वस्ताद अभिप्राय | Vastad Reviews 💯🙏
Open in Telegram
या मध्ये आमच्या विविध कोर्सेस वरील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया टाकणार आहोत.
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
345
Subscribers
+224 hours
+27 days
+430 days
Posts Archive
+2
शिवानी गायकवाड मॅडमचा आज संध्याकाळी msg आला की सर Tax assitant झाले आणि नकळत 3 वर्ष मागे गेलो..
कारण मॅडम आपल्या वस्ताद परिवार च्या राज्यसेवा मुख्य 2023 मेंटॉरशिप च्या विद्यार्थिनी होत्या..त्यानंतर MPSC ची मुलाखत सुद्धा चांगली तयारी केलेली.. प्रत्येकवेळी मॅडम शी कॉल वर बोलणं होत असायच...प्रत्येकवेळी मॅडमच्या बोलण्यातून ती शिकण्याची ओढ दिसायची.समोर येईल ती प्रत्येक परीक्षा मॅडम देत होत..गेल्या 3 वर्षा पासून संघर्ष बघतोय, थोडक्या थोडक्यात यश हुलकावणी देत होत..परंतु खरच मॅडम च्या जिद्दीला सलाम..मॅडम कष्ट करत राहिल्या...मध्येच हार मानली नाही आणि आज कष्टाचं चीज झालं..🔥❤️✨🤞
या उल्लेखनीय यशामागे त्यांच्या अथक परिश्रमांची, जिद्दीची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या यशाचे खऱ्या मानकरी त्या आणि त्यांचे पालक आहेत.
वस्ताद परिवाराने केवळ वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडली, आणि त्या मार्गावर त्यांनी प्रामाणिकपणे व निर्धाराने वाटचाल केली.
तुमची ही यशोगाथा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरो. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम — आणखी उंच भरारी घ्या!
कोल्हापूर च्या अर्पिता मॅडम 2025 सुरुवाती पासून मुख्य मेंटॉरशिप 24,पूर्व मेंटॉरशिप 25 आणि आता मुख्य मेंटॉरशिप 25 पासून सतत संपर्कात आहेत...
प्रचंड मेहनती ,जिद्दी व्यक्तिमत्व..
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व व मुख्य असे दोन्ही टप्पे यशस्वीरीत्या पार केले—तेही Open Female Rank 13 मिळवत कर सहायक पदी निवड झाली.
यावर्षीच्या गट ब पूर्व परीक्षेत त्यांनी 60 गुण, तर गट क पूर्व परीक्षेत 70 गुण मिळवले आहेत.
या यशामागच गमक म्हणजे प्रत्येक वेळी झालेल्या चुकावर सखोल चर्चा करतात आणि त्यातून योग्य बोध घेत अभ्यासात सुधारणा करतात..योग्य दिशेत मेहनत घेतात..
याच सातत्यपूर्ण योग्य दिशेत होणाऱ्या मेहनती च्या जोरावर गट ब 2025 च्या निकालातून त्या आज STI पदी विराजमान झाल्या आहेत...❤️🤞
पूर्व,मुख्य च्या प्रत्येक निकालात त्यांना आलेलं यश हे सर्वस्वी त्यांचं,त्यांच्या मेहनतीच आहे..परंतु काही असतात अवलिये...मनाचा मोठेपणा खूप असतो त्यांच्याकडे... स्वतः च्या मेहनतीच आपल्याला काही कारण नसताना श्रेय देऊन जातात..आणि किती नाही म्हटल तरी आपण सुद्धा नकळत थोड्यावेळ का होईना ढगात जातोच😁🙏🙏
प्रत्येक टप्प्यावर येणारे मॅडम चे msgs नक्कीच आम्हाला सुद्धा प्रेरणा देणारे असायचे..
ते सुरुवातीपासून तुमच्यासोबत शेअर करत आहोत...❤️🤞
नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत....!!
+2
कर सहायक पदी निवड झालेल्या निखिल, निलेश आणि श्रीनिवास सरांच्या प्रतिक्रिया...
❤️🤞
