LetsUpp Marathi
Open in Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Show more6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
6 624
👉 भाग : 1 कारले लागवड; वाण व पूर्व मशागत
Let's Up Agri Katta
कारले हे सर्वांचे नावडते असले तरी आरोग्याच्या व उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात.
हवामान : कारले हे वेलवर्गीय पीक असून हे साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारले हे उष्ण हवामानातील पीक आहे. महाराष्ट्रामध्ये कडक थंडीचा काळ वगळता वर्षातून दोनदा कारल्याची लागवड करता येते. खरीप हंगामकरिता लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते.
बियाणे : कारल्याच्या लागवडीसाठी 4 ते 5 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागतात.
जमीन, पूर्वमशागत आणि लागवड
कारल्याच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी व सुपीक जमीन आवश्यक असते. जमिनीची चांगली नांगरट करून 2-3 कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या घालून घ्याव्यात. शेवटच्या पाळीच्या वेळी 10-12 टन शेणखत प्रति एकर टाकून घ्यावे. लागवडीसाठी दोन ओळींमधले अंतर मंडप पद्धतीने 2.5 मीटर तर ताटी पद्धतीने 1.5 मीटर ठेवावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 वाण :
हिरकणी : फळे गडद हिरव्या रंगाची, 15 ते 20 सेंमी. लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन 130 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते.
फुले ग्रीन गोल्ड : फळे गडद हिरव्या रंगाची, 25 ते 30 सेंमी. लांब व काटेरी असतात. हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळते.
फुले प्रियांका : या संकरित जातींची फळे गर्द हिरवी, 20 सेमी. लांब व भरपूर काटेरी असतात. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीस योग्य आहे. ही जात केवडा या रोगास बळी पडत नाही. सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
कोकण तारा : फळे हिरवी, काटेरी व 15 सेमी. लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. निर्यातीसाठी अशी फळे योग्य असतात. सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर आहे. कोकण विभागात या जातीच्या लागवडीची शिफारस आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 4 दिवस बँकांना सुट्टी…
Let's Up Current Affair
पुढच्या आठवड्यात बँकांना 4 दिवस सुट्टी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी मंगळवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस बँका सुरु राहतील. त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग 3 दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 पाकमध्ये हिंदू विवाह कायद्याला मंजुरी
पाकिस्तानमध्ये राहणा-या हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, पाकिस्तानच्या सिनेट सभागृहाने हिंदू विवाह विधेयकाला मंजूरी दिली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये राहणा-या अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक अखेर मंजूर झाले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कनिष्ठ सभागृहात या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर आता सिनेट सभागृहाने या हिंदू विवाह विधेयकाला मंजूरी दिली आहे. पुढील आठवड्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल.
या कायद्यानुसार हिंदूसाठी मुलगा व मुलगी यांचे किमान वय 18 वर्ष ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय या कायद्यान्वये विवाह नोंदणी करण्यात येणार आहे. या कायद्यामुळे हिंदूंच्या विवाहाची अधिकृत नोंदणी होणार असल्याने हिंदू महिलांना वाद निर्माण झाल्यास न्यायालयात दावा करणे शक्य होणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 कोहलीची ब्रॅण्ड व्हॅल्यू गगनाला भिडलीय...
Let's Up Sports Katta
सध्या क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दमदार फॉर्मात आहे. त्याचप्रमाणे कोहलीची ‘ब्रॅण्डव्हॅल्यू’ मैदानाबाहेर देखील गगनाला भिडली आहे. कोहलीने गेल्या वर्षात ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल 600 कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. यादीत कोहली दुस-या स्थानावर असून बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान अजूनही अव्वल स्थानावर आहे.
गेल्या वर्षभरात कोहलीने केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. कोहलीने आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डींग करावे यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. 4 मालिकांमध्ये सलग 4 द्विशतक ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. सध्याच्या घडीला कोहली 20 पेक्षा अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.
👉 कैफ होणार गुजरात लायन्सचा सहप्रशिक्षक
गुजरात लायन्सने भारताचा माजी कसोटीवीर मोहम्मद कैफची सहप्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मोहम्मद कैफचा अनुभव आणि त्याचे क्रिकेटचे ज्ञान लक्षात घेता तो आमच्या संघाचे एक बलस्थान ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. कैफचा आजवरचा अनुभव लक्षात घेता त्याला एक मोठी भूमिका देण्याची गरज होती, असे सांगून गुजरात लायन्सचे मालक केशव बन्सल म्हणाले की, कैफच्या त्या भूमिकेचा संघाला निश्चितच लाभ होईल.
👉 जागतिक क्रमवारी ; पीव्ही सिंधू पाचव्या क्रमांकावर
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या पाचमध्ये येणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. गत महिन्यात सैद मोदी ग्रांप्री गोल्ड खिताब जिकल्यावर तिने आत्तापर्यंतच्या करियरचे सर्वश्रेष्ठ रँकींग मिळविले आहे.
21 वर्षीय हैद्राबादी सिंधूचे 69,399 अंक झाले आहेत. लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळविलेली फुलराणी साईना नेहवाल पहिल्या दहात स्थान मिळविलेली दुसरी भारतीय खेळाडू असून ती 9 व्या क्रमांकावर आहे. साईनाने यापूर्वी दोन वेळा जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर येण्याचा गौरव प्राप्त केलेला आहे. पुरूष एकेरीत अजय जयराम 18, के. श्रीकांत 21 तर एसएस प्रणय 23 व्या स्थानावर आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 लवकरच ‘फेसबुक’वर नोकरी शोधता येणार!
Let's Up Techno Katta
ऑनलाईन विश्वातील अधिकाधिक यूजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ‘फेसबुक’ने नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार तूम्ही ‘फेसबुक’चा नोकरी शोधण्यासाठीही उपयोग करू शकणार आहात. अमेरिका आणि कॅनडामधील यूजर्ससाठीच ही सुविधा सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण पुढील काळात ती अन्य देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल.
