en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
'अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती' LetsUpp | Ahmednagar ⚡ अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज पाच हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 👉 जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते, असे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले आहेत. 💫 अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ✅ मंगळवारी त्यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील निमोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 🗣️ गमे म्हणाले : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी जी शिस्त पाळायला हवी, ती पाळली जात नाही. ● जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असूनही आठवडे बाजार अनेक ठिकाणी सुरू असल्याचे निर्देशनास आले. दुकानदार, ग्राहक मास्क वापरताना दिसत नाही. हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात येणे फार मुश्कील बाब आहे. ● पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला आणि कारवाई करायला त्यांना सांगितले आहे. ● कोरोना टेस्ट वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या १६ हजार टेस्ट होतात. त्या २५ हजारपेक्षा अधिक कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या दहाच्या आसपास आहे. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते. त्यात वाढ करून तीसपर्यंत करावे, असेही सांगितले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/ROfVNE3tKjb

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp l Bulletin ● राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या सूरात सूर मिसळणे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक: राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर ● औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला दणका; साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही; औरंगाबाद खंडपीठ ● राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला; शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत, शिवसेना नेते अनंत गीते यांची बोचरी टीका ● पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर; राज कुंद्रा दोन महिन्यांनी आर्थर रोड जेलबाहेर ● मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत उच्च न्यायालयाची नाराजी; मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणताही रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याी परवानगी देणार नाही ● नाशिकमध्ये दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ, अन्न व सुरक्षा विभागाकडून दूध संकलन केंद्रावर छापा ● नागपूर जिल्ह्याला दोन दिवस येलो अलर्ट; धरणाची पाणीपातळी वाढल्यानं सतर्कतेच्या सूचना; वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा ● अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये कोणतीही गुंतवणूक केली नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ● हवाना सिंड्रोमचा भारतातला पहिला पेशंट अमेरिकेच्या सीआयएचा अधिकारी; लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स ● क्रिकेट विश्वात पाकिस्तान पुन्हा एकाकी, इंग्लंडच्या संघानेही केला पाकिस्तान दौरा रद्द; सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/LxOc4o4nJjb

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● “महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या”, मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश! ● गणेशोत्सव काळातील गर्दी, पावसाळा संपत असल्याने १५ दिवस अत्यंत महत्वाचे; आगामी पंधरा दिवसात ठरणार तिसऱ्या लाटेचे भवितव्य- अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ● जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगली ताकद लावून आपल्या उमेदवारांना विजयी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन ● "मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकून देऊ शकते पण राज्यातल्या निवडणूक नाही"; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला आहेर ● जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; शिवगढ धार भागात घडली घटना; हेलिकॉप्टरमध्ये दोन जण असल्याची माहिती ● महाराष्ट्राला हादरवणारी घटना, परभणीत एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांकडून सामूहिक बलात्कार; पीडित मुलीची विष प्राशन करून आत्महत्या ● नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता ● महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले; आयकर विभागाच्या तपासात खुलासा ● देशात पाच दिवसांनंतर 30 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; काल दिवसभरात 26,115 कोरोनाबाधितांची नोंद, तर 252 रुग्णांचा मृत्यू ● अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये बस चालकाने एसटीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/lxaQ8OTbJjb

photo content

परभणी हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या LetsUpp | Trending ⚡ परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर 3 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 👉 या घटनेनंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 💫 सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीला त्याच परिसरातील तीन मुले त्रास देत होती. त्यातच 12 सप्टेंबर रोजी या नराधम तरुणांनी पीडित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 🏥 त्यानंतर नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. 🚔 मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सोनपेठ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी परळी परिसरातून आज पोलिसांनी अटक केला आहे. 🗣️ या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून या प्रकरणात पीडितेने तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्टेटमेंट दिलं आहे. 📍 दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या मुलीच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/wMRmeP5XIjb

आरोग्य विभागात पदभरती ! आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्या तारखा LetsUpp | Trending 🩺 महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग
आरोग्य विभागात पदभरती ! आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्या तारखा LetsUpp | Trending 🩺 महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. 💁🏻‍♂️ या परीक्षेसाठी साधारणपणे गट 'क'साठी एकूण 2740 एवढय़ा जागा आपण भरत आहोत. 👉 गट 'ड'साठी 3 हजार 500 जागा आपण भरत आहोत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा आपण भरत आहोत. ✍️ या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 🗣️ परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पूर्णपणे पालन करावे असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/kxnfstSKIjb

विदेशात पुन्हा लस पुरवठा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय! LetsUpp | Trending ⚡ देशातून पुन्हा इतर देशांमध्ये लस पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. 'वॅक्सीन मैत्री' कार्यक्रमांतर्गत हा लस पुरवठा केला जाणार आहे. 💉 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून लस निर्मिती कंपन्या विदेशात लस पाठवू शकणार आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये देशात पुरेसे लसीकरण झालेलं नसल्यानं केंद्राने विदेशात लस पाठवण्यावर निर्बंध आणले होते. 🗣️ केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी स्पष्ट केलं की, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांजवळ जे काही अतिरिक्त लस उपलब्ध असतील या लस 'व्हॅक्सिन मैत्री' कार्यक्रमांतर्गत इतर देशांमध्ये पाठवण्यात येतील. 💁‍♂️ विविध लस कंपन्यांकडून ऑक्टोबरपासून देशात ३० कोटींहून अधिक लस उपलब्ध होतील, असा दावाही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. 🔝 भारत कोरोना प्रतिबंधक लसींचा जगातील सर्वात मोठा निर्माता आहे. एप्रिल महिन्यात भारताने आपल्या जास्तीत जास्त जनतेचं लसीकरण करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी लस निर्यातीवर निर्बंध आणले होते. 📍 दरम्यान, डिसेंबरपर्यंत भारत आपल्या सर्व ९४.४ कोटी प्रौढ जनतेला लसीकरण पूर्ण करायचं ध्येय ठेवलं आहे. यांपैकी आत्तापर्यंत ६१ टक्के जनतेला एक डोस देण्यात आला आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/AbV3EBOWHjb

टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या का
टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा ● शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले! ● किरीट सोमय्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, किरीट सोमय्यांनी माफी मागावी : हसन मुश्रीफ ● काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचं गोव्यात वक्तव्य ● औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ? ● राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे ● पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसनं चरणजितसिंह चन्नी यांची निवड करुन अनेकांना धक्का दिला ● पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर ● कंगनाला कोर्टावर भरवसा नाय... अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील मानहानीचा खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/IyhqAtwKHjb