en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
...म्हणून आपली इंडियन आर्मी ग्रेटच Let's Up General Knowledge आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात म्हणूनच आपण रात्री शांतपणे झोपू शकतो. 1776 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने कोलकात्यात ‘इंडियन आर्मी’ची स्थापना केली होती. ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात भारतीयांची भरती करून त्यांना युरोपियन पद्धतीचे प्रशिक्षण दिले. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या लष्कराविषयी माहिती नसतात. त्याविषयी आज थोडसं... 👉 1776 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने कोलकात्यात ‘इंडियन आर्मी’ची स्थापना केली. 👉 आसाम रायफल्स हे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. 1835 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. 👉 भारतीय लष्कराने 1982 मध्ये लडाखमध्ये जगातील सर्वात उंच पुलाची उभारणी केली. हा पूल बेली पद्धतीचा आहे. 👉 भारताचे राष्ट्रपती लष्कराचे कमांडर इन चीफ असतात. तथापि, वास्तविक नेतृत्व संरक्षणमंत्र्यांकडे असते. ‘चीफ आॅफ आर्मी स्टॉफ’ हे लष्कराचे प्रमुख असतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 भारतीय लष्कर जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी लष्कर आहे. जगात स्वेच्छेने लष्करात सहभागी झालेले सर्वाधिक सैनिक आपल्याकडे आहेत. 👉 भारतीय लष्कराकडे घोडदळ आहे. जगात केवळ तीन लष्कराकडेच घोडदळ आहे. 👉 भारतीय लष्कराच्या संपूर्ण देशभरात 53 छावण्या आणि 9 लष्करी तळे आहेत. जगातील मोठ्या लष्करात समावेश होणाऱ्या भारतीय लष्करात 11 लाख 29 हजार 900 सक्रिय सैनिक असून, 9 लाख 60 हजारांवर राखीव जवान आहेत. 👉 समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी असून, भारतीय जवानांचे तेथे नियंत्रण आहे. 👉 संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) जगभरातील शांतता मोहिमांसाठी सर्वाधिक शांतता जवान भारताकडून पुरविले जातात. 👉 राष्ट्रपतींचे अंगरक्षक ही भारतीय लष्कराची सर्वात जुनी चिलखती पलटण आहे. 1773 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही पलटण राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे तैनात असते. 👉 लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) ही भारतातील सर्वात मोठी बांधकाम संस्था आहे. 👉 भारतीय लष्कराचे जवान जंगल युद्धनीतीतील निपुणतेसाठी प्रसिद्ध आहेत. जंगलात युद्ध कसे करायचे याचे कसब आत्मसात करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशियासह इतर देशांचे जवान भारतीय लष्कराचा दहशतवाद प्रतिबंधक विभाग आणि जंगल युद्धनीती विभागाला भेट देतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 अमेरिकेकडून भारताला मुख्य सुरक्षा भागीदारीचा दर्जा Let's Up Current Affair अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण कायद्यात बदल करण्यात आला असून आता नवीन कायद्यानुसार अमेरिकेच्या वाणिज्य विभागाकडून भारतीय कंपन्यांना शस्त्रआयात करण्याची पूर्वस्वीकृती मिळाली आहे. याबाबत बोलताना अमेरिका-भारत बिझनेस काऊन्सिलचे अध्यक्ष मुकेश अघी म्हणाले, मी अमेरिकेकडून भारताला मुख्य सुरक्षा भागीदारीचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. हा दर्जा मिळविण्यासाठी भारताने दीर्घ काळापासून प्रयत्न केले आहेत. आता अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याला मान्यता मिळाली आहे. नवीन नियमानुसार आता ज्या कंपन्यांना ‘वॅलिडेटेड अ‍ॅण्ड युझर’चा दर्जा मिळणार आहे, त्यांना शस्त्रास्त्रे आयात करण्यासाठी लायसन्सची आवश्यकता भासणार नाही. याबाबत ‘युएसआयबीसी’चे निर्देशक एस. बेंजामिन म्हणाले, भारताला हा दर्जा मिळाल्यामुळे कंपन्यांना वेगळे लायसन्स काढण्याची गरज नाही. तसेच ‘ग्लोबल सप्लाय चेन’ बनविण्यासाठी आणि बदलते तंत्रज्ञान तत्काळ आत्मसात करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा निर्णय भारतीय कंपन्यांसाठी खूप सकारात्मक आहे, असेही बेंजामिन म्हणाले. हा निर्णय संरक्षण क्षेत्राशी संलग्न असलेल्या भारतीय कंपन्यांच्या व्यापार वाढीला मोठा फायदेशीर ठरणार आहे. भारतीय कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार असून त्याचा दोन्ही देशांना लाभ होणार आहे. मागील 5 वर्षांत दोन्ही देशात सुमारे 3 खरब रुपयांहून अधिक सैन्य तंत्रज्ञान, शस्त्रात्रे आणि क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 810 लायन्सस जारी करण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक लायसन्स हे ‘एरोस्पेस सिस्टम’ विकसित करणे आणि वाहन खरेदीशी संबंधीत आहेत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 13 हजार जणांना गुप्तपणे फाशी! न्यायालय, वकील किंवा कोणतीही चौकशी न करताना विरोधकांवर अत्याचार करून गुन्हा कबूल करून सीरियाचे राष्ट्रपती बशर-अल असद यांनी सुमारे 13 हजार विरोधकांना सरकारी कारागृहात गुप्तपणे फाशी दिली. असा धक्कादायक खुलासा ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’च्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. सन 2011 ते 15 दरम्यान दमिश्कजवळील सैदनाया लष्करी कारागृहात या सामूहिक फाशी देण्यात आल्या आहेत. या सामूहिक फाशीबाबत सुरक्षारक्षक, कैदी आणि न्यायाधिशांसह 84 प्रत्यक्षदर्शिनी माहिती दिल्याचे या अहवालात नमूद केले आहे. अजूनही या कारागृहात मृत्यूचा खेळ सुरू आहे. आठवड्यातून 2 दिवस सोमवार आणि बुधवारी ज्यांची नावे पुकारण्यात येतात; त्यांना सांगितले जाते की, तुम्हाला दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना कारागृहातील तळगृहात घेऊन 2-3 तास मारहाण करण्यात येते. त्यानंतर दुसर्‍या इमारतीतील तळगृहात त्यांना सामूहिक फाशी देण्यात येते. या संपूर्ण कारवाई दरम्यान कैद्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. फाशी देण्यापूर्वी फक्त 1 मिनीट त्यांना फाशी देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनीही माहिती न देता गुप्तपणे दफन करण्यात येतो. ही भयानक परिस्थिती सांगणार्‍या पीडितांच्या साक्षीने लंडनच्या एनजीओने चौकशी केली असता सीरियाच्या सैदनाला कारागृहात 5 वर्षांत सुमारे 13 हजार नागरिकांनी फाशी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 गोळ्यांविना बरे होणारे आजार... Let's Up Health Katta हल्ली धावपळी वाढलीय. आपल्याला थोडं काही दुखले-खुपले की, झटपट आराम मिळतील अशा औषधांची गरज भासते. जरासा त्रास झाला नाही की, कोणत्याही डॉकटरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून गोळी आणून खाल्ली जाते. किंवा काही लोक फिजिशियनकडे धाव घेतात. अशा तर्‍हेने या ना त्या कारणाने लोक गोळ्या खातातच. मात्र काही आजारांपासून गोळी न खाताही इलाज होऊ शकतो. विशेषतः महिलावर्गाला या उपायांची जास्त गरज आहे... 