आजही जी लोक ‘फेसबुक’पासून दूर आहेत. या निमित्ताने ते तरी या सोशल नेटवर्किंग साईटकडे वळतील आणि फेसबुकची प्रसिद्धी वाढेल, असा कंपनीचा हेतू आहे. नोकरीच्या शोधात किंवा काम मिळवण्याच्या शोधात असलेले यूजर्स आज अन्य लिंक्डइन किंवा मॉन्स्टर डॉट कॉम या सारख्या साईटकडे वळतात. तिथे स्वतःचे प्रोफाईल अपडेट करून यूजर्स नोकरीचा शोध घेत असतात. आता नोकरीच्या शोधासाठी इतर कोणत्याही साईटवर वेगळे प्रोफाईल तयार करण्यापेक्षा ‘फेसबुक’वरच्या प्रोफाईलमधूनही तुम्ही तु्म्हाला हवी असलेली नोकरी शोधू शकणार आहात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 पॉवरफुल बॅटरीचा झिऑक्स थंडर लाँच
झिऑक्स कंपनीने पॉवरफुल बॅटरीचा फिचर फोन झिऑक्स थंडर मेगा नावाने भारतीय बाजारात लाँच केला. हा फोन 1803 रूपयांत सर्व रिटेल व ऑनलाईन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनला 4 हजार एमएएचची बॅटरी दिली गेली असून ती 50 तासांचा टॉकटाईम देते असा कंपनीचा दावा आहे.
2.4 इंची डिस्प्ले, सेफ्टी अॅलर्ट म्हणून काम करणारे एसओएस बटण, इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने 32 जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, डिजिटल रियर एलईडी फ्लॅशसह चांगला कॅमेरा, फोर एलईडी टॉर्च, वायरलेस एफएम, मोबाईल ट्रॅकर, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांची भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : प्रोफेसर - जागा : 03 - पात्रता : संबंधित विषयात Ph. D.
पोस्ट : असोसिएट प्रोफेसर - जागा : 02 - पात्रता : संबंधित विषयात Ph. D.
पोस्ट : असिस्टंट प्रोफेसर - जागा : 01 - पात्रता : 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी
पोस्ट : डेप्यूटी रजिस्ट्रार (F&A) - जागा : 01 - पात्रता : 55 % गुणांसह वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी
पोस्ट : प्रोड्यूसर - जागा : 01 - पात्रता : 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी
पोस्ट : सोशल वर्कर - जागा : 01 - पात्रता : 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Social Work)
फी : 1000 रुपये (SC/ST फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : दि. 10 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/WUgm1t
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/jUU0yC
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड मध्ये भरती
पोस्ट : जीवरसायन शास्त्रज्ञ - पात्रता : M.Sc (Medical Biochemistry), 05 वर्षे अनुभव
पोस्ट : सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ - पात्रता : M.Sc (Medical Microbiology), 05 वर्षे अनुभव
पोस्ट : वरिष्ठ लॅब तंत्रज्ञ - पात्रता : MSc(MLT)/BSc(MLT)/ DMLT, 05/07/08 वर्षे अनुभव
पोस्ट : लॅब तंत्रज्ञ - पात्रता : DMLT/BSc(MLT), 03/04 वर्षे अनुभव
एकूण जागा : 500
वय : दि. 01 फेब्रुवारी 2017 रोजी 37 वर्षे
थेट मुलाखत : दि.14 ते 19 फेब्रुवारी 2017 (वेळ सकाळी 10 ते 12)
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/uhxcmd
+917900109534 or hrhcsmumbai@lifecarehll.com
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना
Let's Up Govt. Scheme
सन 1992 पासून ऑगस्ट क्रांती दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषि विभागामार्फत ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श उपक्रम आहे.
गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उददेश आहे.
गाव निवडीचे निकष
👉 गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून 30 टक्कयांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे.
👉 गावाची लोकसंख्या 4,000 च्या आत असावी.
👉 गावाचे महसुली क्षेत्र 1,500 हेक्टरपर्यंत असावे.
👉 गट ग्रामपंचायती अंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते.
👉 ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे.
👉 सप्तसुत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
संस्था निवडीचे निकष
👉 गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
👉 गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील 25 किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे.
👉 ही संस्था शक्यतो जिल्हयातील असावी.
👉 या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी.
👉 संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 3 लाखांपेक्षा कमी असू नये.
👉 संस्थेचा 3 वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक.
लाभार्थी निवड प्रक्रिया
संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या पात्र गावांची निकषांनुसार छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतात. जिल्हा समिती छाननीनंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाचा वस्तुनिष्ठ अहवाल शिफारशीसह राज्यस्तरीय कार्यकारी समितीला सादर केल्यांनतर गावाची निवड होते.
