en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
😱 *अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या* *LetsUp | Breaking* ⚡ बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 😰 बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. 🏠 मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. 👮🏻 सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान अधिक तपासासाठी मुंबई पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. ☎️ वृत्तानुसार सुशांतच्या सेवकाने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे. 👍 *जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *सारीच्या 36 रुग्णांना कोरोनाची बाधा* *LetsUp | Aurangabad* जिल्ह्यात कोरोनाबरोबर सारीचे रुग्णही वाढत आहे. मागील तीन दिवसांत सारीचे ५५ रुग्ण आढळले. कोरोना चाचणीनंतर ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सारीच्या आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने प्रत्येक सारीबाधित रुग्णाचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेतले जात आहेत. मागील आठवड्यात तीन दिवसांत आढळलेल्या ३९ सारी बाधितांतून २९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. या आठवड्यातही सारीच्या रुग्णांतून कोरोना पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी पुन्हा वाढले आहे. आतापर्यंत शहरात सारीचे ५६६ रुग्ण आढळले. त्यापैकी ५५३ जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले. पैकी १३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर ४२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सहा जणांचे अहवाल बाकी असून आजपर्यंत सारीमुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दीड महिन्यापासून घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून सारीचा एकही रुग्ण आढळला नाही. केवळ शहरातील विविध खासगी रुग्णालयांतून सारीच्या ४८४ रुग्णांच्या नोंदी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यातूनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती समोर येत आहे. घाटीकडून नोंद झालेल्या सारीच्या रुग्णांची संख्या ८२ आहे.असे प्रशासनाने कळवले आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *येरवडा कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन* *LetsUp | Pune* पुण्यातील येरवडा कारागृहातून आज (शनिवारी) दोन कैद्यांनी पलायन केले आहे. या दोघांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हर्षद सय्यद (२०, रा.कासारवाडी), आकाश बाबुराव पवार (२६. रा.काळेवाडी) असे कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी अधिक तपास येरवडा पोलिसांकडून सुरू आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *चोवीस तासांत अकरा हजारांपेक्षा अधिक रुग्ण...* *LetsUp | Corona Live* 💫 भारतात मागील चोवीस तासांत अकरा हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून मृत्यूचा आकडा तर धडकी भरवणारा आहे. ✨ भारत जगात चौथ्या क्रमांकावर असून आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे. देशात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. 📍 जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे दहा हजार प्रकरणे नोंदवली जात असून आज मागील चोवीस तासांत अकरा हजारांपेक्षा जास्त संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. 📌 दरम्यान, देशभरात एक लाख चोपन्न हजार तीनशे तीस रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत आठ हजार आठशे पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *राज्यातील तिघाडी सरकारमध्ये बिघाडी...* *LetsUp | Update* 💫 महारष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. 💁‍♂️ *आठवले म्हणाले :* ▪️ शिवसेना आणि राष्ट्रवादीएवढे काँग्रेसला महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसचे मंत्री तसेच आमदारांच्या एका गटात आहे. ▪️ यासंदर्भात काँग्रेसच नेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्रात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याचे विधानही केले होते. ▪️ निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला जे स्थान असायला हवे ते मिळत नसून काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा. ▪️ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. 📌 दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच नगरसेवकांना अर्थ खात्याकडून निधी देताना झुकते माप दिले जाते, काँग्रेसच्या नगरसेवकांना मात्र डावलले जाते, अशीही तक्रार आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *बारा दिवसाच्या बाळाची कोरोनावर मात* *LetsUp | Pune* पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयामध्ये तीन दिवसाच्या कोरोना पॉझिटीव्ह बाळाला व त्यांच्या आईला दाखल करण्यात आले होते. जन्मल्यानंतर आईपासून कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचे प्राण वाचविणे हे मोठे आव्हान होते. मात्र, रुग्णालयात देण्यात आलेल्या उपचारास बालकालाने दोन ते तीन दिवसात प्रतिसाद देवून कोरोनावर मात केली आहे.  