👉 स्पर्शाने : किचनमध्ये काम करीत असताना आपल्याला भाजले असता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? पटकन बोट तोंडात घालतो असेच उत्तर बहुतांशी महिला देतील. ते अगदी बरोबर आहे. मनगटाला इजा पोहचली असता दुस-या हाताने त्या मनगटाला पकडून धरा. स्पर्शात मोठी ताकद असते. अगदी स्वत: केलेला असला तरी. डोके दुखी असेल तर आपलीच बोटे हलक्या हाताने डोक्यावर फिरविली असता आराम मिळतो. अशा पद्धतीने आपल्या मेंदूपर्यंत आपण स्वत:ची काळजी घेतो असा संदेश पोहचविला जातो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 बर्फाचा शेक : जिथे कळ आहे अशा ठिकाणी बर्फाचा शेक द्या. बर्फाचा तुकडा टॉवेलमध्ये गुंडाला किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत थंड पाणी भरून त्याने शेक द्या. 👉 चांगल्या गोष्टींचा विचार करा : जेव्हा तुम्ही एकटे असता किंवा दु:खी असता त्यावेळी चांगल्या आठवणींना उजाळा द्या आणि भविष्याच्या नियोजनाबाबत विचार करा. 👉 एक्सरसाईज करा : औषधांना नाही तर एक्सरसाईजला आपल्या आयुष्यात स्थान द्या. जास्ती आराम केल्याने शरीरातील टिश्यूजला नुकसान पोहोचते. विश्रांतीनंतर एक्सरसाईज एक पम्पासारखे काम करत असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्सरसाईज करा. 👉 वेदनांकडे दुर्लक्ष करा : वेदना थोडी असेल तर टीव्ही किंवा एखादा गेम खेळा म्हणजे त्या दुखण्यापासून लक्ष दुसरीकडे जाईल किंवा आवडत्या व्यक्ती बरोबर फोनवर संभाषण करा. 👉 एका विशिष्ट पद्धतीने श्‍वास घ्या : वेदनांवर विजय मिळविण्यासाठी किंवा कळ कमी होण्याकरिता बेडवर असाल किंवा खुर्चीवर असाल तर एक दीर्घ श्‍वास घ्या आणि हळू-हळू नाकाद्वारे तो सोडा. ही क्रिया वारंवार केल्यास तणाव कमी होतो. 👉 योगसाधना : योग एक अशी प्रक्रिया आहे. ज्यामुळे शरीरातील सर्व इंद्रिय नियंत्रित होण्यास मदत होते. शरीरात मजबुती आणि लवचिकपणा येण्यासाठी योग हा एक रामबाण उपाय आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 व्हॉटस्अॅप ; स्टेटसवर कॉमेंटची सुविधा Let's Up Techno Katta व्हॉटस्अॅपच्या आगामी आवृत्तीमध्ये आणखी एका नवीन फिचरची भर पडणार आहे. WABetaInfo या ट्विटर अकाऊंटवरून आगामी आवृत्तीतल्या एका अनोख्या फिचरचा स्क्रीनशॉट देण्यात आला आहे. यात विंडोजच्या 2.17.40+ या बीटा आवृत्तीत स्टेटसवर कॉमेंटची सुविधा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या माध्यमातून चॅटींगदेखील करता येईल. विशेष म्हणजे अन्य युजरने आपले स्टेटस अपडेट केल्यानंतर ते दुसर्‍यांना नोटीफिकेशनच्या स्वरूपात कळणार आहे. अर्थात हे नोटिफिकेशन ‘ऑफ’ करण्याची सुविधाही यात मिळणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 टाटाची ‘टामो’ कार्यान्वित टाटा मोटर्सने ‘टामो’ या नावाने नवीन शाखा कार्यान्वित केली आहे. या ब्रँडच्याच अंतर्गत पुढील महिन्यात जिनेव्हा शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल मोटार शो’मध्ये ‘फ्युचरो’ हे मॉडेल प्रदर्शीत करण्यात येणार आहे. ‘टामो’चे सिलीकॉन व्हॅलीतही कार्यालय असणार आहे. टामो ही टाटा मोटर्ससाठी ग्लोबल प्लॅटफॉर्म म्हणून काम करणार आहे. यात देशो-देशींचे स्टार्टप्स व टेक कंपन्यांसह नेटवर्कींग करून चालू प्रवाह आणि नाविन्याची माहिती मिळवत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने किफायतशीर दरात उत्तमोत्तम वाहने या माध्यमातून सादर करण्यात येणार असल्याचा टाटा मोटर्सने जाहीर केले आहे. 👉 येतोय लेनोव्हो योगा ए 12 लेनोव्हो कंपनीने आपला योगा ए 12 हा टु-इन-वन लॅपटॉप कम टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. लेनोव्होने गेल्या वर्षी सादर केलेल्या योगाबुकमध्ये व्हर्च्युअल कि-बोर्ड प्रदान केला होता. लेनोव्हो योगा ए 12 या मॉडेलमध्येही याच प्रकारचा कि-बोर्ड देण्यात आला आहे. यात 12.2 इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले, रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी इतके असेल. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 13 तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यात लेनोव्होचा मल्टी-टास्कींग हायब्रिड युजर इंटरफेस असेल. प्रारंभी हे मॉडेल अमेरिकेत 299 डॉलर्स या मुल्यात सादर करण्यात आले आहे. भारतात हे मॉडेल 20 हजारांच्या आसपास असेल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

पालघर जिल्हा परिषदेत विविध पदांच्या जागा Let's Up Job Updates 1. पोस्ट : विधी तज्ञ - जागा : 01 - पात्रता : विधी पदवी आणि अनुभव 2. पोस्ट : संगणक तज्ञ - जागा : 01 - पात्रता : Bsc IT, MSCIT, संगणक अनुभव 3. पोस्ट : जनसंपर्क अधिकारी - जागा : 01 - पात्रता : पत्रकारिता व मास मिडिया पदवी/पदव्युत्तर पदवी आणि अनुभव 4. पोस्ट : पेसा समन्वयक (डहाणू तालुका) - जागा : 01 - पात्रता : पदव्युत्तर पदवी समाजकार्य/ग्रामीण लोकप्रशासन आणि मानवशास्त्र, PGD ग्रामीण, MSCIT, 02 वर्षे अनुभव 5. पोस्ट : कनिष्ठ सहाय्यक - जागा : 04 - पात्रता : कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि., MSCIT (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 6. पोस्ट : चतुर्थ श्रेणी कर्मचारी (MTS) - जागा : 02 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संगणक अनुभव 7. पोस्ट : गट समन्वयक (Block Coordinator) - जागा : 01 - पात्रता : BSW पदवी, 02 वर्षे अनुभव 8. पोस्ट : समूह समन्वयक (Cluster Coordinator) - जागा : 11 - पात्रता : BSW पदवी, 02 वर्षे अनुभव 9. पोस्ट : डेटा मॅनेजर (IDSP) - जागा : 01 - पात्रता : Computer Science किंवा BE (IT/Electronics), 03 वर्षे अनुभव वय : पद 1 : 30 ते 45 वर्षे I पद 2,3,7,8: 25 ते 35 वर्षे I पद 4,5,6: 18 ते 33 वर्षे I पद 9 : 40 वर्षे थेट मुलाखत : दि. 