योजनेसाठी संपर्क : सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व राज्य पातळीवरील आदर्शगाव व प्रकल्प योजना कार्यालय, कृषिभवन शिवाजीनगर, पुणे यांच्याशी संपर्क साधावा
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू-काश्मीर - बारामुल्लात पट्टणमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या एका स्थानिक दहशतवाद्यास अटक
👉 नवी दिल्ली - भारतीय नौदलातील भारतीय बनावटीची दुसरी शीडनौका #INSV तारिणी शनिवारी नौदलात दाखल होणार, सर्व महिला क्रूसह विश्वसागरपरिक्रमा तिच्यावरून होणार
👉 नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची 5 न्यायमूर्तींनी घेतली शपथ, न्या. संजय कौल, न्या. मोहन शंतनागौदर, न्या. एस. ए. नाझीर, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. दीपक गुप्ता अशी न्यायमूर्तींची नावे
👉 नवी दिल्ली - 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, साध्वी प्रज्ञाच्या जामिन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगित
👉 नवी दिल्ली - राष्ट्रीय गाण्याला राष्ट्रगीताइतकाच सन्मान देण्याची मागणी करणारी, भाजपचे अश्विनी उपाध्याय यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
👉 नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती यांच्याविरोधात सामुहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी FIR दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
👉 नवी दिल्ली - आशा किरण रुग्णालयातल्या 11 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने समाजकल्याण विभागाकडून अहवाल मागितला
👉 हिमाचल प्रदेश - कुल्लू पोलिसांनी एका अमेरिकी नागरिकाकडून 126 किलो गांजा, 9 लिटर हश तेल आणि 1296 ग्रॅम हशीश केले जप्त
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 अफगाणिस्तानात 76 दहशतवादी लपल्याची भीती, अफगाण दुतावासाकडे सोपवण्यात आली यादी, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमारेषा तात्काळ स्वरुपात बंद
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ला यूपीचा दत्तक मुलगा म्हणवत कितीही नाटक केले तरी त्याचा भाजपला उपयोग होणार नाही : मायावती
👉 नवी दिल्ली - तामिळनाडूचे मंत्री के. ए. सेंगोट्टायन यांची तामिळनाडू विधानसभेचे अण्णाद्रमुकचे पक्षनेते म्हणून नियुक्ती : एआयएडीएमके
👉 नवी मुंबई - शिवसेना-भाजपाला महापालिका निवडणुकांत बहुमत मिळालं नाही तरी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार : रामदास आठवले
👉 नाशिक - सदाभाऊ खोत यांना भाजपात घेण्याचा कुठलाही विषय नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई उच्च न्यायालयाने 19 तारखेचा ड्राय डे उठवला, 23 तारखेला निकाल लागेपर्यंत ड्राय डे राहणार
👉 नागपूर - निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्यांची सेवा घेण्याचे प्रकारण जनहित याचिका म्हणून दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
👉 औरंगाबाद - धन दुप्पट करून देतो अशी थाप मारत महिलेचे दागिने लंपास करणारे 2 भोंदूबाबा अटकेत, साईनाथ जगताप (रा.जामनेर) आणि प्रेमनाथ चव्हाण (रा. अंबड) अशी आरोपींची नावे
👉 अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनता भाजीबाजारात केलं 'फूकट गाजर वाटा आंदोलन, 5 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
👉 कोल्हापूर - बांदिवडेकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या डॉ. प्रकाश बांदिवडेकरला वाढदिवस साजरा करण्यास पोलिसांनी नाकारली परवानगी
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28468.75, निफ्टी : 8821.70, सोने भाव : 29,406 (प्रतितोळा), चांदी : 42,883 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 मेझू कंपनीने मेझू एम5एस हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची केली घोषणा, या दोन्ही व्हेरियंटची रॅम 3 जीबी, कॅमेरे 13 आणि 5 मेगापिक्सल्स, 3300 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट, येत्या काही महिन्यात ते भारतात लाँच करण्यात येईल
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बांगलादेशात भारत-पाकिस्तान भिडणार, 15 ते 26 मार्चदरम्यान बांगलादेशात इमर्जिंग चषक स्पर्धा रंगणार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार, ‘टेड टॉक : नई सोच’ असे शाहरुख होस्ट करणार असणाऱ्या शोचे नाव आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 कर्ज घेताना काय पूर्वतयारी करावी
Let's Up Finance Katta
महागाई आणि बदलत्या राहणीमानानुसार आपल्या सर्वांच्या गरजा वाढतच चालल्या आहेत. या गरजापूर्ण करण्यासाठी मग आपल्याला पैशाची चुणचुण जाणवायला लागते. मग मार्ग उरतो तो कर्जाचा. मग कर्ज मिळवण्यासाठी आपली धावपळ सुरु होते. त्यासाठी आवश्यक बाबींची जुळवा-जुळव करताना नाकी नऊ येते. तुमची हि धावपळ कमी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या बँकेत वा वित्तीय संस्थेत कर्ज प्रकरणाची फाइल सादर करण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्याबद्दल थोडं जाणून घेऊयात...
👉 कर्ज घेताना विविध बँका, वित्तीय संस्थांकडून आकारले जाणारे व्याजदर, त्यांच्या योजना, कर्ज मिळण्यासाठी लागणारा कालावधी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज असते.
👉 तारण कर्ज आणि विनातारण कर्ज यापैकी आपल्याला कोणते कर्ज उपयुक्त ठरणार आहे? हे पडताळून पाहणे आवश्यक असते.
👉 या पूर्वी कर्ज घेतलेल्या ओळखीच्या व्यक्तीशी किंवा या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, नातलग किंवा मित्राशी चर्चा करा.
👉 कर्ज देणाऱ्या विविध योजनांच्या नुसत्या जाहिरातीतील व्याजदराने प्रभावित होऊ नका. त्या-त्या वित्तीय संस्थेत जाऊन व्याजदराबाबत, कर्जावरील काही दराबाबत चौकशी करून कर्ज देणा-या विविध संस्थेतील व्याजदराचा तुलनात्मक अभ्यास करा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 आपण मागणी केलेल्या रकमेपैकी 80 ते 90 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते कारण वित्तीय संस्थांकडून कर्ज देताना आपणाला अपेक्षित असलेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे लागणाऱ्या कर्जाचे बजेट काढून अधिकची फाईल तयार करू शकता.
👉 आपल्या कर्जाची घट कशाप्रकारे होणार आहे? हे जाणून घ्या. कारण आपल्याकडून आकारण्यात येणा-या मुद्दलाच्या रकमेनुसार वित्तिय संस्था कर्जाच्या मूळ रकमेत दैनंदिन घट, मासिक घट आणि वार्षिक घट अशा प्रकारे घट करत असतात. त्यामुळे कर्जाची समान रक्कम,समान कालावधी, समान व्याजदर असले, तरी हप्त्याच्या रकमेत फरक पडत असतो.
