en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
☄ अंतराळातही एन्जॉय करा हॉलिडेज! Letsup I Update अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील ओरिअन स्पॅन या स्टार्टअपतर्फे अंतराळातील पहिले लक्झरी हॉटेल 'ऑरोरा स्टेशन' बनविण्यात येणार आहे. यामुळे येत्या चार वर्षात चक्क अवकाशात सुट्टी घालवता येणे शक्य होणार आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील स्पेस 2 संमेलनात ओरियन स्पॅनचे सीईओ व संस्थापक फ्रॅक बेंगर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे हॉटेल 2022 पर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत बनविण्यात येणार असल्याचे बेंगर यांनी सांगितले. पृथ्वीपासून 321 किलोमीटर उंचीवर असलेल्या या हॉटेलमध्ये खोली आरक्षित करण्यासाठी 80 हजार डॉलर मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर तब्बल 61.1 कोटी रुपये 12 दिवसांच्या आकर्षक हॉलिडे पॅकेजसाठी मोजावे लागणार आहेत. 'ऑरोरा स्टेशन'च्या माध्यमातून पर्यटकांना अंतराळातील विविध घडामोडी अगदी जवळून अनुभवता येणार आहे. तसेच शुन्य गुरुत्वाकर्षण, अंतराळातील ग्रहांच्या आश्चर्यकारक हालचाली, सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृश्य यांचा अनुभव 'याची देही याची डोळा' घेता येणार आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

👨‍💻 BSNLची नवी ऑफर; मिळणार 153 GB डेटा Letsup I Update IPLच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे. बीएसएनएल या IPL सीजनसाठी 258 रुपयांमध्ये आपल्या ग्राहकांना 153 GB डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून यात प्रिपेड ग्राहकांना दररोज 3 GB डेटा मिळणार आहे. यापूर्वी रिलायन्स जिओने क्रिकेट सीजनसाठी 251 रुपयांमध्ये 102 GB डेटा पॅक देण्याची घोषणा केली होती. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🌧 राज्यात गारपीटीसह अवकाळी पावसाचा अंदाज Letsup I Update येत्या दोन दिवसांत राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काही भागात गारपीट व पावसाने सुरुवात केली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार 🔅 नवी दिल्ली - पत्नी म्हणजे कोणती वस्तू नाही, की संपत्ती समजून स्वतःसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करावी : सुप्रीम कोर्ट 🔅 नवी दिल्ली - फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसी व फिचर्समध्ये बदल, फेसबुकवर इतर ॲप्ससाठी नियम व अटी 🔅 नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 72 उमेदवारांचा समावेश 🔅 उत्तर प्रदेश - मुख्यमंत्री योगींच्या घराबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप 🔅 सीरिया - डौमा शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यात लहान मुलांसह 70 जणांचा गुदमरून मृत्यू 🔅 मुंबई - पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात, राज्यातील 4 हजारहून अधिक गावांचा स्पर्धेत सहभाग 🔅 मुंबई - राज्यातील कर्करोगग्रस्तांना जिल्हा रुग्णालयांमध्येच मोफत केमोथेरपीची सुविधा मिळणार 🔅 मुंबई - महामार्गावरील खेड्यातील दारू दुकाने पुन्हा सुरू होणार, सर्वोच्च न्यायालय व शासनाचा संयुक्त निर्णय 🔅 मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती अनुष्का शर्माला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार 🔅 मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्णपदक, सिंगापूरवर केली मात 🔅 मुंबई - कोलकाता नाइट रायडर्सचा रॉयल चॅलेंज बेंगळुरूवर 4 गडी राखून विजय, तर पंजाबची दिल्लीवर 6 गडी राखून मात For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 पोटनिवडणुकीत सर्व पक्षांनी गड राखले! Letsup I Election Update राज्यातील सहा महापालिकांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सर्वच पक्षांनी आपापल्या जागा राखल्या आहेत. 👉 मुंबई : प्रतीक्षानगर, शीव येथील प्रभाग क्र. 173 मध्ये शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे 845 मतांनी निवडून आले. 👉 उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. त्यांना 2,690 मते मिळाली. 👉 नाशिक : मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले विजयी झाल्या आहेत. भोसले यांना 7,490 मते मिळाली. 👉 पुणे : महापालिकेचा मुंढवा वानवडी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांचा 3521 मतांनी दणदणीत विजय झाला. 👉 सोलापुर : काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचेच तौफिक हत्तुरे 4,944 मते घेऊन निवडून आले. 👉 अहमदनगर : केडगाव वॉर्ड क्र.32 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झाले. कोतकर यांना एकूण 2340 मते पडली. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 अखेर सलमानला जामीन मंजूर Letsup I Breaking ▪ जोधपूर सत्र न्यायालयातून सलमान खानला जामीन मंजूर ▪ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर ▪ उच्च न्यायालयात अपीलासाठी शिक्षेला स्थगिती ▪ आज संध्याकाळपर्यंत सलमान सुटण्याची शक्यता For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