15 फेब्रुवारी 2017 मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,पालघर अधिक माहितीसाठी : https://goo.gl/eoXdvC (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - चोरी केलेल्यांना आवाहन की पुरस्काराचे मोल समजा, केवळ आर्थिक मूल्याकडे पाहून त्याची नासधूस करू नका - कैलाश सत्यार्थी 👉 नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाचा मसूद अझर आणि जैश-ए-मोहम्मदच्या अन्य 3 म्होरक्यांना फरार घोषित करणारा आदेश जारी 👉 नवी दिल्ली - विजय मल्ल्या प्रकरणी किंगफिशर एअरलाईन्सच्या आणि आयडीबीआय बँकेच्या 9 माजी कर्मचाऱ्यांच्या विशेष सीबीआय कोठडीत 20 फेब्रुवारीपर्यंत वाढ 👉 हैदराबाद - ब्रिटिश कौन्सिल 'ग्रेट स्कॉलरशिप 2017' योजना सुरु करणार , उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये जाण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर 👉 तामिळनाडू - पनीरसेल्वम यांनी पक्षाविरोधातील बंड थांबवावे अन्यथा त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल - व्ही. के. शशिकला, पक्षप्रमुख अण्णाद्रमुक (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 अफगाणिस्तान - काबूलमधील सुप्रिम कोर्टाच्या पार्किंग एरियात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू, अफगाण प्रसारमाध्यामांची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई महापालिकेसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना 24 तास पाणी देणार, रस्ते खड्डेमुक्त झाल्याशिवाय पथकर घेणार नाही 👉 मुंबई - भाजपाच्या जाहीरनाम्यावर उद्धव ठाकरेंची टीका, स्टॅम्पपेपरऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का वापरला नाही 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 औरंगाबाद - शरद पवारांशी गोपीनाथ मुंडेंचा संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही त्यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजीच साजरा करायचो - प्रकाश महाजन 👉 सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्टीने राज्यात आघाडीवर, शैक्षणिक गुणवत्तेचा वास्तव सांगणारा देशव्यापी अहवाल 'असर' संस्थेकडे सादर 👉 मुंबई - हॉटेल मालकाकडून लाच घेताना शिवसेना नगरसेविका हेमांगी चेंबूरकरसह पीए राजाराम रेडकरलाही बेड्या, एसीबीची कारवाई 👉 पंढरपूर - दोन मुलांची गळा दाबून हत्या करुन आईची आत्महत्या, आजाराला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची मुंढेवाडीतील घटना 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैदराबाद - भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील 9 फेब्रुवारीला होणाऱ्या कसोटीमध्ये जायबंदी अमित मिश्राऐवजी कुलदीप यादव खेळणार 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, श्रद्धाने या चित्रपटाचे पहिले पोस्टर तिच्या ट्विटर अकाउंन्टवर केले अपलोड (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - नोटाबंदी निर्णय अंमलात आणण्यासाठी घाईदेखील केलेली नाही तसेच याची घोषणा अविचारानेही करण्यात आलेली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 👉 नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय सरकार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लादलेला नसून 1 हजार आणि 500 च्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव रिझर्व बँकेचाच : अर्थमंत्री अरुण जेटली 👉 नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते कैलास आणि सामाजिक कार्यकर्ते सत्यर्थी यांच्या घरी चोरी, चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती लांबवली 👉 नवी दिल्ली - शिख समाजावरील जोक्सवर बंदी घालता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय 👉 नवी दिल्ली - 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, साध्वी प्रज्ञासिंहच्या जामिनप्रकरणी NIA ने मुंबई उच्च न्यायालयात ध्वनी आणि चित्रफित सादर केली (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - दहशतवादाला प्रोत्साहन देण्याबद्दल पाकिस्तानकडून दंड वसूल करावा, अमेरिकतल्या थिंक टँकने डोनाल्ड ट्रम्प सरकारला दिला सल्ला 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला गौप्यस्फोट 👉 मुंबई - शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच शिवसेनेला हार्दीक पटेलला बोलवावे लागले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉 पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक, भाजपाने उघडले खाते, भाजपचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार रवी लांडगे बिनविरोध 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - आयडीबीआय आणि किंगफिशर एअरलाईन्सचा कर्मचाऱ्यांच्या जामिन अर्जावरील विशेष सीबीआय न्यायालयातली सुनावणी उद्यापर्यंत स्थगित 👉 मुंबई - उद्योगपती विजय नंदा यांच्याकडून कोट्यवधी रुपये किंमतीच्या प्राचीन मूर्ती हस्तगत, नंदा यांना 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी 👉 बीड - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा, राजाभाऊ मुंडेंसह 16 जण दोषी, दोषींना ५ वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी 60 हजार रुपये दंड 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28335.16, निफ्टी : 8768.30, सोने भाव : 29,245 (प्रतितोळा), चांदी : 42,254 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 लावाने त्यांचा नवा फिचर फोन लावा फोरजी कनेक्ट एम वन केला लाँच, त्याची किंमत 3333 रूपये 🎯 खेळ घडामोडी : 👉 नवी दिल्ली - दिल्लीच्या मोहित अहलावतने टी-20 सामन्यात झळकावले विक्रमी त्रिशतक, त्याने 72 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 39 