👉 कर्जाच्या प्रकारची कोणतीही प्रक्रिया अर्धवट समजून घेऊन कर्जाचा निर्णय घेऊ नका, कर्ज घेताना कर्जाच्या प्रक्रियेविषयी, त्याच्या परतफेडीविषयी तुम्हाला असलेल्या शंकेचे पूर्ण निरसन करून घ्या. एखादी बाब समजली नसेल, तर पुन्हा-पुन्हा विचारा.
👉 काही महत्वाच्या गोष्टी असतात त्यांची चौकशी आवर्जून करा. जसे की, मुदतपूर्व कर्ज फेडण्याची सोय आहे का? त्यासाठी काही पेनल्टी भरावी लागेल का?
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 स्क्रब वापरा आणि त्वचा बनवा हेल्दी!
Let's Up Health Katta
त्वचेची काळजी घेणे स्त्रियांप्रमाणेच पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पण रोजच्या धावपळीत आपल्याकडून त्वचेला क्लिनजिंग, टोनिंग, मॉईश्चरायझिंग करायला वेळच मिळत नाही किंबहुना असं काही असतं आपल्यापैकी कित्येकांना ठाऊकही नसेल. तुमच्या या समस्यवर उपाय म्हणजे खाली आम्ही दिलेले स्क्रब वापरून तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता...
👉 केळी स्क्रब - दोन पिकलेली केळी कुस्करून त्यात पीठीसाखर टाका. पीठीसाखरेने स्क्रब खडबडीत होईल. यात एक चमचा मध टाका. हा पल्प 5 मिनिटे चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून घ्या.
👉 लिंबू स्क्रब - हात व पायांसाठी हे स्क्रब उत्तम आहे. हा स्क्रब बनवण्यासाठी दोन तुकडे केलेले एक लिंबू घ्या. एक तुकडा पिठीसाखरेत बुडवून नंतर त्या तुकड्याने हात व पायांना मसाज करा. 5 ते 7 मिनिटे मसाज केल्यावर कोमट पाण्याने हातपाय धुवून घ्या.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 दही व पपई स्क्रब - हा स्क्रब बनवण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. ती चांगली कुस्करून घ्या. नंतर त्यात 2 चमचे घट्ट दही घाला. 4 थेंब लिंबाचा रस व 1 चमचा मध घाला. या पेस्टने 5 ते 7 मिनिटे मसाज करा.
👉 मध व संत्री स्क्रब - प्रत्येकी 2 चमचे संत्र्याचा गर व ओट्स घ्या. हे मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट 5 मिनिटे वर्तुळाकार दिशेने आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
👉 ओट्स व टोमॅटो स्क्रब - यासाठी तुम्हाला ओट्स, पीठीसाखर व पिकलेला टोमॅटो लागेल. टोमॅटोचे 2 मोठे काप करा. त्यात बारीक केलेले ओट्स व साखर घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर घासून 3 ते 4 मिनिटांनी चेहरा धुवा.
👉 अशी बनवा होममेड टूथपेस्ट...
आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात दात साफ करण्याने होते. दात साफ करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केमिकल असलेल्या टूथपेस्ट मिळतात. या टूथपेस्टमुळे दात स्वच्छ होत असले तरी दात मजबूत होण्याऐवजी अधिकच कमजोर होतात. यावर उपाय म्हणून तुम्ही आपल्या घरच्या घरी टूथपेस्ट बनवू शकता. यामुळे कुठलेही नुकसान न होता दात चमकदार बनतील. यामुळे दाढ मजबूत होते....
साहित्य : खोबरेल तेल - 2 चमचे, खाण्याचा सोडा – 2 चमचे, हळद - 1 चमचा, पुदिन्याच्या पानांचा रस - 10 ते 15 थेंब (पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट)
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात खोबरेल तेल व बेकिंग सोडा घेऊन चांगले मिसळा. यामध्ये पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट व हळद मिसळवून एकत्र करा. हे मिश्रण चांगले फेटून त्याची क्रीम बनवा. एका डब्यात ही क्रीम ठेवून दररोज वापरा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?
Let's Up Political Update
एडीआरने राज्यातील 7 महापालिकांच्या उमेदवारांची पडताळणी केली. त्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात 1641 पैकी 216 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 154 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पहिल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय मनसे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
शिवसेना : 173 पैकी 41 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे तर 28 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
काँग्रेस : 171 पैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
मनसे : 154 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर तर 22 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
भाजप : 151 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर तर 14 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
राष्ट्रवादी : 132 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
👉 पहिल्या टप्प्यात 69% मतदान ; निकाल 23 फेब्रुवारीला
राज्यातील 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी सरासरी 69% मतदान झाले. या 15 जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी 7,700 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 2 कोटी 4 लाख 4 हजार मतदार होते. मतमोजणी आणि निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
जिल्हानिहाय मतदान खालीलप्रमाणे :
अहमदनगर 70.83% I औरंगाबाद 66.22 % I बीड 68.73 % I बुलडाणा 67.31 % I चंद्रपूर 71.75 % I गडचिरोली 71.45 % I हिंगोली 72.49 % I जळगाव 64.14 % I जालना 74.80 % I लातूर 70.31 % I नांदेड 71.69 % I उस्मानाबाद 71.94 % I परभणी 74.94 % I वर्धा 64.93 % I यवतमाळ 70 % Iएकूण सरासरी 69%
