंडावर आजीच्या अस्थीचे विसर्जन, देशाने मला वाचवले व देशवासियांना माझ्यावर खूप प्रेम केले त्याबद्दल धन्यवाद
👉 सातारा - वाई तालुक्यात बुवाबाजी करणारे 5 भोंदू देवऋषी 'अंनिस'च्या जाळयात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
👉 यवतमाळ - बलात्कार प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यास हयगय करणारे मारेगावचे सहायक पोलीस निरीक्षक निलंबित, ठाणेदार संजय शिरभाते यांची नियंत्रण कक्षात बदली
👉 रत्नागिरी - खेड तालुक्यातील कळंबणी येथे स्विफ्ट कार आणि ट्रक अपघातात 3 ठार, तर दोघे गंभीर जखमी
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘सिटी गाईड’ हे फिचर दिले, याच्या मदतीने कुणालाही एखाद्या शहरातील विविध ठिकाणांबद्दल माहिती मिळणार आहे
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक 3 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट, वीणाचा चित्रपटसृष्टी पुनरागमनाचा निर्णय न पटल्याने त्यांचा काडीमोड होत असल्याचे वृत्त
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावरून यशस्वीरित्या प्रक्षेपण, पाकिस्तानसह चीनचे धाबे दणाणले
👉 नवी दिल्ली - ‘एअर इंडिया’ने मार्च 2015 पर्यंतच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 100 कोटी डॉलर्स; अर्थात 6 लाख 64 हजार 950 कोटी रुपयांचा तोटा दडविला, ‘कॅग’चा ठपका
👉 नवी दिल्ली - इराणच्या आग्नेयेला असलेल्या चाबाहर बंदराच्या विकासाचा पहिला टप्पा 2018 साली पूर्ण करू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
👉 बिलासपूर - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 12 सीआरपीएफ जवान शहीद, 4 गंभीर जखमी, सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 भारतीय वंशाचे अमेरिकन अॅटर्नी प्रीत भरारा यांनी पायउतार व्हावे अशी सूचना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने केली आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - अतिशय बोलकी आहे. आपल्याला 2019 विसरुन 2024 च्या निवडणुकीची तयार करायला हवी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
👉 नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जनतेचे धन्यवाद, भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय : नरेंद्र मोदी
👉 नवी दिल्ली - बसपच्या पराभवासाठी ईव्हीएमना जबाबदार धरण्याचा मायावतींचा आरोप ऐकून वाईट वाटलं... मतदारांचा मूड बदलतोय, या वास्तवाचा स्वीकार करण्याची गरज : योगेंद्र यादव
👉 नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या विजयाबद्दल मी नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
👉 लखनौ - भारतीय जनता पक्षाने मतदानयंत्रात घोटाळा करून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकल्या, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा आरोप
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील विजयाबाबत भाजपचे अभिनंदन करत आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली
👉 धुळे - पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर धुळ्यात परत, धुळ्यात त्याचं जंगी स्वागत
👉 औरंगाबाद - मोंढा नाका उड्डाण पुलावर 10 मिनिटांमध्ये दोन विचित्र अपघात, 7 कार एकमेकांवर धडकल्या
👉 सांगली - म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास आता उपअधीक्षक दीपाली काळे करणार : पंकजा मुंडे
👉 शिर्डी - साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे आणि मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांना 20 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, पोस्टाने आलेल्या निनावी पत्रात ही धमकी देण्यात आली
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - आता प्रिमीयम आणि आधुनिक वाहनांवर कंपनी जास्त भर देणार असल्याने ह्युंदाईने आय 10 कारचे प्रॉडक्शन भारतातून बंद करण्याचा निर्णय घेतला
🎯 खेळ घडामोडी :
👉 दुबई - एकदिवसीय क्रमवारीत एबी डिव्हिलियर्स अव्वल, यादीत दुसर्या स्थानावर वॉर्नर असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसर्या स्थानावर
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - सध्या तापसी पन्नूच्या आगामी नाम शबाना या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु, या चित्रपटातील 'जिंदा' हे गाणे रिलीज
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आता ‘नीट’ परिक्षा उर्दुतही...
