ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 880
订阅者
无数据24 小时
-227
-8430
帖子存档
20) संयुक्त महाराष्ट्र समितीत कोणते बिगर काँग्रेस पक्ष सामील होते . अ) प्रजा समाजवादी पक्ष ब) लाल निशाण गट क) संयुक्त महाराष्ट्र कॉंग्रेस परिषद ड) शेतकरी कामगार पक्ष
Anonymous voting

19) असत्य विधान ओळखा . अ) 1942 च्या छोडो भारत आंदोलनात ' सुरूंगे' म्हणून ओळख भुमिगत चळवळ आंदोलकांची होती . ब) 1942 च्या छोडो भारत आंदोलनात ' सुरूंगे' म्हणून ओळख महात्मा गांधींच्या आदेशान्वये कैद पत्करणा-या आंदोलकांची होती .
Anonymous voting

18) विजयालक्ष्मी पंडीत संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत अ) त्यांचे मूळ नाव स्वरूप कुमारी असे होते ब) जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी होत्या . क) 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता . ड) त्यांनी ' प्रिजन डेज' हा ग्रंथ लिहिला .
Anonymous voting

17) अयोग्य विधान ओळखा . अ) अरुणा असफ अली यांचे टोपणनाव 'कदम' होते . ब) सुचेता कृपलानी यांचे टोपणनाव ' दादी' असे होते .
Anonymous voting

15) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेल्या प्रकरणात 6 जानेवारी 1943 रोजी देशातील 100 हून अधिक वृत्तपत्रांनी एक दिवसाचा हरताळ पाळला होता .
Anonymous voting

14) खानदेश विभागात छोडो भारत आंदोलनादरम्यान केलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन......... हे गोळीबारात स्वर्गवासी झाले होते.
Anonymous voting

13) महाराष्ट्र एकीकरण परिषद व संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषय कोणती विधाने सत्य आहेत. अ) महाराष्ट्र एकीकरण परिषेदेत स.का. पाटील यांनी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध दर्शविला ब) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा होता
Anonymous voting

12) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खालील पैकी कोणत्या कलाकाराने आपली कला दाखवून लढ्यास बळ मिळवून दिले?
Anonymous voting

11) छ़ोड़ो भारत आंदोलन सुरू करण्या मागे खालील पैकी कोणती करणे कारणीभूत ठरली? अ) लोकांमधील असंतोष वाढत गेला ब) क्रिप्स मिशनची अयशस्वीता क) लोकांच्या मनात ब्रिटिशांचा पराभव होईल असा वाटत होते ड)ब्रिटिशांच्या वरील जनतेचा उडालेला विश्वास
Anonymous voting

10) खालील पैकी अचूक विधाने ओळखा. अ) मिदनापूर जिल्ह्यातील जातीय सरकारचे नेतृत्व चित्तू पांडे यांनी केले. ब) बलिया येथील प्रतिसरकार चे नेतृत्व सतीश कुमार सामंत यांनी केला.
Anonymous voting

9) "ऑपरेशन झेरो अवर" ही इंग्रजांच्या कडून भारतीय नेत्याच्या विरुद्ध राबवलेली मोहीम कोणत्या दिवशी राबवली होती?
Anonymous voting

8) खालील पैकी अचूक विधाने ओळखा. अ) अखिल भारतीय काँग्रेस कंमिटीची बैठक मुंबई येथे 9 ऑगस्ट 1942 रोजी भरली होती. ब) काँग्रेस विर्किंग कंमिटीची बैठक वर्सोवा येथे भरली होती जेथे " ब्रिटिशांनी भारत सोडून जावे " असा ठराव मंजूर करण्यात आला.
Anonymous voting

7) "जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम ज्याचे वास्तव आहे तो महाराष्ट्रीयन"अशा स्पष्ट शब्दात उदगार कडून मराठी भाषा बोलणाऱ्याचे एक राज्य व्हावे अशी मागणी कोणी केली?
Anonymous voting

6) खालील पैकी कोण "संयुक्त महाराष्ट्र समिती"चे सदस्य म्हणून काम केलं आहे ? अ)केशवराव जेधे ब) ग.त्र्य.माडखोलकर क) द. बा. पोतदार ड)श्री. शं.नवरे
Anonymous voting

5) ऑगस्ट क्रांती / छोडो भारत चळवळी दरम्यान रायगड मधील चळवळ कोणी सुरू केली?
Anonymous voting

लोकं तुम्हाला कॉपी करायला लागले की समजून जायच की प्रगती झाली. 🤟🤟 @Mpscdecoded

वाढत्या शहरीकरणामुळे इथून पुढे शहरी प्रशासकीय सेवेचे मानवी जीवन व विकासामध्ये महत्त्व वाढत जाणार आहे . महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेमध्ये यावयाची इच्छा असणार्‍या सर्व शिलेदारांच्या माहितीसाठी 25 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेले नियम देत आहोत.