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांत प्रचंड पैसा जमा झाला अशा 9 लाख खात्यांमधील व्यवहार शंकास्पद
👉 नवी दिल्ली - दिल्लीमध्ये 2005 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा दिल्ली न्यायालयाने दिला निकाल, 1 दोषी तर 2 जण निर्दोष
👉 इंदोर - 90 वर्षांनंतर भगत सिंग यांची 32 एमएम कोल्ट ऑटोमॅटिक असलेली बंदूक इंदुर येथील सीएसडब्ल्यूटी संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली
👉 भोपाळ आयएसआय हेरगिरी प्रकरणी आरोपी राजन तिवारीला 21 फेब्रुवारीपर्यंत तर अन्य तीन आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 इस्लामाबाद - पाकिस्तानमधील सेहवान येथील लाल शाहबाज कलंदर दर्गाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 चेन्नई - ई पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
👉 मुंबई - राज्यातील पहिल्या टप्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान
👉 मुंबई - हिंम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन सांगा की, भ्रष्टाचार केला नाही - नितीन गडकरी
👉 मुंबई - तुमचा अभिप्राय काय आहे हे पुढील तीन दिवसात कळवावं, भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचं ‘सामना’ला पत्र
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 पुणे - मतदान करा आणि सिनेमा पहा, तिकिट दरात 15 टक्के सूट देण्याचा पुणे मल्टिप्लेक्स थिएटर संघटनेचा निर्णय
👉 मुंबई - काही महिन्यांपूर्वी कोर्टातील कामकाजाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणा-यांविरोधात बार असोसिएशनची हायकोर्टात अवमान याचिका
👉 औरंगाबाद - घरफोड्या राहुल जाधवला गुन्हे शाखेकडून अटक, आरोपी राहुल हा कुख्यात गुन्हेगार कालिम खानचा साथीदार
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीची तुलना सचिन व रिचर्ड्स या दिग्गजांसोबत केली
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - अॅक्शन शैली खूप शानदार असून मला ती दृश्य सहजतेने पार पाडताही येतात त्यामुळे आगामी काळात मी अॅक्शन आयकॉन बनू शकते - जॅकलिन फर्नांडिस
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र प्रवेशपरीक्षा - 2017
Let's Up Job Updates
महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा सेल, मुंबई यांच्या मार्फत राज्यातील विविध महाविद्यालयातील अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवीधर आणि औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘ MHT–CET–2017‘ या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
फी (प्रवेशअर्ज) : 800 रुपये (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC: 600 रुपये)
परीक्षा : दि. 11 मे 2017
निकाल : दि. 04 जून 2017 च्या आधी
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 23 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/s9brZh
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/9x0bRU
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 सर्वोच्च न्यायालयात भरती
पोस्ट : कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - जागा : 57 - पात्रता : पदवीधर, संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि.
वय : दि. 01 डिसेंबर 2016 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट)
फी : 300 रुपये (SC/ST/माजी सैनिक/अपंग: 150 रुपये)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 10 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/wHMk0A
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/WtFR5p
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 घर प्रथमच भाड्याने देताय?
Let's Up Useful Info
अधिकचे उत्पन्न मिळावे म्हणून खोली किंवा घर भाड्याने दिले जाते. तसेच घरांच्या वाढत्या किंमती आणि महानगरांमध्ये स्थलांतरितांचे वाढणारे प्रमाण या गोष्टींमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात ‘रेन्टल होम’ला सध्या मोठी मागणी आहे. पण घर भाड्याने देताना आपण जास्त विचार करत नाही किंवा कायदेशीर बाबी लक्षात घेत नाहीत. त्यामुळे पुढे अनेक कायदेशीर गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणून काय काळजी घ्यावी त्याबाबत थोडं...
👉 योग्य भाडे रक्कम : घर भाड्याने देण्यापूर्वीच भाड्याची योग्य ती रक्कम ठरवणे गरजेचे आहे. हे ठरवताना आजूबाजूच्या परिसराचा थोडा अभ्यास करून त्या परिसरातील घरांसाठी आकारले जाणारे भाडे लक्षात घेणे गरजेचे आहे.
👉 घराला विमा कवच : तुमच्या स्वत:च्या घराचा विमा काढणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण एकदा घर भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्या घरावर तुमचे फार कमी नियंत्रण राहते. विमा काढताना देखील याबाबत आधी तज्ज्ञांशी चर्चा करावी.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 निवड माध्यमांची : घर भाड्याने देण्यासाठीच्या जाहिरातीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करा. तुमची अपेक्षा, घराची विस्ताराने माहिती आणि संपर्कासाठी क्रमांक या महत्त्वाच्या गोष्टी नमूद करा.
👉 भाडेकरार महत्त्वाचा : घर भाड्याने देताना भाडेकरार सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येक भाडेकरार हा लिखित व नोंदणी स्वरूपातच असला पाहिजे. या करारामध्ये नियम व अटी, दरमहा भाडे रक्कम आणि डिपॉझिटची रक्कम याचा उल्लेख असतो.