Let's Up Current Affair
एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'नीट' परीक्षा उर्दु माध्यमातही सुरू करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, यावर्षी ही अंमलबजावणी करता येणार नाही, असे सरकारने न्यायालयात सांगितले आहे. सध्या हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, उडीया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड भाषेत नीट परिक्षा देता येते.
न्यायमूर्ती कूरियन जोसफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर केंद्र सरकारकडून बाजू मांडताना अॅड. रंजीत कुमार यांनी सांगितले की, नीट-2017ची प्रक्रिया सुरू झाली असून यावर्षी उर्दू माध्यमातून परिक्षा घेता येणे संभव नाही. ते म्हणाले, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत कोणत्याही राज्याकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. मात्र, पुढील वर्षापासून उर्दू माध्यमातून परिक्षा घेण्यास मंजुरी देता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
मुव्ही रिव्ह्यू : ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’... जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/hGblSw
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
याबाबत स्टूडेंट्स इस्लामिक ऑरग्नायझेशनने (एसआयओ) याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, महाराष्ट्र आणि तेलंगणाने नीट परिक्षा उर्दू माध्यमात घेण्यात येण्यास परवानगी असेल असे एमसीआयला सांगितले होते.
👉 8 वर्षांनी सापडले भारताचे ‘चांद्रयान-1’
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्त्रो’ ने चंद्रावर पाठवलेले भारताचे पहिले मानवरहित यान ‘चांद्रयान-1’ चंद्राभोवती चक्कर मारताना दिसून आले आहे. नासाच्या ‘लुनर रिकोनाइस ऑर्बिटर’चा आणि ‘चांद्रयान-1’चा एकत्रित शोध घेताना चांद्रयानाचा शोध लागला आहे.
नासाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या पृष्ठभागापासून दूर 200 किमी अंतरावर हे ‘चांद्रयान-1’ एका कक्षेत आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये श्री हरीकोटा येथून इस्त्रोने पहिल्या चंद्रयानाचं प्रक्षेपण केलं होतं. चंद्राभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर 2009 पासून त्याच्याशी इस्त्रोचा संपर्क तुटला. हे यान शोधण्यासाठी इंटर प्लानेटरी रडारचा वापर करण्यात आला. या रडारचा उपयोग लघुग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
🎯 सॅमसंगच्या मोबाईलवर खास ऑफर
Let's Up Techno Katta
लवकरच फ्लिपकार्ट सॅमसंग मोबाईल फेस्ट आणणार आहे. या फेस्टमध्ये सॅमसंगच्या मोबाईलवर खास ऑफर मिळणार आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत…
👉 सॅमसंग गॅलक्सी On5 : याच्या किंमतीत 2,860 रुपयांची सूट मिळणार असून हा स्मार्टफोन 6,990 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
👉 सॅमसंग गॅलक्सी On Nxt : याच्या किंमतीत 2590 रुपयांची सूट दिली आहे. याचा ब्लॅक आणि गोल्ड हे दोन्ही व्हेरिएंट आता 15,900 रुपयांत खरेदी करता येणर आहेत. याची किंमत 18,490 रुपये होती. या डिव्हाईसवर एक्सचेंज ऑफरही आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 सॅमसंग गॅलक्सी J5 (2016) : या स्मार्टफोनवर 2300 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 10,990 रुपयांत उपलब्ध आहे.
👉 सॅमसंग गॅलक्सी On8, गॅलक्सी On7 : सॅमसंग गॅलक्सी On8 वर 2,000 रुपयांची सूट तर गॅलक्सी On7 वर 1700 रुपयांचं डिस्काउंट मिळणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 13,900 आणि 8,490 रुपयांत उपलब्ध असेल.