मग ही भयाण शांतता आवडू लागेल तुम्हालाही... अगदी मनापासून ..... मेंदूत घोंगावणारं विचारांचं वादळ कुणाची मन तर दुखावली जाणार नाहीत ना ..आपल्या शब्दांनी ..आपल्या कृतींनी? याच विचाराचं काहूर नेहमीच माजलेलं ... खरंतर या सगळ्याचा कुणाला काहीच फरक पडत नाही ...आपणच अनावश्यक जास्त विचार करतो ...अमूल्य वेळ वाया घालवतो ...आणि दोष मात्र नशिबाला देतो ..नशीब ....ज्याचं अस्तित्वच नगण्य आहे ... तुम्ही निघालेल्या प्रवासाला ...तुमच्या सोबत असणारी,चालणारी लोकं अचानक गायब होतात ...कदाचित तुमची वेळ ...तुमची स्थिती...याला कारणीभूत असावी..लोकं पसार झाल्यानं ...पसरते एक निरव शांतता..जी भयाण वाटू लागते ...मग तुम्ही फसता एका दृष्टचक्रामध्ये ...गर्दीतही तुम्ही एकटे असता ...आणि एकांतात विचारांची गर्दी ... पण या सगळ्याला अर्थ नसतो ...तुम्हांला या जगाबद्दल जी भावना आहे तीच जगानेही तुमच्याबद्दल बाळगावी हा काही नियम नाही ना ... सरतेशेवटी उरते तीच नकोशी शांतता ...या शांततेनं आता आक्राळ रूप धारण केलेलं असत ...पण आपण थांबायचं नाही..एकच जागी पडून राहायचं नाही ...चालायचं ...जिवाच्या आकांतानं...रडू आलं तर रडायचं ...पण चालत राहायचं .. एका वळणावर जीवघेणी भयाण शांतता पुन्हा सापडेल ...नवीन रूपात ...सुरुवातीला गर्दीत राहणाऱ्यांना त्रास होतो ...पण नन्तर सवय होते ...तेव्हाही चालत राहायचं ...अशा वळणांवर कुणीतरी येईल सोबत चालायला ...हा विचार पण निरर्थक ...अगदीच निर्रथक ... या भयाण शांततेत तुम्ही एकटे नाहीत ...खूप जण चालतायत ...पण कोणच कोणाला दिसत नाही किंबहुना पाहत नाही...कोण दिसलाच दुर्लक्ष करणाऱ्यांचीच संख्या जास्त ...पण तुम्ही तस करू नका .... तर दोन पावलं का होईना ...सोबत चाला.. त्याला साथ दया..त्याच्या मंदावलेल्या पावलांना थोडं का होईना पण बळ मिळेल ... याच शांततेत...खूप गोष्टी..व्यक्ती ..परिस्थिती..वर्तणूक ..शब्द ..कृती .. नजरेसमोरून तरळून जातील ..पण आपल्याला फरक पडत नाही ...कसलाच...कोणाचाच ...या अविर्भावात चालायचं ...चेहऱ्यावर गूढ हास्य घेऊन ...आत खोलवर अगदी वणवा लागला असला तरी ...आग धुमसत राहील काही काळ ...पण होईल शांत तीही ..आग अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेली नाही ... या नंतर तुमच्या मनाला एक अवस्था प्राप्त होईल ...ज्यात तुम्हांला .... ना कोणाकडून अपेक्षा ना कोणाची आपल्याकडून उपेक्षा ना कोणाविरुद्ध जिंकण्याची इच्छा ना कोणाला हरवण्याची इर्ष्या ... हे सारं काही वाटू लागेल ...त्यानंतर थोडं पुढे सरकाल तुम्हांला पुन्हा लाभेल ... तीच अवघड शांतता ... आता या सगळ्या थरार नाट्यांनंतर ही शांतता तुम्हांला आपलीशी वाटायला लागेल ...ज्यात लोकं नसतील ...विचार नसतील ...सवयी नसतील...फक्त तुम्ही असाल ...तुमच्यासाठी ....तुमची तुम्हांला नव्याने ओळख करून देण्यासाठी ... या सगळ्या भयानक नाट्यात सुरू होईल स्वतःला ओळखण्याचा नवा अध्याय ...जो रटाळ असेल सुरुवातीला ...एखाद्या रहस्यमयी कादंबरी सारखा ....पण वाचनाला वेग मिळाला की प्रत्येक उलटलेल्या पानाबरोबर उत्कंठा वाढत जाते...तश्या नवनवीन गोष्टी शोधायला लागाल ...स्वतःला पाहायला शिकाल...स्वतःबरोबर रमायला लागाल ...आता तुम्ही स्वतःबरोबर मैत्री कराल ...स्वतःला ओळखाल ...ही स्वतःची ओळख होणं ...म्हणजे ...कादंबरीचा शेवटी गोड होण्यासारखी भावना ..आता तुम्ही तुम्हांला ओळ्खताय ..अगदी नखशिखांत ....एकदा का तुम्ही तुम्हांला ओळखलं ...तुम्हांला तुमच्या बलाढ्य क्षमतांचा साक्षात्कार झाला .... की .... मग ही भयाण शांतता आवडू लागेल तुम्हालाही अगदी मनापासून ..... © Sagar Kamble STI

#Decodingcurrents Photo मध्ये खाली डाव्या कोपऱ्यात pyq references दिले आहेत..SSM (म्हणजे राज्यसेवा मुख्य), CAPF , आणि UPSC मध
#Decodingcurrents Photo मध्ये खाली डाव्या कोपऱ्यात pyq references दिले आहेत..SSM (म्हणजे राज्यसेवा मुख्य), CAPF , आणि UPSC मध्ये MSP वर आयोगाने प्रश्न विचारले आहेत... Join @Mpscdecoded

4) छोडो भारत आंदोलना दरम्यान" सिक्रेट रेडिओ स्टेशन" केंद्रावरुन नियमितपणे कोण भाषणे देत असत?
Anonymous voting