षटकारांसह नाबाद 300 धावांची खेळी केली 👉 भुवनेश्वर - टी 20 अंध विश्वकप, भारताने 9 गडी राखून न्यूझीलंड संघाचा केला पराभव 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - सिने दिग्ददर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई सीरीजचा तिसरा सिनेमा 'मुन्नाभाई 3' बनवण्याचा घेतला निर्णय (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 विजेचा नेमका रंग कोणता? Let's Up Knowledge Katta बहुतेक वेळा आपण वीज चमकताना पाहिली असेल, तेव्हा तिचा रंग पांढराच असतो. पण असं नसतं. तर इंद्रधनुष्यात जितके रंग असतात, त्या प्रत्येक रंगाची वीज असू शकते. पण वीज चमकताना तिचा रंग कोणता असेल, हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. वातावरणात बाष्पाचं प्रमाण किती आहे, पाऊस पडतो आहे का, तसंच हवेत प्रदूषणाचं प्रमाण किती आहे, यावरून विजेचा रंग ठरतो. उदाहरणार्थ, हवेत ओझोनचं प्रमाण जास्त असेल तर विजेचा रंग निळा होतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 चंद्र नसता तर… चंद्र आणि सूर्य, हे आपल्या सूर्यमालेतले अतिशय महत्त्वाचे घटक. यापैकी एक जरी घटक अस्तित्वात नसता तर काय झालं असतं, याची कल्पनाही करणंही अवघडच. चंद्र नसता तर काय झालं असतं, याची कल्पना करणं कठीण आहे. पण वातावरणावर वाईटच परिणाम झाला असता, हे नक्की. समुद्राची भरती आणि ओहोटी हे चंद्राच्या स्थानावर अवलंबून असते आणि त्यानुसार आपल्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. चंद्र आणि पृथ्वीच्या स्थानानुसार दिवस आणि रात्र यांची लांबी ठरते. चंद्र नसेल तर पृथ्वीची गती वाढेल आणि त्याचा परिणाम दिवस व रात्रीवर होईल. शिवाय पृथ्वीचा कल कमी होईल, त्यामुळे याचा होणारा परिणाम ऋतूंवर जाणवेल. पृथ्वीवरच्या काही जागा खूप थंड असतील तर काही उष्ण. 👉 भारतात घड्याळे कधी आली? भारतात व्यापारासाठी वखारी सुरू करणार्‍या इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंच लोकांनी भारतात घड्याळं आणली. पण सुरुवातीला त्या घड्याळांचा वापर त्यांच्यापुरताच मर्यादित होता. यापैकीच काही घड्याळं या युरोपियन व्यापार्‍यांनी इथल्या सत्ताधीशांना भेट म्हणूनही दिली होती. भारतात आपल्या लोकांमध्ये घड्याळाचा वापर पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत सुरू झाला असावा असं दिसतं. इ. स. 1735 सालच्या एका पत्रात पेशव्यांचं घड्याळ इंग्रज अधिकार्‍यांनी दुरुस्त करून दिल्याचा उल्लेख आहे. बाजीरावाप्रमाणेच नारायणराव व माधवराव या दोन पेशव्यांकडेही घड्याळं होती. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up Status Katta 👉 मुझे क्या फर्क पडता है जहाँ मैं आज डूबा हूँ वहीं से कल उभरना है 👉 दर्द की बारिशों मे हम अकेले ही थे, जब बरसी खुशियाँ... न जाने भीड कहा से आई...। 👉 कुछ युँ हो रहा है, रिश्तों का विस्तार... जितना जिस से मतलब, उतना उस से प्यार...। 👉 अब कहाँ दुआओं में वो बरकतें, वो नसीहतें, वो हिदायतें... अब तो बस जरूरतों के जुलुस हैं, मतलबों के सलाम हैं...। (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, मेरी मंजिल मेरा हौंसला देख कर...। 👉 दुनिया का हर शॉक पाला नहीं जाता, काँच के खिलोनो को... उछाला नहीं जाता, मेहनत करने से हो जाती है, मुश्किले आसान, क्युँकी हर काम तकदीर पर टाला नहीं जाता। 👉 जिंदगी ने कई सवालात बदल डाले वक्त ने मेरे हालात बदल डाले मै तो आज भी वही हूँ जो मैं कल था बस मेरे लिये लोगों ने अपने खयालात बदल डाले। 👉 'फितरत', 'सोच' और 'हालात' में फर्क है, वरना 'इंसान' कैसा भी हो, दिल का बुरा नहीं होता। 👉 गलतफहमियों के सिलसिले आज इतने दिलचस्प हैं, कि हर ईंट सोचती है दिवार मुझपे टिकी है...। (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

मोबाईल इंटरनेटचा स्पीड कमी झालायं? Let's Up Techno Katta 3G किंवा 4G डेटा पॅक टाकून सुद्धा इंटरनेटला स्पीड मिळत नाही यामुळे अनेकांचा संताप अनावर होतो. काही वेळेस आपण टेलिकॉम कंपनीला दोष देत असतो पण इंटरनेटचा स्पीड आपल्या काही चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 👉 ब्राउझर : तुमच्या मोबाईलच्या दृष्टीने कोणते ब्राऊझिंग अॅप चांगले आहे ते निवडावे. ब्राऊझिंग अॅप निवडताना त्याची साईझ, विश्वासहार्यता, डेटा किती खातो अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गुगल क्रोम हा अँड्रॉइडसाठी सर्वोत्तम ब्राउझर्सपैकी एक आहे. हा ब्राउझर तुमचे पासवर्ड, तसेच बुकमार्क्स लक्षात ठेवतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 Cache क्लिअर करा : जर तुमचा फोन ‘स्लो’ किंवा इंटरनेटचा स्पीड कमी झाला असेल तर मोबाईल व ब्राउझर मधील कॅशे (Cache) डिलिट करा. वेळोवेळी कॅशे क्लिअर केला, तर फोन आणि इंटरनेट व्यवस्थित चालते. 👉 अनावश्यक अॅप्स काढा : अॅप आवडलेकी आपण ते डाउनलोड करतो किंवा शेअरिंगने घेतो. त्याचा वापर होवो अथवा न होवो आपण त्याला अनइन्स्टॉल करत नाही. त्यामुळे ते अॅप मोबाईल मधील जागा खाते शिवाय बॅकग्राउंडलाही सुरू राहते. त्यामुळे फोन आणि इंटरनेट स्लो होते. म्हणूनच अनावश्यक अॅप काढून टाका. 👉 इमेजेस डिसेबल करा : इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी मोबाईलचा ब्राउझर ‘टेक्स्ट ओन्ली मोड’ वर ठेवा. फोनच्या किंवा ब्राउझरच्या ‘सेटिंग्ज’मध्ये तो पर्याय उपलब्ध असतो. ‘टेक्स्ट ओन्ली मोड’ सुरू केला, की ब्राउझरमध्ये फोटो लोड होणार नाहीत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड काही प्रमाणात वाढण्यास मदत होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