👉 सॅमसंग गॅलक्सी A9 Pro आणि गॅलक्सी C9 Pro : या दोन्ही डिव्हाईसवर कोणतीही सूट नसली तरी हे दोन्ही स्मार्टफोन ईएमआयवर उपल्बध आहे. त्यावर कोणतंही व्याज आकारण्यात येणार नाही.
🎯 कार्बन ‘ऑरा स्लीक फोर-जी’ची लिस्टींग
‘ऑरा स्लीक फोर-जी’ हे मॉडेल कार्बन कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले असून हे मॉडेल लवकरच ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याच्या किंमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यात 5 इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच 854 बाय 480 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल.
याची रॅम 1 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 8 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरे हे अनुक्रमे 5 व 2 मेगापिक्सल्सचे तर बॅटरी 2000 मिलीअँपिअर क्षमतेची राहणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 किडनी स्टोन जाणवतोय?
Let's Up Health Katta
उन्हाळा सुरु होताच अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, घाम येणे, उन्हाळ्या लागणे व डीहायड्रेशन सारख्या त्रासाला नेहमीच तोंड द्यावे लागते. तर काही जणांना उन्हाळ्यामध्येच अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत तर काय काळजी घ्यावी त्यासाठी विशेष...
👉 भरपूर पाणी प्या : पाण्याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स व किडनी स्टोनसाठी कारणीभूत असणारे टाकाऊ मीठ बाहेर टाकले जाते. यामुळे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने किडनी स्टोन व इतर आरोग्य समस्या उद्भवत नाहीत. ताज्या फळांचा रस, ताक, लिंबू पाणी ही पेय देखील पिल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित होते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 खाण्यावर नियंत्रण : अति मीठामुळे तुमच्या हाडांमधील कॅल्शियम बाहेर टाकले जाते तर अति साखरेच्या पदार्थामुळे देखील शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढते या दोहोंचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारात साखर व मीठ कमी प्रमाणात घ्या. तसेच स्टोनची समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम व ऑक्सिलेटयुक्त पदार्थांचे प्रमाण आहारात कमी ठेवा.
👉 डॉक्टरांचा सल्ला घ्या : अति प्रमाणात घेतलेले अॅन्टासिड व कॅल्शियमच्या गोळ्या देखील हानिकारक ठरु शकतात. या औषधांमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. जर तुम्ही अशी औषधे घेत असाल तर याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्या. कारण कदाचित या औषधांचे सेवन कमी करुन तुम्हाला तुमच्या शरीरात किडनी स्टोन विकसित होणे टाळता येऊ शकते.
👉 लघवी थांबवू नका : बराच काळ लघवी थांबवून धरणे तुमच्या किडनीसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण लघवी तुमच्या मूत्राशयामध्ये जेवढा वेळ जमा होईल तेवढा वेळात मूत्राशयातील टाकाऊ मिनरल्स आणि मीठाचे किडनीस्टोनमध्ये रुपांतर होण्यास मदत होईल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - 2012 मध्ये मारुती सुझुकीच्या मानेसर येथील प्लांटमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी 31 जण दोषी तर 117 जणांची निर्दोष मुक्तता
👉 नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 6 नॉन बॅंकिंग फायनान्सशिअल कंपन्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द केल्याची माहिती
👉 नवी दिल्ली - न्यायाधीश टी. बी. राधाकृष्णन यांची छत्तीसगड तर हेमंत गुप्ता यांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती
👉 नवी दिल्ली - भारताने चंद्रावर पाठवलेले पहिले मानवरहित यान, चंद्रयान 1 चंद्राभोवतीच भ्रमण करीत असल्याचा दावा ‘नासा’ने केला
👉 उत्तर प्रदेश - मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कारगिलमधील 101 शहिदांच्या कुटुंबियांच्या पेन्शनसाठी 54 लाख 90 हजार रूपये केले मंजूर