एका खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेस दुसर्‍याच दिवशी ताप व खोकला अशी कोरोनाची लक्षणे दिसू लागली. सदर महिला ही उत्तर प्रदेशातील आहे. महिला आणि तिच्या नवजात बालकाला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. तपासणीनंतर दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यावेळी बालकाला धाप लागत असल्यामुळे नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. बालकाच्या आईला देखील कोरोना झाला असल्यामुळे आईला वेगळ्या वॉर्डमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले. तसेच बाळाला ऑक्सिजन लावल्यामुळे आईचे दूध देता येत नव्हते. अशावेळी बाळाला सलाईनमधून कोविडचे उपचार सुरु केले.  तीन ते चार दिवसात बाळाने उपचारास चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर बाळाच्या आईच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत होती. पाच दिवसानंतर त्याला आईचे दूध देण्यात आले. बारा दिवसानंतर आता बाळ आणि आई सुखरुप असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.  🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *बिहारच्या सीमेवरील गावात नेपाळ पोलिसांचा गोळीबार* *LetsUp | National* ⚡ बिहारमधील भारत - नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. 💁🏻‍♂️ सध्या भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. 👉🏻 भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला. 🧐 यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 📌 दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *जालना जिल्ह्याची त्रिशतकी वाटचाल; नवीन 12 रुग्ण* *LetsUp l Jalna* जालना जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट अधिकच गडद होत असुन आतापर्यंत आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या प्रयोग शाळेच्या अहवालानुसर नवीन 12 रुग्णांची भर पडल्याने आता जालना जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या 267 वर पोहोचली आहे. नवीन बारा रुग्ण आढळल्यानंतर जालन्यात कोरोनाची त्रिशतकी वाटचाल सुरु झाली असली तरी कोरोना चाचणीत निगेटिव्ह येणाऱ्या संशयीत रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल 105 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असुन 12 जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगीतले. नव्याने पाॅझिटीव्ह आढळून आलेल्या 12 रुग्णांमध्ये जालना राज्य राखीव पोलीस बल गट (एसआरपीएफ) - 4, काद्राबाद परिसर - 4 व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथिल 4 रुग्णांचा समावेश असल्याचे प्रशासकिय सुत्रांनी स्पष्ट केले. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

✍🏻 *सीमेवरचा तणाव* *LetsUp l Editorial* लडाखमधील तणावातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना नेपाळच्या सीमेवर मात्र तणाव वाढतो आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी नेपाळच्या अंतर्गत राजकारणात नाक खुपसण्याची किंमत आपण मोजतो आहोत. नेपाळची राज्यघटना कशी असावी, त्यांच्या प्रांतांची रचना कशी असावी, याचा निर्णय घ्यायचा पूर्णतः अधिकार तेथील संसदेचा आहे. तेथील मधेशीसारख्या समाजघटकांवर अन्याय होत असेल, तर तो दूर करण्याची जबाबदारीही नेपाळची आहे. मधेशी समाजाबाबतच्या भावना आपण फक्त त्या सरकारच्या कानी घालणे आपले काम होते; परंतु आपल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसले. चुकलेल्या परराष्ट्र धोरणाची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे. सरकार ते मान्य करणार नाही, हा भाग वेगळा. नेपाळमध्ये सत्तांतर झाले आणि तेथील राज्यकर्त्यांनी भारताऐवजी चीनला जवळ केले. भारताच्या सीमा नेपाळला लागून आहेत. बिहारमधील अनेकांचे रोटीबेटी व्यवहारही नेपाळमध्ये होतात. सीतामढी जिल्ह्यात तर दररोज काही लोक रोजगारासाठी परस्परांच्या देशात जातात. नेपाळचा ऐंशी टक्के व्यापार भारताशी निगडीत होता; परंतु एका चुकीमुळे आता बहुतांश व्यापार चीनच्या ताब्यात गेला. व्यापार जाण्यामुळे जेवढे नुकसान झाले नाही, तेवढे नुकसान चीनने नेपाळपर्यंत रस्ते, विमान, लोहमार्ग टाकण्यामुळे होणार आहे. चीनचे सैन्य नेपाळमार्गे भारतावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या सीमांवर अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आताही चीनच्या सांगण्यावरूनच मानससरोवराला जाण्याचा मार्ग नेपाळ बंद करतो आहे. भारताचा काही भाग नेपाळच्या नकाशात दाखविण्यात आला आहे. संसदेची मान्यतही घेण्यात आली आहे. नेपाळसारखा छोटा देश भारतासारख्या आर्थिक महासत्ता म्हणविल्या जाणा-या देशाला आव्हान देतो, यावरून भारताची कशी कोंडी झाली आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. भारत नेपाळ तणाव भारत आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने बिहार सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय ठार झाला. यामुळे सीमेवरचा ताण आणखीच वाढला आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या सीमेवर अशा चकमकी व्हायच्या. आता नेपाळ सीमेवरही ते घडायला लागले आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने केलेल्या गोळीबारात एका शेतक-याला प्राण गमवावे लागले. काही जखमी झाले. त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. आता दोन्ही बाजूंनी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने भारतीयांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने सीमाभागातून एका व्यक्तीला ओलीस ठेवले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नेपाळमधून 18 फैरी झाडल्या. सीतामढीच्या खासदारांनी तर हा भारत-नेपाळ मैत्रीसंबंधावर गोळीबार असल्याचे म्हटले आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी लगन राय हे आपल्या मुलासह एका महिला नातेवाइकाला भेटण्यासाठी सीमेवर गेले. नेपाळ सशस्त्र संरक्षक दल त्यांना सीमेवरुन दूर नेण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा वडिलांनी मुलाला थोडे थांबायला सांगितले, तेव्हा नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने त्यांच्या मुलावर गोळीबार केला. हे पाहून सीमेवर क्रिकेट खेळणा-या काही तरुणांनी आणि शेतात काम करणा-या लोकांनी नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाच्या या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने गोळीबार सुरू केला. भारतीयांना त्याची बंदूक हिसकावून घ्यायची होती, असा आरोप नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने केला आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने शेतक-यांना स्मगलर ठरवले आहे. एक व्हिडिओत नेपाळ सशस्त्र संरक्षक दल मुलाला मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे नेपाळचा कांगावा जगासमोर आला आहे. 📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *जिल्ह्यात 1087 रुग्णांवर उपचार सुरू; आज 87 रुग्णांची वाढ* *LetsUp l Aurangabad* औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 87 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2622 झाली आहे. यापैकी 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 135 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1087 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया ‍विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 60 पुरूष आणि 27 महिलांचा समावेश आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह* *LetsUp l Satara* विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 वर्षीय पुरुष. *कराड तालुक्यातील* तुळसण 50 वर्षीय व 22 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष *सातारा तालुक्यातील* गोजेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला व 5 वर्षाची मुलगी, सैदापूर येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला *कोरेगाव तालुक्यातील* साप येथील 39 वर्षीय पुरुष *जावली तालुक्यातील* धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष *वाई तालुक्यातील* वेळे येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 718 रुग्ण आढळले आहेत. 472 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 213 जणांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न* *LetsUp | Nashik* नाशिक शहरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवन्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला आहे. देवळाली गाव परिसरातील सुंदर नगर भागात गावगुंडांनी हैदोस घालत वाहनांची तोडफोड केली आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुंदर नगर भागातल्या झोपडपट्टीत कुमावत आणि घोरपडे या दोन कुटुंबात वाद झाले. या वादाचे पर्यवसान घोरपडे कुटुंबीयांनी दहशती मध्ये केले आहे. कुमावत कुटुंबासह परिसरात गाड्यांची आणि घरांची तोडफोड करून मारुती घोरपडे याच्यासह अन्य 12 साथीदारांनी सुंदर नगर भागात घरघुती वादातून कोयता लोखंडी रॉड घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे. या घरांच्या तोडफोडित कुमावत कुटुंबातील एका लहान मुलाच्या हातावर वार झाल्याने तो जखमी आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत पोलिसांनी मुख्य आरोपी मारुती घोरपडे याच्यासह 3 जण आणि आईला ताब्यात घेतले आहे. या तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी मारुती घोरपडे हा अल्पवयीन असून सुधा याआधी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली आहे. सुंदर नगर भागात झालेल्या या तोडफोडीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून 13 पैकी 5 आरोपी ताब्यात असून उर्वरित 8 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

⛽ *सहा दिवसांत पेट्रोल 'एवढे' महागले!* *LetsUp l Update* ⚡ सलग सहाव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 57 पैशांनी वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 59 पैशांची वाढ करण्यात आली आहे. 💥 *इंधन महागले* : दोन्ही इंधनांच्या दरांत गुरुवारी प्रत्येकी 60 पैशांची वाढ केली होती. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सहा दिवसांत पेट्रोल 3 रुपये 31 पैशांनी महागले आहे. 🧐 *विरोधाभास* : पेट्रोलच्या दरात सहाव्या दिवशी वाढमुळे मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटर 81 रुपये 53 पैसे मिळत आहे तर डिझेल प्रतिलिटर 71 रुपये 48 पैसे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कच्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली दिसत आहे. 👀 इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार आजचे दर, पेट्रोल डिजल *दिल्ली* : 74.57 72.81 *कोलकाता* : 76.48 68.70 *मुंबई* : 81.53 71.74 *चेन्नई* : 78.47 71.14 📌 सलग सहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जणांना कोरोना* *LetsUp l Update* ⚡ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 🧐 *विशेष* : मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली होती. याचे रिपोर्ट गुरुवारी रात्री आले. यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंत्री मुंडे सहभागी झाले होते. 