👉 पोलिसांकडून तपासणी : घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूची माहिती तपासणे सध्याच्या काळात गरजेचे आहे. यासाठी पोलीस विभागाच्या संकेतस्थळावर यासंबंधीचा फॉर्म उपलब्ध असतो. तो फॉर्म भरून आपल्या परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरूच्या ओळखपत्र पुराव्यासह सादर करावा. त्यानंतर पोलीस संबंधित भाडेकरूची तपासणी करतात, त्याचे संपूर्ण रेकॉर्ड चेक करतात आणि मगच भाडेकरार करण्यास मान्यता किंवा नकार देतात. प्रत्येक घरमालकानेच ही प्रक्रिया करणे बंधनकारक आहे, अन्यथा सेक्शन 188 नुसार घरमालकाला शिक्षा होऊ शकते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या सर्व सहयोगी बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियात होणार विलीनीकरण
👉 नवी दिल्ली - लग्नसमारंभात 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास त्या रकमेच्या 10 टक्के रक्कम ही गरीब मुलींच्या लग्नासाठी द्यावी लागणार, यासंदर्भात लवकरच लोकसभेत विधेयक मांडले जाणार
👉 नवी दिल्ली - तिकिटासाठी लागणा-या लांब रांगाची कटकट संपवण्याच्या दृष्टीने रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले असून लवकरच बँकेतही रेल्वे तिकीट मिळणार, एप्रिल 2017 पर्यंत ही योजना सुरु होईल
👉 नवी दिल्ली - यापुढे सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या उत्पन्नाचा भाग म्हणून भेटवस्तू दाखवणे बेकायदा ठरणार : सर्वोच्च न्यायालय
👉 नवी दिल्ली - तोंडी तलाक याचिका, सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना 30 मार्चपर्यंत आपले म्हणणे महाधिवक्त्यांकडे लेखी सादर करण्याचे आदेश दिले
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 अमेरिकेच्या तुलनेत चीनचे मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार 5 पट जास्त, आयरिसर्च ग्लोबल या संस्थेने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 हरदोई - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यापासून उत्तरप्रदेशची मुक्ती झाल्याखेरीज राज्याचा विकास होणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 पुणे - पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या भारती चव्हाण यांचा अखेर भाजपात प्रवेश
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 बेळगाव - बेळगावात धडकले मराठा वादळ, "एक मराठा लाख मराठा'च्या हाकेने शहर परिसर दणदणून गेला, सीमा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी
👉 मुंबई - परवाना क्रमांक, परवानाधारकाचे नाव व कालावधी याचा उल्लेख नसलेले सर्व बेकायदा होर्डिंग, बॅनर्स निवडणुकीपूर्वी हटवा, मुंबई हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश
👉 मुंबई - राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात 1 हजार कोटी रुपयांची घट : IGR आणि मुद्रांक (स्टॅम्प)नियंत्रक एन रामास्वामी
👉 सोलापूर - सोलापुरात ऐन निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 11 लाखांची दारु जप्त
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28301.27, निफ्टी : 8778.00, सोने भाव : 29,314 (प्रतितोळा), चांदी : 42,950 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - फेसबुक स्मार्ट टीव्हीसाठी एक अॅप लॉन्च करणार, ज्याच्या मदतीने सोशल मीडियाचा वापर करणारे आपले व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर पाहू शकतील
👉 नवी दिल्ली - पोर्श या कंपनीने भारतात आपल्या दोन स्पोर्ट्स कार 718 बॉक्स्टर आणि 718 केमॅन केल्या लॉन्च, या कार्सची अनुक्रमे भारतातील किंमत 85.53 लाख रूपये आणि 81.63 लाख रूपये
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - अष्टपैलू क्रिकेटर युसूफ पठाणला बीसीसीआयने दिला दणका, बीसीसीआयने युसूफ पठाणला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास नाकारली परवानगी
👉 मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची एक पोस्ट सध्या व्हायरल, धोनीने त्याची लेक झिवासोबत रांगतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केला शेअर
🎯 मनोरंजन घडामोडी :
मुंबई - भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
लॅपटॉपवर पाणी पडले तर…
Let's Up Tips & Tricks
तुमच्याबरोबर असे कधी झाले आहे का? की, तुम्ही लॅपटॉपवर काम करत आहात आणि चुकीमुळे त्यावर चहा, पाणी असे काहीतरी पडले आहे आणि त्यामुळे तुमचा लॅपटॉप खराब झाला आहे. या प्रकारामुळे लॅपटॉपच्या सॉफ्टवेअरसोबतच हार्डवेअरमध्येही समस्याही उद्भवू शकतात. अशा वेळी घाबरून जाऊ नका, प्राथमिक स्वरूपात काही गोष्टी कराव्यात ज्याने तुम्ही लॅपटॉपवर काही पदार्थ पडल्यानंतरही त्याचा वापर करू शकता...
👉 लॅपटॉपवर पाणी पडल्याचे लक्षात येताच तो तत्काळ बंद करावा. सोबतच अॅडाप्टर व बॅटरी काढून घ्यावी. असे केल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टाळता येतो.
👉 लॅपटॉपच्या सर्व अॅसेसरीज काढून घ्या. जसे की, माइक, वायरलेस कार्ड, डाटा केबल, पेन ड्राइव्ह आदी.
👉 त्यानंतर टिश्यू पेपर घेऊन लॅपटॉप स्वच्छ करा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 लॅपटॉपला लगेच उलटा करा, त्याच्यामुळे चहा किंवा पाणी डिवाइसच्या आतपर्यंत पोहोचू शकणार नाही.
👉 काही लॅपटॉप असेही असतात ज्यांच्या ‘की’ रिमूव्हेबल असतात. जर तुमचा लॅपटॉपही असाच असेल तर त्याच्या ‘की’ वेगळ्या करा.
👉 लॅपटॉपचा कव्हर स्क्रू ड्राइवरने खोला. त्यामुळे आत गेलेले पाणी बाहेर येईल.
👉 आता टिश्यू पेपर किंवा ईयरबडच्या माध्यमातून सर्किट स्वच्छ करा.
👉 रॅमला बाहेर काढून त्यालाही टिश्यूने साफ करा.
👉 त्यानंतर हेयर ड्रायरने लॅपटॉप सुकवा. लक्षात ठेवा की, हेयर ड्रायरला लो हीट वर ठेवा.