👉 चेन्नई - देशातील विविध बँकाची 9 हजार कोटी रुपयांची देणी असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तडजोडीची तयारी दर्शवली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 काठमांडू - नेपाळच्या पश्चिम भागात एका बसचा अपघात होऊन बस नदीत कोसळली, या दुर्घटनेत जवळपास 25 जण ठार
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश - सर्व देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
👉 मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या दोन कारवायांत 126 आयफोनसहित साडे सोळा लाख किमतीचे सोने जप्त
👉 नागपूर - महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी दर दिवशी किमान सात शेतकरी आत्महत्या करीत होते, अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारने नागपूर खंडपीठासमोर सादर केली
👉 पुणे - शनिवार, रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस बँकांना सुट्टी, त्यामुळे बँकांद्वारे होणार्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता
👉 धुळे - पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले जवान चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार, गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
👉 औरंगाबाद - स्कूल व्हॅनच्या चालकाने नववीत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना, आरोपीला सोलापूर येथून अटक
👉 पुणे - चित्रपटात काम देतो असं सांगून युवतीची 10 हजार रुपयांची फसवणूक, निगडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
👉 जालना - पालिकेच्या विविध प्रभागांत खोदण्यात आलेल्या जवळपास 250 विंधन विहिरी गायब झाल्याचे धक्कादायक वृत्त
👉 अंबाजोगाई - विहिरीत पडलेल्या स्वत:च्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेल्या वडिलांचा मृत्यू मात्र, मृत्यूपूर्वी स्वत:च्या मुलाला वाचवण्यात या धाडसी वडिलांना यश
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य 33 खेळाडूंची नावे केली जाहीर, बेंगळुरू येथील साई केंद्रात 14 मार्चपासून शिबिराला सुरुवात होणार
👉 मुंबई - महाराष्ट्राचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंह यादव हरियाणाच्या सॅफ गेम्स सुवर्णपदक विजेत्या पैलवान शिल्पी शिवरानसोबत विवाहबंधनात अडकला
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - ‘जग्गा जासूस’ सिनेमाचे चित्रीकरण करत असताना अभिनेत्री कतरिना कैफ जखमी, तिच्या अंगावर जड वस्तू पडल्याने मान व पाठीला दुखापत
🎯 स्थानिक घडामोडी :
👉 अहमदनगर - केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ मागे घ्यावी म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयात 'चूल पेटवा' आंदोलन
👉 अहमदनगर - जामखेड न्यायालयात घरगुती वादाच्या खटल्यात साक्ष देताना विमल अण्णासाहेब आजबे या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
👉 अहमदनगर - ‘महावितरण’ने नगर व पारनेर तालुक्यात 327 वीजचोर पकडले असून, यापैकी 130 जणांकडून 36 लाखाची दंड वसुली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 तुमच्या यशातील अडथळे कोणते?
Let's Up Think Katta
भरपूर मेहनत घेऊनही हवा तसा रिजल्ट मिळत नाही. अशी बऱ्याच जनांची तक्रार असते. म्हणून केलेल्या कामाचं सार्थक होण्यासाठी त्यामागील कारणांचा शोध लावणे व त्यावर सोल्युशन शोधणे फार महत्त्वाचे ठरते. आपल्या दैनंदिन जिवनातील पुढील सवयी हेच तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळे असू शकतात. त्यावर एकर नजर टाकुयात...
👉 अतिकाम हानिकारक : दिवसभर काम केल्यानंतरही काही जण घरी येऊन काम करतात तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. कारण झोप ही मेंदुला व शरिराला आराम देण्यासाठी आवश्यक असते. त्याही वेळेत जर तुम्ही काम करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या कामाच्या गुणवत्तेवर होतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 इंटरनेटचा अनावश्यक मोह : बऱ्याचदा काहीही कारण नसताना आपण हातातील काम अर्धवट सोडून सोशल नेटवर्किंग साइट्सवर लॉगइन करून त्याठिकाणी बराच वेळ घालवतो. शेवटी हातातील कामाला महत्त्व देत इंटरनेटच्या अनावश्यक मोहाला बळी न पडणे हे आपल्याच हातात असते.