भारतीय स्टेट बँकेत 2313 जागांसाठी भरती Let's Up Job Updates पोस्ट : प्रोबेशनरी ऑफिसर्स (Probationary Officers) - जागा : 2313 - पात्रता : पदवीधर (पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले देखील अर्ज करू शकतात) वय : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट) फी : 600 रुपये (SC/ST/अपंग 100 रुपये) परीक्षा : दि. 29, 30 एप्रिल & 6, 7 मे 2017 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 06 मार्च 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/fg6xmD ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/fI0JtS (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 सी-मेट पुणे येथे विविध पदांची भरती पोस्ट : प्रोग्राम कोऑर्डिनेटर - जागा : 01 पोस्ट : सायंटिस्ट D’ (ETIV) - जागा : 01 पोस्ट : सायंटिस्ट C’ (ETIII) - जागा : 05 पोस्ट : सायंटिस्ट `B’ (ETII) - जागा : 04 पात्रता : B.E./B.Tech/M.Sc. वय : दि. 20 मार्च 2017 रोजी 40 वर्षापर्यंत अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar Centre for Materials for Electronics Technology (CMET), 34/2B, Panchwati, Dr. Homi Bhabha Road, NCL (P.O.), Pune - 411 008 (Maharashtra) अर्ज करण्याची मुदत : दि. 20 मार्च 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/nOjmql (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - गव्हर्नर ऊर्जित पटेल उद्या आरबीआयचे पतधोरण जाहीर करणार, व्याजदरात कपात जाहीर होण्याची शक्यता 👉 नवी दिल्ली - दिल्ली, नोयडा आणि उत्तराखंडमध्ये रात्री 10.30 वाजता भूंकपाचे धक्के, उत्तराखंडमधील पिपालकोटी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविला गेला 👉 नवी दिल्ली - एका वर्षात सर्व सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडले जातील असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले 👉 नवी दिल्ली - पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश, 14 हजार 779 रुपयांची थकबाकी जमा करण्याचेही फर्मान (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 सॅन फ्रान्सिस्को - सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात गुगल, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सह जवळपास 97 कंपन्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नाशिक - विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे विजयी 👉 नागपूर - अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे 43 हजार 8897 मतांच्या अधिक्याने पहिल्या फेरीत विजयी 👉 पुणे - जिल्हा परिषदेच्या आखाड्यात नेत्यांची नवीन पिढी उतरली, बारामतीतून अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री कृपांशकर सिंह यांच्याविरोधात एसीबीने एकूण 19 मालमत्तांचा तपशील दिला 👉 पुणे - प्रवाशांना तिकीटासाठी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) टोलभरणाही डिजिटल होणार 👉 नाशिक - सुरगाणा तालुक्यातील वनरक्षक संतोष कचरू शिंदे यास 5000 रुपयांची लाच घेताना अटक 🎯 खेळ घडामोडी : 👉 लंडन - अलिस्टर कूकने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, कूकने 2012 साली इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 राजस्थान - जॉली एल.एल.बी. चित्रपटातील भूमिकेबाबत जयपूर न्यायालयाने अक्षय कुमारला जारी केले समन्स, 10 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश 👉 मुंबई - मुस्लिम समाजाचे चुकीचे चित्रण झाल्याने शाहरुख खानच्या पाकिस्तानात प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटावर बंदी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*व्हॉटस्अॅपवर नवीन इमोजींची भर…*_ _*Let's Up Techno Katta*_ व्हॉटस्अॅपची 2.17.44 ही आवृत्ती नुकतीच बीटा युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. याची खासियत म्हणजे यात नवीन इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने आयओएस 10.2 आणि अँड्रॉइड नोगट 7.1 या ऑपरेटींग सिस्टीम्समधील इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात आपल्या स्मार्टफोनमध्ये संबंधीत प्रणालीचा वापर नसतांनाही आपण त्या इमोजी वापरू शकू. नवीन आवृत्तीत डॉक्टर, शास्त्रज्ञ, आरोग्य सेवक, शेतकरी, गायक, पॉपस्टार, तंत्रज्ञ, शेफ, कारखान्यातील कामगार, गायक, मेकॅनिक आदींचा समावेश असेल. महत्वाची बाब म्हणजे लिंग समानता दर्शविण्यासाठी यात संबंधीत महिला व्यावसायिकांच्या इमोजीदेखील देण्यात येणार आहे. अर्थात आपण महिला डॉक्टरसह अन्य महिला इमोजींचा वापरदेखील करू शकणार आहे... *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/QZwXhe 👉 _*फेसबुकचं ‘डिस्कव्हर पीपल’ फिचर*_ अलीकडच्या काळात फेसबुकवरील शेअरिंगचा वेग मंदावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे फेसबुकने आपल्या युजर्सला त्यांच्या आवडी-निवडी आणि छंदाशी संबंधीत अन्य लोकांना सहजपणे शोधता यावे म्हणून ‘डिस्कव्हर पीपल’ हे फिचर सादर केले आहे. सध्या फेसबुकवर आपण दुसर्‍या युजरला सर्चबारच्या माध्यमातून शोधू शकतो. मात्र यासाठी आपल्याला संबंधीत व्यक्तीचे नाव माहित असणे आवश्यक असते. आवडी-निवडी, छंद असणारे अन्य युजर शोधण्याची सुविधा आजवर नव्हती. या पार्श्वभूमीवर आता फेसबुकने ‘डिस्कव्हर पीपल’ या नावाने नाविन्यपूर्ण फिचर प्रदान केले आहे. आयओएस आणि अँड्रॉइड प्रणालीवरील काही युजर्सला हे फिचर देण्यात आले असून अन्य युजर्सला टप्प्याटप्प्याने याला लागू करण्यात येणार आहे. या अंतर्गत कुणालाही समविचारी लोक शोधता येतील. यासाठी फेसबुकचा अलॉगरिदम संबंधीत युजरच्या प्रोफाईलमधील माहितीचा आधार घेणार आहे. अर्थात याचा वापर करण्यासाठी संबंधीत युजरला आपले प्रोफाईलदेखील अपडेट करावे लागणार आहे. यातील संबंधीत व्यक्तीचे शहर, छंद (उदा. वाचन), त्याने लाईक केलेले पेजेस/ग्रुप्स आदींचे अध्ययन करून त्याला समविचारी लोकांची यादी सादर करण्यात येणार आहे. यासाठी एक स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. यावर क्लिक केल्यास पहिल्यांदा ‘इंट्रोड्युस युवरसेल्फ’ असे दिसते. यात संबंधीत व्यक्तीला आपले प्रोफाईल अद्ययावत करण्याचे सुचविण्यात येते. यानंतर त्याला अन्य युजर्सची यादी दिसते. ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/QZwXhe । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी फक्त 30 टक्केचं आश्वासनं पूर्ण, संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात केंद्र सरकारची पोलखोल 👉 नवी दिल्ली - लाल किल्ला परिसरात साफसफाईदरम्यान आढळली हत्यारं आणि स्फोटकं, पोलिसांनी परिसर केला सील, कळवले एनएसजीला 👉 नवी दिल्ली - मोबाईल फोन्सच्या सिमकार्डांचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने योग्य यंत्रणेमार्फत सिमकार्डधारकांच्या काटेकोर नोंद ठेवावी : सर्वोच्च न्यायालय 👉 चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललितांच्या रक्तात संसर्ग झाला होता, एकेक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला : डॉक्टर रिचर्ड बेले 👉 लखनऊ - उत्तर प्रदेशातील विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे तब्बल 302 उमेदवार कोट्यधीश तर 143 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 👉 आझमगड - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील शेवटचे सैनिक कर्नल निजामुद्दीन (वय 116) यांचं निधन, उत्तर प्रदेशातील आजमगडच्या मुबारक भागातील ढकवा इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 सॅन फ्रान्सिस्को - समुद्राचं खारं पाणी पेयजलात बदलण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय भारतीय वंशाचा अमेरिकन विद्यार्थी चैतन्य करमचेडूने काढला शोधून 👉 पाकिस्तान - कराचीमधील क्लिफ्टन भागात असलेल्या अफगाणिस्तानच्या वकिलातीजवळ गोळीबार, या गोळीबारात 1 जण ठार 🎯 राजकीय घडामोडी : 👉 लखनौ - यादव कुटुंबात सर्व काही ठीक असून शिवपाल सिंह यादव हे आपला नवा पक्ष तयार करणार नाही : मुलायम सिंह यादव 👉 पुणे - चंदन नगर पोलिसांनी केला भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवारांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 ठाणे - आधीच पूर्ण बुकिंग झालेल्या विमानाची तिकीटं दिल्याप्रकरणी ठाण्याच्या पाटील दाम्पत्याला 1.6 लाख रुपये देण्याचे ठाण्याच्या ग्राहक मंचाचे जेट एअरवेजला आदेश 👉 मुंबई एअरपोर्टवर एका प्रवाशाकडून 31 लाख 68 हजार 780 रुपये किंमतीचं सोनं जप्त, काळा रंग देऊन लपवण्यात आलं होतं सोनं 👉 नवी मुंबई - कोब्राला किस करुन फोटो काढताना सापाच्या दंशाने नवी मुंबईतील सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राचा मृत्यू, 12 वर्षातली ही 31वी घटना 👉 कोल्हापूर - पानसरे खटल्याच्या सुनावणीत संशयित समीर गायकवाडला सनातनचे गोमूत्र, अगरबत्ती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली, जप करण्यासाठी मात्र माळ देण्याची मुभा 👉 पुणे - पुण्यामध्ये पतीसोबत झालेल्या वादानंतर विवाहितेने केली आत्महत्या, भाग्यश्री पवार असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचे नाव आहे 👉 बीड - आष्टी तालुक्यातील नगर-बीड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस (नाईक संदीप तागड) आणि त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यू 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28439.28, निफ्टी : 8801.05, सोने भाव : 29,060 (प्रतितोळा), चांदी : 42,133 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 फेसबुकवर अधिक उत्तम रितीने इमेज सर्च करण्याची पध्दत विकसित, यासाठी आर्टीफिशियल इंटिलेजियन्स आणि डीप न्यूरल नेटवर्कचा वापर, याच्या मदतीने संबंधीत प्रतिमेतील पदार्थ, व्यक्ती, विख्यात स्थळे आदींबाबत फेसबुकला माहिती मिळणार 🎯 खेळ घडामोडी : हैदराबाद - भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेच, पण त्याबरोबर तो उत्कृष्ट कर्णधारही आहे : ब्रायन लारा 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 प्रियंकाने आणि ‘बेवॉच’ या चित्रपटातील तिच्या इतर सहकलाकारांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘बेवॉच’ चित्रपटाचा नवा ट्रेलर केला शेअर (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 एकदिवसीय क्रिकेमध्येही सुपर ओव्हर Let's Up Sports Katta इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅंम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आता एकदिवसीय क्रिकेमध्येही सुपर ओव्हरचा रोमांच अनुभवता येणार आहे. कारण आयसीसीने जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीचे सामने टाय झाल्यास निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्याच्या पर्यायाला आयसीसीने मंजुरी दिली आहे. याआधी असा पर्याय केवळ अंतिम सामन्यांसाठी ठेवण्यात आला होता. टी-20 क्रिकेटमध्ये सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब करण्याचे प्रसंग अनेकवेळा आले आहेत. पण, एकदिवसीय सामन्यात मात्र याआधी सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 अॅलेस्टर कूकचा राजीनामा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. "गेली 5 वर्षे इंग्लंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्माननीय होते. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता, पण हा निर्णय माझ्यासाठी आणि इंग्लिश संघासाठी योग्य आहे असे मला वाटते," असे कूकने कर्णधारपद सोडल्यानंतर सांगितले. कूकने 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या कूकने कारकिर्दीत अनेक चढ-उतार पहिले. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आदी संघांनाही कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पराभूत केले होते. पण 2013मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅसेस मालिका, तसेच गतवर्षी पाकिस्तान आणि भारताविरुद्घच्या मालिकांमध्ये इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता. 