en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 707 subscribers, ranking 5 597 in the Education category and 11 970 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 707 subscribers.

According to the latest data from 06 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -81 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.92%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 344 views. Within the first day, a publication typically gains 1 068 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 707
Subscribers
-324 hours
-477 days
-8130 days
Posts Archive
photo content
+9

photo content
+9

PSI mains 2019 revised result

photo content

🟪पशुसंवर्धन विकास अधिकारी गट - अ निकाल. निकाल पॉईंट मध्ये आहे. www.simplifiedcart.com

🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आ
🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 700+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश ▪️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे. १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार असून; या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे. ‘आम्ही देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असलेल्या महिन्यातच शक्तिशाली अशा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवायला मिळणे हा आमच्यासाठी बहुमान आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला व्हिडीओ संदेशात सांगितले. भारताच्या अध्यक्षपदाचा कामकाजाचा पहिला दिवस सोमवार, २ ऑगस्ट राहणार असून, तिरुमूर्ती हे त्या दिवशी संयुक्त राष्ट्रे मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता. अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे. पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे.

🟪इटलीच्या अध्यक्षतेत जी-20 संस्कृती मंत्र्यांची बैठक संपन्न. जी-20 समूहातील देशाच्या संस्कृती मंत्र्यांची 29 जुलै आणि 30 जुलै 2021 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत भारताच्या केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या सहभागी झाल्या होत्या. वर्तमानात जी-20 संघटनेचे अध्यक्ष असलेल्या इटली देशाच्या सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते. ▪️ठळक माहिती भारताने सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रांचा उपयोग विकासासाठी प्रेरक म्हणून करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती, लेखी यांनी यावेळी दिली. त्यांनी सांस्कृतिक आणि सृजनात्मक क्षेत्रांचा आर्थिक विकास आणि रोजगारासाठी कसा उपयोग झाला आणि महिला,युवक आणि स्थानिक समुदायांना अधिक संधी देण्याची या क्षेत्राची क्षमता देखील त्यांनी अधोरेखित केली. सांस्कृतिक परंपरा आणि वारसाच्या संरक्षणाविषयी या बैठकीत चर्चा झाली. सांस्कृतिक क्षेत्राला जाणवणारे हवामान बदलाचे संकट, प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या मार्गाने क्षमता बांधणी, सांस्कृतिक क्षेत्रासाठी डिजिटल व्यवहार आणि नवीन तंत्रज्ञान यांसहित सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्राचा विकासाचे इंजिन म्हणून उपयोग या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेच्या अखेरीस, जी-20 देशाच्या मंत्र्यानी जी-20 देश सांस्कृतिक कार्यकारी गटाच्या सहकार्य गटाच्या संदर्भ अटींचा स्वीकार केला.संस्कृती मंत्र्यानी यावेळी जी-20 नेत्यांच्या 2021 जी-20 मंत्रिस्तरीय जाहीरनामा स्वीकारला.

🟪नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली” महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली असं वक्तव्य भाजपा नेत्याने केलं आहे. मध्ये प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी हे विधान केलं आहे. पहिले पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने जर अर्थव्यवस्था योग्य स्थितीत ठेवली असती तर आज महागाई नियंत्रणात असती असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. ते भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता विश्वास सारंग यांनी म्हटलं की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे”. “महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे,” असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. भाजपाच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून लोकांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खऱं तर सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं पाहिजे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

🟪अभियांत्रिकीसाठी देशपातळीवर एकच परीक्षा. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेप्रमाणेच (नीट) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीही देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा केंद्रीय प्राधिकरणांचा विचार आहे. निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना करण्यात आली असून, याबाबत चाचपणी सुरू आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय स्तरावर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. निती आयोगाच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. अभियांत्रिकीसाठी देशपातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची सूचना आयोगाच्या सदस्यांनी बैठकीत केली. ‘अभ्यासक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशपातळीवर समान संधी मिळावी यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा असावी,’ अशी गरज सदस्यांनी व्यक्त केली. देशपातळीवर अभियांत्रिकीसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला. त्यातूनच ‘जेईई’ सुरू झाली. या परीक्षेला राष्ट्रीय संस्थांनी नकार दिला. त्यानंतर मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स असे दोन स्तर झाले. जेईई मेन्सच्या गुणांनुसार राज्यांनी त्यांच्या अखत्यारितील संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र, त्याला राज्यांनी विरोध केला. त्यानंतर राज्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्ये त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात, काही जेईई मेन्सचे गुण गृहित धरतात तर काही राज्ये बारावीच्याच गुणांआधारे प्रवेश देतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी २०१७ मध्ये पुन्हा देशपातळीवर परीक्षेची चर्चा सुरू झाली. आता निती आयोगानेही देशपातळीवरील परीक्षेची सूचना केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

🟪दिपक दास: भारताचे 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) दिपक दास हे 01 ऑगस्ट 2021 पासून भारताचे नवीन आणि 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) आहेत. दिपक दास हे 1986च्या तुकडीचे भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) अधिकारी आहेत. ▪️भारताचा लेखा महानियंत्रक. भारताचा लेखा महानियंत्रक हा भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयातील व्यय विभागाचा प्रमुख असतो. केंद्रीय सरकारच्या खात्यांशी संबंधित सर्व माहिती लेखा महानियंत्रक प्रसिद्ध करतो. त्यात अर्थसंकल्पाचा अंदाज, वित्तीय / महसूल तूट इत्यादींशी संबंधित माहितीचा समावेश असतो.