👩‍✈ प्रेरणादायी - वीरपत्नी स्वाती महाडिक दहावीच्या अभ्यासक्रमात Letsup I Update दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात आली आहे. लेफ्टनंट स्वाती या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते. पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणे पसंत केले. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🎖 अभिमानास्पद; भारताच्या खात्यात तिसरे सुवर्णपदक Letsup I Update ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदके वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, 110 लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू 🔅 नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, मात्र हार्डवेअरमध्ये बिघाड असल्याची सायबर विभागाची माहिती 🔅 नवी दिल्ली - दलितवस्तीत दोन दिवस रहा, पंतप्रधान मोदींचे खासदारांना निर्देश, 20 हजार गावांत कामे पोहोचवणार 🔅 नवी दिल्ली - भारत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 9 एप्रिलला देशव्यापी उपवास पाळणार 🔅 मुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायद्याची योग्य अंमलबजावणी का नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल 🔅 मुंबई - जिल्हा न्यायालयांतील कनिष्ठ श्रेणीतील पदांवरील नोकरभरतीच्या प्रक्रियेला अंतरिम स्थगिती 🔅 मुंबई - नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करत प्रसाद कांबळी विजयी 🔅 मुंबई - आयपीएलला आजपासून सुरुवात, चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🗣 आता व्हॉट्सअ‍ॅपवर व्हाईस मॅसेज लॉक्ड करता येणार Letsup I Update व्हॉट्सअ‍ॅप मॅसेंजरच्या अँड्रॉईडसाठी असणाऱ्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये लॉक्ड व्हाईस मॅसेज पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला ही सुविधा वापरता येणार आहे. आजवर व्हाईस मॅसेज पाठविण्यासाठी माईकच्या आयकॉनवर दाबून धरावे लागत होते. लॉक्ड व्हाईस मॅसेज फिचरमुळे युजर्सचा हा त्रास वाचणार आहे. याच्याअंतर्गत युजरला माईक बटन हे फक्त 0.5 सेकंदापुरते दाबून धरावे लागेल. यानंतर त्याला वरील बाजूस दिसणाऱ्या लॉक्ड बटनाकडे आपले बोट न्यावे लागेल. यानंतर तो युजर हव्या तितक्या वेळेपर्यंतचा व्हाईस मॅसेज रेकॉर्ड करून नंतर तो सेंड या बटनावर क्लिक करून समोरील व्यक्ती अथवा ग्रुपमध्ये पाठवू शकतो. हा मॅसेज रद्द अर्थात ट्रॅश करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मॅसेज सेंड करण्याआधी ऐकण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ कैरी खाण्याचे फायदे माहिती आहेत का? Letsup I Update आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. कच्च्या कैरीची चटणी, लोणचे, पन्हे हा जवळपास सर्वांचाच आवडीचा पदार्थ असतो. म्हणूनच आज आपण कैरी खाण्याचे काय फायदे आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात... 👉 कैरीत व्हिटामिन सी अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताचे विकार दूर होतात. 👉 कैरी मिठासोबत खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. 👉 कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढत नाही. 👉 कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोक होत नाही. 👉 कैरी व कोयीमुळे पोटासंबंधित आजार दूर होतात. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 टायगर तुरुंगातच; जामीन अर्जावर उद्या सुनावणी ब्रेकिंग काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचे जोधपूर सत्र न्यायालयाने सांगितले. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे. काय आहे प्रकरण 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - भारतातील 20 कोटी फेसबुक युजरपैकी 5 लाख युजरची माहिती चोरीला गेली असल्याची माहिती 🔅 नवी दिल्ली - नेट बँकिंग, कार्ड आणि ई-वॉलेटने बिटकॉईन ट्रेडिंगवर बंदी, रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी आणणार 🔅 नवी दिल्ली - रिलायन्सचा काँग्रेस नेते संजय निरुपमांविरोधात एक हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा 🔅 नवी दिल्ली - पुढच्या पाच वर्षांसाठी बीसीसीआयचे प्रसारण हक्क 6138 कोटींना स्टार स्पोर्ट्स इंडियाने घेतले 🔅 पॅरिस - फ्रान्स आणि मालीच्या लष्करी तुकड्यांसोबत झालेल्या चकमकीत 30 जिहादी दहशतवादी ठार 🔅 मुंबई - म्हाडाच्या तब्बल 18 हजार फायली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची धक्कादायक माहिती समोर 🔅 पुणे - सीबीएसई मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, 12 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार 🔅 परभणी - शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणीतील कोनेरवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 