👉 खराब स्टेडियम्सचे होणार कठोर परिक्षण आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करणाऱ्या क्रिकेट स्टेडियम्सच्या खेळपट्ट्यांचे कठोर परिक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. प्रत्येक सामन्यानंतर खेळपट्टी आणि मैदानाच्या स्थितीच्या आधारे स्टेडियमला श्रेणी बहाल केली जाईल. खराब स्थितीतल्या स्टेडियम्सना नकारात्मक गुण दिले जाणार आहेत. 5 वर्षांच्या कालावधीत एखादया स्टेडियमच्या खात्यात 10 नकारात्मक गुण जमा झाले, तर त्या स्टेडियमवर 2 वर्षांसाठी बंदीची कारवाई केली जाईल. एखाद्या स्टेडियमला 5 नकारात्मक गुण मिळाल्यास, त्या स्टेडियमवर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात येईल. दुबईत आयसीसीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 अ‍ॅकॅडमिक क्वालिफिकेशन पुरेसं नाही...! Let's Up Edu Katta इंटरव्ह्यूसाठी जाताना जशी तुमची तयारी एका बाजूला सुरू असते, अगदी त्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूने कंपनीही येणार्‍या कँडिडेटची निवड कशी करायची, यासाठी काही निकष ठरवत असते. कंपनीने ठरवलेल्या निकषांवर तुम्ही परफेक्ट बसत असाल, तर तुमची निवड नक्की; पण त्याचवेळी कदाचित काही पॉईंटवर उन्नीस-बीस होत असेल, तर अशावेळी परफेक्ट लिस्टमध्ये पोहोचण्यासाठी काय करायला हवं? याची खबरदारी कॅडिडेट म्हणून तुम्हालाच घ्यावी लागते. कंपनीला तुमचं प्रोफाईल क्लिक झालं, तर ऑफर लेटर घेऊनच बाहेर पडता येतं. मात्र, त्यासाठी कंपनीच्या तुमच्याकडनं असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी निभावणं आवश्यक ठरतं. अलीकडच्या काळात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळं, एकेका पदासाठीची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. साहजिकच, कंपनीकडून राइट कँडिडेट फॉर राईट जॉब शोधण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळं, तुम्ही अ‍ॅकॅडमिकली ब्रिलियंट असाल; पण कंपनीच्या क्लायंटबरोबर संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेल्या कम्युनिकेशन स्कील्समध्ये मागे पडलात, तर गुणवत्ता असूनही जॉब मिळवताना कष्ट पडतात. सध्याच्या जगात मिळवताना मल्टिटास्किंग अर्थात विविध प्रकारची कौशल्ये अवगत असलेल्या कँडिडेटला प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळं, संबंधित क्षेत्रात नोकरीसाठी, इंटरव्ह्यूसाठी जाताना केवळ तुमची डिग्री महत्त्वपूर्ण ठरते असं नाही, तर तुमच्या रेझ्युममधील आधीच्या नोकरीतील अनुभव आणि तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटिंनाही महत्त्व प्राप्त होतं. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) एखाद्या जॉबसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता तुमच्याकडे असेल आणि त्याचबरोबर इतर कौशल्यांची जोड असेल, तर चांगलं सॅलरी पॅकेज देण्यासाठी कंपन्याही मागे-पुढे पाहात नाहीत, असा अनुभव आहे. नोकरी मिळवणं म्हणजे नक्की असतं, तरी काय याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणलं, नोकरी मिळविणे म्हणजे स्वत:ला गुणात्मक सादर करणं. चांगली नोकरी मिळविण्यासाठी फक्त शैक्षणिक गुणवत्ता हा एकमेव मापदंड असून चालत नाही, तर त्याव्यतिरिक्त आपण नोकरीसाठी योग्य, कामासाठी योग्य असणे गरजेचे आहे. मार्क आणि डिग्री, या व्यतिरिक्त आज कंपन्यांना अजुन काहीतरी जास्त/वेगळे अपेक्षीत आहे. हे काहीतरी जास्त/वेगळे म्हणजे संभाषण कौशल्य, वागणूक, प्रामाणिकपणा, व्यावसायिकता, कॉम्प्युटरचे ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन पटवून देण्याचे कौशल्य, धीर, सहनशक्ती, तत्परता, चिकाटी, रागावर नियंत्रण, वेळ पाळणे, इत्यादी. या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकल्या जात नाहीत, तर त्या अंगभूत असाव्या किंवा आत्मसात करून घ्याव्या लागतात. अगदी तुम्ही चालता-बोलता कसे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या सगळ्या गोष्टी वैयक्तिक मुलाखत आणि एचआर राऊंडमध्ये तपासल्या जातात. फक्त गोष्टींची माहिती असून चालत नाही, तर त्या गोष्टी उपयोगात कशा आणायच्या हे ही महत्त्वाचे असते. आपली नोकरी टिकविण्यासाठी आणि त्यात प्रगती करण्यासाठी या सगळ्या योग्यता असणे अत्यंत जरूरीचे आहे. सर्वच कंपन्यांमध्ये सध्या एचआर विभाग कार्यरत आहे. त्यामुळे, तुमचा रेझ्युम तुम्ही कंपनीतील ओळखीच्यांकडे पाठवलात, तरी रीतसर प्रोसेसनुसार एचआरला टाळून पुढे जाता येत नाही. त्यामुळंच कँडिडेटची निवड करताना, एचआरकडून कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. सध्याच्या जगात इन्टर्नल आणि एन्स्टर्नल कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचं झालं आहे. कंपनीला बाहेरच्या जगात तुम्ही प्रेझेंट करत असाल तर आणि इन्टर्नली तुम्ही सहकार्‍यांशी, वरिष्ठांशी कसा संवाद साधता, या कम्युनिकेशन स्कील्सच्या कसोटीवर कँडिडेट सिलेक्ट होता का रिजेक्ट हे अनेकदा पाहिलं जातं. त्यामुळं, अ‍ॅकॅडमिक क्वालिफिकेशनसह इतर पूरक गोष्टींतही तुम्ही परिपूर्ण असाल, यासाठी प्रयत्नशील राहा! (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 रोख व्यवहार ; एचडीएफसीकडून शुल्कात वाढ Let's Up Current Affair एचडीएफसी बँकेने रोख व्यवहारांसाठी बचत खातेधारकांवर आकारण्यात येणार्‍या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकड रहित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे नवीन नियम फक्त सॅलरी आणि बचत खातेदारकांना लागू असणार आहेत. तसेच बँकेने होम ब्रँचेजमध्येही फ्री कॅश ट्रांजॅक्शन 2 लाखापर्यंत मर्यादित केले आहे. यावरील जास्त व्यवहारांना जास्तीत जास्त 150 रुपये किंवा 5 रुपये प्रती हजार रुपये भरावे लागणार आहे. बँकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, एचडीएफसी बँकेने 1 मार्चपासून काही व्यवहारांवर आकारण्यात येणार्‍या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही व्यवहारांवर रोखीची मर्यादा आणि काही अन्य ट्रांजॅक्शनवर नव्याने शुल्क आकारण्यात येणार आहे. बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, थर्ड पार्टी सोबत दर दिवशी 25,000 रुपयेपर्यंत व्यवहार करण्याची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच शाखांमध्ये करण्यात येणार्‍या फ्री व्यवहारांची संख्या 5 वरून 4 करण्यात आली असून नॉन-फ्री ट्रांजॅक्शनची शुल्क 50 रुपयांवरून वाढवून 150 रुपये करण्यात आली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 गुगल नंबर वन ब्रँड गुगलने यंदाच्या वर्षात प्रतिस्पर्धी टेक कंपनी अॅपलला मागे टाकत जगातील सर्वाधिक मौल्यवान व लोकप्रिय ब्रँडचा किताब मिळवला आहे. यंदाच्या वर्षात गुगल सर्वाधिक विश्वासार्ह व मौल्यवान ब्रँड ठरल्याचे ब्रँड फायनान्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत 109.4 अब्ज डॉलर (7,194 अब्ज कोटी रुपये) आहे. वर्ष 2011 पासून अॅपल एक नंबरवर विराजमान होता. मात्र, यंदा गुगलने हे स्थान काबीज केले. आकड्यांनुसार गुगलने मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने 24 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