👉 आता रॅम आणि कव्हरला पुन्हा लावा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 व्हॉटस्अॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज’
Let's Up Techno Katta
व्हॉटस्अॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी ‘स्टोरीज’ या नवीन फिचरच्या माध्यमातून फोटो वा व्हिडीओला आपले स्टेटस म्हणून वापरण्याची सुविधा देणार आहे. आजवर कुणीही फक्त शब्द अथवा इमोजींना स्टेटस म्हणून वापरू शकतो. लवकरच यासोबत प्रतिमा अथवा व्हिडीओदेखील वापरता येणार आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा फोटो/व्हिडीओ फक्त 24 तासांपर्यंत स्टेटस म्हणून दिसेल. काही डेव्हलपर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी घेण्यात येत असून ते लवकरच जगभरातील युजर्सला अपडेटच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 फेसबुकवर ध्वनीयुक्त व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होणार
सध्या फेसबुकच्या न्यूज फिडमध्ये व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होत असले तरी त्यात ऑडिओ सुविधा नव्हती. अर्थात आपल्याला ध्वनीरहित व्हिडीओ आपोआप सुरू होतांना दिसत असत. आता मात्र ध्वनीयुक्त व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होणार आहेत. बर्याच युजर्सला यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. अर्थात सेटींगमध्ये जाऊन हा प्रकार थांबविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
यासोबत फेसबुकने व्हर्टीकल व्हिडीओ अधिक उत्तम प्रकारे पाहण्याची सुविधा दिली आहे. अनेक जण स्मार्टफोनला उभ्याने धरून व्हिडीओ काढून तो शेअर करत असतात. यामुळे तो व्हिडीओ उभा दिसतो. फेसबुकच्या ताज्या अपडेटमुळे स्मार्टफोनवर हे व्हिडीओ सुलभपणे पाहता येणार आहेत.
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’ हे फिचरही दिले आहे. यामुळे आता फेसबुकवरील एखादा व्हिडीओ पाहतांना आपण न्यूज फिडही पाहू शकणार आहोत. आपल्या स्मार्टफोनच्या कोणत्याही कोपर्यात आपण हा व्हिडीओ ठेवू शकतो. अँड्रॉईड या प्रणालीचे युजर्स तर अगदी फेसबुकचे अॅप बंद असतांनाही अशा स्वरूपाचा व्हिडीओ पाहू शकतील. याचसोबत फेसबुकने टिव्हीवर उत्तम दर्जाचे व्हिडीओ पाहण्यासाठी स्वतंत्र टिव्ही अॅप सादर करण्याची घोषणा केली आहे. अॅपल टिव्ही, अमेझॉन फायर टिव्ही आणि सॅमसंग स्मार्ट टिव्ही आदींसोबत फेसबुकचे व्हिडीओ अॅप जोडता येणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आता विदेशी पर्यटकांसाठी वेलकम किट
Let's Up Current Affair
विदेशी पर्यटकांसाठी भारत सरकारकडून एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ई-व्हिसावर भारतात येणार्या पर्यटकास सरकारकडून एक वेलकम किट उपलब्ध करून देण्यात येईल. या किटमध्ये विविध माहितींसह एक सिम कार्डही असणार आहे. या सिम कार्डमध्ये 50 रुपयांचा टॉक टाईम आणि 50 एमबी डाटा मोफत देण्यात येणार आहे.
सध्या ही सेवा देशाची राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध असणार आहे. तसेच पुढील काही दिवसांत देशातील अन्य 15 आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, जेथे ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा व्हीएसएनएलच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एक विशेष काऊंटर असणार असून पर्यटकांना ई-व्हिसा आणि पासपोर्टच्या पहिल्या पानाची एक झेरॉक्स दिल्यावर फ्री सिम देण्यात येणार आहे. भारतात सध्या 161 देशांसाठी ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
संस्कृति आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा म्हणाले, ही योजना सुरू करण्याचा उद्देश असा आहे की, भारतात येणार्या विदेशी पर्यटकांना आपल्या कुटुंबियांशी आणि आपल्या मित्रांशी सतत संपर्क ठेवून आपली खुशाली देता येऊ शकेल. तसेच टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स् ऑपरेटरपासून टॅक्सी, हॉटेलमध्ये संपर्क साधता येईल. या सुविधामुळे लोकल सिम घेण्यासाठी व्यर्थ जाणारा 2-3 तासांचा वेळ वाचणार आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी विदेशी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टुरिस्ट हेल्पलाईन सेवेचाही लाभ घेता येणार आहे. ही टुरिस्ट हेल्पलाईन 24 तास सेवा देत असून सध्या 12 आंतरराष्ट्रीय भाषेत उपलब्ध आहे. यात इंग्रजीसह रशियन, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जपानी आणि अरबी यासारख्या भाषांचा समावेश आहे.
👉 पॅनकार्ड मिळणार 5-6 मिनिटांत!
सध्या पॅनकार्ड काढायचे असल्यास 2-3 आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच 5-6 मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे. कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)ने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि वैयक्तिक माहितीची खातरजमा केली जाणार आहे.
यामुळे ज्या पॅनकार्डसाठी 2-3 आठवडे लागतात ती प्रक्रिया 5-6 मिनिटांत होऊ शकते. दरम्यान, यामुळे पॅननंबर जरी तात्काळ मिळत असला तरी प्रत्यक्षात पॅनकार्ड हातात येण्यास काही कालावधी लागणार आहे. याशिवाय सीबीडीटी करदात्यांसाठी आणखी एक नवे पाऊल उचलत आहे. ते म्हणजे करदाते अॅपद्वारे इनकम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेबाबतही हालचाली सुरु आहेत. या अॅपमध्ये पॅनसाठी अर्ज करणे, टॅक्स रिटर्न भरण्याबाबतची सर्व कामे होऊ शकतील.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक…
Let's Up Sports Katta
यंदा आयपीएलच्या मोसमाला 5 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील…
संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे
👉 मॅच 1 : SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री 8 वा.( भारतीय वेळेनुसार)
👉 मॅच 2 : RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 3 : GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 4 : KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मॅच 5 : RCB vs DD, 8 एप्रिल 2017,रात्री 8 वा.
