en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या LetsUpp l Bulletin ● ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा ● बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज ● राज्यभरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री, एफडीएची धडक कारवाई, १४ गुन्हे दाखल, तर ११ जणांना अटक --------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५ ---------------------- ● ग्रामपंचायतींची थकीत वीज बिलांची वसुली आणि वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश ● महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पेडणेकरांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती ● राज्यात मंगळवारी ६, ९१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर ७ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त; १४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद; मृत्यूदर २.०४ टक्के ● छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं ही अफवा, अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण ● महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणार, सरकारमध्ये काही अंतर्गत वाद नाही : राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच वक्तव्य ● कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव ● जम्मूत पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी; जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हात ● अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली; दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार ठरले विजयचे शिल्पकार To know more click here https://letsup.app.link/MEdUG9rO3hb

ठाकरे, पवार, थोरात हे झारीतील शुक्राचार्य - चंद्रशेखर बावनकुळे LetsUpp | Nashik राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद
ठाकरे, पवार, थोरात हे झारीतील शुक्राचार्य - चंद्रशेखर बावनकुळे LetsUpp | Nashik राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यात दररोज कलगीतुरा रंगतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य असल्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारचे चालक आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याने हे आरक्षणाच्या विरोधात असून ते झारीतील शुक्राचार्य आहे. असे खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय जनता युवा मोर्च्याची ताकद वाढविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. युवा मोर्चा आता युवा वारीयर्स म्हणून काम करणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप https://letsup.app.link/6hZVIvkx2hb

धक्कादायक ! मुसळधार पावसात पाच जण वाहून गेले LetsUpp | Raigad 🌧️ राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात
धक्कादायक ! मुसळधार पावसात पाच जण वाहून गेले LetsUpp | Raigad 🌧️ राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 🛣️ नुकतेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गाेवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला हाेता. 👩🏻‍🚒 दरम्यान पेण तालुक्यातील पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय तट रक्षक दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले. 💁🏻‍♂️ दाेन दिवसांपासून काेसळणाऱ्या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पाेयंजे येथील तीघे जण तर खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. 🔎 दरम्यान स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शाेध कार्य मोहीम हाती घेतली आहे. 🌊 गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 186 मिमी पावसांची नाेंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे आंबा, कुंडलीका, बाळगंगा नद्यांना पुर आला आहे. To know more click here https://letsup.app.link/tn6n5Mnj2hb

photo content

रांगोळीतून साकारली विठू माऊलीची भव्य प्रतिमा LetsUpp l Aurangabad ● आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आसावरी रामलिंग लिंगाडे या युवतीने ७ बाय ९ फूट आकारात विठू माऊलीची भव्य प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. त्यासाठी तब्बल ८० ते ८१ तासांचा वेळ लागला. ● औरंगाबाद मधील गारखेडा परिसरात राहणाऱ्या आसावरी लिंगाडे हिने घरातच पांडुरंगाची सुरेख रंगसंगती साधत प्रतिमा साकारली आहे. गेल्या सोमवारी तिने रांगोळीतून पांडुरंगाची प्रतिमा रेखाटण्यास सुरूवात केली. ● भक्तिरसात तल्लीन झालेले संत-महंत, वारकऱ्यांना दृष्टांत देण्यासाठी अवतरलेल्या पांडुरंगाची प्रतिमा दर्शवणारी ही कलाकृती आहे. ● ही रांगोळी साकारण्यासाठी ८० ते ८१ तास लागले. या काळात दररोज १५ ते २० तास बैठक बसवून काम केल्याचे आसावरीने सांगितले. आसावरी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात जी.डी.आर्टच्या शेवटच्या वर्षातील शिक्षण घेत आहे. ● रांगोळीद्वारे कलाकृती काढण्याचे शिक्षण सुप्रसिद्ध रंगावलीकार प्रा.अक्षय शहापूरकर यांच्याकडे घेतले आहे. घरात साकारलेल्या विठ्ठलाच्या प्रतिमेसाठी एकूण ५ ते ६ किलो रांगोळी लागल्याचे तिने सांगितले. To know more click here https://letsup.app.link/DgmQmWii2hb

जनी विठ्ठल दिसावा...मनी विठ्ठल रुजावा... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺🌺
जनी विठ्ठल दिसावा...मनी विठ्ठल रुजावा... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺🌺

मोठी बातमी ! अकरावी सीईटीची तारीख झाली जाहीर LetsUpp | Trending 💥 अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. 📅 येत्या 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता सीईटीची प्रवेश परीक्षा होणार आहे. ⏰ दरम्यान ही परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी 20 जुलैपासून अर्ज करता येणार आहे. 💁🏻‍♂️ राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. 👦🏻 त्यामुळे 10 वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे. To know more click here https://letsup.app.link/5vJDd03m1hb

ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू LetsUpp | Trending ● गेल्या दोन - तीन दिवसापासून राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ● मुसळधार पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवीत हानी झाली आहे. ● ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व भागातील डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ● कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून चार घरांचे नुकसान झाले आहे. ● शेजाऱ्यांनी तात्काळ घरातील चार नागरिकांना बाहेर काढले, काही नागरिक घरात अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. ● मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे. To know more click here https://letsup.app.link/A4UeQOEg1hb