📌 राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. तेही कोरोनामुक्त झाले आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *राज्यात कोरोनाचा आलेख वाढताच!* *LetsUp l Corona Live* ⚡ राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात 152 कोरोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 3 हजार 590 झाली आहे. 💁🏻‍♂️ *कोरोनामुक्त* : राज्यात दिवसभरात 3 हजार 607 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 97 हजार 648 वर पोहचली आहे. शिवाय दिवसभरात 1 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 78 झाली आहे. 😷 *मृत्यू* : राज्यात दिवसभरात दगावलेल्या 152 रुग्णांपैकी 97 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे 9, कल्याण-डोंबिवली 7, नवी मुंबई 4, वसई-विरार 2, नाशिक 5, औरंगाबाद 6, लातूर 2, पुणे आणि सोलापुर प्रत्येकी 8, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 📌 मृत रुग्णांमध्ये 102 पुरुष आणि 50 महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी 60 वर्षांवरील 85, 40 ते 59 वयोगटातील 54 आणि 40 वर्षांखालील 13 रुग्णांचा समावेश आहे. मृत रुग्णांपैकी 107 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*LetsUp News Update* ▪ आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानवेळी 50 लोकांच्या उपस्थितीला राज्य शासनाची परवानगी; महापूजेसाठी मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण ▪ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट; स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते ▪ राज्यात दिवसभरात 3 हजार 607 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 97 हजार 648 वर पोहचली; दिवसभरात 152 बाधित दगावले ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ जीएसटी परिषदेची आज 40 वी बैठक; राज्यांना भरपाई व ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2020 कालावधीत जीएसटी परतावा न भरणाऱ्यांना विलंब शुल्क माफ करण्यावर निर्णय होण्याची शक्यता ▪ छोटय़ा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त 1 टक्का; भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांची माहिती ▪ राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान; सर्वसाधारण गटात राज्यातील 12 संस्था आणि विद्यापीठ गटात 13 संस्था ▪ भारताशी योग्य पद्धतीने सीमाप्रश्न हाताळत असल्याचा चीनचा दावा; दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी कारवाई करीत आहेत ▪ ऑटोमोबाइल क्षेत्रातील फोर्ड कंपनीने आपल्या तब्बल 25 लाख सदोष कार माघारी बोलावण्याचा घेतला निर्णय; अमेरिका, कॅनडा व अन्य ठिकाणी विकलेल्या कारचा यात समावेश ▪ भारतीय क्रिकेट संघाचा पुढील महिन्यातील श्रीलंका दौरा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे स्थगित; आयसीसीची ट्विटद्वारे माहिती ▪ राम गोपाल वर्मा यांनी केली 'गांधी-गोडसे' यांच्यावरील 'द मॅन हू किल गांधी' चित्रपटाची घोषणा; पहिले पोस्टर येताच लोक भडकले 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *मृत व्यक्तींचे नातेवाईक मृतदेह नेण्यास येईना* *LetsUp | Corona Live* 💫 मुंबईतील केईएम रुग्णालयात सात कोरोनाबाधितांचे सात मृतदेह पडले असून या रुग्णांचे नातेवाईक मृतदेहांचा ताबा घेण्यासाठी येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ⚡ तसेच नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. सातपैकी एका मृतदेहाला तीन आठवडे झाले असून इतर मृतदेह नजीकच्या काळातील आहेत. 👉 कोरोनाबाधितांचे मृतदेह नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक न आल्यास काय करायचे याबाबत ८ मे रोजी पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. 📍 पोलिसांच्या परवानगीशिवाय तसेच कायद्याचे उल्लंघन करून मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत महापालिका काहीही करू शकत नाही. 📌 दरम्यान, कोविड मार्गदर्शक तत्वानुसार महापालिका आयुक्त चहल पोलीस आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर दिली. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल* *LetsUp | Update* 💫 महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली. ✨ मान्सूनने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचे चित्र असून कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मजल मारली आहे. 📍 तसेच संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यदेखील व्यापले असून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. 📌 दरम्यान, मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापली असल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🙏 *जिवापेक्षा काहीच मौल्यवान नाही!* 😷 मास्क वापरा, स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवा. 👌 *अमेझॉनची दमदार ऑफर* 🎨 मल्टि-कलर रीयुजेबल कॉटन मास्क 👍 *3 पिसेस फक्त ~599~ 499 रुपयांत* 🛒 *अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा* 👉 : https://amzn.to/306TJsU

*दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहीत* *letsup | satara* क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या जावली तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित 26 वर्षीय गरोदर महिलेची प्रसुती 30 मे 2020 रोजी झाली असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरोदर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp