759
订阅者
+224 小时
+17 天
-330 天
帖子存档
विधीमंडळ आणि त्याच्या सदस्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल सुर्यकांत मोरे यांना शिक्षा देण्याचा निर्णय पण यासोबतच देवेंद्रजींचा संयमीपणा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामगार हितासाठी आणखी एक ठोस पाऊल. मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार मालकी हक्काची घरं
राज्यात “कडक हेडमास्तर” म्हणून देवेंद्र फडणवीस बसले आणि सगळीच गणितं बदलली.
फाईल अडकवणं, पैशाशिवाय काम न करणं, वसुलीचं टार्गेट हीच व्यवस्था झाली होती… पण आता ना तडजोड, ना दिरंगाई.
भ्रष्टाचार केला तर खुर्ची जाते, आणि कायद्याचा फास घट्ट होतो.
MPID गुन्ह्यांमधील आरोपींची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची बाजारभाव किंमत निश्चित करण्यात बराच कालावधी जातो. यासाठी न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये ६ महिन्यात निकाल द्यावा असे बंधन घालण्यात आले आहे. अशा मालमत्ता क्लिअर करून त्यांचा लिलाव लवकरात लवकर करून फिर्यांदींना पैसे परत करण्यात गती आणली जात आहे.
पोलिसांच्या LCB शाखेकडून काही गैरव्यवहार होतात असे निदर्शनास आले आहे. यासाठी या शाखेत प्रामाणिक आणि योग्य अधिकारी नेमण्याची सूचना पोलीस महासंचालकांना केली आहे. कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते.
एक संकल्प पूर्ण, हजारो आयुष्ये सुखी: आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे देवेंद्रजी यांनी सामान्य जनतेला किमान शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत सेवा आणि कल्याणाचे नवीन उदाहरण सादर केले आहे.
पराभवाच्या भीतीने ममता दीदींचा विवेक हरपला, आता आरोप-प्रत्यारोपांचाच पाऊस!
देवाभाऊंच्या कारवाईत भोंदूगिरीला लगाम, फसवणूक करणाऱ्या खरातचा डाव उधळला!
देवाभाऊंनी सांगितली स्व. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर नावामागची भावनिक कहाणी, सेवाभावाची खरी ओळख!
भोंदू बाबा खरात प्रकरणात ज्याचा दुरान्वयी संबंध असेल त्याच्यावर देखील कारवाई होणार कोणालाच सोडलं जाणार नाही देवाभाऊंनी स्पष्टच सांगितलं
“जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥”
संत तुकाराम महाराज यांच्या या ओवीतून ज्या व्यक्तींचं आयुष्य उलगडतं… त्यातलं एक नाव म्हणजे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस.
काही माणसं असतात… जी पदावरून मोठी नसतात, पण मनाने आणि कार्याने उंचावलेली असतात.
नागपूरमध्ये सुरू झालेलं स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे फक्त एक आरोग्यसेवेचं ठिकाण नाही… तर एका विचाराचा, एका संस्कारांचा आणि एका आयुष्यभर जगलेल्या समाजकारणाचा जिवंत पुरावा आहे.
मोफत आणि माफक दरात सुरू झालेलं हे सेंटर… हजारो गरजूंसाठी आशेचा किरण ठरणार आहे. पण या मागची कहाणी समजून घेतली… तर हा केवळ प्रकल्प नाही, तर एक भावनिक प्रवास आहे.
स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस…
राजकारणात असले तरी त्यांची खरी ओळख होती समाजकारणासाठी झटणारा कार्यकर्ता.
त्यांच्या कामाला कधीही स्वार्थाचा स्पर्श झाला नाही. लोकांशी नातं जोडणं, त्यांचं दुःख समजून घेणं, आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं… हेच त्यांचं आयुष्य होतं.
वयस्कर पिढी आजही त्यांच्या नावाने भावूक होते… कारण त्यांनी केवळ राजकारण केलं नाही, तर माणसं जपली.
आणि हाच वारसा पुढे नेतो आहे त्यांचा मुलगा देवेंद्र फडणवीस.
देवेंद्रजींमध्ये दिसणारी कार्यपद्धती, निर्णयक्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन… हा काही योगायोग नाही.
ते त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार आहेत.