👉 पोटभर ब्रेकफास्ट करा : घरातून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करणे फार महत्त्वाचे ठरते. सकाळी केलेला पोटभर ब्रेकफास्ट दिवसभर एनर्जी टिकवून ठेवतो. ब्रेकफास्ट न करताच बाहेर पडून त्याबदल्यात दुपारी कितीही जेवण केले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही.
👉 उद्यावर काहीच ढकलू नका : एक काम होते यार! जाऊ दे उद्या करतो… आज कंटाळा आलाय. असं म्हणून उद्यावर काहीच ढकलू नका. तुम्ही तुमच्या कामांना सिरियसली घेतले तर तुम्ही वेळेत केलेली कामं तुम्हाला सिरियस रिजल्ट देतील.
👉 अनावश्यक मीटिंग : काम करताना, गरज नसताना मिटिंग घेण्यात वेळ वाया घालवू नये. काही कामं फोनवर अथवा इमेलच्या माध्यमातून होत असतील तर उत्तम.
👉 एका वेळेस एकच काम करा : मी सर्व एकाचवेळी करू शकतो, मला हेही जमतं, मला तेही यतं असं म्हणत सर्वकाही अंगावर घेऊ नका. एका वेळेस एकच काम करा. यामुळे हाती घेतलेले काम व्यवस्थित कुठलेच टेन्शन न घेता पुर्ण होईल.
👉 कामाचे नियोजन करा : प्रत्येक कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे नियोजन तयार करा. कुठलेही काम हाती घेऊन ते केल्यास तुम्ही महत्त्वाची कामं उशीरा कराल परिणामी वेळेवर धावपळ होईल व कुठलेच काम धड होणार नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - क्रेडिट कार्ड वरून वॊलेटमध्ये पैसे भरल्यावर 2 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमने घेतला मागे
👉 नवी दिल्ली - प्रसूती रजा विधेयकाला लोकसभेत आवाजी मतदानाने मंजुरी, त्यामुळे गरोदर महिलांना आता 12 ऐवजी 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार, ही रजा भर पगारी असणार आहे
👉 नवी दिल्ली - उरी दहशतवादी हल्ल्यावेळी पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या दोन अल्पवयीन मुलांना (फैसल हुसैन आणि एहसान खुर्शिद) भारताने दिले सोडून
👉 नवी दिल्ली - पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याचे खाजगी विधेयक केंद्र सरकारने फेटाळले, खासदार राजीव चंद्रशेखर यांनी आणले होते विधेयक
👉 नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधी देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, विनायक राऊत यांची मागणी
👉 नवी दिल्ली - रद्द झालेल्या नोटा 31 मार्चपर्यंत जमा करण्याची परवानगी द्यावी यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली, पुढची सुनावणी 21 मार्चला
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 न्यूयॉर्क - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार, ही गोड बातमी स्वत: झुकरबर्गने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन दिली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मणिपूरमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळणार, 2012 साली आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती आणि आता स्पष्ट बहुमत मिळणार : राम माधव, भाजप नेते
👉 नाशिक - महापौरपदासाठी भाजपच्या रंजना भानसी आणि उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांचा अर्ज दाखल
👉 नाशिक - काँग्रेसकडून महापौरपदासाठी आशा तडवी आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे यांचा अर्ज दाखल, शिवसेना तटस्थ राहणार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - बारावीच्या पेपरफुटीचे सत्र सुरूच, बुक कीपिंग विषयाचा पेपर फुटला, डॉ. टी. आर. नरवणे विद्यालयातील घटना, दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
👉 मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज 15 मार्चपर्यंत स्थगित
👉 मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना दणका, जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे आदेश