कसा असावा योग्य आहार? Let's Up Health Katta धावपळीच्या जीवनात आपण व्यायामाकडे लक्ष देत नाहीत तसेच आहाराच्या बाबतीतही संतुलन नसते. यामुळे याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणूनच जर आपण आपल्या आहाराकडे थोडं लक्ष दिलं तर या समस्येपासून दूर राहू शकतो... 👉 चुकीचा शाकाहारी आहार : आपण जेवणात कच्ची फळे, भाज्यांच्या ऐवजी हाय ग्लॅमिक कार्बोहायड्रेड, बटाटा, फ्राय फूड, वापरलेल्या तेलाचा जेवणात जास्त वापर करतो. यामुळे हृदय रोगासंबधी आजार उद्भवतात. 👉 फॅट्सची समस्या : स्नॅक्स, फास्ट फूड, बिस्किट, फ्राइड फूड्स तेल यातून ट्रांसफॅट जास्त मिळतात. हे ट्रांसफॅट शरीरासाठी सर्वात घातक फॅट आहेत. म्हणून अति फास्ट फूड खाणे शरीरास फायदेशीर आहे. तसेच रात्री उशिरा जेवण करून लगेच झोपणेदेखील खूप घातक आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 हाय कार्बोहायड्रेड : रोजच्या जेवणात जास्त कार्बोहायड्रेड घ्यावेत. हे कार्बोहायड्रेड आपल्याला धान्यातून मिळतात. कार्बोहायड्रेड हे आपल्याला तांदूळ, डाळ, बटाटा या पदार्थातून जास्त मिळतात. 👉 जेवणाची चुकीची वेळ : उपवास करतो तेव्हा अनेक जण दिवसभर जेवण करत नाही आणि रात्री नेहमीच्या तुनलेत जास्त जेवण करतो. दिवसभर उपाशी राहिल्याचा परिणाम तर होतोच शिवाय रात्री जेवण केल्यानंतर आपल्या शरीरात जास्त कॅलरीज् पोहोचतात. 👉 स्नॅक्स अतिप्रमाणात खाणे : समोसा, फरसाण, भजी आदी पारंपरिक पदार्थ हे मैदा, रिफाइंड शुगर तेल यामध्ये बनवले जातात. याच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरी मिळतात व वारंवार भूक लागते. यामध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि अँटि ऑक्सिडेंट्स सारखे न्यूट्रियंट नसल्यामुळे हे स्नॅक्स आपल्या लठ्ठ बनवतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

NDA पुणे येथे विविध पदांची भरती Let's Up Job Updates पोस्ट : कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) - जागा : 07 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टाइपिंग 35 श.प्र.मि. व इंग्रजी 30 श.प्र.मि. पोस्ट : सांख्यिकी सहाय्यक (Statistial Assistant) - जागा : 01 - पात्रता : B.A. or B.Sc. (Mathematics and Statistics as main subjects), 05 वर्षे अनुभव पोस्ट : ग्राउंड सुपरिटेंडेंट - जागा : 01 - पात्रता : B.Sc. (Agriculture) पोस्ट : कूक - जागा : 03 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा ITI, 02 वर्षे अनुभव पोस्ट : पेंटर - जागा : 01 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा ITI, 02 वर्षे अनुभव (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) पोस्ट : फायरमन - जागा : 01 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 01 वर्ष अनुभव पोस्ट : टेक्निकल असिस्टंट (सायकल रिपेयर) - जागा : 01 - पात्रता : ITI (सायकल रिपेयर) पोस्ट : टेक्निकल असिस्टंट ( बूक बाइंडर) - जागा : 01 - पात्रता : ITI (बूक बाइंडर) पोस्ट : MTS (कार्यालय व प्रशिक्षण) - जागा : 50 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण वय : 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 25 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/BkEixV ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/IBij2n (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - 1 एप्रिलपासून 3 लाख रुपयांच्यावर कॅशच्या स्वरुपात पैसा स्वीकारणाऱ्यांकडून 100% दंड वसूल केला जाणार 👉 नवी दिल्ली - 21 आठवड्यांहून अधिक दिवसांच्या गर्भवती महिलांना करता येणार गर्भपात, सर्वोच्च न्यायालयाने केली समिती स्थापन 👉 उत्तर प्रदेश - रामपूर क्राईम ब्रांच आणि शाहजाद नगर पोलिसांकडून अवैध शस्त्रास्त्रांच्या कारखान्यावर छापा, 110 पिस्तुल जप्त तर पाच जणांना अटक 👉 सुरत - केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या 12 कार्यकर्त्यांना अटक (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 बीजिंग - चीनमधील झेजिआंग प्रांतातील मसाज पार्लरवर गोळीबार, 18 जणांचा मृत्यू तर दोन जखमी झाल्याची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 चेन्नई - शशिकला नटराजन होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री, विधीमंडळाच्या नेत्या म्हणून झाली निवड 👉 गोवा - मडगावमधील 8 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 7 फेब्रुवारीला फेरमतदान घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय 👉 उत्तराखंड - भाजपाने 10 नेत्यांचे 6 वर्षासाठी केलं निलंबन, पक्षाविरोधी कारवाई केल्याचा आरोपखाली झालं निलंबन 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 पुणे - राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या कॉम्पुटर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी दि. 19 मार्च रोजी सीईटी घेतली जाणार 👉 डोंबिवली - मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य पाठपुरावा करावा, त्यासाठी समिती नेमावी, 90 व्या मराठी साहित्य संमेलनात ठराव 👉 पुणे - वृक्षवल्ली परिवाराबरोबरच विविध संस्थांनी एकत्र येऊन सिंहगडावर राबवली स्वच्छता मोहीम, 25 हजार पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक कचरा गोळा 👉 पुणे - गेल्या वर्षभरात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या 32 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द तर 16 दुकानदारांचे परवाने निलंबित 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरीने परतीचे एकेरी सामने जिंकले, डेव्हिस चषकाच्या लढतीत भारताचा न्यूझीलंडवर 4-1 ने विजय 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - श्रद्धा कपूर ही लवकरच एका बायोपिकमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण सीमा पारकरवर आधारित हा चित्रपट असल्याची माहिती (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)