759
订阅者
无数据24 小时
+17 天
+130 天
帖子存档
जयंतराव तर थेट मणकरणिका घाटावर पोहोचले मला आनंद वाटला, तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उल्लेख केला.
अर्थात तुमच्या सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरच नाव अहिल्यानगर नाही केलं
प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगाव , तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18% आहे. आता या दायित्वाने मला सांगा तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच शक्यच नाही
भांडवली खर्च, 13-14 साली आपला भांडवली खर्च होता वर्षाला 25,129 कोटी. आता तो किती झालाय, आता तो झाला आहे पॅरास्टेटल सहित 2 लाख कोटी
राज्यामध्ये जी महसूली जमा आहे ती 13-14 साली, आपली महसूली जमा किती असायची ती असायची 1 लाख 55 हजार कोटी रुपये. 1 लाख 55 हजार कोटी रुपयावरन ती 6 लाख 16 हजार कोटी रुपयांवर दहा वर्षांमध्ये पोहोचली
महसूली तूट म्हणजे आपण जर महसूली तुटीचा विचार केला तर तीही 1% पेक्षा कमी असली पाहिजे असले आपल्या एफआरबीएमनी सांगितलेल आहे आपली महसूली तूट एक टक्क्याच्या आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेला आहे ते याही वर्षी आलेला आहे
टी २० क्रिकेट विश्वचषक जिंकून कोट्यावधी क्रिकेट रसिकांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फलंदाज शिवम दुबे यांनी मुख्यमंत्री देवाभाऊ यांची भेट घेतली !
महाराष्ट्राने लाडकी बहिण योजना चालवली शेतकऱ्यांना मोफत वीज दिली हे सगळं करूनही राजकोशीय तूट आपली 2.78 टक्के आहेत तीन टक्क्याच्या आत आहे"
आता केंद्र सरकारकडन जे सहाय्यक अनुदाने मिळतात, त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13 हजार 241 कोटी मिळायची, 13 हजार 241 ती आता झाली 68 हजार कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास पाचपट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे.
आपण कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिवोल्युशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली. आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयांचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे.
आता केंद्रीय करातन मिळणारा हिस्सा, हा केंद्रीय करातन आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे 16588 कोटी. हे 16588 कोटी वरन 25-26 मध्ये किती झाले 87 हजार 903 कोटी पाच पटी पेक्षा जास्त दहा वर्षात पाच पटी पेक्षा जास्त..
आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36 36 टक्क्यावर पोहोचले आहेत आणि आपण आजही 18 टक्क्यांवर आहोत आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे कर्ज वाढत आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होतय याची चिंता करण हे अत्यंत गरजेच आहे
एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातल एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25 टक्क्याच्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य अस म्हणतो महाराष्ट्राच ते 18.1 टक्के आहे
आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय
आज देशाच्या जीडीपीमध्ये ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5 टक्के आहे त्याचा देशाच्या जीडीपी मध्ये हिस्सा हा 14.3 टक्के आहे.
देशाच्या जीडीपीत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे.
देशातील एफडीआय मध्ये आपण नंबर वन आहोत.
देशातल्या ऑईल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर एक आहोत.
देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर एक आहोत.
देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर एक आहोत.
बँकांच्या ठेवीत आपण नंबर एक आहोत.
बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर एक आहोत.
जीएसटी संकलनात आपण नंबर एक आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया प्रमाणे वृक्ष अच्छादनातही आपणच नंबर वन आहोत ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे
राज्याचा दरडोई उत्पन्न देखील 3 लाख 17 हजार 800 रुपयावरन, 3 लाख 47 हजार 903 रुपये एवढं वाढलेल दिसत"
सरत्या वर्षामध्ये देशाच्या जीडीपी पेक्षा आपला जीडीपी ग्रोथ हा जास्त आहे आपण 7.9 टक्के या दराने विकसित झालो आहोत
आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे, तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा जीडीपी 16 लाख कोटी होता आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरन, 51 लाख कोटी रुपयावर नेला. म्हणजेच तीन पटीपेक्षा जास्त हा आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी आपण केला .
पहिल्या 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय महाराष्ट्राने ऑस्ट्रिया थायलंड नॉर्वे फिलिपाई्स विएतनाम बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे
महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली तिसवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती
हे सरकार तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरू शकत नाही कारण ते होते म्हणून आम्ही आहोत आमचं अस्तित्व आहे
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