👉 मुंबई - 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' नंदन निलेकणी यांना जाहीर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार वितरण
👉 नाशिक - ट्रायल घेताना एसटी पंचवटी बस आगारात घुसली, एसटीचे 5 कर्मचारी जखमी
👉 पुणे - 'पीएपीएमएल'ची दुचाकीला धडक, आयटी इंजिनिअरचा मृत्यू, विजयकुमार स्वामी असं अभियंत्याचे नाव, या अपघाताप्रकरणी बसचालक ताब्यात
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28946.23, निफ्टी : 8934.55, सोने भाव : 28,295 (प्रतितोळा), चांदी : 40,503 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने हिंदीत ‘मशिन लर्नींग’ या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उत्तम दर्जाच्या अनुवादाची सुविधा केली प्रदान
🎯 खेळ घडामोडी :
👉 रांची - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे उर्वरीत कसोटी मालिकेतून बाहेर, स्टार्कच्या पायाला गंभीर दुखापत
👉 नवी दिल्ली - इंडियन प्रीमिअर लीग’च्या (आयपीएल) आगामी दहाव्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलकडे
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - स्टार प्लसवरील 'नच बलिये'च्या मंचावर अभिनेता सिद्धार्थ जाधवचा बायको तृप्तीसोबत थिरकताना दिसणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 उद्यापासून 3 दिवस बँका बंद
Let's Up Current Affair
तुमचे बँकेतील कोणतेही व्यवहार असतील तर ते आजच करून घ्या, कारण उद्यापासून सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यवहारासाठी न थांबता आजच काम करून घ्या.
3 दिवसांच्या सुट्ट्यांनतर बँका थेट मंगळवारी 14 मार्च रोजी चालू होतील. त्यामुळे नागरिकांनी आजच्या दिवसात त्यांचे बँकाचे व्यवहार आटपून घेणेच हिताचे ठरेल. 3 दिवसांच्या सुट्ट्यांचा ताण बँकांच्या 'एटीएम'वरही होणार आहे. त्यामुळे लोकांनी पैशांची गरज भासणार असल्यास आजच एटीएममधून पैसे काढावेत.
या तारखांना असणार बँका बंद -
👉 11 मार्च - दुसरा शनिवार
👉 12 मार्च - रविवारची सुट्टी
👉 13 मार्च - होळीची सुट्टी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 कैद्यांची संख्या ; अमेरिका 1 नंबरवर
जगातील् सर्वाधिक कैदी असलेल्या देशांत अमेरिका 1 नंबरवर आहे. चीनने अमेरिकेच्या मानवाधिकारावर आधारित एक अहवाल नुकताच सादर केला त्यात याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
या अहवालानुसार अमेरिकेत दर 1 लाख नागरिकांमागे 693 कैदी आहेत. 2014 मध्ये अमेरिकेत 22 लाख जणांना तुरूंगात टाकले गेले होते. यावर्षी बंदुक हिंसा संबंधित गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून सध्या अमेरिकी तुरूंगातली कैद्यांची संख्या 7 कोटी आहे. म्हणजेच दर 3 व्यक्तींमागे 1 जण तुरूंगात आहे. अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण विभाग एफबीआयने 26 सप्टेंबर 2016 रोजी जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार 2015 मध्ये बंदुकीचा वापर करून झालेल्या हिंसा घटनात खूनांचे प्रमाण 71.5 टक्के, चोर्यांचे प्रमाण 40.8 टक्के तर हल्ले प्रमाण 24.2 टक्के आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
परीक्षेच्या काळात तणाव कसा टाळावा?
Let's Up Edu Katta
सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. परीक्षा म्हटलं कि ताण-तणाव, चिडचिड आलीच. सर्वात जास्त टेन्शन असतं ते अभ्यासाचं, संपूर्ण वाचून होईल का? वाचलेलं लक्षात राहील का? प्रश्नपत्रिका सोप्पी असेल का? पेपर लिहितानाच जर सर्व विसरलं तर? अशा अनेक शंकांमुळे तणाव वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रहो टेन्शन नही लेने का, फक्त तणाव येऊ नये म्हणून काही गोष्टी टाळणे गरजेच्या आहेत. कोणत्या ते पाहुयात...