👉 मॅच 6 : SRH vs GL, 9 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 7 : MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 8 : KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 9 : RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 10 : MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 11 : KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 12 : RCB vs MI, 14 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 13 : GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 14 : KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 15 : DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 16 : MI vs GL, 16 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 17 : RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 18 : DD vs KKR, 17 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 19 : SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 20 : GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 21 : SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 22 : KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 23 : KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 24 : DD vs MI, 22 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 25 : RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 26 : GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 27 : KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 28 : MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 29 : RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 30 : RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 31 : RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 32 : KKR vs DD, 28 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 33 : KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 34 : RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 35 : Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 36 : KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 37 : SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 38 : MI vs RCB, 1 मे 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 39 : RPS vs GL, 1 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 40 : DD vs SRH, 2 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 41 : KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 42 : DD vs GL, 4 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 43 : RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 44 : SRH vs RPS, 6 मे 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 45 : MI vs DD, 6 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 46 : RCB vs KKR, 7 मे 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 47 : KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 48 : SRH vs MI, 8 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 49 : KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 50 : GL vs DD, 10 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 51 : MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 52 : DD vs RPS, 12 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 53 : GL vs SRH, 13 मे 2017, रात्री 4 वा.
👉 मॅच 54 : KKR vs MI, 13 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 55 : RPS vs KXIP, 14 मे 2017, रात्री 8 वा.
👉 मॅच 56 : DD vs RCB, 15 मे 2017, रात्री 8 वा.
👉 पहिली क्वालिफायर : 16 मे 2017, रात्री 8 वा.
👉 एलिमिनेटर : 17 मे 2017, रात्री 8 वा.
👉 दुसरी क्वालिफायर : 19 मे 2017, रात्री 8 वा.
👉 फायनल : 21 मे 2017, रात्री 8 वा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 ‘साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा
Let's Up Job Updates
पोस्ट : साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक - जागा : 188
पात्रता : ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा समतुल्य (प्रोडक्शन/मशीन टूल्स मेंटेनन्स/फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी/प्लँट इंजिनीअरिंग/मेटॅलर्जी) मधील अभियांत्रिकी पदविका/पदवी. पदवी/पदविकेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार पूर्व परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात गिअर असलेली मोटारसायकल, हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता : पुरुष - उंची : 163 सें.मी., छाती : 79 ते 84 सें.मी.
महिला - उंची : 155 सें.मी.
वजन : किमान 45 कि.ग्रॅ.
फी : 373 रुपये (मागासवर्गीय 273 रुपये)
अर्ज करण्याची मुदत : दि. 19 फेब्रुवारी 2017
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/qMTHfj
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये भरती
पोस्ट : असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (स्टेनो) - जागा : 69 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण 80 श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड
वय : दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी 18 ते 25 वर्ष
उंची : पुरुष - 156 सें.मी., महिला - 155 सें.मी.
छाती : पुरुष 77 ते 82 सें.मी.
फी : 100 रुपये (महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ)
अर्ज पाठवण्याची मुदत : दि. 28 फेब्रुवारी 2017
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : ‘डीआयजी, सीआयएसएफ(वेस्टर्न झोन -1) सीआयएसएफ काँप्लेक्स, डब्ल्यूझेड-1 एचक्यू, सेक्टर - 35, खारघर, नवी मुंबई - 410 210
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 ‘नासा’ची ‘युरोपा’वर मोहीम
Let's Up General Knowledge
पृथ्वी बाहेरील ग्रहावर मनुष्य वस्ती आहे का? हे शोधण्यामागे जगभरातील संशोधक लागले आहेत. तर आता ‘नासा’ गुरूचा उपग्रह असलेल्या ‘युरोपा’वर मोहीम आखत आहे. युरोपाच्या भूमीवर काही इंचाचा खड्डा खाणून तेथील मातीचे प्रशिक्षण करण्यात येणार आहे.
जमिनीमध्ये जीवाच्या अस्तित्वाचे काही पुरावे मिळतात काय? याचा वेध संशोधक घेणार आहे. युरोपावर मानवी वस्ती करता येण्यासारखी परिस्थिती आहे का? हेही तपासले जाणार आहे. या माहितीच्या साहाय्याने भविष्यात युरोपावर रोबोट पाठवले जातील.
युरोपावरील परिस्थितीची फारशी माहिती संशोधकांना नाही. त्यामुळे ही मोहीम आव्हानात्मक ठरणार आहे. या मोहिमेसाठी पुढील दोन दशके तरी लागणार आहेत. युरोपाच्या भूमीवर उतरणाऱ्या यानात कॅमेरा, जीओफशेन अँटेना अशी यंत्रणा असणार आहे. याशिवाय सेपरेशन मास स्पेक्टोमीटर सिस्टम असेल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 जिनोम एडिटिंग
मानवी शरीराच्या रचनेला कारणीभूत पेशी केंद्रकातील गुणसूत्रे म्हणजे जीन्स असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहेच; पण याच गुणसूत्रांचे एडिटिंग करून रोगांवर उपाय शोधता येतील, असा काही शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. रेण्विय कात्रीचा वापर करून पेशी केंद्रकातील गुणसूत्रांची योग्य रीतिने काटछाट, बदल केल्यास निरोगी जीवन मानवाला प्राप्त होईल, असे शास्त्रज्ञांना वाटते. या सर्व प्रक्रियेला ‘जिनोम एडिटिंग’ म्हणतात.
👉 भारताबाबत धक्कादायक अहवाल
अमेरिकेच्या ‘हेल्थ इफेक्ट्स इस्न्टिट्यूट’ या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून सन 2015 मध्ये जगभरात प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक भारत आणि चीन या देशांमध्ये झाले असल्याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या कालावधीत प्रदूषणाने जगभरात 42 लाख जणांचा बळी घेतला. त्यापैकी 22 लाख जण भारत आणि चिनमधील असल्याचे अहवालात म्हटले आहे. जगभरातील 92 टक्के जनता अनारोग्यकारक हवा असलेल्या ठिकाणी राहत असल्याचेही या अहवालात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
भारताला प्रदूषण नियंत्रणाबाबत मोठी मोहीम आवश्यक आहे. मात्र अजूनही भारतातील काही मंत्री प्रदूषण आणि मृत्यू यामध्ये काही संबंध असल्याचे मान्य करण्यास तयार नाहीत; अशी टीकाही या अवहालात केली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