🔅 मुंबई - सलमान खानचे चार बिग बजेट चित्रपट आणि दोन टीव्ही शोचे भवितव्य अधांतरी, 600 कोटी पणाला 🔅 मुंबई - 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू व संजिता चानूची कामगिरी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏦 RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’ Letsup I Update ▪ भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) रेपो रेट ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय ▪ रेपो रेट 6 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ▪ चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक पतधोरण आढावा For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📣 सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू होणार? Letsup I Update राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यंदाची दिवाळी खरोखरच गोड असणार आहे. कारण बहुप्रतीक्षित सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आकडेमोड सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, 1 नोव्हेंबरपासून सातवा वेतन आयोग देण्याची तयारी सरकारने केली आहे. या संदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षांत जेवढी रक्कम द्यावी लागू शकते, तेवढ्याची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 अभिनेता सलमान खान दोषी Letsup I Breaking ▪ काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी ▪ जोधपूर कोर्टात जामिनासाठी अर्ज शक्य ▪ सलमानला 1 ते 6 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता ▪ 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली तर लगेच जामीन ▪ सैफ, सोनाली, तब्बू, नीलम निर्दोष For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏋 कॉमनवेल्थ गेम्स; भारताला पहिले पदक Letsup I Update ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात 249 किलो वजन उचलून रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत गुरुराजाने भारताला मिळवून दिलेले हे पहिले पदक ठरले. दरम्यान, या वजनी गटात सुवर्ण पदक मलेशियाच्या इजहार अहमदने तर कांस्य पदक श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने पटकावले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚜ एका उमेदवारांस दोन जागी निवडणूक लढवता येणार नाही! Letsup I Update एकाच उमेदवाराने एकाच वेळा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगानेही विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च वाढतो, अशी भूमिका आयोगाने शपथपत्राद्वारे सुप्रीम कोर्टात मांडली. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी दोन मतदारसंघांतून एका उमेदवारास निवडणूक लढवण्याची मुभा रद्द करावी, या मागणीची याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी कायद्यात असलेली ही तरतूद अयोग्य असल्याचे त्यात म्हटले आहे. या मागणीचे निवडणूक आयोगानेही समर्थन केले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - सन 2018-19 या वर्षात देशाच्या आर्थिक विकासाची गती 7.1 % हून 7.4 % पर्यंत वाढू शकते ● नवी दिल्ली - एकाच उमेदवाराने एकाच वेळा दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास निवडणूक आयोगानेही दर्शवला विरोध ● नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या 23 दिवसांमध्ये संसदेचे कामकाज चाललेले नाही, त्या काळातला पगार आणि भत्ते न घेण्याचा भाजप-एनडीएच्या खासदारांचा निर्णय ● नवी दिल्ली - देशात 37 हजार रेल्वे पूल शंभर वर्षांहून जुने, यातील 32% पूल उत्तर विभागातील, रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी लोकसभेत दिली माहिती ● नवी दिल्ली - रेल्वेच्या एसी कोचमध्ये लवकरच प्रवाशांना स्वच्छ, वजनाने हलके व मुलायम पांघरूण मिळेल ● नवी दिल्ली - सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा प्रत्येक डबा, पाकिटावर सप्टेंबरपासून हेल्पलाइन क्रमांक टाकणे सक्तीचे ● नवी दिल्ली - नोंदणी नसलेले मदरसे, वैदिक शाळेतील शिक्षणाला मान्यता देण्यास सरकारने दिला नकार ● श्रीनगर - काश्मीरमध्ये CRPF च्या ट्रकवर दगडफेक, ट्रकचालक गंभीर जखमी तर दोन जवानांचा मृत्यू ● पुणे - बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त, या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना केली अटक ● सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस 8 आणि गॅलेक्सी एस 8 प्लस या दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या दरांमध्ये केली कपात ● मुंबई - ऑस्ट्रेलियाद्वारे लावण्यात आलेल्या 12 महीन्यांच्या बंदीविरोधात स्टीव स्मिथ अपील करणार नाही ● जोधपूर - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, सलमान खान यांच्या खटल्याचा निकाल आज गुरुवारी लागण्याची शक्यता For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

photo content