👉 परीक्षेच्या कालावधीत तुमचे मन फ्रेश ठेवा, परीक्षेविषयीची कोणतीही शंका मनात आणू नका. जर तुम्ही तणावाखाली आलात तर तुमच्या परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून फक्त अभ्यास करत राहा.
👉 मन शांत आणि संयमी ठेवा, त्यासाठी ध्यान-धारणा किंवा अशा प्रकारच्या रिलॅक्स करणार्या कृती किंवा व्यायाम करू शकता. एखादा फेरफटका मारला किंवा मित्रांची भेट घेतली तर रिलॅक्स व्हायला मदत होते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 जवळ-जवळ सर्वच परीक्षा उन्हाळ्यात असल्यामुळे या दिवसात भरपूर पाणी प्या. शरीर सज्जलित (हायड्रेटेड) असेल तर शरीराचे तापमान संतुलित राहते आणि पेंग येत नाही.
👉 परीक्षेच्या काळात तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीप्रमाणे वेळापत्रक आखणे गरजेचे असते कारण यामुळे तुमचा सगळा अभ्यास वेळेत पूर्ण होण्यास मदत होते.
👉 चित्र किंवा आकृती लक्षात ठेवणे सोपे असते म्हणून अभ्यास करताना चित्र, आकृती किंवा संक्षिप्त नावांचा उपयोग करा. यामुळे परीक्षेच्या आधी उजळणी करताना वेळेची बचत होते.
👉 अभ्यास करत असताना जर एखादे प्रकरण वाचून झाले असेल तर त्यानंतर थोडी विश्रांती घ्या. लगेच नव्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करू नका, त्यामुळे गोंधळ उडतो.
👉 परीक्षेचा पॅटर्न समजावून घ्या. सोबतच उत्तरपत्रिका वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे असते म्हणून परीक्षेचा लेखी सराव करा आणि आपल्या लेखनाचा वेग समजावून घ्या. यासाठी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊ शकता.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - रंगपंचमी खेळताना 500 आणि 2 हजारांच्या नोटांना थोडासा जरी रंग लागला तर अशा नोटा बँका स्वीकारणार नसल्याची बँकाकडून माहिती
👉 नवी दिल्ली - देशात दरवर्षी 5 लाख अपघात होऊन त्यात दीड लाख लोक प्राण गमावतात, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली
👉 मध्य प्रदेश - भोपाळमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राची निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 स्वित्झर्लंडमध्ये एका कॅफेत झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याचे एएफपीचे वृत्त
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपला सत्तेची संधी, तर पंजाबमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाची शक्यता, विविध वृत्तवाहिन्यांचे एग्झिट पोल
👉 नवी दिल्ली - गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बीबीसीकडे वक्तव्य
👉 मुंबई - महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरले, हा शेवटचा पराभव असेल यापुढे पराभव दिसणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 सातारा येथील जवान दीपक घाडगे पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद, शनिवारी फत्यापूर गावात होणार अंत्यसंस्कार
👉 सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल 24 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार
👉 सांगली - म्हैसाळ भ्रूण हत्याकांडातील डॉ. खिद्रापुरेच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात, गर्भपातातील इंजेक्शन व गोळ्या जप्त
👉 वाशिम - धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वापटी कुपटा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेवून केली आत्महत्या
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - स्टीव्हन स्मिथ आणि पीटर हँडस्कोंब विरोधात आयसीसीकडे केलेली तक्रार बीसीसीआयने घेतली मागे
👉 बर्मिंगहॅम - भारताची आघाडीची खेळाडू आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सायना नेहवाल यांनी आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटासाठी त्याने 17 किलो वजन घटवले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