गंगाधररावांनी दाखवलेला मार्ग “राजकारण म्हणजे समाजकारण” त्याच मार्गावर आज देवेंद्रजी चालत आहेत.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत… सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व…
चुकीला कडक आणि योग्याला खंबीर साथ देणारी भूमिका…
माणसं जोडण्याचं आणि ती टिकवण्याचं कसब…
हे सगळं गंगाधररावांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे, जे आज देवेंद्रजींच्या कृतीतून स्पष्ट दिसतं.
आज अनेकांच्या हातात सत्ता आली की संपत्ती वाढते…
कोणाकडे उद्योग,शिक्षणसंस्था, कोणाकडे कारखाने, कोणाकडे मोठी संपत्ती…
पण देवेंद्रजींकडे आहे..समाजसेवेचं व्रत, विकासाचं व्हिजन आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची जिद्द.
स्वतःचं मुंबईत घर नसलेला,
पण सामान्य जनतेला, मराठी माणसाला आपले हक्काचे घर मुंबईतच मिळवून देणारा हा सेवक
पण काही घटना घडतात त्या माणसाच्या मनात घर करून जातात..
वडिलांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारामुळे गमावलेल्या
वेदनेतून उपचारांसाठी पैसा अडथळा ठरू नये एक संकल्प उभा राहिला
आणि त्यातून उभं राहिलं अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय…
आणि आता स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने हे डायग्नोस्टिक सेंटर.ज्यात मोफत आणि माफक दरात सेवा उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे हे फक्त उद्घाटन नाही…हा संस्कारांचा विजय आहे.
हा समाजासाठी जगलेल्या आयुष्याला दिलेला खरा सन्मान आहे.
गंगाधररावांच्या प्रतिमेकडे पाहताना…
डोळ्यांसमोर फक्त एक चेहरा उभा राहत नाही, तर एक संपूर्ण विचार उभा राहतो.
त्या विचारात सेवा आहे… निस्वार्थ आहे… आणि माणसांवरचं अपार प्रेम आहे.
आणि मग हळूहळू जाणवतं
तोच विचार आज देवेंद्रजींच्या रूपाने पुढे चालत आहे.
म्हणतात ना
संस्कार कधीच मरत नाहीत…
ते कृतीतून जिवंत राहतात, निर्णयांतून उमटतात आणि काळाच्या पुढे जाऊन समाजाला दिशा देतात.
आज महाराष्ट्राला मिळालेलं हे नेतृत्व… हा “हिरा”…
तो अचानक घडलेला नाही,
तर एका वडिलांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं, त्यागाचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं फलित आहे.
गंगाधररावांनी ज्यासाठी आयुष्य झिजवलं…
त्याच मार्गावर आज अधिक व्यापक स्वरूपात काम सुरू आहे
गरजूंसाठी आरोग्य, सर्वांसाठी विकास आणि प्रत्येकासाठी आपुलकी.
म्हणूनच हे डायग्नोस्टिक सेंटर केवळ एक प्रकल्प नाही…
तर एका पित्याच्या विचारांना दिलेलं जिवंत स्मारक आहे.
मनात खूप काही दाटून येतं…
पण शेवटी शब्द एकाच भावनेत विरघळतात
देवेंद्रजी,
ही केवळ सेवा नाही… हा संस्कारांचा वारसा जपण्याचा तुमचा प्रयत्न आहे.
तो असाच अखंड सुरू राहो…
आणि तुमच्या हातून जनतेचं कल्याण असंच घडत राहो
हीच मनापासून प्रार्थना.
देवाभाऊंच्या पुढाकारातून अत्याधुनिक सेवा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात!
पराभवाच्या भीतीने ममता दीदींचा विवेक हरपला, आता आरोप-प्रत्यारोपांचाच पाऊस!
देवेंद्रजींच्या नेतृत्वात जागतिक स्पर्धेच्या दिशेने झेपावणारा महाराष्ट्र…उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे शब्द म्हणजेच देवेंद्रजींच्या कामगिरीची ठोस पावती.
समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या कामासाठी देवेंद्रजींच्या कार्याचे नितीन गडकरी यांनी तोंडभरून कौतुक केले…जेष्ठ नेत्यांकडून मिळालेली ही दाद म्हणजे उत्कृष्ट कामाची खरी पावतीच!
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