🟪आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?” या प्रश्नावर अधिकारी “हो म्हणाले अन्. ऑलिम्पिक असो किंवा इतर कोणतीही मोठी स्पर्धा असो त्यामध्ये एका खेळासाठी एकच सुर्वणपदक दिलं जातं. मात्र टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक वेगळच चित्र रविवारी पहायाला मिळालं. एका खेळासाठी दोन खेळाडूंना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. विशेष म्हणजे हा संघिक खेळ नव्हता आणि दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या देशांचे आहेत, मात्र त्याचवेळी ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान चालणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये २०० हून अधिक देशांचे ११ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. तिसऱ्यांना जपानमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं जात असून रविवारी या ठिकाणी घडलेला प्रकार हा सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा ठरला. रविवारी सायंकाळी ऑलिम्पिकमधील उंच उडी प्रकाराचे अंतिम सामने पार पडले. यामध्ये कतारचा मुताज बर्सहिम, इटलीचा गनमार्को तेम्बेरी आणि बेलारुसच्या माकसिम या तिघांनी २.३७ मीटर उंच उडी मारली. मात्र तिघांनाही २.३९ च्या विक्रमापर्यंत पोहचता आलं नाही. मात्र दोन प्रयत्नांमध्ये माकसिमला योग्य पद्धतीने उडी मारता आली नाही. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी सरकला आणि त्याला कांस्यपदक देण्यात आलं. मात्र मुताज बर्सहिम आणि तेम्बेरी यांच्यादरम्यान सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार होती. मात्र त्यापूर्वीच बर्सहिमने येथील पंचांना “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?”, असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिलं आणि या दोघांनी एकाचवेळी जल्लोष सुरु केला. विशेष म्हणजे फ्रेण्डशीप डेच्या दिवशीच दोन मित्रांनी अशाप्रकारे सुवर्णपदक शेअर करण्याचा योगायोग जुळून आल्याची चर्चाही सोशल नेटवर्किंगवर रंगली होती.

🟪मोबाइल अ‍ॅपद्वारे पिकांची नोंदणी आता शेतकरी करू शकणार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन निर्मिती केली आहे. टाटा ट्रस्ट च्या सहाय्याने या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

🟪इटलीच्या जेकॉब्जला १०० मीटर शर्यतीचे सुवर्ण इटलीच्या मार्सेल जेकॉब्जने ऑलिम्पिकमधील सर्वात प्रतिष्ठेच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्याने ९.८ सेकंद अशी वेळ नोंदवली. या स्पर्धाप्रकारातील इटलीचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने रौप्य आणि कॅनडाच्या आंद्रे डीग्रेसीने कांस्यपदक मिळवले. उसेन बोल्टने निवृत्त होण्याआधी १३ वष्रे या १०० मीटर शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले

🟪जैवतंत्रज्ञान विभागाची "बायोटेक-प्राइड“ मार्गदर्शक तत्त्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने "बायोटेक-प्राइड (माहिती विनिमयाद्वारे संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन / Promotion of Research and Innovation through Data Exchange) मार्गदर्शक तत्त्वे" विकसित केली आहेत. देशभरातील संशोधक आणि संशोधन संस्थांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करणे तसेच प्रगत संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणे, असे उद्दिष्ट ठेवून ही मार्गदर्शके ठरविण्यात आली आहेत. जैविक माहितीसंग्रह तयार करण्याच्या बाबतीत सर्वोत्तम 20 राष्ट्रांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सुरुवातीला, ही मार्गदर्शक तत्त्वे रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी येथे इंडियन बायोलॉजीकल डेटा सेंटर (IBDC) मार्फत अंमलात आणली जातील. इतर विद्यमान माहिती केंद्रे IBDC याला जोडली जातील, ज्याला “बायो-ग्रीड” या नावाने संबोधले जाईल. बायो-ग्रीड हे जैविक घटकांचे ज्ञान, माहितीसाठी एक राष्ट्रीय भांडार असेल.

photo content
+2

photo content
+5

इतिहासातील_काही_कायदे_1562716050.pdf3.49 MB

इतिहास_काही_महत्त्वाचे_कायदे_By_439592297.pdf1.85 MB

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com