en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 714 subscribers, ranking 5 600 in the Education category and 11 993 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 714 subscribers.

According to the latest data from 04 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -63 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 14.95%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.82% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 042 views. Within the first day, a publication typically gains 1 289 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 714
Subscribers
-1024 hours
-317 days
-6330 days
Posts Archive
photo content
+9

#Hallticket ▪️ सध्या एवढेच ओपन होत आहे. 🔸 COMBINE पूर्व परीक्षा हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇 https://eformsmpsc.org.in
#Hallticket ▪️ सध्या एवढेच ओपन होत आहे. 🔸 COMBINE पूर्व परीक्षा हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇 https://eformsmpsc.org.in/admitCardLogin

#Hallticket 🔸 COMBINE पूर्व परीक्षा हॉलतिकीट आले आहे. 🔲 काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇 https://eformsmpsc.org.in/admitCardLogin

🟪डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स - एलिन जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान धावपटू. ऑलिम्पिक विजेत्या एलिन थॉम्पसन-हेराहने शनिवारी युजिन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यतीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवली. तिने ही शर्यत १०.५४ सेकंदांत पूर्ण केली. सर्वोत्तम वेळेचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ-जॉयनरच्या (१०.४९ सेकंद) नावावर आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधणाऱ्या एलिन हिने शेली-अ‍ॅन फ्रेसर-प्रायसेला दोन-दशांश सेकंदांच्या फरकाने हरवून सर्वानाच धक्का दिला. शेरिका जॅक्सनला तिसरा क्रमांक मिळवून या शर्यतीमधील जमैकाचे वर्चस्व सिद्ध केले. ‘‘सुवर्णपदकासह सर्वोत्तम वेळ हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. कारण गेल्या पाच वर्षांत इतक्या वेगाने मी कधीच धावले नव्हते. २०० मीटर शर्यतीतही विक्रमी वेळ नोंदवण्यास मी उत्सुक आहे,’’ असे एलिनने सांगितले.

🟪दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत ‘जमाव शिबिरे’ आयोजित. भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने भारत सरकारने चालविलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ याचा एक भाग म्हणून, 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2021 या कालावधीत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या (DDU-GKY) अंतर्गत देशभरात 1183 ‘जमाव शिबिरे’ (mobilisation camps) आयोजित करण्यात आली. राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, राज्य कौशल्य अभियान आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध संस्थांच्या सहकार्याने ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांच्या माध्यमातून 371 हून अधिक संस्थांनी अंदाजे 83795 लोकांना रोजगार मिळवून दिला. तसेच शिबिरात भविष्यातील प्रशिक्षण घेणाऱ्या अंदाजे 75660 लोकांची नावनोंदणी देखील करण्यात आली. ▪️दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) विषयी योजनेचा प्रारंभ 25 सप्टेंबर 2014 रोजी झाला. हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने चालविला जाणारा एक देशव्यापी रोजगार भरती-नि-कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. योजना ग्रामीण तरुणांच्या नियुक्तीशी निगडित कौशल्ये निर्माण करण्याचा आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये वेतन नोकऱ्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

🟪जागतिक युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - रुपेरी शैली. भारताच्या शैली सिंगने रविवारी जागतिक युवा (२० वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रुपेरी पदकाची कमाई केली. १७ वर्षीय शैलीचे पदक एक सेंटीमीटरच्या फरकाने हुकल्याचे शल्य ती लपवू शकली नाही. परंतु भारताने या स्पर्धेत प्रथमच एकूण तीन पदके जिंकण्याची किमया साधली. शैलीने अंतिम फेरीमधील तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर अंतरावर उडी मारत आघाडी मिळवली. परंतु स्वीडनच्या मॅजा अश्कागने चौथ्या प्रयत्नात ६.६० मीटर उडी घेत शैलीला मागे टाकले. मॅजाची हीच उडी सुवर्णपदकाची दावेदार ठरली. युक्रेनच्या मारिया होरीलोव्हाने कांस्यपदक पटकावले. शैलीने पहिल्या दोन प्रयत्नांत प्रत्येकी ६.३४ मीटर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नातील लक्षवेधी कामगिरीनंतर तिचा चौथा आणि पाचवा प्रयत्न अपयशी ठरला. मग अखेरच्या प्रयत्नात ६.३७ मीटर अंतर ती गाठू शकली. दरम्यान, महिलांच्या ५ हजार मीटर शर्यतीत भारताच्या अंकिताला सहावे स्थान मिळाले. 🌀२००२-किंग्स्टन : १ पदक 🌀सीमा अँटिल – कांस्यपदक 🌀२०१४-युजिन : १ पदक 🌀नवजीत कौर ढिल्लाँ – कांस्यपदक 🌀२०१६-बायड्गॉस : १ पदक 🌀नीरज चोप्रा – सुवर्णपदक 🌀२०१८-टॅम्पेरे : १ पदक 🌀हिमा दास- सुवर्णपदक 🌀२०२१-नैरोबी : ३ पदके (२ रौप्य, १ कांस्य) 🌀 मिश्र रिले (बी. श्रीधर, कपिल, प्रिया मोहन, सुमी) – कांस्यपदक 🌀 १० हजार मीटर चालण्याची शर्यत – अमित खत्री – रौप्यपदक 🌀लांब उडी – शैली सिंग – रौप्यपदक 🌀आतापर्यंतची एकूण पदके 🌀सुवर्ण रौप्य कांस्य एकूण २ २ ३ ७

🟪देशातील पहिले लष्करी संग्रहालय 🔹महू, मध्यप्रदेश 🔸देशातील पहिले लष्करी संग्रहालय यात लष्कराचा १७४७ पासून २०२० पर्यंतचा गौरवशाली इतिहास, शूर सैनिकांचे बलिदान व शौर्यकथा, 🔸सजीव वाटणारे पुतळे 🔹दोन एकरात हे संग्रहालय 🔸तीन मजली इमारत १७५७ मधील प्लासी लढाई, भारत पाक छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी बोस यांचा इतिहास

🟪भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल ▪️पुर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख ▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

Amvi result

3863.pdf

सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा. सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com 👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.

photo content
+6

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

photo content
+3

photo content
+9

🟪 लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे. ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ हे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान आहे. DRDO संस्थेच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुणे येथील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) येथे काम करणाऱ्या संशोधकांनी सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले. भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ▪️शाफ तंत्रज्ञानाचे महत्व सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी CMDS प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.